विज्ञान व तंञज्ञानाचे स्वरूप
विज्ञान व तंत्रज्ञान
विज्ञानचे स्वरुप
लॅटीन भाषेतील सायनेशिया (scientia) या शब्दावरुन इंग्लिशमध्ये (science) हा शब्द आला. त्याचा मुळ सायर (scire) म्हणजे जाणणे / समजावून घेणे. ज्ञान प्राप्त करुन घेणे त्यापासून बनलेला शब्द सायन्स यालाच विज्ञान म्हणतात.
विज्ञानाची व्याख्या ;-
-
“सुसंबंध निरिक्षणाने निरनिराळे आणि वारंवार प्रयोग करुन एखाद्या विषयाचा सुसंगत अभ्यास करून सर्व त-हेच्या अनेक कसोट्या लावून जे ज्ञान व्यवस्थित आणि तर्कशुध्द पणे मांडले जाते त्याला विज्ञान असे म्हणता येईल.”
-
कोनंट –“मानवी बुध्दीने निर्सग घटनांतील कार्यकारण भाव लक्षात घेवून निरीक्षण आणि प्रयोग ह्यांच्या आधारे घटनांचा केलेला सुसंबध्द अभ्यास म्हणजे विज्ञान होय.”
-
“अनुभवजन्य ज्ञानाचा शोध घेण्याच्या शास्रास विज्ञान म्हणतात.”
-
फ्रान्सिस बेकन-“पुर्वग्रह आणि अंधश्रध्दा यांच्या विरुध्द केलेले बंड म्हणजे विज्ञान होय.”
-
कार्ल पॉपर – “प्रत्यक्ष अनुभवांवर अव्याहतपणे सुरु राहणारी प्रक्रिया म्हणजे विज्ञान होय.”
-
डेव्हिस –“आपल्या भोवतालची परिस्थिती समजावून घेण्यासाठी व तिच्यावर प्रभूत्व मिळविण्यासाठी मानवाने जाणीवपुर्वक केलेला प्रयत्न म्हणजे विज्ञान होय.”
शास्त्र –“व्यवस्थित किंवा पध्दतशीर अभ्यासाच्या आधारे तयार केलेल्या कोणत्याही विषयातील ज्ञानरचनेला शास्र असे संबोधले जाते”.
विज्ञानाचे स्वरुप -
-
वस्तुस्थिती- जे ज्ञान कोणीही, कुठेही,कधीही आणि कसेही प्रत्यंतराने मिळवू शकतो ते ज्ञान म्हणजे वस्तूस्थिती होय. जे ज्ञान व्यक्तीनिरपेक्ष असून जी निसर्ग घटना वस्तूनिष्ट आहे त्यास वस्तूस्थिती म्हणतात.
-
प्रत्यंतर क्षमता - प्राप्त झालेल्या ज्ञानाचे प्रत्यंतर घेणे. उदा-ऍसिडमध्ये निळा लिटमस तांबडा होतो.याचे प्रत्यंतर विश्वात कोठेही कायम असते. त्याचे उत्तर कधीही बदलत नाही.
-
अव्याहत शोध – प्राप्त झालेले ज्ञान ठराविक मुदतीपर्यंत उपयुक्त असल्याने वैज्ञानिक ज्ञान ही एक अव्याह्तपणे चालणारी (Nonsstop) प्रक्रिया आहे.
-
उपयुक्तता- मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी ,भविष्यकालीन ज्ञान सुलभ होण्यासाठी विज्ञानाचा उपयोग होतो.मानवाच्या उपयुक्त्ततेनुसार वैज्ञानिक संशोधन बदलत जाते.
-
निश्चितता- शास्त्रीय ज्ञान संदिग्ध स्वरूपाचे नसते . त्यामध्ये निश्चितता असते. ही निश्चितता गणिताच्या माध्यमातून सुत्राच्या आधारे व्यक्त केली जाते. उदा – पाणी १०० अंश सेल्सिअसला उकळ्ते
-
निरिक्षण आणि प्रयोग - व्यापक शास्रीय पुरावा व ज्ञानाची उपयुक्तता वाढविण्यासाठी उपकरणांच्या सहाय्याने निरिक्षण व प्रयोगाद्वारे ज्ञानाची अचुकता ठरविता येते.
विज्ञानाचे वैशिष्ट्येः-
१) वस्तुनिष्ठ सत्याचा शोध – विज्ञान सत्यसंशोधनासाठी प्रयत्नशील असते. वैज्ञानिक सत्य हे व्यक्तीगत स्वरूपाचे नसते तर ते वै चारिक स्वरूपाचे असते. त्याचे स्वरूप स्थल, काल, व्यक्ती निरपेक्ष असते.
2)अनुभव प्रामाण्य- वैज्ञानिक सत्य हे अनुभवजन्य असते . विज्ञान प्रत्यक्ष अनुभवाद्वांरे मिळालेल्या ज्ञानाचाच स्विकार करते.
3)व्यवस्थीकरण- विज्ञानात प्रत्यक्ष अनुभवाद्वारे जी माहीती जमा केली जाते त्या माहितीची परस्परांशी संबंध
जोडून सुसंगती निर्माण करण्याचा किंवा व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला जातो त्याला व्यवस्थीकरण म्हणतात.
4)सामान्यीकरण –वैज्ञानिक मिळालेल्या अनुभवांच्या आधारे सामान्य नियम प्रस्थापित करतो. या प्रक्रियेस सामान्यीकरण असे म्हणतात. विज्ञानाच्या सामान्य नियमांना स्थल कालाची मर्यादा नसते. वैज्ञानिक सत्य हे एक त्रिकालबाधित सत्य असते.
शास्त्रीय ज्ञानाबद्दल काही गैरसमज -
-
प्रयोग आणि प्रयोगशाळाः- सर्वसामान्यपणे वैज्ञानिक ज्ञान हे प्रयोगशाळेत प्राप्त होते हा मोठा गैरसमज आहे.वास्तविक प्रयोगशाळा ही प्राप्त ज्ञानाचे प्रत्यंतर पाळण्यासाठी जास्त प्रमाणात वापरली जातात. तर्कशास्र ,गणित ,ही महत्वाची शास्रे कोणत्याही बाबतीत प्रयोगशाळेशी निगडीत राहिलेली नाही.
-
शास्त्रीय परिभाषा- सर्वसामान्यपणे असा एक समज आहे की वैज्ञानिक ज्ञान हे केवळ वैज्ञानिक सुत्रांच्या आधारे स्पष्ट केले जाते. सुत्रे ही वैज्ञानिक ज्ञान सुसंघटीत करण्यासाठीच वापरली जातात त्यांचा सर्रास वापर केला जात नाही .
-
विज्ञान आणि तंत्रज्ञान – विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकच आहे असे सामान्य माणसांना वाटते. परंतु दोन्ही भिन्न आहे.
-
तंत्रज्ञान – वास्तविक तंत्रज्ञान ही विज्ञानाची एक मर्यादित अशी शाखा आहे.वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे निरनिराळी उपकरणे इ. तयार करण्यासंबंधीचे विकसित केलेले तंत्र म्हणजे तंत्रज्ञान होय. विज्ञानाचा व्यवहारीक वापर म्हणजे तंत्रज्ञान होय.
विज्ञानातील प्रणालीः-
-
वर्गीकरणात्मक प्रणाली- साम्यभेदानुसार वस्तू, पदार्थ किंवा घटना ह्यांचे पाडलेले गट म्हणजे वर्गीकरण होय. उदा. –साधारणतः प्राण्यांचे वर्गीकरण शाकाहारी व मांसाहारी, सर्वाहारी इ. प्रकारात केले जाते .
-
कारणविषयक प्रणाली- निर्सगातील घटना एकमेकांशी कार्यकारणभावाने जोडल्या गेलेल्या असतात.विस्तवाने भाजते असे म्हणतांना विस्तवाशी संपर्क येणे हे कारण असते . अशाप्रकारे कारणविषयक प्रणालीत विविध घटनांचे निरिक्षण करुन शास्रज्ञ त्यातील कार्यकारण भाव समजण्याचा प्रयत्न करीत असतात.
-
गणिती प्रणाली – प्राप्त झालेल्या ज्ञानाचा एका विशिष्ट घटनेपुरताच विचार न करता त्यातनू सर्वच घट्नाबद्द्ल व्यापक विचार मांडतांना शास्रज्ञ गणिती सुत्राचा आधार घेतात . उदा-०पाणी म्हणजे H2O यात २ भाग हायड्रोजन व स१ भाग ऑक्सिजन आहे हे स्पष्ट होते . अशा प्रकारची गणिती सुत्रे शास्रीय ज्ञानाला व्यक्तनिरपेक्ष करीत आहे.
-
उपपत्ती – उपपत्ती म्हणजे विशिष्ट वर्गातील ज्ञान प्रकट करण्यासाठी वापरलेले सामान्य तत्व होय. सामान्यतः उपपत्ती व्यापक स्वरुपाची असते . उदा-गुरुत्वाकर्षणाची उपपत्ती म्हणजे त्या संबंधातील गोष्टींचा खुलासा होय. त्यामध्ये समुद्राची भरती , आहोटी, आकाशस्थ ग्रहगोलांची गती व स्थिती ह्यांचे ज्ञान होय.
विज्ञानाचे वर्गीकरण
शास्त्र
शुद्ध शास्र , व नैसर्गिक शास्र व आकारीक शास्र व तथ्यात्मक शास्र
उपयोजित शास्र सामाजिक शास्र अनुभवजन्य शास्र व मुल्यात्मक
१)शुध्दशास्र व उपयोजीत शास्रेः-
शुध्द शास्रे (pure science)- जेव्हा विज्ञानाचा मुळ उद्देश केवळ घटनांचे वर्णन किंवा स्पष्टीकरण करण्याचा असतो तेव्हा त्यास शुध्द शास्त्र म्हणतात . उदा-जीव ,भौतिक, रसायन इ.
-
विज्ञानाच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे स्वरुप शुध्द शास्राचे असते .
-
शुद्ध शास्राचे प्रवर्तक – न्यूटन ,डार्विन, गॅलिलिओ, मेंडल इ.
उपयोजीत शास्रे (Applied Science)-जेव्हा प्राप्त झालेल्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग केला जातो तेव्हा त्यास नियोजित शास्त्र असे म्हणतात. त्यांचा मुळ उददेश उपयुक्तता असतो.
-
नियोजीत शास्रे मोठ्या प्रमाणावर आहेत .उदा- फार्मसी,बायोकेमिस्ट्री, स्थापत्यशास्त्र,वैद्यकशास्त्र,धातूशास्त्र,धर्नुविद्या इ.
-
शुध्द विज्ञान आणि प्रयुक्त विज्ञान यातील फरक अनेकदा सुक्ष्म असतो. उद्योगधंद्याची वाढ ही मुलतः शुध्द विज्ञानाच्या वाढीबरोबर झालेली आहे .
२) आकारिक आणि अनुभवजन्य शास्रेः-
आकारिक शास्रे- ही विशिष्ट गृहीत तत्वावर आधारित असतात. ही गृहीत तत्वे सिध्द करता येत नाहीत .ह्यात आकार किंवा साचा ह्याला जास्त महत्व असते. ह्याचा संबंध वस्तूस्थितीशी नसतो . जर गृहीत तत्त्वे सत्य असतील तर त्याच्या आधारे काढलेले निष्कर्ष सत्य असलेच पाहिजे . ही शास्रे अमुर्त विचारांचा पाया आहेत. या शास्रांना विज्ञानाचा दर्जा आहे . याचे अनुमाने निगमन पध्द्तीने घेतात. उदा- तर्कशास्त्र, गणित , भूमिती, तत्वज्ञान इ.
अनुभवजन्य शास्रे – आकारिक शास्रे सोडून इतर सर्व शास्रे अनुभवजन्य आहेत .निरिक्षण आणि प्रयोग हा त्यांचा पाया असतो. अनुभवजन्य शास्रांचे वर्गीकरण खालील प्रकारे करतात.
*भौतिकशास्रे – पदार्थविज्ञान,रसायनशास्र , भूगर्भाशास्र ,भूरुपिकी, अंतरिक्ष शास्र इ.
*जैविक शास्रे – प्राणीशास्र , वनस्पतीशास्र, शरीरशास्र, उत्पत्तीशास्र, पर्यावरणशास्रे इ.
*सामाजिक शास्रे – समाजशास्र, राज्यशास्र, अर्थशास्र , इतिहास ,मानव वंशशास्र ,इ.स
*वर्तनाधिष्ठत शास्रे - मानसशास्त्र व मानसशास्त्रातील उपशाखा. ः-मानववंशशास्र,अपराध शास्र.
३) नैसर्गिक शास्त्रे व सामाहिक शास्त्रः-
नैसर्गिक शास्त्रे – याचा मुळ उद्देश निसर्ग घटनांचा अभ्यास करुन त्यांचे स्पष्टीकरण, नियम व उपपत्तीच्या आधाराने करणे एवढेच मर्यादीत असते. ही शास्रे अनुभवजन्य असतात त्यातील निष्कर्ष अचुक असतात. ह्या शास्रात वैज्ञानिक पध्द्तीचा अवलंब केला जातो . उदा- पदार्थ विज्ञान, रसायनशास्र, जीवशास्र, अंतरिक्ष शास्त्र , भूगर्भशास्र, भूगोल इ.
सामाजिक शास्त्रे - ही शास्रे मानवी जीवनाशी निगडीत असतात. तसेच ती एकमेकांत गुरफटलेली असतात. यातील विकास अतिशय मंद गतीने होतो. ही शास्रेसुध्दा अनुभवजन्य असतात. यातील निष्कर्ष ढोबळ मानाने प्रस्थापित होऊ शकतात.
-
नैसर्गिक व सामाजिक शास्त्राची सिमा रेषावरील शास्र – मानस शास्त्र
-
आधुनिक काळात शास्रीय विषयांचे शास्रशुध्द वर्गीकरण कार्ल पिअर्सन यांनी करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी आधुनिक शास्त्राचे १)केवल शास्त्रे २) पार्थिव शास्त्रे ३)जीवन विषयक शास्त्रे असे वर्गीकरण केले.
१) केवल शास्त्रे (Abstract sciences)- तर्कशास्त्र , गणित , संख्याशास्त्र , इ.
२) पार्थिव शास्त्रे (Concreate Sciences)-पदार्थ विज्ञान ,रसायन ,खनिजशास्त्र , भूशा्स्त्र, भूविज्ञान ,वातावरणशास्त्र, खगोलशास्त्र इ.
३)जीवनविषयक शास्त्रे (Biological Science)- मुलदेशविचार (Chornology),परिस्थिती विचार (Ecology ), उत्क्रांतीशा्स्त्र (Evolution ), जीवविज्ञान, शरीरविज्ञान (Morphology), शरीररचना (Anatomy), सुक्ष्म रचना विचार (Histalogy),अनुवंश विचार (Heridity); गर्भविज्ञान (Embryology),मानसशास्त्र , समाजशास्त्र, इ.
४) तथ्यात्मक व मुल्यात्मक शास्त्रेः-
तथ्यात्मक शास्त्रे – जी शा्स्त्रे भोवतालच्या घटनांचा अभ्यास करतांना वास्तववादी दृष्टिकोन व प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व देवून त्यातील कार्यकारण भावाचा शोध घेतात त्यांना तथ्यात्मक शास्त्रे म्हणतात. उदा – भूमिती , खगोलशास्त्रे इ.
मुल्यात्मक शास्त्रे – जी शास्त्रेमानवी जीवनातील मुल्ये व आदर्श यांचा अभ्यास करतात. त्यांना मुल्यात्मक शास्त्रे किंवा आदर्शवादी शास्त्रे म्हणतात . यात काय आहे यापेक्षा काय असावे याला महत्व असते .
-
तथ्यात्मक व मुल्यात्मक दोन्ही प्रकारची शास्रे - राज्य शास्त्र
विज्ञानाचा इतिहास
विज्ञानाची सुरुवात आदिमानवाच्या कालखंडापासुनच झाली . मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात मानवाला शेतीचा शोध लागला . नद्यांच्या काठी विकसित झालेल्या भारतीय संस्कृती, चिनि संस्कृती, मेसोपोटेमियन (इजिप्तशियन) संस्कृती, प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृती यासारख्या संस्कृती ची मानवी जीवनात तसेच वैज्ञानिक विकासात महत्वाचे योगदान आहे .प्राचीन भारतीय संस्कृतीने गणित शास्रे, वैद्यकशास्र ,ज्योतिषशास्रे, रसायन शास्र , इ. क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्या काळातील आर्यभट्ट, भास्कराचार्य यासारखे गणिती. सुश्रुत , चरक, वाग्भट यासारखे वैद्यकशास्त्रेज्ञ यांनी भारतीय विज्ञान नावारुपाला आणन्यास मोठाच हातभार लावला होता. प्राचीन काळात होवून गेलेल्या ग्रीक व रोमन संस्कृतीमधील थेल्स, अऍनॅक्झिमँडर, पायथागोरस, डेमॉक्रॅटिस, हिपॉक्रेटस्, अऍरिस्टॉटल इ. शास्त्रज्ञांचे विज्ञानातील योगदान महत्वपुर्ण आहे.
ग्रीकांची विज्ञान परंपरा
-
ग्रीकांच्या विद्यावैभवाचा व शास्त्रीय प्रगतीचा काल म्हणजे खि. पु. ६०० पासून खि. पु. ३३२ पर्यत मानण्यात येते.
-
ग्रीक नगर राज्यातील मिलेटस व एफ सस ही दोन शहरे व सॅमॉस आणि कॉस ही दोन बेटे इतिहासात वैज्ञानिक परंपरेसाठी फार प्रसिध्द आहेत.
-
ग्रीकांच्या तीन परंपरा मानण्यात येतात -
-
अयोनियन परंपरा – यामध्ये थेल्स, ऍनॅक्झिमॅडर इ. वैज्ञानिकांचा उल्लेख करतात.
-
पायथागोरसची परंपरा – या मध्ये पायथागोरस , झीनो, अकार्टस इ. वैज्ञानिकांचा उल्लेख करतात.
-
अथेनियन परंपरा – या परंपरेत हिपॉक्रेटस , प्लेटो, युडॉक्सस, मेनॅचमस, ऍरिस्टॉटल इ. होते.
-
थेल्स (खि.पु ६२४ – ५४७) – मुत्सद्दी, इंजिनिअर, उद्योगपती, तत्वज्ञ, गणिती खगोलविज्ञान शास्त्रज्ञ म्हणून प्रसिध्द होता. विज्ञाननिष्ठ विचारसरणी यानेच सुरू केली. इजिप्तचा प्रवास करून आपल्या बरोबर त्याने भूमिती विज्ञान सारख्या ज्ञानविद्या आणल्या.
-
ऍनॅक्झिमॅडर (खि. पु ६१० – ५४६) – खगोल विज्ञान , भुविज्ञान आणि सर्वसामान्य तत्वज्ञान यावर कार्य केले. भूमितीवर एक पुस्तक लिहिल्याचे सांगितले जाते. त्याचे ‘ऑन नेचर’ हे पुस्तक प्रसिध्द आहे. त्याने उत्क्रांतीचे तत्वज्ञान सांगितले आहे. माणसाचे पहिले रूप माशासारखे असावे किंवा माणसाची निर्मिती माश्यासारख्या जलचर प्राण्यापासून झाली असावी असे त्याने मांडले. ज्ञात असणा-या भूप्रदेशाचा एक नकाशा तयार केला.
-
ऍनॅक्झिमॅडरचा शिष्य ऍनॅक्झिमिडीज असून त्याने जलतत्वाऐवजी वायूतत्व हे सर्व सृष्टीच्या निर्मितीचे कारण असल्याचे सांगितले.
पायथागोरियन परंपरा
१) पायथागोरस (खि. पु ५७०-५०४) – क्रॉटान येथे एक विद्यामंदीर सुरू केले पायथागोरस स्त्री पुरूष समानता मान्य केली. ख-या अर्थाने गणित विज्ञान उभे केले ते पायथागोरसने असे म्हणावे लागेल. पायथागोरसचा प्रसिध्द सिध्दांत काटकोन त्रिकोणाचा व त्यावरील चौरसाच्या बेरजेचा सर्वज्ञात आहे
.(कर्ण)२=(पाया)२+(उंची)२
इतर सिध्दांत
-
त्रिकोणातील तीन कोनांची बेरीज दोन काटकोनांबरोबर असते .
-
काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील चौरस उरलेल्या दोन बाजूंवरील चौरसाच्या बेरजेबरोबर येते.
-
सम आणि विषम अंकांची विभागणी केली .
-
विभाज्य (Factroble) व अविभाज्य (Prime)अशा अंकांची वाटणी केली.
२) झीनो (खि. पु. ४९५-४३५) मोठा गणिती म्हणून प्रसिध्द होता. कप्पी ,यांत्रिक खेळणी,उडणारे पक्षी हे त्यांचे संशोधन विषय होते.
३) अकार्टस – [पायथागोरियन परंपरेतील यंत्र विज्ञानासंबंधी प्रसिध्द होता.
अथेनियन परंपरा
अथेन्स – हे शहर ग्रीकांची परंपरा वाढविणारे होते.शास्त्र,विद्या,कला,या क्षेत्रात अथेन्सची किर्ती सर्वत्र पसरली होती.
ग्रीकांचे खगोल विज्ञानः-
-
ऍनेक्झॅगोरस (ख्रि. पु.५००-४२८) –चंद्राला सुर्यापासून प्र्काश मिळतो हे याने प्रथम सांगितले . चंद्राच्या कलांची कारणमिमांसा सांगितली. चंद्राचे कमी होणे जास्त होणे हे याने प्रथमच सांगितले.
-
इडॉक्सस (ख्रि. पु.४०७-३५५)- याने खगोल विद्येवर पुस्तक लिहिले. पृथ्वी व या केंद्राभोवती फिरणा-या गोलांच्या कक्षा मांडून दाखविल्या .
ग्रीकांचे पदार्थविज्ञानः-
-
थेल्स- जलतत्वास आदि स्थान देवून त्याची धुके , पाणी व पृथ्वी ही तीन रुपे मानली . ऍनॅक्झिमीडीज यानेवायूतत्वाला महत्व दिले तर, हेरॅक्लिटस याने अग्नितत्व प्रमुख मानले.
-
लुसिपस व त्याचा शिष्य डेमॉक्रिटस (ख्रि.पु.४७०-४००)याने जगाचे स्वरुप कणांचे वा अणूंचे मानले आहे . म्हणजेच ऍटम वा परमाणूने सर्व जग भरलेले आहे असे प्रतिपादन केले . अणू कल्पना अगदी प्राचीन काळी सुरु केली ती डेमॉक्रिटसनेअसेच मानले जाते.
ग्रीकांचे वैद्यक शास्रः-
-
हिपॉक्रेटस (ख्रि. पु४६०-३७७)-ग्रीकांच्या वैद्यकासंबंधीची सर्व हकिगत हिपॉक्रेटसच्या निरनिराळ्या ग्रंथातून मिळ्ते. हिपॉक्रेटसचे महत्वाचे कार्य म्हणजे त्याने धर्मभोळ्या समजूतीपासून वैद्यकीय ज्ञान मुक्त केले . आज वैद्यक शा्स्त्रात विद्यार्थ्यांना जी शपथ दिली जाते ती म्हणजे हिपॉक्रेटसच्या नावानेच दिली जाते . प्राणी मात्रास होणारे रोग हे दैवी कारणांची होत नसून त्याच्या मागे भौतिक कारणपरंपरा असते हे त्याने पटवून दिले . अनेक रोग व त्यावरील उपाय यासंबंधी त्याने लिहून ठेवले आहे . पाश्चात्य वैद्यक शास्त्राचा जनक हिपॉक्रेटस मानला जातो.
ग्रीकांचे जीवविज्ञानः-
-
ऍरिस्टॉटल (ख्रि.पु. ३८४-३२२) एक मोठा तत्ववेत्ता मानला जातो .जगज्जेता अलेक्झांडर द ग्रेट याचा शिक्षक म्हणून तो काही वर्षे राहिला .त्याचे ग्रंथालय खुप मोठे होते .त्याचे प्राणी संग्रहालय व उद्यानही होते .
-
तर्कशास्त्र ,तत्वज्ञान ,आत्मविद्या, नितीशा्स्त्र. राजकारण इ. विषयांवरील महत्वपुर्ण विचार ऍरिस्टॉटलने मांडले.तर्कशास्राचा प्रणेता/जनक म्हणून त्याची ख्याती आहे.
-
जीवनविज्ञानाचा पहिला मोठा निर्माता म्हणून त्यास मानावे लागेल. प्राणीसृष्टीचे त्याने रूधिरयुक्त (Blooded) व रुधिरहिन (Bloodless) असे विभाग केले. ऍरिस्टॉटलचे जीवविज्ञान शा्स्त्रे इतिहासात फार प्रसिध्द आहे . प्राण्यांचा इतिहास हा त्याचा प्रसिध्द ग्रंथ आहे. जीवशास्त्राचा, प्राणीशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो.
-
थिओक्रॅटस – ऍरिस्टॉटल चा शिष्य .याने वनस्पती शास्त्रावर विस्तृत विचार करणारा वनस्पतींचा इतिहास हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला आहे . त्याने वनस्पतीचे वर्गीकरणही केले आहे .वनस्पतींचा औषधी उपयोग ही त्याने नमूद केलेला आहे .
-
अलेक्झांड्रिया विद्यापीठः- अलेक्झांडर दि ग्रेट यानेच स्वतः हे शहर आपल्या विजयाचे स्मारक म्हणून वसविले होते . टॉलेमी घराण्याने आपली राजधानी व्यापार उद्योगाबरोबरच विद्या कला व शास्रे यासाठी प्रसिध्द व्हावे या महत्वाकांक्षेतून नाईलच्या मुखावरील जगप्रसिध्द असे अलेक्झांड्रिया विद्यापीठ उदयास आले (ख्रि . पु ३००) दुस-या टॉलेमीने अलेक्झांड्रियाच्या जगप्रसिध्द ग्रंथालयाची निर्मिती केली. या ग्रंथालयाचे साहित्य, गणित, खगोल विज्ञान आणि वैद्यकअसे चार विभाग होते.
-
युक्लिड (ख्रि.पु.३३०-२७५)-अलेक्झांड्रिया विद्याकेंद्रातील सर्वात महत्वाचा गणिती होता. त्याचे एलेमेंटस ऑफ जॉमेट्रीहे पुस्तक फार प्रसिध्द आहे . त्याचप्रमाणे त्याने खगोलविज्ञान , संगीत , दृकशास्त्र इ. वर लिखाण केले.
-
आर्किमिडीज (ख्रि.पु.२८७-२१२)-त्याने जहाजातून पाणी काढावयाचा स्क्रु शोधला . एक मोठे प्रचंड जहाज त्याने थोड्या मदतीने केवळ चाके व कप्पा असलेल्या यंत्राच्या साहाय्याने हालविल्याची कथा प्रसिध्द आहे . तरफेचे तत्व त्याने व्यवहारात उपयोगी आणले . “मला थोडे इतरत्र उभे राहावयास जागा द्या , मी ही सर्व पृथ्वी उचलून दाखवीन “ हेआर्किमिडीजचे उद्गार प्रसिध्द आहे . नेहमी विचारमग्न असे त्यामुळे स्नान करतांना एका गोष्टीचे उत्तर अचानक सापडले असता तसाच युरेका(सापडले) म्हणून रस्त्यावरुन पळ्त सुटला होता . आसर्किमिडीज हा पाण्याची तरणशीलता व स्थितीशास्रातील मुख्य तत्व यांचा जनक मानला जातो .सापेक्ष घनतेचा सिध्दांत मांडला (एखादा पदार्थ द्रवात अंशतः अथवा पुर्णतः बुडविला असता त्याचे वजन कमी भरते व हे कमी झालेले वजन त्याने उत्सारित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते ) आर्किमिडीजने अनेक प्रकारची गणिते करुन पाय π ची किंमत ३.१४०८ पर्यंत दिली आहे . तरणचा नियम मांडला (तरंगणारी वस्तु तिच्या वजनाइतका द्रव विस्थापित करते .)
-
अपोलोनिअस (ख्रि.पु २६०-२००)- अलेक्झांड्रियाचा गणिततज्ञ म्हणून प्रसिध्द अपोलोनिअसचे जवळ्जवळ चारशे सिध्दांत आहे .त्याचा पुस्तकाचे आठ भाग आहेत .
-
डायोफॉण्टस –बीजगणित हे शास्त्र प्रचलित आणल्यामुळे यास बीजगणिताचा जनक म्हणतात .
-
ऍरिस्टॉकर्स (ख्रि.पु.३१०ते२३०)- अनेक प्रकारची गणिते करुन त्याने पृथ्वीपासून चंद्र सुर्याची अंतरे शोधुन काढली.
-
इरॅटोस्थेनिस (ख्रि. पु. २७६-१९५) –अलेक्झांड्रिया ग्रंथालयाचा प्रमुख होता . पृथ्वीचे मापन करणारा भूगोल विज्ञानाचा प्रवर्तक किंवा भूगोलाचा जनक म्हणून इरॅटोस्थेनिसचे नाव घ्यावे लागते .
-
हिपॉकर्स (ख्रि. पु, १९०-१२०)- खगोलशा्स्त्रज्ञ होता .त्याने मोजमापे घेवुन वर्षाचे ३६५ दिवस ५ तास ४९मिनीटे कालमापन ठरवले.
-
क्लॅडिअस टॉलेमी (इ.स.२ रे शतक)- त्याचे भूवर्णन व ज्योतिषशा्स्त्र यावरील ग्रंथ प्रसिध्द आहे. त्याचा सर्वात गाजलेला ग्रंथ अल्माजेस्ट (अरबी शब्दाचा अर्थ- सर्वात मोठा ग्रंथ ) भूगोल विषयक आठ पुस्तके लिहिली . नकाशे तयार केले. तसेच त्याचा पृथ्वी केंद्री सिध्दांत प्रसिध्द आहे .
-
थिऑन व हिपॉशिया- हे दोघेही गणितीतज्ञ होते . हिपॉशिया हिचा इ.स. ४९५ मथ्ये धर्मवेडाने वध करण्यात आला . इ. स. ६४२ मध्ये खलिफ ओमर या धर्म वेड्याने अलेक्झांड्रिया उध्वस्त केले. तेथील ४०००० ग्रंथ जाळून टाकले.
भारतीय विज्ञान परंपरा
भारतातील प्राचीन विद्यापीठेः –
तक्षशिला विद्यापीठ - इ.स.पू. ८ व्या शतकापसून ४ शतकापर्यत जगाचे लक्ष वेधून घेणारे तक्षशिला विद्यापीठ होय (सध्या पाक मध्ये). नागार्जून, अतीश, वासूदेव,सार्वभौम इ. महान आचार्य या विद्यापीठात होवून गेले.चंद्र्गुप्त मौर्य,कौटिल्य,वैद्यजीवक,पाणिनी इ.नी तक्षशीला विद्यापीठात विद्यार्जन केले असे मानले जाते.
-
नालंदा विद्यापीठ –इ.स.४००ते १२००पर्यंत गुप्त काळात भरभराटीस आले . यातही शास्त्राचा अभ्यास होत असे.१३व्या शतकात बखत्यार खिलजीच्या स्वारीने नष्ट झाले. नालंदा विद्यापीठाची आठवण म्हणून १९५१साली नवनालंदा महाविहार (नालंदा पालि प्रतीष्ठान )बिहार सरकारद्वार स्थापन करण्यात आले
-
भारतातील इतर प्राचीन विद्यापीठे –विक्रमशीला ,उदन्तपुरी, काशी, अयोध्या,गुणशीला, मिथिला, जागद्यल, नवद्वीप, वल्लभी, इ.विद्यापीठे प्रसिध्द होती.
विज्ञानाचा उदयः-
जीवनाकडे पाहण्याचा ऐहिकवादी ,प्रवृत्त्तीवादी द्रुष्टिकोन असल्यामुळे प्राचीन भारतीयांनी विज्ञानवादीकडे फार जाणीवपुर्वक लक्ष दिले होते.जवळ जवळ सर्व शास्त्रांचा अभ्यास प्राचीन काळी होत असत. ६४ कलांबरोबर १४विद्याही शिकविल्या जात. प्राचीन भारतात पुढील शास्त्रे ही अभ्यासली जात . ऋग्वेद , सामवेद , यर्जुवेद , अथर्ववेद , इतिहास , पुराण, व्याकरण, निधी, देवविद्या,तत्वज्ञान, ब्रम्हविद्या,भूतविद्या, नक्षत्रविद्या (ज्योतिष), राशीविद्या (गणित), देवविद्या(व्युत्पत्ती ) इ. विद्याचे अध्ययन केले जात असे.
भारतीय तत्वचिंतक (षड्दर्शन)
न्यायदर्शन –गौतम वैशेषिक दर्शन –कणाद सांख्य दर्शन –कपिल , योगदर्शन – पंतजली वेदांतदर्शन-ब्रादायणी
मिमांसा दर्शन – जैमिनी चार्वाक दर्शन (जडवाद) –चार्वाक
१) कणाद किंवा कश्यप (इ. स. पुर्व २ रे शतक )- यांचा ग्रंथ –वैशषिक दर्शन
-
प्रत्येक पदार्थाच्या मुळाशी अति सुक्ष्म कण असून तो अविनाशी असतो .
-
भविष्य वाणी- परमाणूचे विभाजन केल्यास पश्चातापाची पाळी येईल .
२) आर्यभट्ट पहिला (इ.स.५ वे शतक) जन्म वर्ष इ.स.४७६ मानतात . प्रख्यात ज्योतिष शास्रज्ञ होते . भारतीय खगोल शास्राचा जनक मानला जातो. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पॄथ्वी आपल्या आसाभोवती फिरत फिरत सुर्याभोवती फिरते असे मानणारा भारतीय एकमेव ज्योतिष शास्रज्ञ होता . आर्यभट्टाने पायची किंमत ६२८३२/२०००० ही सांगितली. आर्यभट्टाच्या मते वर्ष हे ३६५ दिवस, १५ घटी , ३१ पळे व १५ विपळे यांचे असते . युरोपियन गणित मापनापेक्षा हे ३ मिनिटे व १९.२५ सेकंदानी जास्त आहे . त्यांचे ग्रंथ- आर्यभट्टीय किंवा आर्य सिध्दांत – हा ग्रंथ गीतकापाद , गणितपाद, कालक्रिया पाद आणि गोलपाद या चार विभागांत आहे.
३) वराह मिहीर (इ. स. ५ वे शतक)- हा खगोल , गणित व ज्योतिष शास्त्रज्ञ म्हणून प्रसिध्द होता .सम्राट विक्रमादित्याच्या दरबारी होता. यांचे जन्मवर्ष ४९० मानले जाते .त्यांनी ग्रीक भाषा शिकून टॉलेमीच्या संशोधनाचा अभ्यास केला व २७ नक्षत्रे व ग्रीकांच्या १२ राशींच्या करून १ राशी= २१/४ नक्षत्रे असे प्रमाण मांडले . त्यांनी ज्योतिष शास्त्रातील सूर्य सिध्दांत मांडला आहे .शुन्याचा शोध लावण्याचे श्रेयही वराह मिहीर यांना दिले जाते. सृष्टी शास्त्रावर स्वतंत्रपणे विचार करणारा पहिला भारतीय शास्त्रज्ञ होय.
ग्रंथ –पंच सिध्दांतिका, बृहत संहिता किंवा वाराह संहिता , बृहत जातका इ. त्यास भारतीय वैज्ञानिक पध्दतीचा जनक मानतात.
४) ब्रम्हगुप्त (इ.स ५९८ते ६६५)- हे हर्षवर्धन काळात होऊन गेले. भास्कराचार्यांनी यांचा गौरव गणकचक्रचुडामणिअसा केला.पृथ्वीच्या अंगी आकर्षण शक्त्ती असल्याचे न्यूटन पुर्वी कित्येक शतके अगोदर प्रतिपादन केले आहे. ग्रंथ- ब्रम्हस्पुट सिध्दांत, खंड खाद्यकरण
५) दुसरा आर्यभट्ट (इ.स.९५०)-ज्योतिष व गणित दोन्ही शास्त्रांत नाव प्रसिध्द झाले.
ग्रंथ- महासिध्दांत हा प्रसिध्द ग्रंथ
याने प्रवर्तित केलेल्या अंक पध्दतीस कटपयादी (बीजगणित)असे नाव आहे.
६) दुसरा भास्कराचार्य (१११४ ते ११७५) - हा मोठा ज्योतिषी होता.सिध्दांत शिरोमणी हा महत्वपुर्ण ग्रंथ होय. गणिताध्याय; व गोलाध्याय हे दोन भाग आहे .लिलावती हा भास्कराचार्याचा गाजलेला ग्रंथ आहे. तो सिध्दांत शिरोमणी याचाच एक भाग किंवा प्रकरण मानला जातो . या ग्रंथात त्यावेळेची कोष्टके , अंकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घनमुळ, व्यवहारी अपुर्णाक, गणितश्रेष्ठी,भूमितीश्रेष्ट. क्षेत्रमापन , त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ चतुरस्त्रांचे क्षेत्रफळ इ. विषय आले आहेत. शुन्यलब्धी तत्वाचा शोध ही त्याची महत्वपुर्ण कामगिरी होय . इतर ग्रंथ –करण कुतुहल ,वासना भाष्य .
७) चरक – सम्राट कनिष्कच्या काळात होवून गेलेले शास्रज्ञ . वैद्यक शास्रातील प्रसिध्द चरकसंहिता हा ग्रंथ लिहिला. या चरक संहितेवर अनेक टिका ग्रंथ लिहिले गेले. त्यातील आठ प्रमुख विभाग – सुत्र स्थान ,औषध विज्ञान , निदान स्थान ,विमान स्थान ,शरिर स्थान ,इंद्रीय स्थान इ.
८) सुश्रुत- तत्कालीन उत्कृष्ट शल्यविदारक होता. सुश्रुतसंहिता हा ग्रंथ लिहिला. . धन्वंतरी व सुश्रुत संहितेत अनेक रोग व त्यावरील औषधांची तपशीलवार माहिती दिली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राला लाजवील असे शस्त्रक्रियेचे वर्णन, शस्त्रक्रियेस आवश्यक हत्यारे यांची माहिती या ग्रंथात दिलेली आहे.
९) वाग्भट – भारतीय वैद्यकशास्त्रात यांचे नाव प्रसिध्द आहे. ग्रंथ – अष्टांग हॄदय, अष्टांग संग्रह.
अष्टांग हॄदयात आयुर्वेदाचे सार आले आहे असे मानतात.
१०) नागार्जुन – भारतीय रसायनशास्त्राचा जनक तसेच धातुशास्त्रज्ञ म्हणून ही प्रसिध्द आहे. ग्रंथ – सिध्द नागार्जुन – या मध्ये भस्मे, संयुगे, संमिश्र धातू, रंग तयार करणे, उर्ध्वपातनाचा शोध, जंतूनाशके, याची माहिती मिळते.
११) कश्यप – कश्यप संहिता हा ग्रंथ लिहिला. यामध्ये बालरोग उपचारांची माहिती दिलेली आहे.
१२) कपिल - यांना संख्याशास्त्राचे प्रवर्तक मानतात. ग्रंथ – सांख्यदर्शन, कपिलगीता, कपिलस्तोस्त्र..
१३) जैवक – हे शस्त्रक्रियेत पारंगत होते. त्यांनी पोटातील रोगांच्या निवारणाविषयी ग्रंथ लिहिला आहे.
१४) राजा जयसिंग द्वितीय (१७२८) – जयपुर या गुलाबी शहराची रचना केली. त्यांचा जयपूरचा हवा महल प्रसिध्द आहे. त्या प्रमाणे दिल्ली, उज्जैन, जयपूर, वाराणशी, मथुरा या ठिकाणी वेध शाळा बांधल्या. त्या पैकी दिल्लीच्या वेध शाळेस जंतर मंतर असे नाव आहे.
२० व्या शतकातील शास्त्रज्ञः–
-
जगदिशचंद्र बोस (१८५८ ते १९३७) – भारतात पदार्थ विज्ञान प्रगतीचा पाया रोवला. १९०६ साली वनस्पतींच्या संवेदनाहे पुस्तक लिहिले. केस्कोग्राफ हे वनस्पतीच्या वाढीचे मापन करणारे यंत्र शोधले. १८९४ साली विद्युत चुंबकीय तरंगाचे धृवीयकरण हा प्रबंध लिहिला. रेडिओच्या शोधाचे श्रेय मार्कोनी या इटालियन शास्त्रज्ञास दिले जाते,परंतु असा पुरावा आहे कि हा शोध जगदिशचंद्र बोस यांनी लावला. १९०१ साली लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट मध्ये बोस यांनी ताण व तणाव व त्याचा जीवितावर होणारा परिणाम सप्रमाण सिध्द करुन दाखविले. भारतीय वनस्पती शास्राचा जनक मानला जातो .
-
प्रफुल्ल चंद्ररे (पी. सी. रे) (१८५९-१९९४४) – रसायन शास्त्रज्ञ, इंडियन स्कुल ऑफ केमिस्ट्री ह्या संस्थेचे संस्थापक होते. नायट्राईट (नत्र रसायने ) ह्यावर त्यांचे प्रभूत्व होते . १८९५ साली त्यांनी मरक्यूरस नायट्राईटचा शोध लावला . श्री . एन. आर. धर ह्या शास्रज्ञाच्या सहाय्याने त्यांनी सर्व प्रथम अमोनियम नायट्राईट तयार केले .ग्रंथ – भारतीय रसायनशास्राचा इतिहास.
-
चंद्रशेखर व्यंकट रमण (१८८८ -१९७०) प्रकाश किरण जेव्हा पारदर्शक माध्यमातून परिवर्तित होतात तेव्हा त्यापासून अनेक रंगसंच निर्माण होतात. हया घटनेस रमण इफेक्ट असे म्हटले जाते.. त्यांना या संशोधनाबद्दल १९३० चे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी धातूतील विदयुत प्रवाह आणि धातूचे चुंबकीय गुणधर्म हयावर सुध्दा संशोधन केले. त्यांनी ध्वनी व धातूतील कंपने यावरही लिखाण केले. १९१७ मध्ये भारतात स्कुल ऑफ फिजिक्स ही संस्था काढली.
रामन इफेक्ट - विभिन्न पदार्थाच्या रेणूमुळे प्रकाश किरण परावर्तित होताना प्रकाश लहरींची लांबी वाढते. हा सिध्दांत२८ फेब्रु .रोजी जगासमोर मांडला म्हणून हा दिवस भारतात ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो . १९३४ ला करंट सायन्स ही वैज्ञानिक पत्रिका सुरु केली. विकीरणामुळे आकाश निळे दिसते असा सिध्दांत मांडला.
-
के .एस. कृष्णन -१९२८ साली चंद्रशेखर व्यंकटरमन व के. एस. कृष्णन हयांनी संयुक्तपणे इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स हया मासिकात एक शोध निबंध लिहिला.
-
एस. एन. बोस (१८९४ ते १९७४) – हयांनी उर्जा पुंज व संख्याशास्त्र यात संशोधन केले. त्यांनी प्लंकच्या नियमावर एक प्रबंध सादर करून तो प्रख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांना पठविला होता. आइन्स्टाइन यांनी स्वतः त्याचे जर्मन भाषांतर केले. पुढे बोस – आइन्स्टाइन संख्याशास्त्र नावाने तो प्रसिध्द झाला. अतिशय प्राथमिक कणांचे त्यांनी वर्गीकरण केले. त्यांना बोसॉन असे नाव मिळाले.
-
मेघनाद सहा (१८९३ ते १९५६) – प्रारंभी खगोल शास्त्रज्ञ म्हणून प्रसिध्द होते. इंग्लंडमध्ये त्यांनी प्रसिध्दथर्मलायझेशनची उपपत्ती प्रसिध्द केली. हया उपपत्ती नुसार अतिशय तीव्र उष्णतामानात ता-यातील अणू आपली नियोजीत कक्षा सोडून ते► इतरत्र भ्रमण करतात. अतिसुक्ष्मग्राही उपकरणाचा शोध लावला. फाउलर या शास्त्रज्ञांनी त्यात अधिक संशोधन करून तारकांच्या वर्ण पटलाची भौतिक उत्पत्ती हा सिध्दांत मांडला. राष्ट्रीय पंचगणात सुधारणा केल्या त्या १९५७ पासून स्विकारल्या.
-
डॉ. होमी भाभा (१९०९ ते १९६६) – १९३८ मध्ये डॉ. भाभा यांनी मेसन अणूतील सुक्ष्म कण हयावर संशोधन केले. कॅसकेड उपपत्ती ही त्यांची महत्वाची कामगिरी होय. टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या स्थापनेत पुढाकार व टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे ते पहिले प्रमुख होते. पदार्थ विज्ञानातील मुलकणांचे सिध्दांत आणि अन्योन्य परिणाम यासाठी डॉक्टरेट मिळाली.टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या स्थापनेत सहभाग घेतला. हायटायलर हा सिध्दांत मांडला. भारतात अणूभट्टी स्थापण करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यामुळे त्यांना भारतीय अणूशक्तीचे जनकम्हटले जाते. १९५५ मध्ये जिनिव्हा येथे भरलेल्या शांततेसाठी अणू या जागतिक परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते.
-
सुब्रमण्यम भारती – डॉ होमी भाभा यांच्या बरोबर अणुशक्तीविषयक संशोधनात महत्वाचा सहभाग होता.
-
हरगोविंद खुराना (१९२२) – त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक १९६८ साली मिळाले. त्यांनी जेनेटिक्स कोडवर संशोधन केले आहे. कृत्रिम इस्ट तयार केले.
-
सुब्रमण्यम् चंद्रशेखर (१९१९ – १९९५) – चंद्रशेखर यांना १९८३ सालचे पदार्थविज्ञान विषयातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या खगोल शास्त्राच्या सिध्दांतास चंद्रशेखर लिमिट असे नाव दिले गेले.
-
बिरबल साहनी – १९१८ साली वनस्पती मुद्रा शास्त्रावरची पहिली लेखमाला सुरू केली. पेट्रोक्सिली वनस्पतीचा शोध लावला. इन्स्टिटयूट ऑफ पॉलिओ बॉटनीची स्थापना केली.
-
शांतीस्वरूप भटनागर – पाण्याच्या पृष्ठभागावर जिरलेल्या वायूचा परिणाम यावर प्रबंध लिहिला आहे. विषारी वायुविरोधी कापडावर चढवावयाचा वार्निशचा शोध लावला. न फुटणारी भांडी, मळीपासून लेप, देशात राष्ट्रीय प्रयोगशाळा व वैज्ञानिक संस्था स्थापन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
-
विक्रम साराभाई – अवकाश संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जातात. ब्रम्हांड व सुर्यमंडळ यांच्यातील गहण प्रश्नांचे सैधांतिक व प्रायोगिक निष्कर्ष काढले.
-
डॉ. जयंत नारळीकर – विश्वाची निर्मिती स्फोटातून झाली. (big bang Theory) आताही सुक्ष्म लहरी अवकाशातून येत असतात हा सिध्दांत त्याच प्रमाणे अंतराळाच्या पोकळीत कृष्ण विवरे असून त्यांना मोठया प्रमाणात गुरूत्वाकर्षण असते.
-
डॉ. राजा रामण्णा – अणू तंत्रज्ञान विकासात डॉ. होमी भाभा यांचे सहकारी. १९७४ च्या पोखरन अणूचाचणीचे प्रमुख सुत्रधार.
-
डॉ. ए. पी. जे. कलाम – १९८१ ते ९० कालावधीत भारताच्या अवकाश प्रगतीत महत्वाचा वाटा. पृथ्वी, अग्नी, त्रिशुल क्षेपनास्त्रांचे प्रमुख शिल्पकार. त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतात.
-
सतिष धवन – रोहीणी ऍपल उपग्रहांचे उड्डाणात प्रमुख सुत्रधार.
-
यू.आर. राव – वैश्विक किरणांबाबत महत्वपूर्ण संशोधन. भारताचा उपग्रह कार्यक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला आहे.
-
सॅम पॅत्रोदा – भारतीय दूर संचार क्रांतीचे जनक, ज्ञान आयोगाचे अध्यक्ष. वर्ल्ड टेलिकम्यूनिकेशनचे अध्यक्ष.
*संकीर्ण *
-
धनुर्वेद – हया ग्रंथात विविध शस्त्रे, सैन्याची रचना, अग्नीबाणाचा वापर इ. चा उल्लेख आला आहे.
-
अश्विनीकुमार – भारतीय वैद्यकशास्त्रात महत्वपुर्ण योगदान दिले.
-
पालकाव्य – पशु विज्ञानावर पुस्तक – हस्त आयुर्वेद
-
अत्रीमुनी – औषधशास्त्राचे जनक म्हणून प्रसिध्द होते
-
आयुर्वेद हा अथर्ववेदाचाच एक भाग होय.
-
सेवन योग्य औषध म्हणून पा-याचा उपयोग करणारे वैद्यक – नागार्जुन
-
उज्जयीनी येथील वेधशाळेचे संचालक – वराहमिहीर
-
भौमितिक तसेच दशमान पध्दतीचा शोध लावण्याचे श्रेय प्राचीन भारतीयांस दिले जाते.
-
सामवेदात संमितस म्हणून उल्लेख- उत्तर,वर्ण व नारद
-
भारतात भूगोल शब्दाचा वापर करणारा शास्त्रज्ञ-सुर्यसिंध्दांत
प्राचीन इजिप्तशियन संस्कृती व विज्ञान
-
पश्चिम आशियातील यफ्रेटिस आणि तैग्रीस यांच्या दुआबात एक संस्कृती उदयास आली.त्यास मेसोपोटेमिया असे नाव दिले आहे.
-
दुआबात सुपीक प्रदेशात सहा हजार वर्षापुर्वी येथे सुमेरियन संस्कृती उभारली गेली.
-
दक्षिणेकडील सेमेटिक टोळीने त्यांना युध्दात पराभव करुन युफ्रेटिस नदीकाठच्या बॅबिलोन शहरी आपली राजवट प्रारंभ केली.
-
मेसोपोटेमियन संस्कृतीचा भाग असलेल्या सुमेरियन संस्कृतीचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे कुंभाराचे चाक होय.
-
बॅबिलोनियन संस्कृती – त्यांच्या धर्म प्राधान्येतून ग्रह ज्योतीषाचा उदय झाला.
बॅबिलोनियन लोकांना आकाशस्थ ग्रहांची व नक्षत्रांची विशेष माहिती होती.
-
त्यांनी वर्षाचे दिवस ३६० मानले असून १२महिन्यांचे वर्ष व ३० दिवसांचा महिना असे काल मापन केले.
बॅबिलोनियनच्या अंक विज्ञानाची विशेष माहिती होती.
-
सात आश्चर्यात गणना झालेली बॅबिलोनची तरंगती बाग इतिहासात प्रसिध्द आहे.
-
वर्णमाला प्रथम तयार करण्याचे श्रेय बॅबिलोनच्या लोकांना आहे.
-
बॅबिलोनच्या आसपास सिरिया,फोनोशिया,पार्शिया इ. संस्कृती उदयास आल्या.
-
युरोपात प्रसिध्द रोमन मुळाक्षरांचा प्रारंभ फोनेशियात झाला.
-
भारतात ० ते ९ चा वापर -७ व्या शतकात ब्राह्म गुप्ताच्या काळापासून सुरु झाला.
चीनचे ज्ञानविज्ञान
-
शिन- तुंग सृष्टीज्ञानावर लिहिलेल्या ग्रंथात ३६५ औषधी वनस्पतींचे वर्णन आहे.
-
त्साइ लुन याने लिहिण्यासाठी बांबूपासून कागद तयार करण्याची पध्द्त शोधून काढ्ली.
-
चीनचे दारुकाम,चीनेचे वैद्यक,चीनेमधील मिपी,चीनमधील कागद या महत्त्वाच्या देणग्या चिनी संस्कृतीची देण आहे.
-
चँग त्सँग नावाच्या पंडीताने बीजेगणित व भूमितीची पुस्तके लिहिली. वजा चिन्हांकित संख्येचा उल्लेख त्याने प्रथम केला.
-
त्सु चुंग चिंह याने पायाची किंमत ६/१० स्थानापर्यत निश्चित केली.
-
भूकंपदर्शक यंत्र इ.स.१३२ मध्ये चँग हँग नावाच्या व्यक्तीने प्रचारात आणले.
-
हौ टी याने विवक्षित दारुची भूल देवून अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या.
आधुनिक विज्ञानाचे टप्पेः-
-
इ.स.४७६ मध्ये रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मध्ययुगाला सुरुवात झाली.कालखंड सुमारे एक हजार वर्षाचा मानला जातो.मध्ययुगाला अंधःकारयुग किंवा तमोयुग या नावानेही संबोधले जाते. कारण प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगतीची मध्ययुगात पिछेहाट झाली.
-
संरजामशाहीचे वर्णन संघटीत अराजकता असे करतात.
-
प्रबोधनकाळात साहित्याचा समृध्द अविष्कार –इटली.
विज्ञान उषाःकालाची कारणे –
-
१)वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उदय
-
२)धर्म सुधारणा चळ्वळ
-
३)मानवता वादाचा उदय
-
४)कॉन्स्टीटीनोपलचा पाडाव-१४५३
मध्ययुगात विज्ञानाची पिछेहाट होण्याची कारणेः-
-
समाज जीवनावरील धर्म संस्थेचा पगडा- धर्म संस्थांनी समाजावरील प्रभाव टिकवण्यासाठी समाज अंधश्रध्दाळू बनविला.धर्मग्रंथात जे काही लिहून ठेवले तेच अंतिम सत्य होय असा प्रचार केला. म्हणजेच शब्द प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्य यांना महत्व प्राप्त झाले.
-
युरोपातील प्रबोधन किंवा पुनरुज्जीवनवादी चळवळीस सुरुवात -१४ व १५ वे शतक
विज्ञानाचा उषाःकालः-
-
रॉजर बेकन (१२१४ ते १२९४) - रॉजर बेकनला आधुनिक उषःकालाचा दूत म्हणतात.आधुनिक वैज्ञानिक विचारसरणी प्रथम पुरस्कार केला. रॉजर बेकन स्वतः वैज्ञानिक नसून एक तत्वज्ञ होता त्याने केलेली अनेक वैज्ञानिक भाकिते सत्य ठरली. उदा- उडत्या मशिनची कल्पना,घोड्याशिवाय धावणारी गाडी, पाण्यावर चालणारे यंत्र इ. त्याच्याआपॅस मेजस ह्या शास्त्र विचारांचा ग्रंथात गणित विद्येचे महत्व स्पष्ट केले आहे.
ग्रंथ – ऑन बर्निंग ग्लासेस, ऑन द मार्व्हलस पॉवर ऑफ अन्व्हेन्शन अँड नेचर,कॉप्युटेशन ऑफ नॅचरल इव्हेंट्स इ.
-
डांटे (इ.स.१२६५ -१३२१) – इटलीच्या प्रसिध्द कवी व तत्वज्ञ.ग्रंथ – दि दिव्हाइन कॉमेडी.
-
लियोनार्दो - द – व्हिन्सी (१४५२ -१५९९) - एक थोर शास्त्रज्ञ,कल्पक इंजिनियर, शिल्पकार,वास्तूशास्त्र चित्रकार इ. नात्यांनी त्याची किर्ती फार मोठी आहे. त्याला संगीत व तत्वज्ञान यांची ही आवड होती. त्याची मोनालिसा, द लास्ट सपर ही चित्रे जगभर गाजली आहेत.या अलौकिक प्रतिभावंत कलावंताने विज्ञानाच्या क्षेत्रातही आपली छाप पाड्ली होती.
-
प्रबोधनाच्या काळातील संपुर्ण मानव असा उल्लेख केला जातो.
-
त्याची कल्पना चित्रे – पाण चक्कीची कल्पना, पाणबुडी,पॅराशुट त्याचप्रमाणे हेलिकॉप्टर .
-
प्रयोगापेक्षा त्याने केली आहे.झाडाच्या कापलेल्या खोडाच्या पोटी जितकी वर्तुळे दिसतील तित्की वर्षे त्या झाडाचे वय असे त्याने लिहून ठेवले आहे. अलेक्झांडर हंबोल्ट्ने १५ व्या शतकातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून लियोनार्दो द व्हिन्सी चा गौरव केला आहे.
-
मॅडिनो – डी – लुझी याने ऍनाटोमिया हे शरीरशास्त्रावरील पुस्तक सन १३१६ मध्ये तयार केले.
-
मायकेल अँजेलो (१४७५ – १५६४) – ह्याची चित्रकार व शिल्पकार म्हणून जगभर ख्याती आहे.मोझेस,ख्रिस्तमाता,डेव्हीड इ. पुतळे प्रसिध्द आहेत. रोमच्या व्हॅटिकन सिटीतील सिस्टिम चॅपेल च्या छ्तावरील भव्य चित्र,त्याचप्रमाणे दि. क्रिएशन व लास्ट जजमेंट ही दोन चित्रे आजही अजरामर होवून गेली.
-
फ्रान्सिस बेकन (१५६१ – १६२६) – महान तत्वज्ञ,मुत्सद्दी, राजकारणी म्हणून प्रसिध्द होता. वैज्ञानिक पध्द्तीचा पाया घातला. दुसरा कोणीतरी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता ती घटना स्वतः निरिक्षणाने खात्री करुन घ्यावी. ग्रंथ – ऑन द ऍड्व्हान्समेंट ऑफ लर्निंग. नव्या शास्त्र पध्द्तीच्या वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा पुरस्कार नोहम ऑरगनम या ग्रंथात केला आहे. त्याच्या न्यू अट्लांटिस या ग्रंथात मानवाने हस्तगत केलेल्या कलांचे व शास्त्रांचे अभ्यास पूर्ण विवेचन आहे. संशोधनाचे पहीले शास्त्र शुध्द परिगमन व वर्गीकरण केले.
-
फ्रान्सिस बेकन हा विगमन (इंडक्टिव्ह) या तत्वज्ञान पध्द्तीचा जनक मानला जातो.
-
पेट्रार्क (१३०४ – १३३४) – दि फर्स्ट मॉडर्न मॅन म्हणून प्रसिध्द होता.
-
देकार्त(१५९६ – १६५०) – विज्ञान हे घटनांच्या निरिक्षणावर अवलंबून असते. विश्वाची रचना गणिती स्वरुपाची आहे. विश्लेषणात्मक भूमिती या नव्या गणित शास्त्राचा शोध लावला. जग हे वस्तूमय निव्वळ यंत्र आहे. विचारांचे सार शंका निर्माण होण्यात आहे.
ग्रंथ – पध्द्तीची मिमांसा. भुमिती व गणित संबंध प्रस्थापित केले.
-
विल्यम हार्वे (१५७८ – १६५७) – रुधिराभिसरणाचे (रक्ताभिसरण) स्पष्टीकरण व प्रयोग राजा चार्ल्स समोर दाखवून दिले.
ग्रंथ – De Motu Cordis (On the motion of Heart)
-
मालपिघी (१६२८ – १६९४) - विल्यम हार्वेच्या रुधिराभिसरणाचे समर्थन केले. पेशी विज्ञानाचा वा शरीरबांधणीच्या शास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. त्याचा सर्वात महत्वाचा शोध हा सुक्ष्म रक्त वाहिन्यांचा शोध होय.
-
लिवेन हॉक – कार्नेलियस,डिब्रन,गॅलिलियो,डॉ हुक, स्टीफ न ग्रे इ. नी भिंगे तयार केली तरी ख-या अर्थाने मायक्रोस्कोपतयार करुन वापरला तो ऍटोनी लिवेन हॉक यांनी. जंतू विज्ञानाचा जनक म्हणून त्याची ख्याती आहे.
-
निकोलस कोपर्निकस (१४७३ – १५४३) – खगोल शास्त्राचा जनक.ह्या पोलिश शास्त्राज्ञाने सुर्य केंद्र सिध्दांत मांडला. त्याने प्रस्थापित टॉलेमीच्या पृथ्वी केंद्री सिध्दांतास विरोध दर्शवून सूर्य हा केंद्र बिंदू असून सर्व ग्रह तारे सुर्याभोवती फिरतात. तसेच पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे. पृथ्वी स्वतःभोवती पण फिरत असते असे त्याने सांगितले.
त्याचे पुस्तक १५४३ मध्ये त्याच्या मित्राने (हेरिकस) याने प्रकाशित केले. फर्स्ट बुक ऑफरेव्हील्यूशन व पुढे त्याचे नाव ऑन दी रिव्होल्यूशन ऑफ दि सेलेश्रिअल ऑरबस. हेवनली बॉडिज हे दुसरे पुस्तक प्रकाशीत केले.
-
थिऑक्रट्स पॅरॅसेल्सस – औषधे व रसायनशास्त्रात महत्वपुर्ण संशोधन केले.
ग्रंथ – Hermetic and Alchemical writings of Paracelsus (लॅटिन भाषेत)
-
लिबॅव्हिअस (१५४० – १६१६) – व व्हॅन हेलमॉट (१५७७ – १६४४) – रसायनशास्त्रज्ञ होते.
-
रसायनशास्त्रात वायूचे (गॅसचे) महत्व वाढले.त्या गॅसचा शोध प्रथम व्हॅन हेलमॉट्न यांनी लावला.
-
विल्यम गिल्बर्ट (१५४०- १६०३) – विद्युतशास्त्राचा जनक म्हणून त्याचा गौरव केला जातो.लोह चुंबक व तज्जन्य विद्युत या संबंधीचे गिलबर्टचे प्रयोग फार महत्वाचे होते.पदार्थ विज्ञानात प्रयोगनिष्ठ ज्ञानाची उभारणी करणारा गिलबर्ट हा पहिला शास्त्रज्ञ मानावा लागतो.पृथ्वी हा एक चुंबक असल्याचे सांगून चुंबक सुईच्या टोकांना दक्षिण धृव व उत्तर धृव अशी नावे दिली.
ग्रंथ – १६०० मध्ये डि मॅग्नेटी हा ग्रंथ प्रसिध्द झाला.
इलेक्ट्रीसिटी हे नाव देवून पदार्थाचे इलेक्ट्रीकल व नॉन इलेक्ट्रीकल असे विभाजन केले.
-
टायको ब्राही (१५२६ -१००१) – खगोलशास्त्रातील महत्वाची उपकरणे तयार केली.
तुरीय यंत्र व सुर्य यंत्र तयार केले.धुमकेतू विषयी स्पष्टीकरणे लिहिली. अक्षांश मोजण्याची नवी पध्द्त शोधली.
-
जोहान केपलर (१५७१ – १६३०) – टायकोब्राहीचा शिष्य होता.ता-यांच्या गती आणि स्थितीबद्द्ल नियम केपलरनेशोधलेले आहे.गृहगोल हे सुर्याभोवती लंबर्तुळात फिरतात.ग्रहाची गती त्याच्या कक्षेच्या निरनिराळ्या भागात निरनिराळी असते. ग्रह सुर्याजवळ आल्यास परिभ्रमणाचा वेग वाढतो.
-
गॅलिलिओ गॅलिली (१५५४ – १६४२) – हा त्या युगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ होता.ख-या विज्ञानाचा प्रारंभ गॅलिलिओसआधुनिक वैज्ञानिक पध्द्तीचा जनक मानतात. त्याने उष्णता मापक यंत्राचा शोध लावला.१६०९ मध्ये जगातील पहिली दुर्बिण तयार केली. मौल्यवान रत्नांची घनता काढण्यासाठी त्यांनी एक हैड्रोस्टीक तराजू निर्माण केला. केप्लरच्या नियमांची सत्यता दुर्बीनीच्या आधारे सिध्द केली.जडत्वाची संकल्पना त्याने प्रथम मांडली. शुक्राच्या कला व गुरुच्या उपग्रहांचा शोध घेतला.
गॅलिलिओचे वैशिष्ट्य तीन वैशिष्ट्यपुर्ण गोष्टीत आढळते.
-
अ) गॅलिलिओचा भर अनुभवांवर होता – प्रयोगाचा खरा वापर त्यानेच सुरु केला. त्याने अनेक विध प्रयोग केले.त्यामुळे त्यास प्रयोगात्मक पदार्थ विज्ञानाचा जनक मानले जाते. बायबलला आव्हान दिल्याने त्यास पोपसमोर उभे करण्यात आले व पातकाबद्दल माफीपत्र लिहावे लागले. दुर्बिणीचा शोध – १६०९
-
ब) विज्ञानात गणिताचा वापर – त्याने ज्ञात केलेल्या प्रयोगांचे पडताळे किंवा प्रत्यंतर गणिताच्या आधाराने केले. गणिती सुत्रांच्या आधाराने आकाशातून खाली पडणा-या वस्तूंची गत्ती मोजता येते ह्यावर त्याचा विश्वास होता.
-
क) प्रयोगशिलता – प्रत्येक शास्त्राज्ञाने वस्तूनिष्ठ दृष्टीकोन ठेवावा या मताचा तो त्याने केवळ प्रयोगच आपणास वस्तूस्थितीकडे नेऊ शकेल असे प्रतिपादन केले.त्याने गणिताचा पाया घातला.
आकाशातून खाली पडणा-या वस्तूचा वेग वातावरणाच्या दाबावर अवलंबून असतो.(पिसाच्या मनोअ-यातून प्रयोग)साम्यानुमानाचा अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ होता.
त्याची पुस्तके – दि मेसेंजर ऑफ दि स्टार्स,ऑन दि सोलर स्पॉट्स, ऑन दि नेचर ऑफ दि कॉमेट्स इ.
-
गिऑर्डनो ब्रुनो (१५४७ – १६००) – गॅलिलिओच्या काळातील प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ होता. कोपर्निक सपेक्षाही क्रांतीकारी कल्पना बोलून दाखविल्या.धर्म पंडिताशी वाद होवून पाखंडी मताबद्द्ल जिवंत जाळून देहांत शासन दिले गेले.त्याच्या १५५३ मधील
ग्रंथ – ऑन दि इन्फीनिट युनिव्हर्स ऍड इटस वर्ल्डस इ. – जिवंत जाळले.
-
ऍड्रिआ व्हेसॅलिअस (१५१४ – १५६४) - शरीर विज्ञान शास्त्रज्ञ – म्हणून प्रसिध्द होता.ख-या अर्थाने मानवी शरीराच्या अभ्यासात यानेच प्रारंभ केला.त्याने मानवी शरीराची व अस्थिसंस्थेची माहिती दिली.
पुस्तके – De Humani corporis, The Anatomy of the Human body हा ग्रंथ त्याने राज चार्लस यास समर्पित केला. आधुनिक वैद्यक शास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो.
-
आयझॅक न्यूट्न (१६४२ – १७२७) - या शतकातील सर्वात मोठा क्रांतीकारक शास्त्रज्ञ होता. प्रकाश हा सात रंगाचा बनलेला आहे .हे त्याने प्रीझम (लोलक) च्या सहाय्याने पृथ्थकरण करुन दाखवले.
-
१६७२ च्या त्याच्या शोध निबंधात म्हटले आहे. – “पांढरा प्रकाश हा अनेक रंगाच्या किरणांचे मिश्रण होवून बनलेला आहे. अमुक एक वस्तू अमक्या रंगाची आहे. याचा अर्थ ती वस्तू बाकीच्या रंगाच्या किरणांचे ग्रहण करुन फक्त विशिष्ट रंगाचे किरण परावृत्त करते.” गुरुत्वाकर्षण उपपत्ती, ग्रह व तारे याची गति स्थिती,समुद्राची भरती,ओहटी, आकाशातून पृथ्वी वर पडणा-या वस्तूची व गती.तात्विक/सैध्दांतिक भौतिक शास्त्राचा जनक. प्रकाश कण सिध्दांत मांडला. प्रकाश वक्रीभवन सिध्दांत मांडला.
कॅल्क्युलस गणिताची नविन शाखा निर्माण केली.
आधुनिक विज्ञानशास्त्राचा प्रवर्तक म्हणून न्यूटनची ख्याती आहे.न्यूटनचे प्रसिध्द ग्रंथ प्रिन्सिपिया हा आहे.यात न्यूटनचे प्रसिध्द गतिविषयक , गुरुत्वाकर्षण सिध्दांत मांडला आहे.
-
सिडेनहॅम (१६२४ – १६८९) – निसर्गोपचार करणारा शास्त्रज्ञ.
-
जॉन मेयो (१६४० – १६७९) – रक्ताचे गुणधर्म तपासले.
रसायनशस्त्रज्ञानः-
-
किमयागार – बर्नाड ट्रिव्हीन्सन (१४०६ – १४९०) - यांनी सोन्याच्या शोधात आयुष्यभर प्रयत्न केले व मृत्यूशय्येवर असतांना निष्कर्ष मांडली की,”सुवर्ण तयार करायचे असेल तर आपणास ते सुवर्णाचेच बनवावे लागेल.”(“To make gold, one must start with gold.”)
-
तेथून पुढे किमयेचे महत्व संपले व रसायनशास्त्राची परंपरा चालू झाली.
न्यूटनच्या समकालीन शास्त्रज्ञः-
-
इव्हजलिस्ट टॉरिचेली (१६०८ – १६४७) – बॅरोमीटर किंवा वायूभारमापकाचा शोध लावला.
-
ऑटो गॅरिक (१६०२ – १६८६) – हवेच्या दाबासाठी प्रयोग करुन हवेचा पंप व वाताकर्षण पंपाचा शोध लावला.
१६५० मध्ये इतिहासप्रसिध्द हवेच्या दाबासंबंधी प्रयोग केला तो म्हणजे त्याने दोन धातूचे अर्धगोल एकमेकांना जोडले व त्यातील हवा काढून घेवून निर्वात बनवले. हवेच्या दाबाने ते इतके घट्ट चिकट्ले की दोन्ही बाजूने ३० घोड्यांना जोडूनही ते धातूचे अर्धगोल वेगळे करता आले नाही. हा प्रयोग त्याने जर्मनीतील मॅग्डेबरी या गावी राजासमोर केला.
-
ब्लास पास्कल (१६२३ – १६६२) – बंदिस्त द्रवावरील दिलेला दाब सर्व दिशांना सारख्याच प्रमाणात असतो हा सिध्दांत मांडला. त्याचप्रमाणे गणिती तत्वज्ञ म्हणूनही प्रसिध्द होता.
-
रॉबर्ट बॉईल (१६२७ – १६११) – पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रात त्याचे नाव विख्यात होते. काही काळ रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते.
रॉबर्ट बॉईल यास रसायनशास्त्राचा जनक म्हणतात.
The Spectical Chemist (1661) हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला.
-
रॉबर्ट हुक (१६३५ – १७०३) – घड्याळे नियमित चालण्यासाठी लागणारी स्प्तिंग शोधून काढली. – पेशीचा शोध लावला.
-
हायगेंझ – होरोलिनियम असिलेटोरियम नावाचा एक गणित ग्रंथ लिहिला.१६५७ म्ध्ये पहिले लंबकाचे घड्याळ तयार केले.
-
ऍरिस्टॉटल – इ.स. पूर्व ३८४ – ३२२ – तर्कशास्त्राचा जनक, प्लुटोचा शिष्य त्याने गतीचे प्रकार केले. – १) स्वाभाविक गती २) जबरदस्तीची गती
विद्युत शास्त्रज्ञः-
मशेन ब्रोक – स्थिर विद्युत घटाचा शोध लावला.(लेड्न जार).
-
बेंजामिन थॉम्पसन (१७५३ – १८१४) – उष्णता ही एक गती आहे, त्या बरोबर ती एक शक्तीही आहे. उष्णतेचा संवहन सिध्दांत मांडला.
-
थॉमस यंग (१७९३) – प्रकाश आणि रंग याविषयी सिध्दांत मांडला. प्रकाश हे एक जड तत्व नसून लहरींनी युक्त असलेली गती असल्याचा निर्वाळा थॉमस यंग याने दिला.
-
कार्ल लिनियस – आधुनिक वनस्पती विज्ञानाचा पाया घातला. सजिवांचे वर्गीकरण, द्विनाम पध्द्ती विकसित केली. – क्रिटिका बोटॅनिका (Critica Botanica) लॅटिन भाषेतील ग्रंथ आहे.
-
कॉनर्ड गेन्झर (१५१६ – १५६५) – प्राण्यांचा इतिहास हा ग्रंथ लिहिला.
-
लॅमार्क (१७४४ – १८२९) – प्राणी विज्ञानाचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ होता. भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे प्राण्यांच्या शरीरात उत्क्रांती व बदल होत जातो. पुस्तक – Natural History of Invertebrate Animals.
-
चार्स्ल डार्विन (१८०९ – १८८२) – १८५९ मध्ये ग्रंथ Origion of Species by Means of Natural Selection.
इतर ग्रंथ – उत्क्रांतीचा सिध्दांत Zoology of the Voyage of the beagle (1840),
The Descent of man (1871), The Ferilization of orchids (1862)
-
अलेक्झांडर फॉन हंबोल्ट (१७६९ – १८५९) – शरीरविज्ञान व प्राण्यांचे वर्गीकरण यात अध्ययन केले. यांच्याच प्रयत्नाने प्राचीन जीव विचार किंवा अश्मीभूत प्राणी शास्त्र ह्या नव्या शास्त्र शाखेचा उदय झाला.त्याचे उदगार – “एखाद्या प्राण्याचा नुसता दात जरी मला मिळाला तरी मी त्या प्राण्याचा संपुर्ण सांगडा तयार करीन.’ त्याचा कॉस्मास (Kosmos) हा भूगोल विषयक ग्रंथ प्रसिध्द आहे.
-
अगॅजिझ (१८०७ -१८७३) – मस्त्यशास्त्र (Ichthyology) ह्या विषयात संशोधन केले. माशांचे वर्गीकरण केले.
-
लुई पाश्चर (१८२२ – १८९५) – या फ्रेंच शास्त्रज्ञाने प्रथम मेढ्यांना होणा-या ऍथ्रक्स रोगाबद्द्ल संशोधन केले. कुत्रे चावल्यामुळे होणारा जलद्वेष (Hydrophobia) रोगावरची लस शोधून काढली.
-
एडवर्ड जेन्नर (१७४९ – १८२३) - देवीची लस शोधली. Vaccination या शब्दातील Vaccinus या लॅटिन शब्दाचा अर्थ of a cow. असा आहे.
-
रेनी लायनेक (१७८१ – १८२६ ) – फ्रान्सच्या शास्त्रज्ञाने छातीचे ठोके तपासणारे स्टेथॉस्कोप या साधनाचा शोध लावला.
-
जेम्स यंग सिंप्सन – १८४७ मध्ये क्लोरोफॉर्म या भूलीच्या औषधाचा शोध लावला.
-
रोनॉल्ड रॉस (१८५७ – १९३२) – मलेरियाचे जंतू शोधून काढले.
-
रॉबर्ट कॉक (१८४३ – १९१०) – क्षय व कॉलराचे जंतू शोधून काढले.
-
हेल्म हॉल्टझ (१८२१ – १८९४) – ध्वनीचा अभ्यास केला. प्रमाणहीन ध्वनीलहरीतून गोंगाट निर्माण होतो तर प्रमाणबध्द लहरीपासून सुरेल संगीत तयार होते.
-
अलबर्ट आईनस्टाईन – त्यांनी सापेक्षता सिध्दांत मांडला त्यांच्या मते अंतर, काळ,गती सापेक्ष संकल्पना आहेत. त्यांनी फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट्ची संकल्पना मांडली. वस्तूमान व ऊर्जा यांचा संबंध E=mc2 या समीकरणाने दाखविली.
औद्योगिक क्रांती (१७६० – १८३०) -
-
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप आणि विशेषतः ग्रेट ब्रिटनमध्ये घडलेली अत्यंत महत्वाची घटना म्हणजे औद्योगिक क्रांती (Industrial revolution) होय. हिचा उदय वाफेवर चालणा-या साधनामध्ये इंजिनचा (जेम्स वॅट १७६५)उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्याने झाला. कारण त्यामुळे उत्पादनाची साधने आणि मार्ग यात आमुलाग्र बदल घडून आला. समाज व्यवस्थेवरही त्यामुळे खोलवर परिणाम झाला.
-
१६ व्या आणि १७ व्या शतकात वैज्ञानिक क्रांतीमुळे ज्या नव्या प्रायोगिक पध्दती अस्तित्वात आल्या त्याचा उपयोग मानवी अनुभवांच्या सर्व क्षेत्रात झाला. नवनवीन तंत्र विकसित करण्यासाठी त्याचा त्याचा उपयोग केला गेला आणि त्यातूनच उत्पादन करणा-या साधनामध्ये आमुलाग्र बदल घडून आला.
त्यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात.
या औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार कारागिर व संशोधन होते.
-
औद्योगिक क्रांती मुख्यःता वस्त्रोद्योगामुळे झाली.
-
वस्त्रोद्योगाबरोबर रसायन व लोह उयोग आणि खाणकाम व दळणवळण यांचेही मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले. १८६९ सुएझ कालवा,१८९६ कौल,१९१४ पनामा कालवा हे कालवे निर्माण केले.त्यामुळे दळणवळण व वाहतुकीच्या सोयीत वाढ झाली.
-
आईस्टाईन – सापेक्षवादाचा सिध्दांत मांडला,काळ आणि स्थिती सापेक्ष संकल्पना आहेत. असे मानणारा पहिला शास्त्रज्ञ,विश्वातील सर्व गोष्टी नित्य नसून प्रत्येक वैश्विक गोष्टीचे आस्तित्व हे दुस-याच्या सापेक्ष असते. स्थळ,काळ , आणि गति निरपेक्ष काळ असूच शकत नाही. चौथे परिणाम – काळ मानले. त्याला नोबल पुरस्कार मिळाला – फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट १९२१ या शोधाबद्दल.
-
महत्वाचे शोध व शोधक
शास्त्रज्ञ |
शोध |
|
|
जोहान गटेनबर्ग,जर्मनी १४५० हॅन्स लिप्पर्रो,नेदरलंड १६०८ टॉरिचेली,इटली १६४३ हायगेंझ,नेदरलँड १६५६ जेम्स हरग्रीव्हज,इंग्लंड १७६४ स्कॉटलँड १७६५ कार्टराईट १७८५ लुई रॉबर्ट ,फ्रान्स १७९८ रॉबर्ट फुलटन,अमेरिका १८०७ हंप्रे डेव्ही,इंग्लंड १८१६ जॉन वॉकर, इंग्लंड १८२७ जार्ज स्टीफन्सन १८३० मायकेल फॅरेडे,इंग्लंड १८३१ जकॉब पार्किन्स, अमेरिका १८३४ सॅम्युअल मोर्स,अमेरिका १८४४ लुई द गॉरा, फ्रान्स १८३९ मॅकमिलन,स्कॉटलंड १८३९ इलिस हार्वे,अमेरिका १८४६ |
छापखाना (छपाईमशीन) दुर्बिणीची भिंगे वायू भारमापक यंत्र लंबकाचे घड्याळ विणण्याचे यंत्र (स्पिनींग जेनी)जेम्स वॅट, वाफेचे इंजिन पॉवर लुम कागद करण्याचे यंत्र आगबोट अभय दिप (सेफ्टी लॅप) आगकाड्याची पेटी वाफेवर चालणारी रेल्वे विद्युत जनक यंत्र यांत्रिक शीतकरण तारायंत्र काळे पांढरे छायाचित्रण सायकल (दुचाकी) शिवण्याचे यंत्र |
|
|
जे एकर्ट व जॉन माँचली डेनिस पापिन लिऑन कॉकल्ट जे.पी.बॅलनचार्ड जॉर्ज इस्ट्मन एस.एस.व्हीलर वाल्डेअर पॉलसन जोहान्स केपलर आयझॅक न्यूटन ग्रॅबीअल फॅरनहाइट जोसेफ प्रिस्ट्ले जेम्स मॅकबेल ए.व्होल्टा विल्यम रॉट्जेन एक्स रे जॉर्ज ओहम चार्लस डफे मशेन ब्रोक मायकेल फॅरेडे चार्ल्स टोन्स विल्यम हर्बल जोहन रिटर हर्ट्झ पियरे व मेरी क्यूरी अर्नेस्ट रुदरफोर्ड अर्नेस्ट रुदरफोर्ड अल्बर्ट मायकेल लावाझिए ओटिस, अमेरिका १८६१ आल्फ्रेड नोबेल,स्वीडन १८६२ शोल्स,अमेरिका १८६८ अलेक्झांडर बेल, अमेरिका १८७६ एडिसन,अमेरिका,१८७७ एडिसन,अमेरिका,१८७९ वॉटरमन,अमेरिका १८८४ लिपमन,फ्रान्स १८९१ अमेरिका १८९१ रुडॉल्फ डिझेल,जर्मनी १८९२ एडिसन,अमेरिका १८९३ मार्कोनी,इटली १८९५ राईट बंधु सी.एफकार्लसन विल्यम पॉल्स डॉ.रॉबिन्सन रॉबर्ट बुन्सेन हेन्सरी ब्रिअर्ली कार्ल यान्स्की आर गॅटलिंग जॉन के डब्ल्यू एफ टालबोट गॅलिलिओ कार्ल फॉन लिंडे डेनिस गॅबर जे एंगल बर्गर लिवेनहॉक एम नॉल व एश्नॉल रस्का रॉबर्ट वॅट्सन – वॅट ए., पेनिएटॉफ जॉन लॉगे बेअर्ड व्हॅनेव्हर बुथ
|
आधुनिक काम्प्युटर प्रेशर कुकर गायरोअस्कोप पॅराशुट सेल्युलाईड फिल्म विद्युतपंखा टेप रेकॉर्ड ग्रहांचे भ्रमण पांढ-या रंगाचे अंतरंग फॅरनहाइट तापमानाचे मोजमाप ऑक्सिजन तयार करणे रेडिओ लहरी विद्युत प्रवाह जे.जे.थॉमसन इलेक्ट्रॉन विद्युत प्रवाह नियम विद्युत्तीकरण स्थिर विद्युत (लेडनजार) विद्युत मोटार लेसर इन्फ्रारेड किरण अल्ट्रा व्हायोअलेट किरण विद्युत तरंग रेडियम अल्फा आणि बीटा कण अणु केंद्र प्रकाशाचा वेग ज्वलन सिध्दांत विजेचा पाळणा सुरुंगाची दारु टाइपरायटर टेलिफोन फोनोग्राफ विजेचा दिवा (बल्ब) फाउंट्न पेन रंगीत छायाचित्रण जॉन हॉलंड, पाणबुडी डिझेल इंजिन चलचित्रपट रेडिओ विमान झेरॉक्स ट्रॅफीकचे दिवे वा-याची शक्ती मोजणारे यंत्र स्पेट्रॉस्कोप स्टेनलेस स्टील रेडिओ दुर्बिण मशीनगन यंत्रमाग फोटोची निगेटीव्ह फिल्म थर्मामीटर फ्रीज होलोग्राफ औद्योगिक यंत्रमानव मायक्रोस्कोप इलेट्रॉन मायक्रोस्कोप रडार व्हीडीओ रेकॉर्ड्र दुरदर्शन ऍनलॉग कॉम्युटर |
विज्ञानातील गृहीतत्त्वे
विज्ञानातील गृहीततत्वे किंवा पुर्व गृहीतके
निसर्गाच्या विविध गुणधर्माविषयी ज्या गोष्टी गृहीत धरल्या जातात त्यांना विज्ञानातील गृहीतके असे म्हणतात.
विज्ञानातील गृहीतके, मुलतत्वे आणि स्वयंसिध्द तत्वे हा विज्ञानाचा पाया आहे .गृहीत तत्वे हे अत्यंत प्राथमिक
तत्व असते ते सत्य आहे असे मान्य करावे लागते .कारण गृहीततत्व प्रस्थापित करता येत नाही तसेच ते खोटेही
ठरविता येत नाही. ही तत्वे स्वंयसिध्द असतात.
-
एखाद्या वस्तूचे वा विषयाचे यथार्थ ज्ञान मिळविण्यासाठी ज्या संकल्पना गृहीत धरल्या जातात त्यानांही
विज्ञानातील पुर्व गृहीतके असे म्हटले जाते. निसर्ग हा सत्य वा वास्तविक आहे ही संकल्पना पुर्व गृहीतकांचा
मुळ गाभा आहे.
पुढील पाच गृहीतके विज्ञान संशोधनात वापरतात. १) निसर्ग नियमबध्द आहे. २) विश्वाचे अस्तित्व स्वतंत्र,
व्यक्ती निरपेक्ष आणि वस्तूनिष्ठ असते.३) निसर्गात घडणा-या प्रत्येक घटनेस कारण असते. ४) निसर्गात एकरुपता
असते. समान घटनांची कारणे व कार्य समान असतात. ५) वस्तूनिष्ठता, व्यक्तीगत दृष्टिकोन न ठेवता निसर्ग घटनांचे
यथायोग्य दिग्दर्शन करणे.
१) निसर्ग वास्तविक आहे किंवा निसर्गाचे प्रत्यक्ष अस्तित्व – अनुभवजन्य विश्व हे वास्तविक किंवा सत्य आहे शास्त्रज्ञ
मानतात.ग्रीक लोकांनी विश्व महाकाय यंत्र मानले. विश्व नियमानुसार कार्य करते आणि ते नियम मानव आपल्या
इच्छेनुसार बदलु शकत नाही.
निरिक्षण आणि प्रयोगाच्या साहाय्याने निसर्गाच्या सत्यता पडताळता येते. जर निसर्गाचे प्रत्यक्ष अस्तित्व नसते.तर
निरिक्षण अर्थहीन असते. म्हणून निसर्ग वास्तविक आहे .हे मान्य करावे लागते.
२) निसर्ग सुव्यवस्थित आहे – ग्रीक तत्ववेत्ता थेल्सची निसर्गाच्या सुव्यवस्थेवर नितांत श्रध्दा होती यातूनच त्याने
केलेल्या ग्रहणाची भविष्यावाणी खरी ठरली.
असिमॉव्ह या प्रसिध्द लेखकाने ‘गाइड टू सायन्स’ या पुस्तकात लिहिले आहे. ‘निसर्ग सुव्यवस्थित असून जर आपण
योग्य रितीने व योग्य दिशेने प्रयत्न केले तर निसर्ग सर्व रहस्य मानवासमोर उघड करेल व मध्येच आपली भूमिका
बदलणार नाही.’यातूनच ऍरिस्टॉटलने तर्कशास्त्राची निर्मिती केली.
३) ‘संपुर्ण विश्व आणि त्यातील असंख्य घटना यात एक सुव्यवस्था आहे.’ ही ज्ञान प्राप्तीची महत्वाची दिशा आहे.
निसर्गाचे ज्ञान प्राप्त करण्याच्या ह्या पध्दतीला ग्रीकांनी Pholosophia असे नाव दिले म्हणजेच ते तत्वज्ञान होय.
कारण तत्वज्ञान म्हणजे तत्वाचे ज्ञान होय.
सुव्यवस्थेचा अभ्यास चार प्रकाराने करतात-
अ) वर्गीकरणात्मक प्रणाली – ही प्राथमिक अवस्था आहे .प्राप्त ज्ञानाच्या सोयीसाठी वर्गीकरणाची आवश्यकता भासते.
ब) कारणविषयक प्रणाली – निसर्गातील घटनांत आणि त्यांचे गुणधर्मात सहसंबंध असतात.प्रत्येक घटनेस कारण एकदा
निश्चित झाल्यावर बदलत नाही.कारणानंतर कार्य उपस्थित होते.
क) गणिती प्रणाली – विज्ञानातील प्रणाली गणिताच्या माध्यमातून स्पष्ट केल्या जातात .ह्याची सुरुवात प्रथम गॅलिलिओने
केली.
ड) उपपत्ती – ज्याच्या आधारे विज्ञानातील सामान्य तत्वे स्पष्ट केली जातात त्यास उपपत्ती म्हणतात.
उपपत्तीमध्ये विविध घटनांतील सामान्य संकल्पना स्पष्ट होत जातात.प्रत्यक्ष अनुभवाने उपपत्ती सत्य की असत्य आहे हे
पडताळून पाहता येते.
४) निसर्ग एकविधतेचे तत्व – निसर्ग आणि नियमबध्दता ह्यावर असणारी अढळ आणि नितांत श्रध्दा म्हणजे निसर्ग एकविधतेचे
तत्व होय. निसर्गातील नियम बध्दतेमुळेच निसर्गात एकवाक्यता किंवा एकविधता निर्माण झालेली दिसते.निसर्गात व्यापक
विविधता असली तरी त्यात काही तरी एक तत्व निश्चित असते.
-
समान परिस्थितीत समान घटना समान प्रमाणात व समान प्रकारे घडतात.
निसर्ग घटना विशिष्ट अनुक्रम पाळतात. निसर्गात विविध प्रकारच्या एकरुपता आढळतात.
-à सहअस्तीत्वाची एकरुपता
निसर्ग एकरुपतेचे प्रकार ----------------à अनुक्रमाची एकरुपता
-à कारणाची एकरुपता
अ) सह अस्तित्वाची एकरुपता – पदार्थ आणि त्याचे प्राथमिक गुणधर्म एकाच वेळी अस्तित्वात असतात .म्हणजेच पदार्थाला त्याच्या प्राथमिक गुणधर्मापासून अलग करता येत नाही. उदा. बर्फापासून शीतलता, जाळ (अग्नी) पासून उष्णता, फुलापासून सुगंध इ.
ब) अनुक्रमाची एकरुपता – निसर्गातील घटना एकामागून एक विशिष्ट अनुक्रमाने घडत असतात. त्या बदलत नाही त्यास अपवाद नसतो.
उदा. दिवसामागून रात्र – ऋतुक्रम इ.
क) कारणाची एकरुपता गुणांची – पाण्याने तहान भागते .उष्णतेने धातू प्रसरण पावतात. इ. समान कारणांपासून समान कार्ये होतात.
-
प्रसिध्द तर्कशास्त्रज्ञ सुझन स्टेबिंग या प्रकारास गुणाची एकरुपता म्हणतात. त्या म्हणतात, ‘जे काही घडते ते नियमानुसार घडते व
हे नियम असे आहेत की आपण त्यांचा शोध घेवू शकतो.’
५) सरलतेचे तत्व – ज्यात कमीत कमी संकल्पनाचा वापर केलेला असतो अशा सिध्दांतास सरळ सिध्दांत म्हणतात.
उदा- टॉलेमीचा सिध्दांत सरल नसल्याने बाद झाला तर आइन्स्टाइनचा अवघड असूनही सरल असल्याने मान्यता पावला.
-
मध्ययुगातील तत्ववेत्ता ओकमचा विल्यम याने विनाकारण संकल्पना वाढवू नये अशी कल्पना मांडली.
-
ओकमचा वस्तरा – ‘एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण करतांना विनाकारण संकल्पना वाढवू नयेत.’
-
सरलतेच्या तत्वानुसार विनाकारण संकल्पना वाढवू नये.विचारात बचत असावी आणि त्यात मुद्देसुदपणाबरोबर अचुकता असावी
सरलतेच्या तत्वाचे उपघटक -१) अभासीत्वाची कमी शक्यता २) अर्थवाद
३) गतिमान सरलता ४) मुलभूत संकल्पाची कमी संख्या.
६) निसर्ग नियमांचे बुध्दीगम्य स्वरुप – निसर्गाच्या नियमांचे स्वरुप मानवी बुध्दीस आकलन होण्यासारखे असते. असा वैज्ञानिकांचा
ठाम विश्वास असतो. त्यासाठी वैज्ञानिक सतत प्रयत्नशील असतात.
७) विज्ञानात अंतिम काहीही नसते – सत्य शोधणे हे विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे .विज्ञानाचे काही नियम प्रस्थापित केले असले तरी
ते नियम अंतिम स्वरुपाचे असतात असे विज्ञान मानीत नाही. नवी माहिती उजेडात येवून ज्ञानाची क्षितीजे रुंदावतात. नव्या
प्रकारात पूर्वीचे नियम चुकीचे व अपुरे वाटतात. सत्याचा शोध ही विज्ञानाची अखंड चालणारी साधना आहे.
८) कारण सिध्दांत – प्रत्येक घटनेस कारण आहे किंवा शुन्यातून काहीही निर्मान होत नाही.
ऍरिस्टॉटलने उद्देशमुलक आणि हेतूमुलक (Teleogical) कारण कल्पना मांडली. त्याचे मत होते प्रत्येक घटनेमागे काहीना काही
उद्देश असतो.त्यामुळे ऍरिस्टॉटलने कारणाची चौभागी कल्पना मांडली.विश्वात जे जे होते ते सर्व हेतूपुरस्कार होते अशी त्याची
दृढ भावना होती. काळाच्या ओघात त्यात बदल झाले त्यातून पुढे कारणाची यांत्रिक संकल्पना मांडली गेली.
-
कारणाच्या यांत्रिक संकल्पनेचे न्यूटन व गॅलिलिओ हे पुरस्कर्ते होते.
-
गॅलिलिओची कारण कल्पना – त्या आणि केवळ त्याच घटनेस कारण म्हणता येईल की जिच्या अस्तित्वावर लगेच कार्य घडून येते
आणि जिच्या नष्ट होण्याचे कार्यही नष्ट होते.
-
कारणाची शास्त्रीय संकल्पना (Scientific Nation of cause)-जॉन स्टुअर्ट मिलच्या मते, कारण म्हणजे भावात्मक आणि
अभावात्मक घटनांचा समुच्चय आहे. त्याच्या मतानुसार कारण सिध्दांत शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीचा टेकू आहे.
त्याच्या मतानुसार कारण सिध्दांत शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीचा टेकू आहे.
-
उद्देश मुलक किंवा हेतू मुलक कारण कल्पना –ऍरिस्टॉटल
-
कारण कार्याच्या तात्काळ आधि निर्माण होते –कारण हे स्वयंपूर्ण व स्वयंसिध्द असते.
-
कारण हे नेहमी आधी घडणारे असते.कारण आणि कार्य ह्यांचा संबंध अपरिवर्तनीय असतात. उदा.-अ हे ब चे कारण असल्यास पुढे
ब हे क चे कारण होवू शकते. पंरतु ब हे अ चे कारण कधीच होवू शकत नाही.
-
कार्यापुर्वी लगेचच आधी घडणारी कोणतीही घटना तिचे कारण होउ शकत नाही. कारण हे आवश्यक व पुरेशा घटकांचा समुच्चय असते
किंवा एखादे विशिष्ट कार्य वेगवेगळ्या कारणांमुळे घडू शकते.
-
कारण वादाला वैज्ञानिक पध्दतीचा स्तंभ बनविले –न्यूटन
वैज्ञानिक दृष्टिकोन
-
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व – वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विज्ञानाच्या अध्ययनाबरोबरच मानवी जीवनाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी उपयोग होतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही विषयाच्या पध्दतशीर अध्ययनासाठी अवलंबिण्यात येणारा दृष्टिकोन होय.
वैशिष्ट्ये :-
१) चिकित्सक वृत्ती – एखाद्या गोष्टीच्या सतत्येविषयी अभ्यासकाच्या मनात शंका उत्पन्न होणे यास चिकित्सक वृत्ती म्हणतात
वैज्ञानिकास प्रत्येक गोष्ट पारखून घ्यावी लागते.
२) पुर्वग्रहाचा अभाव – पुर्वग्रह म्हणजे एखादा गोष्टीसंबंधी अपुर्ण माहितीवर काढलेले अनुमान होय.
वैज्ञानिक अथवा अभ्यासक तटस्थ वृत्तीचा असावा.
३) वस्तूनिष्ठता – वस्तूनिष्ठता याचा अर्थ वस्तूस्थितीचा किंवा वास्तव परिस्थितीचा आहे त्या स्वरुपात स्वीकार करणे होय.
वस्तूस्थितीशी डोळस दृष्टिकोन ठेवून एकनिष्ठतेने राहणे.वस्तूनिष्ठता हा विज्ञानाचा आत्मा समजला जातो .वस्तूनिष्ठ ज्ञान
आपणास दृष्टि, श्रवण व आकलन याद्वारे मिळते.
४) प्रत्यक्ष अनुभूती – कोणत्याही गोष्टीचा किंवा निष्कर्षाचा सत्य म्हणून स्विकार करण्यापुर्वी निरिक्षण व प्रयोगाने स्वतः अनुभूती घ्यावयाची असते.
वैज्ञानिक विचारसरणीची लक्षणे:-
-
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्विकार करुन सत्यसंशोधनाचा केलेला प्रयत्न आणि त्याच्याशी सुसंगत अशी विचार प्रणाली म्हणजे वैज्ञानिक विचार सरणी होय. वैज्ञानिक विचार सरणीची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे
१) बुध्दी प्रामाण्य – प्रत्येक गोष्ट आपल्या बुध्दीच्या कसोट्या लावून पडताळून घेण्यात बुध्दी प्रामाण्यवादी प्रयत्नशील असतात.वैज्ञानिक
विचार सरणीचा ग्रंथ व शब्द प्रामाण्य यावर विश्वास नसतो.
२) कार्यकारण संबंधाचा शोध – एखाद्या घटनेला नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत झालेली असते किंवा एखादे कार्य निश्चित कोणत्या
कारणामुळे घडून आले त्याच डोळसपणे शोध घेणे.
३) तर्कशुध्दता – विज्ञानाचा संबंध तथ्याशी असतो आणि तथ्याचा शोध उचित अनुमानाच्या सहाय्याने घेतल्या जावू शकतो यालाच
तर्कशुध्दता म्हणतात.
वैज्ञानिक विचारसरणीच्या मार्गातील अडथळे:-
१) व्यक्तीगत पुर्व ग्रह – व्यक्तीगत पुर्व ग्रहामुळे वास्तवतेशी इमान राखणे अशक्य होते त्याकरीता वैज्ञानिकाने तटस्थ असले पाहिजे.
२) स्वमताचा अभिनिवेश – वास्तव परिस्थिती न बघता आपलेच म्हणणे खरे समजण्याची वृत्ती होय.
३) व्यक्तीगत स्वार्थ – अभ्यासकाचा अभ्यास विषयातील हितसंबंध असणे .त्यामुळे तो वस्तूनिष्ठ भूमिका स्विकारु शकत नाही .तसेच
अभ्यासकाच्या इच्छा आकांक्षा त्याचा अहंकार इ. मुळे वैज्ञानिक विचार सरणीला बाधा पोहोचते.
मूलभूत संकल्पना - जीवनशास्त्र
१. दृष्टिपटल (retina)- हे नेत्रगोलाच्या आतील संवेदी पटल असून ते रंगद्रव्य, संवेदी पेशी व चेता पेशीचे बनलेले असते. संवेदी पेशीचे प्रकार-
१. दंडपेशी – यात जांभळे रंगद्रव्य rhodopsin असते. ह्या पेशी मंदप्रकाशात संवेदनक्षम असतात.
२. शंकूपेशी- यात दॄगजंबू नावाचे रंगद्रव्य असते व या प्रखर प्रकाशात संवेदनक्षम असतात. शंकू पेशीमुळे प्रतिमा स्पष्ट दिसत असते. तसेच रंगदृष्टि लाभते. दृष्टीपटलाच्या मध्यभागाजवळ खळग्यात शंकूपेशी मोठ्याप्रमाणावर केंद्रीत झालेल्या असतात. या खळग्यांना पीतबिंदू असे म्हणतात. या भागात सुस्पष्ट प्रतिमा तयार होते. दृष्टीपटलातील चेतापेशीच्या तंतूनी दृष्टिचेता तयार होते. दृष्टिचेता नेत्रगोलाच्या सर्व पटलास छेदून नेत्रगोलाच्या मागील बाजूने बाहेर पडतात. दृष्टिपटलाच्या ज्या बिंदूतन दृष्टीचेता नेत्रगोलातून बाहेर पडते.त्या बिंदूत संवेदी पेशी नसतात. त्यामुळे या बिंदूत प्रतिमा तयार होत नसते. म्हणून यास अंधबिंदू म्हणतात.
ब) डोळ्यांशी संलग्न घटक
-
नेत्र स्नायू – या सहा स्नायूमुळे नेत्रगोल पाहिजे त्या दिशेने वळतात. हे ४ सरळ व २ तिरपे असतात. हे स्नायू कमकुवत असले तर डोळ्यात तिरळेपणा येतो.
-
अश्रु ग्रंथी- यांमुळे डोळ्यांची बाहेरील बाजू नेहमी ओलसर ठेवली जाते. तसेच धुलीकण बाहेर वाहून नेले जातात व जीवाणू नष्ट होतात.
-
नेत्र भिंग- नेत्रभिंगाची वक्रता कमी-अधिक होत असल्यामुळे लांबच्या व जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर अचूक पडते. या कार्यतंत्रास दृष्टिसमायोजन म्हणतात.
-
नेत्रकांचाभद्रव- नेत्रगोलाच्या मागील बाजूस नेत्रभिंग व दृष्टिपटल यामधील मोठा कक्ष जेलीसारखा कांचाभ द्रवपदार्थाने भरलेला असतो या नेत्रकांचाभद्रवामुळे नेत्रगोलाचा आकार कायम राहतो.
-
नेत्र श्लेषमला (Cunjunctiva)- हा पातळ पारदर्शक पडदा नेत्रगोलाच्या बाहेरील बाजूस व पापणीच्या आतील बाजूस असतो.
-
डोळ्यांचे कार्य- दृष्टिपटलावर पडणारी प्रतिमा वस्तूच्या आकारापेक्षा लहान व उलटी असते. वस्तुची प्रतिमा दृष्टिपटलावर पडल्यानंतर वस्तू दृष्टिआड झाल्यावरही तिच्या प्रतिमेची जाणीव सुमारे १/१० सेकंद कायम राहते. या काळात दृष्टिपटलावर दुस-या प्रतिमांचा आवेग तयार झाल्यास वस्तूच्या हालचालीच्या सलगपणाची जाणीव होते. या क्रियेला दृष्टिसातत्य म्हणतात. चित्रपट किंवा दुरदर्शन मध्ये या तंत्राचा वापर करतात.
दृष्टिदोष
१. निकट / - हस्व दृष्टिता (Myopia)- हा दृष्टिदोष असलेल्या व्यक्तीला लांबच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. या व्यक्तीचा नेत्रगोल वाजवीपेक्षा लांबट असतो. किंवा त्याच्या नेत्रभिंगास जास्त वक्रता आलेली असते. लांबच्या वस्तूची प्रतिमा त्यामुळे दृष्टीपटलाच्या समोर कक्षात पडते. लांबच्या वस्तूची प्रतिमा पाहण्यासाठी आंतरवर्क्रभिंगाचा चष्मा वापरतात.
२. दीर्घ/दुरदृष्टिता (Hypermetropia)- हा दोष असलेल्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. या व्यक्तीचा नेत्रगोल एक तर लहान असतो. अथवा नेत्रभिंगाला कमी वक्रता आलेली असते. जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे पडते. बर्हिवक्र भिंगाच्या चष्म्याने प्रतिमा पुढे सरकून दृष्टिपटलावर पडते व जवळची वस्तू स्पष्ट दिसते.
३. वृध्द दृष्टिता (persbyopia)- वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर नेत्रभिंगाची शक्ती कमी होत असते . त्यामुळे नेत्रभिंगाची वक्रता कमी होते व प्रतिमा दृष्टिपटलावर स्पष्टपणे पडत नाही. यालाच वृध्द्ददृष्टिता म्हणतात. हा दोष दुर करण्यास बर्हिवक्र भिंगाचा चष्मावापरला जातो.
४. दृष्टिवैशम्य (Astigmatism)- पारपटलाच्या (cornea) वक्रतेमध्ये जर बदल झाला तर अस्पष्ट प्रकाश किरणांच्या वक्रीभवनाच्या भिन्नतेमुळे दृष्टिपटलावर अस्पष्ट प्रतिमा पडते. यास दृष्टिवैशम्य म्हणतात. दंड गोलाकृती भिंग वापरल्यास हा दोष नाहीसा होतो.
५. मोती बिंदू (cataract) वृध्दावस्थेत नेत्रभिंग अपारदर्शक होण्याची शक्यता असते. या दोषाला मोतीबिंदू म्हणतात.
हा दोष दूर करण्यासाठी नेत्रभिंग काढून टाकले जातात व विशिष्ट भिंगाचा चष्मा वापरून प्रतिमा दृष्टिपटलावर पडतात.
६. काच बिंदू (Glaucoma)- नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला तर त्यास काचबिंदू म्हणतात.
७. रातांधळेपणा- हा दोष असलेल्या व्यक्तीस मंद प्रकाशात नीट दिसत नाही. अ जीवनसत्वाअभावी हा दोष निर्माण होतो. कारण अ जीवनसत्व दंडपेशीतील – होडॉपसीन या रंगद्रव्याचा एक महत्वाचा घटक आहे.
८. ट्रॅकोमा (Trocoma)- हा संक्रामक दृष्टिरोग आहे यात नेत्रश्लेमाला सूज येते. नेत्रश्लेमाला व कॉर्निया अपार दर्शक होत जातो.
B) कान
कान हे श्रवणेंद्रिय असून ते शरीराचा समतोल राखण्याचेही कार्य करत असतात. कानाचे तीन भाग पडतात.
अ. बाह्यकर्ण- ध्वनीलहरींचे संकलन करणे, विजातीय पदार्थ श्रवणनलिकेत जाऊ न देणे.
ब. मध्यकर्ण- ग्रहण केलेल्या ध्वनीलहरींमुळे येथे कंपने निर्माण होतात. यातील तीन हाडांमुळे ध्वनीची तीव्रता १० पट वाढते.
क. अंतरकर्ण- अंतरकर्णाचे प्रघान, अर्धवर्तुळाकार नलिका व कर्णावर्त असे तीन भाग असतात. यामधील अर्धवर्तुळाकृती नलिकेत असणा-या संवेदीग्राही पेरिलिम्फ शरीराचा समतोल साधण्यास मदत करतात.
कर्णदोष
१. संवहनी बहिरेपणा (conductive)- जेव्हा बाह्यकर्ण ध्वनीलहरी अंतरकर्णापर्यंत पोहोचवू शकत नाही. तेव्हा हा दोष निर्माण होतो. बाह्य कर्णनलिकेत मळ साचल्याने किंवा कर्ण अस्थिकांची साखळी तुटल्यामुळे हा दोष निर्मांण होतो. हा दोष वैद्यकीय उपचाराने दूर होऊ शकतो.
२. संवेदनी बहिरेपणा (Preceptive) – हा दोष श्रवणचेता किंवा मेंदूच्या श्रवण क्षेत्राला इजा झाल्यावर होऊ शकतो. हा दोष कायम स्वरूपाचा असतो.
C) नाक व कान हे ज्ञानेद्रिय आहे. नाकाच्या वरील बाजूस अंतस्त त्वचेत गंधस्पर्शी पेशी असतात.
D) जीभ
जीभेचा पृष्ठभाग खडबडीत असून त्यावर लहान लहान उंचवटे दिसतात. त्यांना अंगरक म्हणतात. याच पृष्ठभागावर रूचीकलीका असतात. लाळ मिश्रीत अन्नामुळे त्या उद्दीपित होतात. यावर ४ मूळ स्वाद असतात.
गोड चव कळते - जिभेचा शेंडा
कडू चव कळते - जिभेचा शेवटचा भाग
आंबट व खारट चव कळते - जिभेची कडा
E) त्वचा
यामुळे वेदना,स्पर्श , दाब उष्णता व थंडी यांचे ज्ञान होते. आपल्या शरीरावरील पातळ अच्छादनाला त्वचा म्हणतात. त्वचा हे एक विसर्जनास सहाय्यक इंद्रिय आहे. पाणी,क्षार, व नायट्रोजनयुक्त पदार्थ यांच्या विसर्जनास त्वचा मुत्रपिंडास सहाय्य करते. त्वचे खालील भाग पडतात.
१) अभिचर्म ( बाह्यत्वचा) – अभिचर्म हे स्तरित अभिस्तर उतींचे बनलेले असते. अभिचर्माच्या सर्वात वरचा थर मृत पेशींचा असतो. सर्वात खालच्या थरास माल्पीधीस्तर असे म्हणतात. येथे सूत्री विभाजनाने नवीन पेशी निर्माण होतात. माल्पीधीस्तर काही रंगद्रव्ययुक्त पेशी असतात. त्यांना वर्णक पेशी (मेलॅनिन) असे म्हणतात या पेशींमुळे त्वचेस विशिष्ट रंग प्राप्त होतो. उन्हात ह्या पेशी जास्त सक्रिय होतात. त्यामुळे रंगकण वाढतात व त्वचा काळी पडते.
२) चर्म (आंतरत्वचा)- अभिचर्माला लागूनच चर्म असते. ते संयोगी उती, स्नायू, रक्तवाहिन्या, चेता स्पर्शकणिका, ग्रंथी आणि केस पुटके यांनी बनलेले असते. चर्माखाली मेदयुक्त पेशींचा थर असतो.
-
स्नेहग्रंथी (तैलग्रंथी)- यातून कातडीवर तेलाचा पातळसा थर पसरविला जातो. यामुळे त्वचा मृदू होते व शरीराच्या पृष्ठभागातून होणारे पाण्याचे शोषण व बाष्पीभवन प्रमाणाबाहेर होत नाही.
-
स्वेदग्रंथी (घर्मग्रंथी)- आंतरत्वचेच्या आत खोलवर घर्मपिंड असतो. स्वेदग्रंथीच्या पेशी रक्तातील पाणी, क्षार, युरिया, सोडिअम क्लोराईड इ. पदार्थ वेगळे करून घामाच्या रूपाने बाहेर टाकतात. त्वचेखाली वसामय उतींचा जाड थर असतो. हा उष्णता, थंडी, धक्के यापासून शरीराचे संरक्षण करतो. शरीरातील चरबीचा सर्वात मोठा साठा या थरात असतो. वाढत्या वयाबरोबर चरबी शोषली जाऊन त्वचेस सुरकुत्या पडतात.
-
केस- केस चर्मातील केस पुटकात उगम पावत असतात. केसांचा त्वचेबाहेरील भाग (केसस्तंभ) हा भरीव असून त्यात चेतातंतू व रक्त वाहिन्यांचा पुरवठा नसतो. परंतू केसमुळांशी चेतातंतू असतात. केस मुळाशी चर्म अंकूर असतो व त्याभोवती रक्तकेशिकांचे जाळे असते. त्यामुळे केसांचे पोषण व वाढ होत असते. केसपुटकात तेलकट द्रव स्त्रावणा-या त्वगतीय ग्रंथी असतात. त्यांच्या स्त्रवणामुळे केस व त्वचा मृदू राहते.
त्वचेचे कार्य-
-
रोगजंतूना शरीरात प्रवेश करण्यास अडथळा करणे, सूर्यकिरणापासून आतील पेशींचे संरक्षण करणे.
-
घामावाटे पाणी शरीराबाहेर काढून पाण्याचे नियमन करणे. घामामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत असते. घामाचे बाष्पीभवन होऊन शरीराचे तापमान कमी होते. होताच रक्तवाहिन्या आकुंचन पावून घाम कमी होतो. अशाप्रकारे मानवी शरीराचे तापमान ३६.९॰c ( ९८.४ F) कायम ठेवले जाते.
-
कोवळ्या उन्हात त्वचेतील त्वगतीय ग्रंथीतून स्त्रवणा-या तेलकट पदार्थाचे डी जीवनसत्त्वात रुपांतर होत असते.
-
त्वचेत स्पर्शनलिका व चेता अंतिम असतात. याद्वारे त्वचा स्पर्श आणि तापमानातील फरक यांची उद्दीपणे ग्रहण करते.
-
त्वचारोग व आरोग्य – खरुज, गजकर्ण, इसब व नायटा इ. रोग त्वचेस होतात. जीवनसतत्वाच्या कमतरतेमुळे त्वचेला भेगा पडतात.
-
भाजणे – तीव्रता – १) २० % हून अधिक – गंभीर
२) ४० % हून अधिक –अतिगंभीर
३)६० % पेक्षा जास्त भाजणे – कमालीचे गंभीर यामूळे बहुदा मृत्यू संभवतो.
१) अस्थि संस्था ( Skeleton System)
अस्थिसंस्था मानवी शरीरास विशिष्ट आकार व आकृती प्रदान करते. हाडाच्या सांगाड्यामुळे शरीराला आधार मिळतो व स्नायु आणि नाजूक इंद्रियांचे संरक्षण ही होते. उदा. हृदय, फुफुसे, रक्तवाहिन्या, मणक्यात असणारा मेरुरज्जू इ. मानवी शरीरात जन्माच्या वेळी २७० हाडे असतात. शरीराची वाढ होतांना काही हाडे जोडली जाऊन २०६ हाडे शिल्लक राहतात.
-
हाडांची रचना- कॅल्शिअम कार्बोनेट व कॅल्शिअम फॉस्फेट यासारख्या खनिजक्षार व सेंद्रिय पदार्थापासून हाडे बनतात. सेंद्रिय पदार्थामुळे हाडे लवचिक होतात तर खनिजक्षारामुळे त्यांना मजबूतपणा येतो. लहान मुलांच्या हाडांत सेंद्रिय पदार्थ जास्त असतात.तर वृध्दांच्या हाडांत चुन्याचे प्रमाण वाढत जाऊन सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होते .
-
हाडे पोकळ व छिद्रमय असतात. पोकळीतील मगजास अस्थि मज्जा म्हट्ले जाते. लाल व पांढ-या रक्त पेशी मगजात तयार होतात. शरीराच्या विविध भागातील हाडांची संख्या
१. डोक्याची हाडे – २२ (ब्रेन बॉक्स ८,चेहरा १४)
२. कानातील हाडे -६
३. धडातील हाडे – मणका ३३, वक्षस्थळ १, बरगड्या २४
४. हातांची हाडे – ६० ५ पायांची हाडे- ६०
१. पाठीचा कणा (Vertebral Column) - पाठीच्या कण्यामुळे संपूर्ण शरीराच्या सांगाड्यास आधार मिळतो. पाठीचा कणा ३३ मणक्यांचा बनलेला असून यातील वेगवेगळी असतात. तर इतर ९ मणके जोडली जाऊन २ हाडे बनतात. पाठीच्या कण्याचे ५ भाग पडतात.
१. मानेचा भाग – ७ मणके
२. छातीचा भाग – १२ मणके
३. कमरेचा भाग - ५ मणके
४. कटिभाग/ त्रिकास्थी – ५ मणके
५. शेपूट / माकडहाड – ४ मणके
२. छातीची हाडे – बरगड्यांच्या ७ जोडया मागील बाजूला पाठीच्या मणक्याशी निगडीत असतात. व पुढील बाजूस कुर्च्यांच्या साहाय्याने छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात. ८,९, व १० या जोड्या कुर्च्याच्या साहाय्याने ७ व्या बरगडीस पुढील बाजूने जोडलेल्या असतात. ११ व १२ नंबरच्या जोड्या छातीच्या हाडास जोडलेल्या नसतात. म्हणून त्यांना तरंगत्या बरगड्या असे म्हणतात.
३. हातांची हाडे-
ठिकाण |
हाडे |
नाव |
दंड |
१ |
भुजास्थान |
हात |
२ |
अंगठ्याच्या बाजूचे – रेडियस करंगळीच्या बाजूचे-अल्ना |
मनगट |
१३ |
कार्पल्स |
तळहात |
|
मेटाकार्पल्स |
बोटांची पेरी |
१४ |
फुलेंजिस |
४. पायाची हाडे – मांडीत असणारे हाड हे पायातील सर्वात मोठे हाड असून त्यास पिमर म्हणतात. वाटीच्या हाडाला पॅटेला म्हणतात. पायात दोन हाडे असतात आणि बाहेरील हाडास फि ब्युला असे म्हणतात. पायाच्या मधील नळीस टिबिया असे म्हणतात.
हाडांचे सांधे – सांध्यातील हाडे एकमेकांना दो-यासारख्या पांढ-या व बळकट अस्थिबंधनाने बांधलेले असतात. कुर्च्या किंवा कास्थीमुळे हाडांचा पृष्ठभाग गुळगुळीत राहतो व हाडांमध्ये घर्षण कमी होते. कवटीतील सांधे वगळता इतर सांधे चल असतात.
त्यांचे प्रकार
-
मानवी शरीरातील सर्वात लहान हाड – स्टेप्स (अंतरकर्ण)
-
शरीरातील सर्वात मोठे हाड – फि मर
-
शरीरातील सर्वात मजबूत हाड – जबड्याचे हाड
सांध्याचा प्रकार |
हालचाल |
उदाहरणे |
उखळीचा सांधा |
सर्व दिशांना हालचाल |
खांदा, मांडी |
बिजागरीचा सांधा |
एकाच दिशेने हालचाल |
कोपर, गुडघा, बोट, |
खिळीचा सांधा |
वळणे व फिरणे |
कवटी कण्यावर फिरते रेडिअस व अल्ना |
सरकता सांधा |
पुढे व मागे |
मनगट आणि घोटा |
Saddle joint |
परस्पर आदान प्रदान |
तळहात व तळपाय |
उखळीच्या सांध्याचा |
मेटाकार्पल व ट्रेपेजिअम |
अपूर्ण विकसित प्रकार |
२) स्नायू संस्था (Muscular System)
मानवी शरीरात जवळ जवळ ६२९ स्नायू असून ते सांध्यांना आधार देतात व त्यांची हालचाल करतात. शरीरातील ७५% पाणी केवळ स्नायूंमधे असते. स्नायू हे तंतूचे बनलेले असतात. ते स्नायूबंधानाने हाडांना बांधलेले असतात. हाडांना बांधलेले स्नायू पट्ट्याचे असतात आणि त्यांची टोके निमुळती होत जातात. स्नायू स्वतः आकुंचन , प्रसरण पावत नाही. चेतातंतूची प्रेरणा स्नायूंना उत्तेजन देते. यामुळे स्नायू आकुंचन प्रसरण पावतात व शरीराची हालचाल होते. स्नायूंचे दोन प्रकार पडतात.
१. ऐच्छिक स्नायू – ज्या स्नायूंचे कार्य आपल्या इच्छेवर अवलंबून असते त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. उदाः हाता पायाचे स्नायू
२. अनैच्छिक स्नायू – यांची हालचाल आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. उदाः फुप्फुस, हृदय, जठर यांचे स्नायू
-
स्नायूंची हालचाल – दंडातील द्विशिरस्क ( बायोसेप्स) स्नायू खांदा व रेडियसला जोडलेला असतो. त्यांच्या आकुंचनाने स्नायू फुगलेला दिसतो. याउलट कृती करणारे त्रिशिरस्क (टायसेप्स) दंडाच्या खालील बाजूस व मागे असतात. ते खांदा व अल्नाला जोडलेले असतात आणि तेच सांधे सरळ करण्याचे काम करतात.
-
स्नायू जेव्हा वापरात नसतो तेव्हा त्यातील थोडेसे आकुंचित होत असतात. या अपुर्ण आकुंचनास स्नायूंची सज्जस्थिती असे म्हणतात. नियमित व्यापाने स्नायू बळकट होतात.
-
लहान मुलांमध्ये मानेतील मणक्यात बाक येणे, छातीचा बाक तयार होणे व कमरेतील बाक तयार होणे अशा क्रमाने बाक तयार होतो. तळपायाच्या हाडांतही वक्रता येते.
-
जबड्याचे स्नायू हे मानवी शरीरातील सर्वाधिक शक्तीशाली स्नायू असतात.
३) पचनसंस्था
पचनक्रिया प्रामुख्याने अन्ननलिकेत होते. अन्ननलिकेचा सुरूवातीचा भाग पचनाशी संबधीत असतो. तर नंतरच्या भागात पचलेल्या भागाचे शोषण होते. अन्न मार्गाचे भाग-
१) मुख गुहा २) ग्रसनी ३) ग्रासिका ४) जठर ५) लहान आतडी ६) मोठी आतडी
पचन ग्रंथीचे प्रकार-
१) लाळग्रंथी २) यकृत ३) स्वादूपिंड
दातांची रचना कार्य यानुसार प्रकार
दाताचे प्रकार |
संख्या |
कार्य |
पटाशीचे दात (कृतदंत) |
८ |
अन्नाचे तुकडे करणे |
सुळे दात |
४ |
अन्नाचे मोठे तुकडे फाडून व तोडून लहान करणे. मांसासारखे पदार्थ खाणे |
उपदाढा |
८ |
अन्नाचे चर्वन करणे |
दाढा |
१२ |
|
एकूण |
३२ |
|
एकूण ३२ दात दोन जबड्यांमध्ये असतात. मानवास आयुष्यात दाताचे दोन संच येतात. म्हणून त्यांना द्वितारी दंती म्हणतात. दुधाचे २० दात असतात. सात वर्षानंतर कायमचा संच येतो. तिस-या क्रमांकाच्या दाढांना अक्कलदाढ म्हणतात. ही दाढ वयाच्या १७ ते २० या वर्षी उगवते. प्रत्येक दातावर दंतिन ( इनॅमल ) या टनक पेशीजालाचे आवरण असते. ते दाताच्या आतील भागाचे संरक्षण करते. दंतिन हा शरीराचा सर्वात कठिण भाग असतो. लहान मुलांचे दंतिनचे आवरण पातळ असल्यामुळे दात किड्याचा संभव असतो. जठर / आमाशय – अन्ननलिकेतून अन्न जठरात येते. जठर हा अन्नमार्गातील सर्वांत रूंद भाग होय. मानवाचे जठर उदराच्या डाव्या बाजूला मध्यपटलाखाली वसलेले असते. जठराच्या अंतःत्वचेत असणा-या असंख्य ग्रंथी जरस स्त्रावत असतात. यात पाणी ९७-९९ % असते. HCL४ ते ५ % व पेप्सीन, रेनिन तसेच गॅस्टिक लायपेझ विकरे असतात. अन्नात जाठरास मिसळला जातो व अन्न आम्लधर्मी होते. त्यावेळी टायलिनचे कार्य बंद होते. पेप्सीनमुळे प्रथिनांवर क्रिया होऊन त्याचे रूपांतर सरळ प्रथिने किंवा पेप्टोन आणि पेप्टाईड मध्ये होते. पेप्टोन हे प्रोटीनचे विरघळणारे रूप आहे. रेनिनमुळे दुधातील प्रथिनावर क्रिया होऊन त्याचे रूपांतर दह्यात होते. याला व्हे म्हणतात. त्यानंतर पेप्सीनची क्रिया व्हे वर होऊन पेप्टोन तयार होते. अशा रीतीने जठरात मुख्यतः प्रोटीनचे पचन होते. जठरातील अन्नरस लहान आतड्यात येतो. पक्वाशयाला यकृत व स्वादूपिंडापासून निघालेल्या नलिका एकत्र होऊन जोडलेल्या असतात. त्यात तयार झालेले स्त्राव त्यांच्या नलिकावाटे पक्वाशयात येतात.
५) लहान आतडे लघु आंत्र ( small intestine)
हा पचनाचा मुख्य अवयव आहेत. लहान आतडे हे अन्नमार्गातील सर्वात लांबलचक भाग असतो. याची लांबी ६ ते ६.२५ मी असते. याचा व्यास २.५ सेमी असतो. याचे तीन भाग पडतात.
अ)अद्यांत्र(पक्वाशय)-याची लांबी २५ सेमी आहे. यकृत आणि स्वादूपिंडापासून निघालेल्या नलिका एकत्रितपणे पक्वाशयाला जोडलेल्या असतात.
ब) मध्यांत्र – हा दुसरा भाग असून त्याची लांबी साधारणतः २ ते ४ मी असते.
क) पश्चात्र – यात आंत्ररस स्त्रवत असतो. आंत्ररसातील इरेप्सीनमुळे प्रथिनाचा बदल अमिनो आम्लात होतो. तर इन्व्हरटेज व माल्टेज या विकारामुळे शर्कराचे, ग्लुकोज किंवा फॅक्टोज या साध्या साखरेत रूपांतर होते. लायपेझमुळे मेदाचा बदल मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये होतो. ही अन्नमार्गातील शेवटची रूपे असतात. हे पदार्थ अभिशोषणासाठी योग्य असतात. लहान आतड्यांच्या पेशी पटलातून ग्लुकोज व अमिनो आम्ले शोषली जातात.तर स्निग्धाम्ले लसिका वाहिनीत शोषली जातात.
६) मोठे आतडे / बृहदांत्र (largelntestine) – लघुआंत्र ते मलनलिकेपर्यंतचा हा भाग साधारणतः १.५ मी लांबीचा असतो. लघुआंत्र व बृहदांत्राच्या जोडाजवळील प्रवर्धाला अंद्यांत्र म्हणतात . अद्यांत्रापासून बोटाप्रमाणे दिसणा-या ५ ते १५ सेमी लांबीच्या भागाला आंत्रपुच्छ म्हणतात. ह्या अवयवाचा मानवास काहीही उपयोग नसतो. त्यात अन्न अडकून कुजते. पोटातील जंत त्यात जाऊन बसतात व आंत्रपुच्छाला सूज येते. यास आंत्रपुच्छ असे म्हणतात. शस्त्रक्रिया करून आंत्रपुच्छ काढून टाकतात. अपेंडिक्स हा अवयव शाकाहारी प्राण्यामध्ये सेल्युलोज पचनासाठी उपयोगी पडतो.
कार्य- पाणी शोषून, तात्पुरता मलसंचय व मलोत्सर्ग करणे. यात कसलेही पचन होत नाही. पण पचन न झालेले पदार्थ शोषून घेतले जातात. आतडे जास्त क्रियाशील झाल्यास पाणी शोषण्यापूर्वीच मल बाहेर टाकले जाते. त्यास संग्रहणी (डायरिया) असे म्हणतात.
पचन ग्रंथी-
१) लाळ ग्रंथी – कर्ण पूर्वग्रंथी, अधोहतु ग्रंथी व अधोजिव्हा ग्रंथी अशा लाळ ग्रंथीच्या तीन जोड्या असतात. या तीनही ग्रंथी संयुक्तपणे लाळ स्त्रवतात. लाळेत टायलिन नावाचे एक विशिष्ट पाचक द्रव्य असते. लाळेमुळे अन्नातील पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज शर्करेत होते. माल्टोज चवीला गोड व पाण्यात विरघळणारी शर्करा आहे.
२) यकृत – हा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत उदर पोकळीत उजव्या बाजूस सर्वात वरच्या भागात मध्यपटलाखाली वसलेले असते. यकृताचे डावा व उजवा असे दोन भाग पडतात. याचा रंग लालसर किंवा तपकिरी असतो. स्पंजासारखे दिसते. यकृताचे वजन १ किलो असते. यकृताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोज साठा करणे होय. यकृताच्या खालच्या बाजूस उजवीकडे पित्ताशय असते. त्यात ५० घ. सेमी पित्त राहू शकते. यकृतातून निघलेले पित्त या पिशवीत साठविले जाऊन दाट होते. पित्त वाहून नेणा-या नलिकेस पित्तनाल म्हणतात म्हणतात. या नलिकेस स्वादूपिंड नाल मिळाल्यानंतर तिला संयुक्त पित्तनाल क्षार असतात. ही नाल आद्यांत्रात उघडते. या हिरवट व पिवळसर रंगाच्या पित्तात क्षार असतात. त्यात पाचकद्रव्य नसते. पित्तामुळे अन्नाचे गुणधर्म बदलतात व पचन सुलभ होते. याशिवाय स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तामुळे मदत होते. पित्त हे जंतूचा नाश करते. पित्तरसामुळे मेद विघटन होते (दुधीकरण) लहान आतड्यातील स्निग्धपदार्थांचे पाचन करणा-या यकृताचा चयापचयात महत्वपुर्ण सहभाग असतो.
कार्य – यकृत ही शरीरातील सर्वात विशाल रसायन फॅक्टरी आहे. यकृतात अमोनिया या हानीकारक पदार्थांचे रूपांतर युरियात होते. ग्लुकोजचे रुपांतर ग्लायकोजनमध्ये करते. रक्तात ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यावर यकृतातील ग्लायकोजनचे परत ग्लुकोज मध्ये रुपांतर केले जाते. पचनानंतर शरीरातील जास्तीच्या अमिनो ऍसिडचे रुपांतर पिष्टमय पदार्थात करण्याचे कार्य यकृत करते. पिष्टमय पदार्थ जास्त झाल्यास त्यांचे रुपांतर स्निग्ध पदार्थांत केले जाते. त्यामुळेच आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असले तरी शरीरात स्निग्धपदार्थ निर्माण होतात.
३) स्वादुपिंड (Pancreas) – ही ग्रंथी जठराच्या पश्चभागी आडवी पसरलेली असते. स्वादुपिंडरस स्वादुपिंड नलिकेत जातो. ही नलिका संयुक्त पित्तनालास मिळते व संयुक्त पित्तनाल अद्यांत्रात उघडते. स्वादुपिंडातून आइसलेट ऑफ लैंगरहैस या भागातून स्त्रावलेल्या इन्शुलिनमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते. स्वादुरस स्वादुग्रंथीत उत्पन्न होतो. स्वादुरसात तीन विकारे असतात. ट्रिप्सीन या विकारामूळे प्रथिनांचे रुपांतर अमिनो आम्लात होते. अमायलेझमुळे पिष्टमय पदार्थांचे रुपांतर शर्करेत होते. तर लायझेपमुळे मेदाचे रुपांतर मेदाम्ल ग्लिसरॉल मध्ये होते. अशाप्रकारे ग्लुकोज, स्निग्धाम्ले व अमिनो आम्ले हे अन्नाचे शेवटचे रुप आहे.
विकरे (Enzymes) वरील तक्त्यात विकरे खाद्य पदार्थात बद्ल घडवून आणतात ते केवळ उत्प्रेरकाचे कार्य करतात. विकारांशिवाय पचनक्रिया शक्य नाही. विकरे ही सरळ गोलाकार प्रोटीनचे बनलेले असतात. विकाराचा एक अणू १० हजार ते १० लाख क्रिया नियंत्रित करतो .एक विकर केवळ एकच पदार्थावर आपली क्रिया करु शकतो. उदा. पेप्सीन फक्त प्रथिनांचे पचन करते. विकरे शारीरिक तापमानाला (२६-४५) सर्वाधिक क्रियाशील असतात.
४) श्वसन संस्था (Respriatory System )
१) बहिःश्व्सन – नाकातून घेतलेली हवा नासिका मार्ग, ग्रसनी, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वसनी, श्वसनिका वायूकाप व फुप्फसे असा प्रवास करते. येथे तांबड्या पेशीतील हिमोग्लोबीनशी ऑक्सिजनचा संयोग होऊन ऑक्सिहिमोग्लोबीन हे संयुग तयार होते. ते रक्ताद्वारे शरीरातील विविध भागांना पुरविले जाते. फुप्फुसातून बाहेर निघणा-या या रक्तात ऑक्सिजनचा दाब १०० mmHg असतो तर हिमोग्लोबीनची ऑक्सिजन संतृप्तता ९५% असते. चयापचयात तयार झालेला कार्बनडाय ऑक्साईड जलबाष्प याउलट मार्गाने शरीराबाहेर टाकला जातो. फुप्फुसावाटे होणा-या या क्रियांना बहिःश्वसन म्हणतात.
२) अंतःश्वसन / उतकीय श्वसन – ऑक्सिजन युक्त रक्ताचे सर्व शरीरात अभिसरण होते. उती ऑक्सिजन शोषून घेतात. उतीत असणा-या कार्बन व हायड्रोजनचा या ऑक्सिजनशी संयोग होतो. या ऑक्सिडीकरणातून कार्बनडाय ऑक्साईड व जलबाष्प तयार होते आणि ऊर्जा मुक्त होते.उतीत तयार होणारा कार्बनडाय ऑक्साईड रक्ताद्वारे फुप्फुसात व फुप्फुसातून उच्छावासाद्वारे बाहेर टाकला जातो.
श्वासोच्छवासात वायूंचे बदलणारे प्रमाण
वायू श्वास प्रमाण उच्छवास प्रमाण
ऑक्सिजन २१% १६%
कार्बनडाय ऑक्साईड ०.०३% ४.५०%
नायट्रोजन ७९% ७९%
फुप्फुसे – छातीचे हाड, बरगड्या व पाठीचा कणा यांच्या पिंज-यात फुप्फुसे असतात. हृदयाच्या उजव्या व डव्या बाजूस असे दोन प्रत्येक श्वासोच्छवासात जवळजवळ ५०० मिली हवेची अदलाबदल होते. त्यातील केवळ ३०० ते ३५० मिली हवा वायूकोषापर्यत पोहोचते. व राहिलेली १५० मिली हवा श्वसन मार्गातच राहते. अशाप्रकारे एका वेळी फक्त ३५० मिली हवेची फुप्फुसात अदलाबदल होते नियमित श्वासोच्छवास चालू असताना ३०० मिली हवा फुप्फुसात उरते.
विविध प्राणांचा १ मिनिटाला श्वासोच्छ्वासाचा वेग
प्राणी वेग
प्रौढ व्यक्ती १८ ते २० वेळा
लहान मूल ४५ वेळा
स्त्रिया २० ते २२ वेळा
-
अतिश्रम केल्यास उर्जा कमी पडते, तेव्हा स्नायू विनॉक्सिश्वसनाने ऊर्जा निर्माण करतात. यात लॅक्टिक आम्ल तयार होते. त्यामुळे स्नायूत साठून पेटके येतात. पुरेशा विश्रांतीने लॅक्टिक आम्ल पुन्हा रक्तात शोषले जाते.
५) मानवी रक्त व अभिसरण संस्था (Human Blood & Circulatory System)
रक्त ही द्रव प्रकारात मोडणारी ऊती आहे. या वैशिष्टयपूर्ण ऊतीत निर्जीव जीवद्रव्यामधे पेशी विखुरलेला असतात. रक्तातून विविध घटकांचे परिवहन होते. यालाच रूधिराभिसरण म्हणतात. रक्त हा तांबड्या रंगाचा एक अर्धपारदर्शक द्रव आहे. त्यात काही कणिका रक्तद्रव (प्लाझमा) नावाच्या पातळ द्रवात तरंगत असतात. रक्तात ५५% प्लाझ्मा असतो. तर ४५% भाग कणिकांचा असतो. रक्त हे अल्कधर्मी असते (PH – 7.4). रक्ताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या ९% असते.
रक्त शरीरात खालील कार्य करते.
-
हिमोग्लोबीन द्वारे सर्व शरीरभर ऑक्सिजन पुरविला जातो.
-
ऊतीत तयार झालेला Co2 रक्तद्रवामार्फत फुप्फुसापर्यत आणला जातो.
-
पचलेले अन्न रक्तद्रवात मिसळते व सर्व शरीरभर पुरविले जाते.
-
टाकाऊ पदार्थ रक्ताद्वारे वाहून नेले जातात. उदाः युरिया मुत्रपिंडाकडे, फुप्फुस व त्वचेद्वारे अनावश्यक जल बाहेर टाकले जाते.
-
रक्ताद्वारे हारमोन्स, ऍन्टीटॉक्सिन्स, तसेच ऍन्टीबॉडीज शरीराच्या एका भागाकडून दुस-या भागाकडे वाहून नेले जाते.
-
शरीराचे तापमान संतुलित ठवणे,ऊतींना ओलावा देणे.
-
रक्तात शिरलेल्या रोगजंतूना श्वेतरक्तकणिका नष्ट करतात.
रक्ताचे घटक
१) रक्त द्रव (Plasma) – रक्तद्रव हा रंगहीन किंवा फिकट पिवळसर रंगाचा द्रव आहे याचे रक्तातील प्रमाण जवळजवळ ५५% असते. रक्तद्रवाचे घटक – पाणी – ९०%, प्रोटीन ६-९%,शर्करा व मेद १%, क्षार ०.९% असे असतात. रक्त जेव्हा जखमी ऊतीजवळ येते तेव्हा रक्तद्रवातील फाईब्रिनोजन मुळे रक्त गोठण्यास मदत होते.
कार्य – उतींना अन्न पुरवठा करणे, टाकाऊ पदार्थांचे वहन करणे व शरीरातील अतिरिक्त उष्णता काढून टाकणे, रक्त द्रवात सीरम, ऍल्ब्यूमिन, सीरम ग्लोब्यूलिन आणि फायब्रिनोजीन ही प्रथिने असतात. शर्करा, अमिनो आम्ले मेदाम्ले, जीवनसत्वे ही पोषक द्रव्ये असतात. तसेच सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम सारखे मूलद्रव्यांचे क्षार असतात. विविध संप्रेरके विकरे व युरिया आणि कार्बनडाय ऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थही असतात. रक्त द्रवात विषाला प्रभावहीन करणारे रोग प्रतिकारक पदार्थही असतात.
२) रक्त कणिकांचे प्रकार
अ. लोहीत रक्त कणिका / तांबड्या पेशी (Red Blood Corpusdes) – नरामधे यांची संख्या जवळजवळ ५५ लक्ष प्रतिघन मि मी. असते तर मादीत ५० लक्ष असते. हिचा व्यास ७.२ मायक्रॉन तर जाडी १.२ मायक्रॉन असते. या वर्तुळाकार व दोन्ही बाजूस अंतर्वक्र असतात. यात केंद्रक नसते त्यामुळे त्यांचे विभाजन होत नाही. यात हिमोग्लोबीन नावाचे तांबड्या रंगाचे द्रव्य असते. हिमोग्लोबीनमध्ये लोहयुक्त प्रथिन ग्लोबीन व लोहाचे संयुग हिमेटीन असते. याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन ऑक्सिहिमोग्लोबीन तयार होते. याद्वारे ऑक्सिजनचे वहन पेशीकडे केले जाते. तसेच कार्बनडायऑक्साईड फुप्फुसाकाडे आणला जातो. तांबड्या रक्तकणिकांचे सरासरी आयुष्य ११० ते १२० दिवस असते. या पेशींचे रक्तातील प्रमाण कमी झाले किंवा हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाले तर ऍनिमिया (रक्तक्षय) नावाचा रोग होतो. यामुळे दमल्यासारखे वाटते, भूक मंदावते, तांबड्या पेशींची निर्मिती बोनमॅरा (अस्थिमज्जा) मध्ये होते तर नाश प्लिहेत होतो रक्तात असणारे हिमोग्लोबीनचे सर्वसाधारण प्रमाण = १४.५ % फक्त उंटाच्या लोहित रक्त कणिकात केंद्रक असते.
ब. श्वेत रक्तकणिका / पांढ-या पेशी (White Blood Corpusdes)- याचा आकार लोहित रक्तकणिकांपेक्षा जास्त म्हणजे १० मायक्रॉन इतका असतो. परंतु त्यांची संख्या एक घन मि मी. मध्ये ५००० ते ९००० इतकी असते. रोगजंतूचा प्रादुर्भाव झाल्यावर यांची संख्या तीस हजारापर्यत जातो. या रंगहीन असून त्यात केंद्रक असते. त्यामुळे त्यांची सुत्री विभाजन होते. याचे आयुष्य १२ ते १३ दिवसांचे असते.
कार्य – रोगजंतूवर हल्ला करुन नष्ट करणे व अमिबाप्रमाणे भक्षण करुन पचविणे. म्हणून यांना शरीराचे सैनिक म्हणतात. एखाद्या रोगामुळे रक्तात विषद्रव्ये तयार झाल्यास प्रतिविष तयार करतात. कधी कधी विषारी द्रव्ये प्रभावी ठरल्यास ब-याच श्वेत रक्तकणिका मरतात. अशा रक्तकणिका व शरीरातील इतर द्रव्ये मिळून पूस (Pus) तयार होतो.
-
श्वेत रक्तकणिकांची निर्मिती अस्थिमज्जा, प्लिहा व रसग्रंथी येथे होते तर त्याचा नाश यकृतात होतो. या जास्त प्रमाणात निर्माण झाल्यास रक्ताचा कर्करोग होतो.
क. रक्तपट्टीका / रक्तबिंबिका (Platelets) - या रक्तात ३ लक्ष प्रति घन मि. मि. इतक्या प्रमाणात असतात. याचा व्यास ३ मायक्रॉन इतका असतो. यात केंद्रक नसते. शरीराच्या बाहेर येताच तुटून जातात. याची निर्मिती अस्थिमज्जेत होते. रक्ताची गुठळी तयार करण्यास त्या मदत करतात.
५. लसिका ( Lymph)- हे पिवळसर रंगाचे द्रव्य आहे. केशिकांमध्ये आकारापरत्वे परत शिरु न शकणारे घटक लसिकेमार्फत अभिसरणात राहतात. लसिकेचा प्रवाह उतींकडून हृदयाकडे एकमार्गी असतो.लसिका श्वेत पेशी या विशेष प्रकारच्या श्वेतपेशी असून त्या रोगजंतूंशी प्रतिद्रव्य आणि जीवविषे, विरोधकांच्या साहायाने युध्द करतात.
रक्त गोठणे – रक्त गोठणे ही एक जटिल रासायनिक प्रक्रिया आहे. यात रक्तबिंबिका, फायब्रिन व कॅल्शिअम क्षार यांची आवश्यकता असते. फायब्रिनमुळे रक्त गोठते. रक्त व फायब्रिन एकत्र येऊन रक्त गोठते. सिरम वेगळा होऊन सुकतो व गुठळी कडक बनने. रक्तद्रवात असणा-या फायब्रिनोजिन रक्ताबाहेर निघाल्यानंतर थोम्ब्रिन बरोबर संयोग पावून फायब्रिन तयार होते. थोम्बिन तयार होण्यासाठी कॅल्शिअमची आवश्यकता असते. फायब्रिनची रचना जाळ्या प्रमाणे असते. त्यात रक्तकण अडकून रक्त गोठते.
-
रक्त गोठू नये म्हणून त्यात सोडियम ऑक्झलेटचे द्रावण टाकतात. त्यामुळे गोठण्यासाठी आवश्यक कॅल्शिअम, क्षार व सोडियम ऑक्झलेट यांत विक्रीया होऊन कॅल्शिअम निष्क्रिय होते. त्यामुळे रक्त गोठत नाही. रक्त हे फक्त रक्त वाहिन्यांबाहेरच गोठते. तेव्हा त्यास थ्रॉम्बोसिस असे म्हणतात. या गाठीं मुळे मेंदुचा आजार ( ब्रेन ट्यूमर) किंवा हृदयरोग होतो.
-
शरीरातल्या शरीरात रक्त गोठू नये म्हणून प्लिहेतून हिपॅरिन नावाचे विकर स्त्रवते. रक्त गट (Blood Group) - सन १९००मध्ये डॉ. कार्ल लॅडस्टायनर याने शोध लावला की प्रत्येक व्यक्तीचे रक्त सारखे नसते.
रक्तदान –
रक्त देणा-या व्यक्तीला दाता म्हणतात तर रक्त घेणा-यास ग्राही असे म्हणतात. O रक्त गटात ऍन्टिजेन नसल्यामुळे तो कुठल्याही गटाच्या व्यक्तीस रक्त देऊ शकतो. म्हणून O रक्तगटास सर्व योग्य दाता (Universal Donor) म्हणतात. ए बी रक्तगटाच्या व्यक्तीत ऍन्टिबॉडी नसल्यामुळे कुठल्याही गटाचे रक्त स्वीकारु शकतो. म्हणून A B रक्त गटास सर्वयोग्य ग्राही (Universal Recipient ) असे म्हणतात. A व B रक्तगटास फक्त त्यांचाच गट व O रक्तगटाचे रक्त योग्य ठरते.
-
आर. एच. फॅक्टर – इ. स. १९४० मध्ये कार्ल लॅन्डस्टायनर व वीनर यांनी
-
जगातील ८५% लोक Rh + आहेत.
-
जगातील ४६% लोकांचा रक्तगट o हा आहे.
-
एखद्या व्यक्तीचे रक्त काढून पुन्हा त्याच व्यक्तीस रक्त देणे – ब्लड डोपिंग
-
रक्त सर्व शरीरात रक्ताभिसरण संस्था करते. यात हृदय, रोहिण्या, नीला व केशवाहिन्या यांचा समावेश होतो.
१. हृदय (Heart) – रक्ताभिसरण व हृदयाचे कार्य याचा शोध डॉ. विल्यम हार्वे याने १६२८ मध्ये लावला. हृदय पंपाप्रमाणे काम करून रक्त पुढे ढकलते. मानवी शरीरात रक्त परिभ्रमणासाठी २३ सेकंद लागतात. रक्ताचा वेग ताशी ६५ किमी इतका असतो. हृदय छातीच्या पिंज-यात दोन्ही फुप्फुसांच्या मध्ये असते. त्याचा कल डावीकडे असतो. हृदय छातीच्या वजन जवळपास ३०० ग्रॅम असते. हृदयावर दुपदरी परिहृदय आवरण असते. या दोन आवरणात एक द्रव पदार्थ असतो. त्यामुळे घर्षण व धक्क्यापासून हृदयाचे संरक्षण होते. हृदयाला हृदयधमनीद्वारे रक्त पुरवठा होतो.
-
ह्रदय रोपणाची पहिली शस्त्रक्रिया - डॉ. ख्रिश्चन बर्नाड ( द. आफ्रिका ) १९६७
-
हृदयाची रचना – हृदयाचे चार कप्पे पडतात त्यापैकी वरील दोन कप्प्यांना कर्णिका आणि खालच्या दोन कप्प्यांना जवनिका म्हणतात. स्नायूमय उभ्या पडद्याने हृदयाचे डावा व उजवा असे भाग पडतात. यापैकी उजव्या भागात अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त असते. व डाव्या भागात ऑक्सिजनयुक्त रक्त असते.
१. उजवे अलिंद / उजवी कर्णिका (Right artium) – हा हृदयाच्या उजव्या बाजूचा वरचा कप्पा आहे. उर्ध्वमहाशिर व अधोमहाशिरेद्वारे शरीरातील सर्व अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त या कप्प्यात येते. येथून एका छिद्रावाटे रक्त जवनिकेत जाते. परंतु त्रिदल झडपेमुळे परत कर्णिकेत येऊ शकत नाही.
२. उजवे निलय / उजवी जवनिका (Right Ventricle) – दोन्ही जवनिका वितरण पंपाप्रमाणे रक्त बाहेर पाठवितात म्हणून त्यांच्या स्नायूमय भित्तीका कर्णिकापेक्षा जाड असतात. उजवी जवनिका हृदयाच्या उजव्या बाजूचा खालचा कप्पा आहे. यात उजव्या कर्णिकेतून आलेले रक्त एकमेव फुप्फुस धमनीद्वारे फुप्फुसाकडे जाते. शरीरातील एकमेव फुप्फुस धमनीत अल्प ऑक्सिजनयुक्त असते. हिच्या मुखाशी असणा-या तीन अर्धचंद्राकृती झडपेमुळे रक्त परत जवनिकेत येत नाही.
३. डावे अलिंद / डावी कर्णिका (Left Auricle ) – हा हृदयाच्या डाव्या बाजूचा वरचा कप्पा असतो. यात चार फुप्फुस शिरा फुप्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त आणून सोडतात. शरीरातील एकमेव फुप्फुस शिरेत ऑक्सिजनयुक्त रक्त असते. डाव्या कर्णिकेतून एका छिद्राद्वारे रक्त डाव्या जवनिकेत येते. जवनिकेच्या बाजूला असणा-या या द्विदल झडपेमुळे रक्त परत डाव्या कर्णिकेत येत नाही.
४. डावे निलय / डावी जवनिका ( Left Ventricle ) – हा हृदयाचा डाव्या बाजूचा खालचा कप्पा असतो. यात डाव्या कर्णिकेतून ऑक्सिजनयुक्त रक्त आत येते व येथूनच महाधमनीद्वारे सर्व शरीराला रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे या कप्प्याच्या स्नायूमय भित्तिका जाड असतात महाधमनीच्या आरंभी असणा-या तीन चंद्राकृती झडपांमुळे रक्त परत डाव्या जवनिकेत येऊ शकत नाही.
रूधिराभिसरण / रक्तभिसरण (Blood Circulation) – हृदयातून रक्त सतत पंप केल्यामुळे रक्तनलिकांद्वारे विविध भागांकडे जाते आणि तेथून परत हृदयाकडे येते. या क्रियेस रक्ताभिसरण असे म्हणतात. हृदय स्नायूंच्या तालबध्द आकुंचन प्रसरणक्रियेमुळे, पंप करण्याची क्रिया घडते. हृदय शिथिल असताना शिरांद्वारे अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त उजव्या कर्णिकेत येते. याचवेळी ऑक्सिजनयुक्त रक्त फुप्फुसाद्वारे डाव्या कर्णिकेत येते. कर्णिका आकुंचन पावून रक्त जवनिकामध्ये येते. यानंतर द्विदल व त्रिदल झडपा बंद होतात. जवनिकांचे आकुंचन होऊन उजव्या जवनिकेतून रक्त फुप्फुसाकडे व डाव्या जवनिकेतून रक्त सर्व शरीरभर पुरविले जाते. या दुहेरी अभिसरण म्हणतात.
२. रक्तवाहिन्या (Blood Vessels)
१) धमन्या / रोहिणी ( Arteries) – हृदयातील ऑक्सिजनयुक्त रक्त धमन्यांद्वारे शरीराचे विविध भाग व उतीपर्यत पोहोचविले जाते. यांच्या भित्तीका जाड व मजबूत असतात. त्यामध्ये स्नायू व लवचिक तंतू असतात त्यामुळे त्या ताणल्या जाऊन रक्ताचा दाब सहन करतात. सामान्यतः धमन्या शरीरात खोल भागात असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा सर्वाधिक असतो. त्यास सिस्टोलिक दाब म्हणतात. तर हृदयाचे प्रसरण झाल्यावर रक्तदाब कमी होतो. त्यास डायस्टोलिक दाब म्हणतात. रक्तदाब धमन्यांमध्ये स्पिग्मोमॅनोमीटरच्या सहायाने मोजतात. सामान्य व्यक्तीचा रक्तदाब आकुंचनाच्या वेळी ११० ते १३० व प्रसरणाच्या वेळी ७० ते ८० मि.मि. पा-याच्या दरम्यान असतो. (१२० / ८०) अतिरक्तदाबामुळे (हायपरटेंशन) हा आकडा १५० / ९५ होतो. तर अल्परक्त दाबामुळे (हायपोटेन्शन) तो कमी होतो.
-
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यामुळे धमनी तालबध्दपणे प्रसरण पावते त्यास नाडी म्हणतात. दर मिनिटाला पडणा-या नाडीच्या ठोक्यांवरून हृदयाचे ठोके कळतात. प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटाला ७२ इतके पडतात.
२) शिरा / नीला (Veins ) – यात शरीराच्या विविध भागातील अल्प ऑक्सिजन युक्त रक्त असते. ते हृदयाकडे वाहून नेले जाते. यात रक्तदाब अतिशय कमी असतो. व रक्त मंद गतीने वाहत असते. कमी दाबामुळे रक्त उलट दिशेने येऊ नये म्हणून शिरांमध्ये ठिकठिकाणी अर्धचंद्राकृती झडपा असतात. त्यामुळे रक्त एकाच दिशेने म्हणजे हृदयाकडे वाहते. या शरीरातील त्वचेलगत असतात .त्यामुळे त्वचेतून या निळसर रंगाच्या दिसतात.
३) केशवाहिन्या / रक्तकेशिका Capillaries) – याद्वारे रक्त आणि पेशींमध्ये विविध घटकांची देवाणघेवाण होते. धमन्यांचे रूपांतर केसांसारख्या सूक्ष्म नलिकांत होते. त्यांची आवरणे पेशीच्या एकेरी थराची बनलेली असून सच्छिद्र असतात. त्यांचा व्यास ७.३ मायक्रॉन इतका असतो. त्यांचे सर्व शरीरभर जाळे असते. दोन पेशींच्या मधल्या जागेतून केशवाहिन्या जातात. त्यांच्या सच्छिद्र आवरणातून रक्तातील ऑक्सिजन व पोषक द्रव्ये बाहेर येतात व पेशींना पुरविले जातात. पेशीतील कार्बनडाय ऑक्साईड व इतर टाकावू पदार्थ रक्तात विसरीत होतात. या शिरांतील रक्त हृदयाकडे पाठविले जाते.
-
हृदयाकडून सर्वाधिक (२८%) रक्तपुरवठा यकृतास होतो. त्यानंतर वृक्काला – २४%, मेंदूस – १४ % व इतर भागास १९% रक्त पुरवठा होतो.
३. फुप्फुसातील रक्ताभिसरण – उजव्या जवनिकेतून रक्त फुप्फुसात रोहिणीद्वारे फुप्फुसात येते. रोहीणीचे रुपांतर केश वाहिन्यात होउन कार्बनडाय ऑक्साईडची जागा ऑक्सिजन घेतो. केशवाहिन्या पुन्हा एकदा एकत्र येऊन फुप्फुस नीला तयार होतात. व रक्त डाव्या कर्णिकेत आणले जाते. रक्ताच्या या अभिसरणास फुप्फुसाभिसरण म्हणतात.
४. रससंस्था – (Lymphatic System) – रससंस्थेद्वारे मानवी शरीरात रसाभिसरण होते. यात रसग्रंथी, रसवाहिन्या व रसकोशिकांचा समावेश असतो.
६) विसर्जन संस्था (Excretion System)
चयापचयात तयार झालेले टाकाऊ पदार्थ रक्तात साठू न देता उत्सर्जक इंद्रियांद्वारे बाहेर टाकण्याचे कार्य उत्सर्जन संस्था करते.
१. वृक्क / मूत्रपिंड ( Kidneys) – वृक्क ही शरीरातील सर्वाधिक सक्रीय ग्रंथी आहे. मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, मूत्राशय व मूत्रमार्ग हे या संस्थेचे प्रमुख भाग आहेत. मूत्रपिंड उदरपोकळीत मागल्या बाजूस असतात. पाठीच्या कण्याच्या उजव्या व डाव्या बाजूस अशी दोन मूत्रपिंड असतात. ते रक्तातून आलेले नायट्रोजनयुक्त पदार्थ, क्षार व पाणी शोषून घेतात. गाळून झालेले रक्त निलांद्वारे हृदयाकडे पाठविले जाते. नायट्रोजन युक्त्य पदार्थ (युरिया) द्रव स्वरुपात बाहेर काढले जाते. हे मूत्र वाहिनीद्वारे मूत्राशयात पाठविले जाते. तेथुन मूत्रोत्सर्गिकेद्वारे उत्सर्जित केले जाते. दोन वृक्क धमन्याद्वारे वृक्कास रक्तपुरवठा केला जातो. वृक्कधमनी महाधमनीतून येते. यामुळे यात रक्तदाब जास्त असतो. हृदयातुन वितरीत रक्तापैकी एक चतुर्थांश रक्त वृक्कात येते. प्रत्येक वृक्कात जवळजवळ १० लक्ष नेफ्रोन असतात. नेफ्रोनचा आरंभ मलविधीच्या पिंडापासून होतो.
-
युरियाची उत्त्पत्ती यकृतात होणा-या डिनायट्रीकरणाने अमिनो ऍसिडमधून नायट्रोजनच्या निष्काषणाने होते.
मुत्र पिंडाचे रोग – मूतखडा, नेफ्रोटिक सिंड्रोम, युरेमिया, हेमोडायलॅसिस, नेफ्रायटीस ( मूत्रपिंडास सूज येते) कॅल्शियम ऑक्झलेटमुळे मूतखडा होतो.
२. घर्मग्रंथी - घर्मग्रंथी घामावाटे नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर टाकतात.
७) मानवी चेतासंस्था / मजासंस्था (Nervous System)
चेता संस्था मानवाच्या विविध क्रियांत एकसूत्रीपणा आणते. चेतासंस्था चेतापेशींची बनलेली असते. या पेशींच्या सभोवार त्यांना आधार देणा-या चेताबंध पेशींचे जाळे असते.
(अ)चेता पेशी – तिचे पेशीकाय व चेतातंतू असे भाग पडतात. पेशीकाय केंद्रक असते. त्याभोवतीच्या पेशीद्रव्यावर पेशी पटलाचे आवरण असते. पेशीद्रव्यात रायबोन्युक्लिक आम्लाचे कण असतात. त्यांना निल्सन कण म्हणतात. चेतातंतूमार्फत शरीराच्या एका भागातून दुस-या भागाकडे चेता आवेगाचे वहन होते. चेतातंतूच्या संयोगी उतींनी एकत्रीत केलेल्या पुंजाला चेता म्हणतात. चेतासंस्थेचे प्रमुख भाग -१. मध्यवर्ती चेतासंस्था – अ. मेंदू, ब. मेरुरज्जू
२.परिघीय चेतासंस्था ३. स्वायत्त चेतासंस्था
१. मध्यवर्ती चेतासंस्था – याचे मेंदू व मेरुरज्जू असे दोन भाग पडतात. हे भाग शरीराच्या विविध क्रियांचा समन्वय साधतात.
२. परिघीय चेतासंस्था – मेंदूला जोडलेल्या चेतांना कर्पार चेता व मेरुरज्जूला जोडलेल्या चेतांना मेरुचेता म्हणतात.
३. स्वायत्त चेतासंस्था – या चेता हृदय, फुप्फुस, जठर व इच्छाशक्तीच्या ताब्यात नसलेल्या अन्य अवयवात पसरलेल्या असतात. उदा. भीती वाटल्यास डोळे मोठे होणे, श्वास फुलणे, केस उभे राहणे, आतड्यांची पैरिस्टैल्टिक हालचाल थांबणे, हृदय जोरात धडकणे इ.
१. मध्यवर्ती चेतासंस्था –
अ. मेंदू (Brain)- मानवी मेंदूचे वजन शरीराच्या वजनाच्या प्रमाणात १;४६ असे असते. यात १३०० ते १४०० ग्रॅ. विद्वत्ता, स्मृती, विचार, कल्पना या मानसिक प्रक्रियांचे केंद्र आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा सर्वात सुसंघटीत भाग आहे. त्याच्या बाहेरील धूसर द्रव्यात चेतापेशीच्या पेशीकाया असतात. तर आतील श्वेत द्रव्य बहुतांशी चेतातंतूचे बनलेले असते. मेंदू भोवती मस्तिष्क आवरणे असतात. बाह्य संरक्षक दृढावरण, मध्य पातळ जाल आवरण आणि आतील मृदू आवरण. यामधील जागा प्रमस्तिष्क मेरुद्रवाने भरलेली असते. हा द्रव आघात शोषून घेतो व मेंदूचे दुखापतीपासून संरक्षण करतो.
लंबमज्जा- अनुमस्तिष्कसेतू व मेरुरज्जू यांना जोडतो.
कार्य- श्वसन आणि अभिसरण या जैविक प्रक्रियांची केंद्र लंबमज्जेत असतात. म्हणून या भागाला इजा झाल्यास मनुष्यास तात्काळ मृत्यु येतो. मेंदूकडे येणारे व मेंदूकडून जाणारे चेतातंतू या भागात एकमेकांना ओलांडून विरुध्द दिशेने जातात. म्हणून डावा प्रमस्तिष्क गोलार्ध शरीराच्या उजव्या भागाचे व उलटपक्षी उजवा गोलार्ध डाव्या बाजूच्या भागाचे नियंत्रण करतो.
ब. मजारज्जू (Spinalocord) – मेरुरज्जू- हा भाग पाठीच्या कण्यात सुरक्षित असतो. १. प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया मज्जारज्जूमुळे घडून येतात. २. चेतातंतू द्वारे शरीराच्या इतर भागांचा मेंदूशी संपर्क साधणे व प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेत भाग घेणे. उदा. चटका बसल्यास चटकन हात मागे घेणे, डोळे मिटणे.
८) नलिका विरहीत ग्रंथी / अंतः स्त्रावी ग्रंथी (Endo Crine System) -
संप्रेरके ( हर्मोन्स ) स्त्रावीत करणा-या ग्रंथीना अंतःस्त्रावी ग्रंथी म्हणतात. यातून वाहणारे स्त्राव वाहून नेण्यासाठी नळ्या नसतात. म्हणून यांना नलिका विरहीत ग्रंथी असे म्हणतात. यांचा स्त्राव रक्तातच मिसळला जातो. हे स्त्राव शरीरातील रासायनिक क्रियांवर नियंत्रण ठेवतात.
१. पीयूषिका ग्रंथी (Pitutory)- ही ग्रंथी मेंदूच्या तळाशी असते. ह्या ग्रंथीचा चयापचयातील प्रक्रियांवर ताबा असतो. ही ग्रंथी अंतःस्त्रावी ग्रंथीच्या कार्यावरही ताबा ठेवते म्हणून तिला मुख्यत्यार ग्रंथी (मास्टर ग्लॅड) म्हणतात. हिच्या पालीतून १३ पेक्षा जास्त स्त्राव स्त्रवतात.
कार्य – अ) स्त्रावाचे अधिक्य -
१. मुलांची अवाढव्य वाढ होते. परंतु शक्ती इतरांएवढीच असते.
२. पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीत फक्त हात, पाय, खालील जबडा व नाकाच्या हाडाचा आकार वाढतो.
ब) स्त्रावाचा अपुरेपणा-
१. बालकात खुजेपणा येतो.
२. बहुमूत्रतेचा दोष निर्माण होतो. व तहान खूप लागते.
-
यातील ऑस्किटॉक्सीनमुळे गर्भाशयाचे द्वार जन्माच्या वेळी आकुंचन व प्रसरण पावते.
-
पीयुषिका ग्रंथी ही शरीरात सर्वात लहान ग्रंथी आहे.
२). कंठस्थ / अवटू ग्रंथी (Thyroid) – ही गर्दलाल रंगाची ग्रंथी मानेमधे कंठाजवळ असते. हिचा आकार इंग्रजी H सारखा असतो. या ग्रंथीस ऍडम्स ऍपल असे म्हणतात. ही थारॉक्सीन नावाचे हार्मोन स्त्रवते.
कार्य – अ) आधिक्य –
१. शरीराच्या कार्यशक्तीवर तिचा ताबा असतो. तिच्या स्त्रावाच्या आधिक्यामुळे चयापचयाचा वेग वाढतो.
२. शरीराचे वजन कमी होणे, भूक जास्त लागणे
३. हृदयाचे ठोके वाढतात, डोळे बटबटीत होतात. –
ब)कमतरता –
१. यातील थायरॉक्सिनच्या कमतरतेमुळे मुलांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते, लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो.
२. चयापचयाची क्रिया मंदावून अन्न चरबीच्या रुपात शरीरात साचून राहते. प्रौढांमध्ये Myxoedema रोग होतो.
-
आयोडिनच्या कमतरतेमुळे कंठस्थ ग्रंथीचा आकार वाढतो. त्यास गलगंड (गॉयटर ) म्हणतात. यात मान सुजते, डोळे बाहेर आल्यासारखे होतात. शरीरातील आयोडिनचा साठा या ग्रंथीत असतो.
३.अधिवृक्क ग्रंथी ( Aderenal ) – या दोन्ही मूत्रपिंडावर असतात. या ग्रंथीतून कार्टिकोस्टिरॉईड्स नावाचे प्रेरक स्त्रवते. यामुळे
१. स्नायू व अस्थिंच्या वाढीचे नियंत्रण होते.
२. ग्लुकोज, मेद व प्रथिनांचे चयापचय नियंत्रित केले जाते.
३. अतिरिक्त सोडीअम व पाण्याचे उत्सर्जन रोखणे व पोटॅशियमचे उत्सर्जन वाढविणे.
४. लिव्हरमधे ग्लूकोजची मात्रा वाढविणे
अल्पस्त्राव – याच्या अल्पस्त्रावमुळे १) एडिसन डिसीस होतो. २) स्त्रियांत पुरूषी लक्षणे येतात. ३) मुलांमध्ये लैंगिक परिपक्वता लवकर येते. ४) वजन कमी होणे, दौर्बल्य, मळमळ, मानसिक आजार निर्माण होतात.
४. स्वादूपिंड (Pancreas) – ही एक पाचक ग्रंथी असून ती अंतःस्त्रावाची व बाह्यस्त्रावी अशा दोन्ही प्रकारची आहे. आयलेट ऑफ लंगहॅन्सतील a पेशी – ग्लुकेगोन हार्मोन स्त्रवतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. तर बीटा पेशी (B) द्विपीन (इन्शुलिन) स्त्रवतात. त्यामुळे शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते. इन्शुलिनच्या कमतरतेमुळे यकृत व स्नायूंच्या ग्लायकोजेन साठविण्याचा गुणधर्म नाहीसा होतो. त्यामुळे रक्तात ग्लूकोजचे प्रमाण वाढून ते मूत्रावाटे बाहेर टाकले जाते . यास मधुमेह म्हणतात. इन्शुलिन जास्त स्त्रवले गेल्यास यकृतात साठविलेली शर्करा पुन्हा रक्तात येऊ शकत नाही.
५. वृषण ( Testes ) – यातून टेस्टोस्टेरॉन हे नर लिंग हार्मोन स्त्रवले जाते. त्यामुळे मुलांमध्ये पुरूषी लक्षणे दिसू लागतात.
६. अंडाशय (Ovaries) – यातून १) एस्ट्रोजेन व २) प्रोजेस्टोरॉन महिलांमधील संप्रेरके स्त्रवली जातात. एस्ट्रोजेनमुळे स्त्रीत्वाची लक्षणे येतात. मासिक पाळी सुरू होते. गर्भाशय व स्तनांचा विकास होतो. तर प्रोजेस्टेरॉनमुळे दुग्धग्रंथी सक्रीय होतात. गर्भारपणातील बदलांवर नियंत्रण ठेवले जाते.
७. प्लिहा – ही मानवी शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहीत ग्रंथी शरीरात पोटाखाली डाव्या बाजूस असते. यातून हिपॅरीन स्त्राव स्त्रवतो.
८. थायमस – ही ग्रंथी प्रतिकारक्षमता वाढविते. मोठेपणी नष्ट होते. नष्ट झाल्यानंतर कर्करोग व अन्य व्याधी जडतात.
९. हायपोथॅलमस – शरीराचे तापमान नियंत्रित करते.
-
बाह्यस्त्रावी ग्रंथीत होणारे स्त्राव –विकर (Enzyme)
९) पुनरूत्पादन (Reproduction)
-
मानवातील पुनरुत्पादन पध्दत - लैंगिक प्रजनन
-
पुरुषांच्या वृषणात तयार होणारे शुक्राणू व स्त्रीच्या अंडाशयात तयार होणारे स्त्रीबीज यांचे मिलन होऊन फलनाची क्रिया होते. त्यातून युग्मजन तयार होते.
-
वृषणात एकावेळी २० ते २० लाख शुक्राणू असतात. ते वृषणात ३० दिवस व बाहेर २४ तास जिवंत राहू शकतात.
-
गर्भाची लिंग निश्चिती होते. – गर्भधारणेच्या वेळी
-
अपरिपक्व गर्भाचे गर्भात ( छोटा मानव) रुपांतर होते. – ८ आठवड्यानंतर
-
गर्भधारणेचा कालावधी -२८० दिवस ( ९ महिने ९ दिवस)
मूलभूत संकल्पना - अन्न आहार व आरोग्य
अन्न, आहार व आरोग्य अन्नात मानवी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक अशा रासायनिक घटकांना पोषणद्रव्ये (Nutrients) असे म्हणतात. अन्न म्हणजे शरीराची गरज भागवणा-या पोषकद्रव्यांचा स्त्रोत होय. संतुलित आहार (Balanced Diet)
संतुलित आहार
ज्या आहारातुन व्यक्तीचे वय, लिंग व शारीरिक कार्याचे स्वरुप यानुसार आवश्यक असणारी सर्व पोषणद्रव्य सुयोग्य प्रमाणात उपलब्ध होतात, त्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. अन्नाच्या गरजेचे प्रमाण साधारणः ऊर्जेच्या स्वरुपात ठरविले जाते. या ऊर्जेचे एकक किलो कॅलरी आहे. १ शरीर क्रियात्मक कॅलरी (KCaL)= १००० कॅलरी १ Kg पाण्याचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे १ शरीर क्रियात्मक कॅलरी होय मानवास प्रतिदिन आवश्यक कॅलरी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शिफारशी नुसार भारतीयांची प्रतिदिन आवश्यक किलो कॅलरी
कामाचे स्वरुप पुरुषांसाठी आवश्यक कॅलरी स्त्रीयांसाठी आवश्यक कॅलरी
बैठे काम २४२५ १८७५
मध्यम काम २८७५ २२२५
कष्टाचे काम ३८०० २९२५
गर्भवती स्त्रीयां + ३००
-
निश्चल अवस्थेत व्यक्तीस वजनाच्या १ Kg मागे प्रत्येक तासाला १ कॅलरी ऊर्जा लागते. म्हणजेच २४ तासात ६० Kg वजनाच्या व्यक्तीस १२०० ते १४०० कॅलरी ऊर्जा खर्च होईल.
पोषणतत्वे
अन्नातील जे रासायनिक घटक योग्य प्रमाणात आहारात घेतले असता शरीरातील सर्व कार्ये सुरळीत पणे पार पडतात. त्यांना पोषणतत्वे म्हणतात. अन्नातील पोषणतत्वे पाच महत्वाचे अन्न घटक व त्याचा स्त्रोत
|
|
कार्यानुसार गट |
पोषणतत्वे |
स्त्रोत |
|
१. |
शरीर बांधणी गट ( प्रथिन समृध्द पदार्थ) |
प्रथिने |
दूध, मांस, अंडी, मासे, चीज |
|
२ |
ऊर्जा गट ( तृणधान्य ) |
कर्बोदके |
तृणधान्ये व त्यांचे पदार्थ उदा; तांदूळ, गहू, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका, बटाटे |
|
३ |
अतिसमृध्द ऊर्जा गट |
स्निग्ध |
लोणी, साखर, तुप, खाद्यतेल, गुळ, साजूक ( स्निग्ध पदार्थ, साखर) तूप इ. |
|
४ |
संरक्षक गट |
अ जीवनसत्व |
पिवळ्या व नारंगी रंगाच्या भाज्या, गाजर, ( अ व क जीवनसत्व युक्त पदार्थ ) लाल भोपळा, पपई, आंबा, टमाटे, संत्री, पेरु, मोसंबी हिरव्या पालेभाज्या, पालक, शेवगा पाने, कोबी |
५ |
दुय्यम संरक्षक गट ( जीवनसत्वे व खनिजे ) |
सर्वच जीवनसत्वे व खनिजे |
इतर फळे व भाज्या |
|
|
|
|
|
|
कार्बनी पदार्थ ( Organic Compounds)
१. जीवनतत्वे – या पोषण तत्वाचा शोध पोलिश रसायन शास्त्रज्ञ फुन्क याने लावला. नैसर्गिक अन्नात आढळणारे जे जीवनावश्यक कार्बनी पदार्थ वाढ व उत्तम आरोग्यासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असतात. त्यांना जीवनसत्वे म्हणतात. जीवनतत्वाच्या रेणूमध्ये आढळणा-या ऍमिनोगट समूहामुळे इंग्रजीमध्ये जीवनतत्वासाठी व्हिटामीन शब्द प्रचलीत झाला.
१) अ जीवनसत्त्व
वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्न
हे जीवनतत्व वनस्पतीजन्य व प्राणिजन्य अन्न पदार्थात आढळते. वनस्पतीतील बीटा कॅरोटीन हा अ जीवनत्त्वाचा पूर्व घटक आहे.
कार्ये- दृष्टी निर्दोष राखणे, हाडाच्या व उतींच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्वचा, डोळा,श्वसनमार्ग आणि पचनसंस्था यांचे अभिस्तर ओलसर व निरोगी राखते. या जीवनसत्वा अभावी रातांधळेपणा येतो. हे जीवनसत्व फार कमी झाल्यावर अंतःत्वचा अशक्त होते. तिची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे डोळे, तोंड, श्वसन मार्ग यांना सहजासहजी जंतूसंसर्ग होतो. त्यास झिरोथैल्मिया म्हणतात. याच्या कमतरतेमुळे लहान मुलांची वाढ खुंटते, हाडे व दात यांची वाढ कमी प्रमाणात होते. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती टिकून राहण्याला या जीवनसत्वाचा फार उपयोग होतो. म्हणून त्यास रोग प्रतिबंधक जीवनसत्व म्हणतात.
-
दृष्टीपटलामधील दंडपेशी आणि शंकू पेशीमधील प्रकाश संवेदनशील अशा रॅडॉप्सीन रंगद्रव्याच्या रेटीनॉल हा महत्वाचा घटक आहे. रेटीनाल हे रेटीनॉल ( जीवनसत्व – अ) पासून तयार होते.
अधिक्य – आहारात प्रमाण जास्त झाल्यास मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो. अर्भकावस्थेत जास्त झाल्यास त्वचा कोरडी पडते व खाज सुटते. वेदनादायक सूज येऊन हाडांची जाडी वाढते. आळस, निद्रानाश बध्दकोष्ठ असे दोष निर्माण होतात.स्त्रोत – वनस्पती-
फळे व भाज्या
१. पिवळ्या व नारंगी फळे व भाज्या, आंबा, पपई, संत्रे, पिकलेला टोमॅटो, गाजर, लाअल भोपळा (PSI पूर्व परिक्षा २००८) २. हिरव्या पालेभाज्या- पालक, कोथिंबीर, अळू, सोयाबिन
हिरव्या भाज्या
प्राणी- मासे, अंडी ( पिवळा बलक ), कॉडलिव्हर ऑईल, दूध व दूधाचे पदार्थ लोणी, तूप, यकृत.
दुधाचे पदार्थ
-
अ व ब जीवनसत्वाचा शोध-मॅकुलन
२) ब जीवनसत्वे – या समुहात १२ जीवनसत्वांचा सामावेश होतो. याचा शोध हाप किन या शास्त्रज्ञाने लावला ब व क हे पाण्यात विरघळणारे असल्यामुळे हे अस्थिर आहे. प्रकाश, उष्णता, हवा यामुळे जीवनसत्वाची पोषणमुल्ये कमी होतात. भाजी चिरणे व त्यानंतर धुणे, अन्न शिजवतांना वापरलेले पाणी फेकून देणे, यामुळे ही जीवनसत्वे निघून जातात. शरीरात यांचे प्रमाण जास्त झाल्यास ती मुत्रावाटे बाहेर टाकली जातात. तांदूळ गिरणीत दळणे, पीठ चाळणे यामुळे B जीवनसत्व कमी होते. याउलट धान्याला मोड येणे व आंबविण्यामुळे ब आणि क जीवनसत्वे वाढतात.
या गटातील काही महत्वाची जीवनसत्वे
जीवनसत्व |
कार्य, अभावी होणारा रोग व स्त्रोत |
B१, थायमिन |
हे चयापचयात मदत करते. ग्लुकोजपासून ऊर्जा मिळविण्यासाठी ऑक्सिडिकरण प्रक्रियेमध्ये सहविकर म्हणून कार्य करते. याच्या अभावीबेरीबेरी हा रोग होतो. तृणधान्ये, दाळी, किण्व, मांस, अंडी आणि दूध व दूधाच्या पदार्थात मुबलक असतात. |
B 2 रायबोफ्लेविन किंवा G जीवनसत्व |
कार्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थाच्या चयापचयात सविकर म्हणून कार्य करणे. याच्या कमतरेमुळे ग्लोसायटिस ( जीभेची सूज)किलोसिस ( ओठ फुटणे, सुजणे) त्वचा फाटणे इ रोग होतात. कडाधान्य, यीस्ट, मांस व अंडी यात मुबलक असतात. |
B3 पॅन्टोथेनिक |
याच्या आभावी वाढ खुंटणे, केस पांढरे होणे, डोळे, नाक, तळवे यांची जळजळ होणे. यकृत, किडनी, मांस यात मुबलक असतात. |
B5 नायसिन किंवा |
चयापचयात मदत करणे, नायसिनच्या अभावी पेलाग्रा हा रोग होतो. मकायुक्त आहार घेणा-यासनिकोटिनिक आम्ल पेलाग्रा होतो. |
B 6 पायरीडॉक्सिन |
या जीवनसत्वाच्या अभावी ऍनिमिया होतो. दूध, फळे, भाजीपाला, कडधान्ये यात मुबलक असतात. |
B 7 बायोटिन |
- |
B 8 पॅन्थोथोनिक – ऍसिड |
|
B9 फॉलिक ऍसिड |
पेशी विभाजन, परिपक्वता तसेच हिमोग्लोबीन निर्मितीसाठी आवश्यक , यकृत, पालेभाज्यात मुबलक असतात. |
आयनोसिटॉल |
डोळ्यांची शक्ती व केसांच्या वाढीवर परिणामकोलीन अभावी यकृताला सिरोसीस होते, अंड्याच्या पांढ-या बलकात हे असते. |
B12 कोबामाईन सायनोकोबॅलामिन |
पेशींची परिपक्वता, मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी व लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. याच्या अभावी ऍनिमिया हा रोग होतो. मांस, दूध, दुधाचे पदार्थ, पावसाचे पाणी, पालेभाज्या यात मुबलक असते. |
-
स्वयंपाकात सोडा वापरल्यास बी जीवनसत्वाचा नाश होतो.
-
पचनक्रिया, शरीराची वाढ व चेतासंस्थाच्या कार्यासाठी बी जीवनसत्व आवश्यक असते.
३) क जीवनसत्व (Ascorbic Acid) – हे सर्वात अस्थिर जीवनसत्व आहे. जास्त शिजविल्यास या जीवनसत्वाचा नाश होतो. क जीवनसत्व असणारी फळे किंवा भाज्या ताजे न चिरता व न शिजविता खावी.
कार्य – १) जखमा व घाव भरून काढण्यासाठी कोलॅजन नावाचे प्रथिन तयार करण्यासाठी क जीवनसत्व आवश्यक असते. २)मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी क जीवनसत्व मदत करते. ३) क जीवनसत्वामुळे लोह व कॅल्शिअमचे अभिशोषण वाढते.
क जीवनसत्वा अभावी होणारे रोग – क जीवनसत्वाअभावी स्कर्व्ही नावाचा रोग होतो. या रोगाचे सौम्य प्रमाण असतांना सांधे दुखणे, हिरड्यांतून रक्त येणे, थोडे लागले तरी रक्त साकळणे, रोग बळावल्यावर जिभेला सूज येते, ती दूखू लागते. दात पडतात, सांध्यांना सूज येते. स्त्रोत- हे जीवनसत्व प्राणीज अन्नात नसते. सिट्रस फळांमध्ये मुबलक असते. आवळा संत्री, लिंबू, मोसंबी, द्राक्षे, आंबा, राजगिरा, वाल, वाटाणा, टोमॅटो इ.
४). ड जीवनसत्व (Calciferol) – सकाळच्या कोवळ्या उन्हात अतिनिल प्रारणांमुळे त्वचेखाली स्टेरॉलचे रूपांतर ड जीवनसत्वात होते.
कार्य – हाडांची वाढ व विकास करते. हे जीवनसत्व कॅल्शिअम व फॉसस्फरस यांचे अभिशोषण व संचयन करण्याचे कार्य करते.
अभावी रोग – या जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस (Rickets) हा रोग होतो. यात मुले अशक्त होतात. पायाच्या हाडांना बाक येतो. छाती कबुतराच्या छातीप्रमाणे पुढे येते.
आधिक्य – सामान्यतः लहान मुलांत मळमळणे, उलट्या, थकवा, गुंगी येणे, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडात बिघाड, मोठी रक्तवाहिनी व उतींमध्ये कॅल्शिअम साचणे, चेह-याचा अर्धांगवायू इ. लक्षणे दिसतात.
स्त्रोत- ड जीवनसत्व वनस्पतीत फारसे आढळत नाही. लोणी, अंडी, यकृत, माशांचे यकृत तेल यात मुबलक असते.
१. इ जीवनसत्व (Tocopherol) – इ जीवनसत्व ऑक्सिडिकरण विरोधक म्हणून कार्य करते. शरीरातील व अन्नातील स्निग्धांम्ले तसेच अ व क जीवनसत्व यांच्या ऑक्सिडीकरणास इ जीवनसत्व प्रतिबंध करते. या जीवनसत्वामुळे वृध्दत्व क्रिया मंदावते. प्रजनन योग्य होते. डी. एन. ए. मधील दुरूस्ती किंवा शरीराच्या प्रतिक्षम संस्थेच्या कार्यातही जीवनसत्व इ चा वाटा असावा अशी धारणा आहे.
अभाव – या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा, गर्भाचा मृत्यू इ. परिणाम घडतात.
स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, गव्हाचे अंकूर, हिरव्या पालेभाज्या, लोणी, अंड्याचा पिवळा बलक, यकृत, वनस्पती तेल.
२. के जीवनसत्व (Phylloquinone) – लहान आतड्याच्या खालच्या भागात काही उपयुक्त जीवाणू के जीवनसत्व तयार करतात. के जीवनसत्व प्रोथ्रॉम्बिन हे प्रथिन तयार करण्यास मदत करते. हे प्रथिन रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत आवश्यक घटकांपैकी एक आहे. याच्या अभावी रक्तस्त्राव होतो, हिमोफोलीया होतो. के जीवनसत्व हिरव्या पालेभाज्या, दूध, अंड्याचा पिवळा बलक यकृत व मेंदू, अल्फाल्फा पालक, कोबी शतावरी यात असते.
-
हाडाच्या विकासात के जीवनसत्वाचा वाटा आहे. तसेच ग्लुकोजचे ग्लायकोजेन मध्ये रूपांतर करण्यामधेही जीवनसत्व के साह्य करते.
३. पी जीवनसत्व ( सिट्रिन, रॅटीन, हरप्यालीन) –
-
दुधाच्या पाश्चरीकरणामुळे ब व क जीवनसत्व नष्ट होते.
-
पॉलीश केलेले तांदूळ संपूर्ण आहार म्हणून वापरल्यास बेरीबेरी हा रोग होतो.
थोडक्यात महत्वाचे
जीवनसत्व |
कार्ये |
अभावी दुष्परिणाम |
स्त्रोत |
अ |
त्वचा व डोळ्याचे आरोग्य |
त्वचा रोग, रातांधळेपणा |
टोमॅटो, यकृत, भाज्या,फळे,बिया, मांस,सोयाबिन,पिवळा बलक |
ब (संयुक्त) |
शरीराची वाढ, चयापचय, रक्तवर्धक, चेतासंस्थेसाठी |
ऍनिमिया, पेलाग्रा, बेरीबेरी आरोग्यासाठी कडधान्ये इ. |
हिरव्या भाज्या, यकृत, दूध, अंडी, सोयाबिन, मोड आलेले कडधान्ये |
क |
दात व हिरड्यांची वाढ व त्यांचे आरोग्य |
स्कर्व्ही |
लिंबू,संत्रे, आवळा इ. |
ड |
दात व अस्थिंची वाढ त्वचेचे आरोग्य |
मूडदूस, दंतक्षय, त्वचारोग |
माशाच्या यकृताचे तेल, अंडी, यकृत, दूध, लोणी सूर्यकिरण, अंकुरित कडधान्ये,हिरव्या इ. |
इ |
योग्य प्रजननासाठी |
वांझपणा |
माशाच्या यकृताचे तेल, अंडी, यकृत, दूध, लोणी सूर्यकिरण,अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या इ. |
के |
प्रोथ्राम्बिन तयार करणे |
रक्त न गोठणे |
हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी |
-
आत्तापर्यत २० प्रकारची जीवनसत्वे सापडली आहेत.
२.प्रथिने (Proteins) – प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगांनी बनलेली आहेत. यात सल्फर आणि फॉस्फरस आसतो.
प्रोटीनची कार्ये –
-
शरीराच्या वाढीस मदत करणे व झीज भरून काढणे.
-
शरीरातील सर्व रासायनिक क्रिया विकरे नियंत्रित करतात. रासायनिक दृष्ट्या विकर प्रथिने असतात. संप्रेरक वाढ व विकास नियंत्रित करतात. काही संप्रेरके प्रथिने असतात. संप्रेरक प्रथिनांची उदाहरणे – इन्शुलिन, ग्ल्युकेगॉन, सोमॅटोस्टॅटीन इ.
-
फुप्फुसातील ऑक्सिजन सर्व उतीपर्यंत वाहून नेणारी प्रथिने ही वाहक प्रथिने असतात.
-
संक्रामक रोगांविरूध्द लढण्यासाठी तयार झालेली प्रतिद्रव्ये (Antibodies) ही प्रथिनेच असतात.
-
एक ग्रॅम प्रथिनापासून ४.१ किलो. कॅलरी मिळते प्रथिने आहारात जास्त प्रमाणात आल्यास त्याचे रूपांतर मेदात होते. जेवणात १ किलोग्रॅम वजनामागे १ ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांच्या पचनानंतर त्याचे रूपांतर अमिनोआम्लात होते. कुपोषित व्यक्तीत सर्वाधिक कमतरता प्रथिनांचीच असते.
स्त्रोत - कडधान्ये व डाळी – हरभरा, मूगडाळ, तूरडाळ, शेंगदाणे, आक्रोड, काजू, तीळ, बदाम, कारले, मांस, मासे, अंडी, दूध व दूधाचे पदार्थ (लोणी व तूपाव्यतिरिक्त)
-
डुक्कर या प्राण्याला प्रथिनांचा कारखाना म्हणतात.
अभावी होणारे रोग – केवळ प्रथिनांच्या अभावाने होणा-या रोगाला सुजवटी (Kwashiorkar) म्हणतात. यात चेहरा सुजून गोल गरगरीत वाटोळा होतो. याला चंद्रमुखी म्हणतात. ऊर्जा व प्रथिने तसेच इतर पोषणतत्वे यांच्या सतत अभावामुळे सुकटी ( Marasmus) हा रोग होतो. खूप प्रमाणात अतिसार व उलट्या होण्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन मूल सुकते. त्वचा व हाडांचा सापळाच शिल्ल्क राहतो.
प्रथिनांची उदाहरणे – इन्शुलिन, केसिन, फायब्रिन, पेप्सिन, मायोसिन
-
स्नायुंच्या हालचालींसाठी महत्वाचे प्रथिन – मायोग्लोबीन
४) कर्बोदके (Corbohidrates) – कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार झालेली असतात. यांनाच पिष्टमय पदार्थ असेही म्हणतात. ही सर्व सजिव सृष्टीमध्ये सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असतात. आपल्या आहारात ६० ते ८०% प्रमाण कर्बोदकांचे असते. कर्बोदकांचे सोपे रूप म्हणजे ग्लुकोज होय. त्याचे सहजपणे अभिशोषण होते. ग्लुकोज त्वरीत ऊर्जा देतो म्हणून खेळाडू ग्लुकोजचा वापर करतात. पिष्टमय पदार्थात मुख्यतः तौकीर असते. तौकीर व शर्कराचे शेवटी शरीरात पचन होऊन त्यांचे ग्लुकोज नावाच्या शर्करेत रूपांतर होते ती रक्तात शोषली जाऊन सर्व शरीरात पुरविली जाते. शर्करेपासून उष्णता व शक्ती मिळते अतिरिक्त ग्लुकोज ग्लायकोजेनच्या स्वरूपात यकृतात साठविले जाते. पिष्टमय पदार्थ पचण्यास सुलभ असतात.
कार्य – १. ऊर्जेचा पुरवठा करणे –
पिष्टमय पदार्थ
१ ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून ४.५ किलो कॅलरी उष्णता मिळते. हा उर्जेचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. २. प्रथिनांची बचत करणे व सेल्युलोज या तंतूमय कर्बोदकामुळे मलविसर्जनास मदत होते.
तृणधान्ये
स्त्रोत – सर्व तृणधान्ये – तांदूळ, गहू, मका, बाजरी, नाचणी, बटाटे रताळी, अळवडी, बीट,केळी, चिकू, द्राक्षे, साखर, गूळ,मध, कडधान्ये व डाळी, दूध व दुधाचे पदार्थ
-
सर्वाधिक पिष्टमय पदार्थ बटाट्यात असतात.
पदार्थ |
आहारात प्रमाण |
१ ग्रॅमपासून मिळणारी उर्जा |
कार्य |
कर्बोदके |
६० ते ८० % |
४.५ किलो कॅलरी |
इंधन म्हणून |
प्रथिने |
१० ते १५ % |
४.१ किलो कॅलरी |
शरीराची वाढ व झीज भरणे |
स्निग्ध |
२० ते ३० % |
९.३ किलो कॅलरी |
ऊर्जेचा राखीव साठा |
४. स्निग्ध पदार्थ – स्निग्ध पदार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून बनलेले असतात. पिष्टमय पदार्थांच्या तुलनेने स्निग्ध पदार्थांत हायड्रोजनचे प्रमाण जास्त आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते.
मार्गारिन – हा लोण्यासारखा परंतु त्याचा स्वस्त पर्यायी पदार्थ आहे. वनस्पतीजन्य वा प्राणीजन्य स्निग्ध पदार्थ आणि पाणी यांच्या मिश्रणापासून हे तयार करतात.
स्निग्ध (मेद) पदार्थ कार्ये – अत्यावश्यक स्निग्धाम्ले पुरवितात. जीवनसत्वे वाहक, त्वचेखालील थर उष्णता रोधक म्हणून कार्य करतो. त्यामुळे शरीराचे तापमान कायम राहते. यकृत किंवा मूत्रपिंड सारख्याअ इंद्रियाभोवती थर आघातापासून संरक्षण देतो. मेदाचे पचनानंतर मेदाम्ल व ग्लिसरॉल मधे रूपांतर होते. जास्तीचे मेद त्वचेखाली साठविले जातात. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून मेदाचा उपयोग होतो.
स्त्रोत – खाद्यतेल, तूप, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, चरबी, मासे व माशाच्या यकृताचे तेल.
आधिक्य – लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, धमनी काठिण्य होते. धमनी काठिण्यात धमन्यांच्या आतून कोलेस्टेरॉल व टायग्लिसरॉईड यांचा थर साचतो. यामुळे अर्धांग वायू, गँगरीन किंवा हृदयरोग होतो.
२). अकार्बनी पदार्थ
१. खनिजे ( क्षार ) – यात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन सोडियम, पोटॅशिअम, फ्लुओरिन आणि इतर खनिजांचा समावेश होतो.
१. कॅल्शिअम व फॉस्फरस
कॅल्शिअम
हाडे व दाताची वाढ करणे, कॅल्शिअममुळे स्नायूच्या आकुंचन आणि प्रसरणाचे नियंत्रण होते. रक्त गोठण्यास मदत होते. ATP निर्माण करण्यात फॉस्फरस आवश्यक असतो.
स्त्रोत – नाचणी, तीळ, मनुका, खारीक,दूध व दूधाचे पदार्थ, सागरी अन्न, अंडी, मेथी इ.
२. लोह – हिमोग्लोबीन ऑक्सिजन वहन करतो. मायोग्लोबीन हे लोह प्रथिन स्नायूंच्या हालचालीसाठी आवश्यक असते. ऑक्सिडीकरण करणे. स्त्रोत – मूत्रपिंड,यकृत, तृणधान्ये व कडधान्ये, मनुका, खारीक, हिरव्या पालेभाज्या लोहाच्या अभावी रक्तक्षय ( Anaemia) होतो.
३. आयोडिन – थॉयरॉक्सिन संप्रेरकाचा घटक, आयोडिनच्या अभावी गॉयटर ( गलगंड) हा रोग होतो. पाण्यात व मिठात पोटॅशिअम आयोडेट घालणे. पर्वतीय भागात हा रोग आढळतो. उदा. हिमालय, सातपुडा
४. फ्लुओरिन – हाडे व दात निरोगी राहण्यासाठी फ्लुओरिन ०.८ p.p.m. घेणे. दंताक्षय टाळला जातो. फ्लोरिनच्या अधिक्यामुळे दातावरचे दंतिन इनॅमल फिक्कट होऊन दाताचा तसेच हाडांचा फ्लुरोसिस होतो. स्त्रोत – पिण्याचे पाणी २.पाणी – शरीरात सुमारे ६५% पाणी असते. लहान मुलांत ७५% पर्यंत पाणी असते. पाणी शरीरातील सर्वच पदार्थांमध्ये असते. पाण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. सांध्यातील वंगण म्हणूनही पाणी उपयोगी ठरते. कुपोषण – हे अन्नाचा अभाव किंवा अन्नाचे अधिक प्रमाणात सेवन ( अतिपोषण) यामुळे होते.
-
गिरणीतून तांदूळ काढताना २ ते १०% घट होते. केळी कमी तापमानावर साठविल्यास काळी पडतात.
-
ताक पिवळे भांड्यात ठेवल्यास खराब होते. तर दूध तांब्याच्या भांड्यात ठेवले तर हिरवट होते.
-
पुर्णपणे न वाळवलेल्या धान्यामध्ये विकरांची क्रिया चालूच राहते. व ते बिघडते. विकरामुळे फळे व भाज्याही खराब होतात.
-
दुधात सर्वाधिक असणारा घटक – कॅल्शिअम
पदार्थ |
शर्करा प्रकार |
पदार्थ |
शर्करा प्रकार |
तृणधान्ये |
माल्टोज |
दूध |
लॅक्टोज |
ऊस |
सुक्रोज |
द्राक्ष |
ग्लुकोज |
आंबा |
फ्रुक्टोज ( सर्वात गोड) |
मध |
लेवलोज |
मानवाचे स्वास्थ आणि रोग
-
आरोग्य म्हणजे शारिरीक, मानसिक व सामाजिक स्वास्थ होय. अशी आरोग्याची व्याख्या जागतीक आरोग्य संघटना (W. H. O. ) ने केली आहे.
-
प्राथमिकपणे आपले आरोग्य हे अनुवंशिक असते. दमा, मधुमेह, सांधिवात, मानसिक दौर्बल्य इ. गोष्टी अनुवंशिकतेने पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात.
आपले स्वास्थ वातावरणाशी निगडीत असते. त्याचप्रमाणे जीवनपध्दती राहणीमान, अन्न ह्या सर्वांशी स्वास्थाचा संबंध असतो.
-
भारतीय औषध पध्दतीत आयुर्वेद, सिध्द, युनानी, आणि होमियोपॅथी तसेच योग व निसर्गोपचाराचाही समावेश होतो.
चिकित्सा पध्दती –
१.आयुर्वेद – इ. स. पूर्व ५००० वर्षे पुर्वीची संपूर्ण भारतीय पध्दती आहे.
-
आयुर्वेदाचा शब्दशः अर्थ जीवनशास्त्र असा होतो. अथर्ववेदाचा एक भाग आहे
-
आयुर्वेद त्रिदोष पध्दतीवर अवलंबून आहे. १. कफ २. वात. ३. पित्त
-
दक्षिण भारतात आजही सिध्द पध्द्ती उपचारासाठी वापरली जाते.
-
शल्यचिकित्सक पध्दत सुश्रूत यांनी सुरू केली.
-
उपचार पध्दतीत चरक व वाग्भट हे उध्वर्यु मानले जातात.
-
आयुर्वेद पध्दती ही सर्वात जुनी उपचार पध्दती आहे.
२. चिनी पध्दत – ही पध्दत इ. स. पूर्व २५०० वर्षे काळातील आहे. स्त्रित्व आणि पुरूषोत्व अशा दोन संकल्पांवर आधारीत ही पध्दती आहे.
-
चिनी पध्दती प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपचारावर आधारित आहेत. चिनी पध्दतीतील ऍक्युपंक्चर थेरेपी ही शल्यचिकित्सेसाठी गुंगी आणण्यास वापरतात.
-
ऍक्युप्रेशर – ही जपानी पध्दती आहे.
३. होमियोपॅथी – ही पध्दती जर्मनीत निर्माण झाली. या पध्दतीचा शोध सॅम्युअल हायेनमान (Hahnemann) याने लावला. या पध्दतीत औषधाने रोगाची लक्षणे आधी उग्र करून मग त्याचे दमन केले जाते.
४. ग्रीक पध्दती / ऍलोपॅथी – ही ग्रीस देशातील उपचार पध्दती आहे. याचा जनक हिप्पोक्रेटस हा शास्त्रज्ञ होय. ह्यालाच पाश्चिमात्य वैदक शास्त्राचा जनक मानले जाते. त्याने प्रथमच निरनिराळ्या रोगांचे व त्याच्या लक्षणाचे वर्गीकरण केले
-
वैद्यकशास्त्रात नितीमत्तेची दिली जाणारी शपथ – हिप्पोक्रेटसची शपथ
साथीचा रोग झपाट्याने पसरतो याचा शोध हिप्पोक्रेटसनेच लावला. ५.युनानी – याचा शोध अरबांनी लावला . त्यांचा आधार ग्रंथ – अलहावी.
-
अरबांचे होवून गेलेले वैद्यक – अविझेन्ना व राईस.
-
इतर उपचार पध्दती – सिध्द,तिबेटी, निसर्गोपचार इ.
-
जन्मतः हृदयात दोष असलेले मुल – ब्ल्यू बेबी
-
मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा १९ व्या शतकात जर्मन शास्त्रज्ञ बिल हेल्म वुडंट याने लिपझींग, जर्मनी येथे सुरू केले.
-
Rh +Ve रक्तगटाच्या व्यक्तीने Rh – Ve रक्तगटाच्या व्यक्तीशी विवाह केल्यास रक्तगटाचे संतूलन होत नसल्याने होणारे मूल जगत नाही.
मानसिक आजार –
१.मेदूंचे विकार
मेंदूला होणारी इजा, गाठ, गडू इ. प्रकारच्या गोष्टीतून विकार होतात. उदा. बुध्दीभ्रम, विस्मरण, भावनिक असमतोल.
२. परिस्थितीमूलक दोष – हे दोष परिस्थितीतून निर्माण होतात. आणि मानसिक ताण, भावनिक उद्रेक, वर्तन समस्या, गंभीर आजार, अतिव दुःख इ. मुळे मानसिक आजार होतात.
३. न्युरोसिस – विविध प्रकारच्या समायोजन समस्येतून हा रोग निर्माण होतो. न्युरोसिस झालेली व्यक्ती सतत चिडचिड करते, चिंता ग्रस्त असते, भयभीत व सांशक असते. त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे सततची चिंता, भिती, थकवा, मानसिक थकवा, अशक्तपणा ही असतात. वरील मानसीक अवस्थेत हायपोकॉन्ड्रीसयाक (Hypochondric) असे म्हणतात.
४. सायकॉसिस ः- यालाच उन्माद असेही म्हणतात. यामध्ये शारीरिक उन्माद व क्रियाशील उन्माद असे दोन भाग पडतात. क्रियाशील उन्माद मानसीक कारणांनी तर शारिरीक उन्माद शारिरीक कारणाने होतात. उन्माद झालेली व्यक्ति वस्तुस्थितीपासून दूर गेलेली असतात. आपल्या लायकीपेक्षा नेहमी कमी मिळाले असे नेहमी वाटत असते. अशा रोग्यांना इस्पीतळात दाखल करुन इलाज करावा लागतो. सायकॉसिसचे उप प्रकार – १. शिझोफेनिया २. पॅरानोनिया.
५. व्यक्तीमत्व दोष (Personality Disorder ) :- या आजारात व्यक्ती असामाजीक वर्तन करते. विषमायोजना त्याचे मुख्य कारण असते. गुन्हेगारी प्रवृत्ती, फसवेगिरी, समाज विरोधी कृत्ये, अती मद्य सेवन, व्यसनधिनता, लैंगिक विकृत्ती वगैरे प्रकार या आजारात मोडतात.
६. मानसिक दौर्बल्य - या प्रकारात मानसीक पातळी कमी झालेली असते, मानसिक दौर्बल्य कारणे अनुवंशिक असतात.
मानसिक आजारावर उपाय योजना –
१. शॉक पध्दती – रोग्याची शारिरीक, मानसिक स्थिती व आजाराची तीव्रता याच्यानुसार शॉक दिले जातात व इन्शुलिन, मेट्रॉमॉल इ. चे औषध दिले जाते.
२. औषधोपचार पद्धती – फिनोबार, बिरोन, ब्रीमाईड, डॉयामॅनटीन व मेसॅनटाईन वगैरे औषधांनी निद्रानाश, चिंता, फिट्स येणे इ. सारखे आजार दूर केले जातात.
३. मनसोपचार पध्दती – मनसोपचार पध्दती म्हणजे विविध प्रकारच्या मानसिक आजारावर मनोविश्लेषण, सुचना, पूर्वशिक्षण इ. पध्दतीचे उपचार केले जातात. हे उपचार प्रशिक्षीत व अनुभवी मानसोपचार तज्ञ अथवा मनोवैज्ञानिकाद्वारे केले जातात. ४.
व्यावहारिक चिकीत्सा पध्दती – शारिरीक व प्रामुख्याने मानसिक रोग निदान व रोग निवारण करण्यासाठी रोग्यास मानसिक व शारिरीक व्यवसाय देणे म्हणजे व्यवसाय चिकित्सा पध्दती होय. या उपचार पध्दतीत रूग्णास नेहमी कोणत्यातरी कार्यात मग्न ठेवले जाते त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. लहान मूलांवर उपचार करतांना या पध्दतीत खेळ उपचार पध्दती म्हणतात.
५. समाज चिकित्सा उपचार पध्दती – मानवाच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणून त्याला जगण्यासाठी योग्य सामाजिक वातावरण निर्माण करणे हा या पध्द्तीचा मुळ उद्देश असतो. आधुनिक काळात आधुनिक उपचार तंत्र म्हणून रोग्याला नैसर्गिक वातावरणात ठेवले जाते.
-
सजिवांचा अभ्यास करण्यासाठी कमी तापमानयुक्त वातावरणाचा वापर – क्रायोबायोलॉजी
प्रतिरक्षण – लसिकरण (Immunisation) –
-
विज्ञानाच्या प्रगतीने शरिरात कृत्रिमरित्या रोग प्रतिकारक शक्तीचा विकास करण्याच्या शक्तीस किंवा पध्दतीत लसीकरण असे म्हणतात.
-
कृत्रीम लसीकरणाची सुरूवातः तुर्कस्थान
-
लसीकरणाचा जनक इंग्रज शास्त्रज्ञ – एडवर्ड जेन्नर ( १७४९ ते १८२३)
[(Cow – Pox) गोवर, (small – pox ) देवी, (Chicken – Pox ) कांजिण्या इ.] देवी व कांजण्यावर लस एडवर्ड जेन्नर याने शोधून काढली.
-
१९५३ मधे पोलिओ प्रतिबंधक लस तयार केली – डॉ साल्क
-
१९६७ साली हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली – डॉ. ख्रिश्चन बर्नाड ( दक्षिण आफ्रिका)
-
सल्फा निमाईड – सल्फा मालिकेतील १ ले औषध शोधले. – गेहार्ट डोमॅग ( १९३५ )
-
मानसचिकित्सा शास्त्राचा जनक मानला जातो. – सांतियागो रामन काजल ( १८५२ ते १९३४ )
-
सप्टेंबर १९७८ आल्मा – आटा मधील जाहिरनाम्यानुसार “सर्वासाठी आरोग्य” ह्या संकल्पने नुसार २००० पूर्वीच हे उदिष्ट गाठविण्याचे ठरले होते. या उदिष्ट पूर्ततेसाठी भारत सरकारने “ राष्ट्रीय आरोग्य धोरण २००२’’ (National Health Policy NHP) जाहीर केले असून ते २०१५ पर्यंत साध्य करण्याचे निश्चित केले आहे. त्याच प्रमाणे NHP नुसार पुढील आजारांचे उदिद्ष्टे –
१. लिम्फॅटिक फायनॅरिसीसी ( हत्तीरोग ) निर्मूलन उदिष्ट्य – २०१५ २. काला आजार नियंत्रणात आणला जाणार आहे – २०१० ३. एड्सची नव्याने होणारी लागण शुन्यावर आणण्याचे उदिष्ट– २००७ ४. पोलिओ संपुर्ण निर्मूलन करण्याचे उदिष्ट– २००५ ५. कुष्ठरोग निर्मूलन उदिष्ट – २००५
-
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (२००५ – १२)
-
दि १२ एप्रिल २००५ रोजी ग्रामीण पातळीवरील सर्व आरोग्य सेवांचे एकत्रित करुन प्रत्येक गावासाठी स्वतंत्र आरोग्य योजना याअंतर्गत राबविणे सुरु झाले. यात केंद्राचा ८०% व राज्याचा २०% खर्चाचा वाटा असणार आहे.
-
ही योजना जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी राबवितो.
-
आरोग्य सेवेवरील असणारा खर्च जेडीपीच्या ०.९७% तो २०१२ पर्यंत २ ते ३ ट्क्के पर्यंत मिळ्ण्याचा उद्दिष्ट आहे.
-
भारतात स्थुल राष्ट्रीय उत्पन्नाचा आरोग्य क्षेत्रावर केला जाणारा खर्च – ५.२ %
-
आंतरराष्ट्रीय निर्धारण आयोगाद्वारे भारत देवी मुक्त घोषित – २३ एप्रिल १९७७.
-
W.H.O ने भारत नारुमुक्त घोषीत केले – २०००.
-
भारत जागतीक आरोग्य संघटनेचा सदस्य झाला-१९४८
-
देशातील सर्वात गंभीर आरोग्य समस्येचा रोग – क्षयरोग (TB)
-
आधुनिक समाजात सर्वाधिक आढ्ळ्णारा रोग – मधुमेह (सर्वाधिक प्रमाण – पुरुषांत)
-
राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- जयपूर (विद्यापीठ- दिल्ली)
-
राष्ट्रीय निर्सगोपचार संस्था – पूणे.
-
भारतात पोलिओ निर्मूलनाचा कार्यक्रम सुरु झाला- ९ डिसेंबर १९९५
-
पोलिओची तोंडाद्वारे दिली जाणारी लस – साल्क व्हॅक्सीन
प्लस पोलिओ
-
भारतात सर्वाधिक पोलिओचे रूग्ण उत्तर प्रदेशात आहेत. १९९९ मध्ये टाईप – २ .
-
या पोलिओ व्हायरसचे भारतातून पूर्ण निर्मूलन झाले आहे.
-
भारत पोलिओ लस कच्च्या स्वरूपात आयात करू न ती पुढील संस्थात शुध्द स्वरूपात तयार करतो.
१. हाफकिन बायाफार्मास्युटिकल – मुंबई
२. पॅनाशिया बायोटेक लिमिटेड – दिल्ली
३. भारत इम्युनोलॉजिकल बायोलॉजिकल कॉर्पोरेशन – बुलंदशहर ( उ. प्रदेश )
४. बायोमेड प्रायव्हेट लिमिटेड – गाझियाबाद
-
भारतात बी. सी. जी. चे उत्पादन केले जाते – बी. सी. जी. व्हॅक्सिन लॅबोरेटरी, गिंडी ( चेन्नई )
-
भारतीय औषध उद्योग परराष्ट्रीय कंपन्याच्या ताब्यात – ७०%
-
नेहमीच्या वापरातील औषधे बनविणारी कंपनी – इंडियन फार्मास्युटिकल लिमिटेड
-
भारताला औषध उद्योगास सहकार्य करणारा देश – रशिया
-
भारतीय तसेच युनानी औषधे तयार करणारी कंपनी – भारतीय औषधी फॉर्मोस्युटिकल कार्पोरेशन, अल्मोडा ( उत्तरांचल )
-
सरकारी डिस्पेंसरीजला औषधी पुरवठा करणारी औषध कंपनी – भारतीय औषधी फॉर्मोस्युटिकल कार्पोरेशन, अल्मोडा.
-
हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्स – पिंपरी ( पुणे )
-
प्लेगचा रूग्ण प्रथम आशियामध्ये आढळला.
प्लेग
-
प्लेगचे आढळणारे प्रकार – १) ल्युबोनिक २) सेप्टीसेमिक ३)पल्मोनिक व न्युमोनिक
-
प्लेगचे रूग्ण १९९४ नंतर आढळलेली ठिकाणे – सुरत ( गुजरात ),दिल्ली, मामला (महराष्ट्रातील बीड जिल्हा )
-
राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम – १९५५ ( हा कार्यक्रम ५०% केंद्र पुरस्कृत आहे )
-
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम – १९५५, याच कार्यक्रमास अधिक प्राधान्य – १९८० – १९८३
-
कुष्ठरोग निवारणासाठी पुर्वी दिली जाणारी औषधे – डॅप्सोन किंवा सल्फोन
-
महाराष्ट्रात सोलापूर, उस्मानाबाद व लातूर या ठिकाणी कुष्ठरोग लसीकरणाची मोहिम टाटा रिसर्च सेंटरतर्फे राबविली जाते.
-
राष्ट्रीय हिवताप निर्मुलन योजना – १९५८
-
हिवताप निर्मूलनाचा सुधारीत कार्यक्रम – १ सप्टेंबर १९९७ पासून ( हा कार्यक्रम ५०% केंद्र पुरस्कृत आहे. )
-
संसर्गजन्य रोगावर चालविला जाणारा जगातील सर्वात मोठा आरोग्य कार्यक्रम – हिवताप निर्मूलन कार्यक्रम किंवा मलेरिया निर्मूलन कार्यक्रम
-
राष्ट्रीय अंधत्व निर्मुलन कार्यक्रम – १९७६ पासून ( हा कार्यक्रम १००% केंद्र पुरस्कृत आहे. )
अंधत्व
-
१९८२ पासून राज्यात १० जून हा दिवस प्रसिध्द नेत्र शल्यक्रिया विशारद डॉ. आर. एल. भालचंद्र यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. – दृष्टीदान दिन
-
क्षयरोग नियंत्रणाचा सुधारित कार्यक्रम – २६ मार्च १९९७ पासून.
-
जगातील एकूण क्षयरोग्यापैकी भारतात आढळ्णारे क्षयरोगी – १/३
-
२००२ या राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार क्षयरोगामुळे होणारी मृत्यूसंख्या निम्म्यावर आणण्याचे उदिष्ट्य – २०१० पर्यंत
-
क्षयरोग नियंत्रणाचे कार्य करणारी संस्था – राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण संस्था, बंगळूर ( १९५९ )
-
हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात वर्धा येथे आहे.
-
राष्ट्रीय आरोग्य धोरण २००२ नुसार जगातील ४.५ कोटी अंधत्व ग्रस्तापैकी भारतात आढळणारे रूग्ण – १० लक्ष
-
केंद्र सरकारच्या १००% अनुदान असलेल्या योजना – कर्करोग नियंत्रण, गलगंड, एड्स नियंत्रण, अंधत्व नियंत्रण, मलेरिया निर्मूलन
-
पहिली टेस्ट ट्युब बेबी – १९७८ – लूईस बाऊन – डॉ. रॉबर्ट एडवर्ड व स्टेपडो
-
राष्ट्रीय आरोग्य विमा योजना – ही योजना १ ऑक्टोबर २००७ मध्ये सुरू झाली. यावरील ७५% खर्च केंद्र सरकार करणार असून २५% खर्च राज्य सरकार करणार आहे ही योजना दारिद्र्य रेषेखालील असंघटीत कामगारांसाठी आहे.
-
आम आदमी योजना – ही योजना २ ऑक्टोबर २००७ रोजी – केंद्रशासन,राज्यशासन व एल. आय. सी. यांच्या साह्याने सुरू झाली. ही योजना १८ ते ५९ वयाचा कुटूंब प्रमुख दुर्घटनेमुळे विकलांग झाल्यास ३७०००/- रूपये मिळणारे, नैसर्गिक मृत्यूमध्ये ३० हजार रूपये मिळणार तर अपघाती मृत्यूमध्ये ७५,००० रूपये मिळणार आहे.
-
स्वाईन फ्ल्यू
हा फ्लूचा विषाणू डुकराच्या शरीरात आढळतो. हा इन्फ्ल्यूएंझा H1N1 या विषाणूमुळे होतो. याची सुरूवात २००९ मध्ये सर्वप्रथम मेस्कोमध्ये झाली. भारतात हैद्राबादमध्ये रिदाशेख ही पहिली रूग्ण आढळली . तर पुण्यामधे सर्वप्रथम या रोगाचा बळी गेला.
-
स्वाईन फ्ल्यू रोगावर औषध – टॅमी फ्ल्यू
-
बर्ड फ्ल्यू ( एव्हीएन इन्फ्ल्यूएंझा )
हा पक्ष्यांना होणारा रोग असून तो H5N1 या विषाणूमुळे होतो.
पोषण
-
मंद पोषण (Under Nutrition ) – अपूरे अन्न फार दिवस सेवन केल्याने निर्माण झालेली शरीराची अवस्था होय. मंद पोषणाने अतिथकवा येतो किंवा कार्यक्षमता मंदावते, मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू होतात.
-
कुपोषण – अयोग्य अन्न फार दिवस सेवन केल्याने शरिराची बिघडलेली स्थिती होय. कुपोषणात प्रथिने, जीवनसत्वे इ. चा सतत अभाव असतो.
-
अतिसेवन – विनाकारण अतिअन्न सेवनाची सवयीमुळे शरिरातील फॅट सेल्सचा आकार वाढून शरीर स्थूल बनते.
-
स्थूल लोकांमधे प्रामुख्याने आढळणारे आजार. – हृदयविकार, मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, मेंदूतील रक्तस्त्राव
सुपोषण कार्यक्रमः-
-
एकात्मिक बालविकास कार्यक्रम ( १९७५ – ७६ ) – या कार्यक्रमांतर्गत ६ वर्षे वयांपर्यतच्या मुलांचे पोषण व आरोग्य उंचाविणे, १५ ते ४४ वयोगटातील स्त्रियांना सकस आहार माता - बालसंगोपन विषयक शिक्षण दिले जाते.
-
शालेय सकस आहार कार्यक्रम (१९६८ – ६९ ) –या अंतर्गत ६ ते ११ वर्षे वयोगटातील शाळेतील मूलांचे आरोग्य संवर्धन करणे, मूलांना १५० मि.मी. दुध किंवा १००ग्रॅम पौष्टिक आहार पुरविला जातो.
-
विशेष आहार कार्यक्रम ( १९७० – ७१ ) – शहरी व ग्रामीण भागातील गर्भवती स्त्रिया, लेकुरवाळ्या माता, अर्भके, ६ वर्षा पर्यंतची बालके यांना योग्य पोषणासाठी आवश्यक आहार दिला जातो.
महाराष्ट्राच्या आरोग्यसंबधीत नवीन योजना –
-
राज्यातील रूग्णालयांचे आधुनिकीकरण, आधुनिक उपकरणे सेवांची गुणवत्ता वाढविणे यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने ७५० कोटी रूपये खर्चाचा प्रकल्प – महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प
-
राज्यात २००३ मध्ये तीन नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली – १. कोल्हापूर २. लातूर ३. अकोला
-
हृदय शस्त्रक्रिया केंद्राची निर्मिती करतांना राज्य शासनाने गोरगरीब रूग्णांना उपचार सहजसुलभ व्हावा म्हणून सुरू केलेली योजना – जीवनदायी योजना
-
जीवनदायी योजनेमार्फत दारिद्र रेषेखाली रुग्णांस देण्यात येणारे अर्थसहाय्य –दीड लाख
-
कुटूंब कल्याण
-
कुटूंब नियोजन – कुटूंब नियोजन म्हणजे त्यात केवळ संतती नियमन नसून इअतर घटकांचाही समावेश होतो.
-
भारताच्या राष्ट्रपतींनी २८ मार्च १९७७ च्या अभिभाषणात सांगितले की, कुटूंबनियोजनाचा कार्यक्रम नव्या जोमाने हाती घेण्यात यीईल. हे कार्य संपूर्णपणे ऐच्छीक असेल. शिक्षण, आरोग्य, बाळंतपण, बाल कल्याण, कुटूंब कल्याण, आहार व स्त्रियांचे घटक इ. गोष्टींचा कुटूंब नियोजन हा एक अविभाज्य घटक असेल.
-
१९४९ साली दि फॅमिली प्लॅनिंग असो. ऑफ इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली.
-
शासकीय स्तरावर कुटूंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी भारताने १९५२ पासून सुरु केली.
-
केंद्रीय स्तरावर स्वतंत्र कुटूंब नियोजन खात्याची स्थापना – १९६६
-
महाराष्ट्रात कुटूंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सुपूर्त करण्यात आला -१९६६
-
कुटूंब नियोजन ही संकल्पना स्त्रिया व बालके यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने भारत सरकारने कुटूंब नियोजनाचे नामकरण २८ मार्च १९९७ ला असे केले - कुटूंब कल्याण
-
कुटूंब कल्याण कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्टे - लोकसंख्या वाढीवर नियंत्रण
-
मातेचे स्वास्थ टिकविण्यासाठी व नको असलेली गर्भधारणा नष्ट करण्याचा अधिकार स्त्रियांना या कायद्याद्वारे देण्यात आला आहे - मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्सी ऍक्ट,१९७१
-
कुटूंब नियोजन संबधी संज्ञा- लॅप्रोस्क्रोपी
-
स्त्रीयांची कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया – ट्युबेक्टॉमी
-
पुरुषांची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया – व्हॅसेक्टोमी
-
जन्माअगोदर गर्भ परिक्षा नियंत्रण कायदा (१९९४) नुसार लिंग परिक्षणावर बंदी – १ जाने. १९६६
-
लिंग परिक्षण पध्दती -अल्ट्रोसोनोग्राफी, एमनियो सौरसीस इ.
-
गर्भाशयाचा कर्करोग शोधण्यासाठी टेस्ट –एंडोस्कोपी
-
गर्भाशयात वाढलेल्या मुलाचे वाढीचे परिक्षण केले जाते – प्रतिध्वनी ( अल्ट्रासाउंड)
-
गर्भवती स्त्रीयांना टेड्रासायक्लीन देत नाही कारण –गर्भात व्यंगनिर्मीती होते.
-
गर्भजल परिक्षा कायदा महाराष्ट्रात अंमलात आणला गेला - १० मे १९८८
-
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगन्सी ऍक्ट, १९७१ नुसार २० व्या आठवड्यापर्यंत गर्भापात कायदेशीर आहे.
-
गर्भधारणा रोखण्यासाठी उपाय – डायक्रॉम व लिपीज लुप
-
गर्भनिरोधक गोळीवर विक्रीकरात दिल जाणारे अनुदान - ५५ ते ८० %
-
दोन मुलींच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन करुन घेणा-या दारिद्र रेषेखालील पालकांच्या मुलींना जाहिर करण्यात आलेली योजना - सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना
-
भारताची लोकसंख्या २००१ नुसार – १०२ कोटी ७० लक्ष
-
१९९१ – २००१ या दशकात भारताच्या लोकसंख्येत २१.३४% इतकी वाढ झाली.(१८ कोटी ७ लाख)
-
महाराष्ट्राची २००१ नुसार लोकसंख्या ९ कोटी ६७ लाख ५२ हजार असून देशात उत्तरप्रदेशच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो.
-
दोन आपत्ये असणारे कुटूंब म्हणजे छोटे कुटूंब अशी कुटूंबाची व्याख्या स्वीकारुन ही संकल्पना सर्व शासकीय कर्मचा-यांना वैयक्तीक लाभासाठी बंधनकारक केली आहे.
-
राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण ( २०००) भारत सरकारने निश्चित केले असून लोकसंख्या पर्याप्त करण्याचे किंवा स्थिर करण्याचे उदिष्ट – २०४६
-
लोकसभेची सदस्यसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार २००१ पर्यंत निश्चित केली होती ती सदस्य संख्या २०००च्या लोकसंख्या धोरणानुसार कायम आहे- २०२६ पर्यंत
-
लोकसंख्या धोरण -२००० नुसार कुटूंबनियोजनाचा भार स्त्रियांवर टाकला असून पुरुषांच्या बाबतीत ते सौजन्यशील असल्याची टिका केली – डॉ. नीना पुरी ( अध्यक्ष FPAI)
-
व्यसनाधिनता ( Problem of Drug Addication) :-
व्यसनाचे दुष्परिणामः-
-
मद्याचे परिणामः- मद्य हे शारिरीक व मानसिक दौर्बल्य निर्माण करणारे द्रव्य आहे. त्याचा परिणाम मेंदूची क्रियाशिलता शिथील व दुर्बल करण्यात होत असते. व्यक्ती स्वतः चे विचार, भावना तसेच इच्छा यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याचे मेंदूवर परिणाम झाल्याने शरिर समतोल राहत नाही.
-
अतिमद्यसेवनाने पोटदुखी, आम्ल पित्त, अल्सर, अंतर्गत रक्त स्त्राव, हृदय आणि यकृत इत्यादी दोष संभवतात.
-
हेरॉईन (Heroein)- हे एक तीव्र स्वरुपाचे मादक द्रव्य (Drug) आहे त्या पासून अनेक मादक द्रव्ये बनविली जातात. अफूवर रासायनिक प्रक्रिया करुन त्यापासून हेरॉईन बनवतात.
-
हेरॉईन तीन ते चार वेळेस घेतले तरी मनुष्य त्याचा गुलाम बनतो.
-
अफूची लागवड मध्यप्रदेश ( भारत ), चीन, नेपाळ, थायलंड, कोरिया, पाकिस्तान, अफगानिस्तान, मध्य पूर्व देशांमध्ये केली जाते.
-
अफूत गुंगी आणण्याचे सामर्थ प्रचंड स्वरुपात असते.
-
गर्द किंवा Brown Suger म्हणतात. ते हेरॉईन पासून तयार केले जाते. जास्तीत जास्त शुध्द गर्द मध्ये ३ ते १० % हेरॉईन असते.
-
अफूतील एक घटक म्हणजे मार्फिन होय. वैद्यक शास्त्रात मार्फिनचा उपयोग वेदनाशमनासाठी करतात.
-
मार्फिनचे इंजेक्शन कर्करोगावरील तीव्र वेदना कमी करण्यासाठी दिले जाते.
-
मार्फिन हे प्रभावी गुंगी आणणारे व झोप आणणारे द्रव्य आहे.
भांग, गांजा, चरसः-
गांजा
भांग, गांजा, चरस हे हेम्प (Hemp) जातीच्या कॅनबिस (Cannbis) या वनस्पतीपासून मिळतात. या झाडाच्या पानांना भांग असे म्हणतात. त्याच्या बियांना गांजा असे म्हणतात. वनस्पतीपासून मिळणा-या चिकट पदार्थास चरस किंवा हशिश असे म्हणतात. हशिश हे चरस किंवा भांग पेक्षा अधिक तीव्र असते.या सर्वांना एक सामुहीक नांव आहे – मरिजुआना – हे एक प्रकारचे भ्रम व भास निर्माण करणारे द्रव्य आहे.
मादक द्रव्ये व व्यसनाची कारणे – कुतूहल, समवयस्क समुह, कौटुंबिक वातावरण, सामाजीक रचना, दुःख तणावापासून मुक्ती, व्यक्तीमत्व इ.
-
महाराष्ट्रात गुटखा बंदी सर्वप्रथम लागू केली. – १ ऑगस्ट २००२
पाण्यामुळे साथीचे रोग
साथींच्या रोगांचे प्रकार :-
१. ऍन्डेमिक (Endemic):- काही साथीचे रोग विशिष्ट प्रांतात किंवा भौगोलिक प्रदेशापुरतेच मर्यादीत राहतात. अशा जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने केलेल्या व्याख्येनुसार शारीरीक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य होय तर रोग म्हणजे सर्व सधारण स्वास्थ्यापासून वंचित होणे होय. सर्व साधारण रोगांचे वर्गीकरण दोन गटात केले जाते.
अ. संसर्गजन्य (Communicable) – संसर्गजन्य रोग पसरु शकतो. त्याचा प्रसार स्पर्श, अन्न, पाणी, हवा आणि काही प्राण्यामार्फत होतो. उदा. इन्फ्लुएंझा, क्षय, नायटा, अमांश यासारखे रोग विषाणू, जिवाणू, कवक आदिजीव यापासून होतात. अ) संसर्गजन्य रोग
रोग प्रसाराचे साधन |
पसरणारे रोग |
१. पाण्याद्वारे पसरणारे रोग |
कॉलरा ( पटकी ), विषमज्वर, अतिसार, जंत, कावीळ,नारू, लेप्टोसायरॉसिस इ. |
२. हवेतून पसरणारे रोग |
सर्दी, इन्फ्ल्युएंझा, घटसर्प, क्षय |
३. थुंकी व श्वासावाटे होणारे रोग |
क्षयरोग, डांग्या खोकला, गोवर |
४. किटकांमार्फत पसरणारे रोग |
ऍनाफेलीस डासाच्या मादीमुळे हिवताप, क्युलेस डासाच्या मादीमुळे, हत्तीरोग, घरमाशांमुळे अमांश, पटकी, अतिसार, पिसांमुळे प्लेग, उवा- टायफस, डास-पीतज्वर, उंदीर-प्लेग |
५. जनन इंद्रियांद्वारे |
एड्स, गरमी, परमा |
ब. असंसर्गजन्य रोग – असंसर्ग जन्य रोग रोगजंतूव्यतिरिक्त इतर कारणांमुळे संभवतात. या रोगांचा एका व्यक्ती कडून दुस-या व्यक्तीकडे प्रसार होत नाही. उदाः कर्करोग, मधुमेह विविध कारणांमुळे मानवास होणारे रोग
रोगाचे कारण |
होणारे रोग |
विषाणू |
देवी, इन्फ्ल्युएंझा, पोलिओ, कांजण्या, मेंदूदाह,खूप-या, गोवर, रेबीज, डेंगू फिवर, हरप्लेक्स सिंप्लेक्स, एड्स, कावीळ, हगवण,स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, चिकनगुनिया,नागिन,सार्स इ. |
जीवाणू |
न्यूमोनिया, कॉलरा, कुष्ठरोग, क्षयरोग, धर्नुवात,घटसर्प, प्लेग, सिफीलीस, गनोरिया, बॅसिलरी, डिसेंटी मेनिजायटीस, विषमज्वर (टायफाईड) , लेप्टोप्लायरासिस, ऍन्थ्रॅक्स, इ. |
कवक |
रिंगवर्म, मदुराफुट,धोबीइच, गजकर्ण, खरूज,चिखल्या, इथिलिट्स फूट इ. |
आदिजीव |
मलेरिया,अमीबीक, डिसेंटी, व्हजायनिटिस, निद्रानाश, काळा आजार इ. |
जंत / कृमी |
हत्तीरोग, नारू, टिनियासिन, अस्कारियासिस, अंकायलेस्टो, थामायसिन इ. |
काही महत्वाचे रोग
१. हिवताप (Malaria )- हा संसर्गजन्य रोग असून प्लाझमोडियम व्हायव्हॅक्समुळे हिवताप होतो. ऍनाफिलीसडासाची मादी चावून हा आदिजीव मानवी शरीरात प्रवेश करतो. या परजीवास जगण्यासाठी व आपले जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी माणूस व डास अशा दोन पोशिंद्यांची गरज असते. हा परजीव प्रथम यकृत व नंतर लोहीत रक्त कणिकांत शिरतात . रक्तकणिका फुटून जंतूविष तयार होते. हे जंतूविष रक्तात मिसळल्यास रोग्यास हुडहूडी भरते. हा आजार चालू राहिल्यास प्लिहा मोठी मोठी होते. पंडूरोग होतो आणि अतिशय अशक्तपणा येतो.
उपाय – डास नष्ट करण्यासाठी डी. डी. टी. व बी. एच. सी फवारणे, गटारात, तुंबलेल्या पाण्यात केरोसिन सोडणे डासांचे डिंभक नष्ट करण्यासाठी बदके, गप्पीमासे, Gambusia, Minnous trouts मॉक्सीटो फिश पाण्यात सोडणे.
उपचार – क्लोरोक्क्विन किंवा पॅलूड्रीन आठवड्यातून दोन वेळा ३०० ग्रॅम घेणे तसेच क्विनाईन ( सिंकोना झाडापासून ), प्रोग्वानिल, यांचाही उपयोग करतात.
शोध – यास मलेरिया असे नाव दिले – Macculoch प्लाझमोडियम आदिजीवाचा शोध – Laveran ( १८८० ), रोनॉल्ड रॉस ने इ. स. १८८७ मध्ये मलेरिया डासामुळे प्रसार पावतो हा शोध लावला. त्यावर औषध शोधले याबद्द्ल त्यास नोबेल पारितोषिक देण्यात आले.
२. कुष्ठरोग – हा रोग मायकोबॅक्टेरिय लेप्री या दंडगोलाकार जीवाणूपासून होतो. १८७३ साली नॉर्वे चा शास्त्रज्ञ डॉ. ए. हॅन्सन यांनी या जीवाणूचा शोध लावला. कुष्ठरोगाचे चट्टे कधीही खाजत नाही. कुष्ठरोगावर D. D. S. ( Diamino Diphenyl Sulphona) हे परिणामकारक औषध आहे. याला डॅप्सोन म्हणतात. तसेच रिफीम्पसिन आणि क्लोफ झिमिन ही अत्यंत परिणामकारक औषधे आहेत. तसेच MDT (मल्टी ड्रग थेरपी) हा उपचार करतात. कुष्ठरोगाचे निर्मुलन ३० जानेवारी २००६ रोजी झाले
३. पटकी (Cholera ) – हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. हा रोग व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या स्वल्पविरामकार जीवाणूपासून होतो. रोग्याचे मलमूत्र, घरमाशा यामुळे हा रोग पसरतो. त्याची साथ पसरण्याची खूप शक्यता असते. म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास तसेच यात्रेच्या वेळी यात्रेकरूंना इंजेक्शन देतात. रोग्याच्या जीवाणूंचा नाश पोटॅशिअम परमँगनेटमुळे होतो.
४. डायरिया – जीवाणू, आदिजीव व विषाणूमुळे होतो. उपाय – ORS ( Oral Rehydration Solution ) देणे.
५. एड्स
– एड्सचा शोध सर्वप्रथम जून १९८१ मध्ये अमेरिकेत लागला.
शोध - १) डॉ. ल्यूक मॉटग्रीयर – फ्रान्स,
२) रॉबर्ट गेलो – (USA ) AIDS चा अर्थ Acquired Immuno Deficiency Syndrome असे असून तो HIV (Human immune Deficiancy Virus) या विषाणूमुळे होतो. HIV विषाणू पांढ-या रक्तपेशी पैकी T – Lymphocytes प्रकारच्या रक्तपेशींवर हल्ला करत असतो.
लक्षणे – डायरीया, शरीराचे वजन कमी होणे, बारीक ताप येणे, कवकाचा प्रार्दुभाव व लिंफोमा ही आहेत. एड्स वर उपचार म्हणून Azide Thymine Dimine वापरतात. तसेच ATZ, DDC – Didoxycytidine याचाही उपयोग करतात. एड्सच्या चाचण्या वेस्टर्न ब्लॉट टेस्ट या निदानासाठी घेतात. ELISA – Enzyme Linked Immuno Sorbent Assay या अप्रत्यक्ष चाचण्या आहेत तर EIA Test ( Enzymo Immuno Assay ) ही प्रत्यक्ष चाचणी आहे
-
रोगाची लक्षणे – अचानक व कारणाशिवाय वेगाने वजन कमी होणे, ग्रंथींना सुज येणे, ताप व घाम येणे.
-
एड्सचे प्रमाण जास्त असणारी राज्ये – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मणिपूर, नागालँड.
-
रक्ततपासणी व निदान केंद्र – राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे, जे. जे. हॉस्पिटल मुंबई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
-
एड्स संदर्भात भौतिक स्वरूपाचे संशोधन करणारी संस्था – राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था,(NARI ) भोसरी (पुणे) सर्वाधिक प्रमाण – मणिपुर, महाराष्ट्र – सांगली
-
भारतात सर्वप्रथम एड्सचा रूग्ण आढळला – एप्रिल १९८६, मद्रास
-
महाराष्ट्रात एड्सचा पहिला रूग्ण आढळला – १९८६ मुंबई
-
राष्ट्रीय एड्स निवारण कार्यक्रम – १९८७
-
राष्ट्रीय एड्स निवारण समिती अध्यक्ष – स्वास्थ व परिवार कल्याण मंत्री
-
महाराष्ट्रातील एड्स नियंत्रण कार्यक्रम – Avert
६. ऍस्कारियासिस – याचा प्रसार दूषित पाणी व अन्नामुळे होतो. हा सामान्यतः लहान मुलांमध्ये ऍस्कॅरीस लुब्रीकॉयटीस या अंत्रकृमी परजीवीमुळे होतो. यामुळे यकृत फुप्फुसे यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. स्नायुंचे अचानक अंकुचन होऊन पंडूरोग होतो.
-
उपचार – सॅन्टोनिन, हेट्रझान, टेट्रॅमिसोन सारखी कृमीनाशक औषधे वापरतात.
७. हेपॅटीटीस ( Hepatitis ) - ही यकृताची रोगग्रस्थ स्थिती आहे. हा रोग १) हेपॅटीटीस- ए विषाणू (एच. ए. व्ही ), २) हेपॅटीटीस ( बी ) विषाणू ( एच. ए. बी.), ३) नॉन ए विषाणू आणि ४) नॉन बी विषाणू अशा चार प्रकारांच्या विषाणूंमुळे होतो.
१. हेपॅटीटीस ए – एच. ए. व्ही. मुळे होणारा तीव्र स्वरूपाचा सांसर्गिक रोग आहे. ताप, थंडी, डोकेदुःखी, अशक्तपणा, थकवा, भूक मंदावणे, वांत्या, पिवळी लघवी, डोळे पिवळे होणे इ. लक्षणे दिसतात. याची तीव्रता वाढल्यावर हजार रोग्यांमधे एकाचा मृत्यू होऊ शकतो.
-
उपचार – यावर निश्चित असा उपाय नसून पूर्णपणे झोपून विश्रांतीची शिफारस केली जाते.
-
मानवी इम्युनोग्लोबीनच्या अंतःस्नायू इंजक्शनमुळे विषाणूला बळी पडण्यास प्रतिबंध होतो.
२. हेपॅटीटीस बी – एच. बी .व्ही. या व्हायरसमुळे होतो. यामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. यातील विषाणूंचे वहन रक्त देणे, अयोग्य निर्जंतुक सुया, दुस-याचे वापरलेले रेजर, दुस-याचा टुथब्रश, टॉवेल इ. वस्तू वापरणे तसेच लैंगिक संबंध ठेवणे व आईकडून जन्माच्या वेळेस तिच्या मुलाला अशा प्रकारे प्रसार होतो.
-
उपचार – १) वरीलप्रकारे संसर्ग होणार नाही दक्षता घेणे, २) हेपॅटीटीस बी ची लस घेणे
-
नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI ) भोसरी (पुणे)
विषाणूमुळे होणारे रोग व उपाय
रोगाचे नाव |
कारणीभूत विषाणू |
उपाय व वैशिष्ट्य |
देवी (Small pox) |
Viruola Virus |
लस जन्मतः डाव्या दंडावर देतात १९७७ साली भारतातून निर्मुलन |
रेबीज |
कुत्रा, माकड, उंदीर, मांजर चावल्याने- हायड्रोफोबिया, न्यूटॉपिक व्हायरस |
प्राण्याची भिती वाटते |
इन्फ्ल्युएंझा / फ्ल्यु |
Myxovirus influenza |
लस घेणे |
कांजण्या ( चिकन पॉक्स) |
व्हायरीसेला झोस्टर |
त्वचेवर कॅलामाईन मलम लावणे |
गालफुगी (Mumps) |
पॅरामिक्सो व्हायरस |
कर्णपूर्व ग्रंथीला सूज येते |
डेंग्यु फिवर |
अरबो व्हायरस |
इडिस इजिप्ती डासाद्वारे प्रसार |
पोलिओ |
Entero Virus |
पोलिओ व्हॅक्सिन |
कावीळ |
A ते E प्रकार ,अन्न व पाण्याद्बारे प्रसार |
गामा ग्लोब्युलिन, उसाचा रस, इंटरफेरॉनचे इंजेक्शन ,बी जीवनसत्व |
गोवर (Measles ) |
Myxo virus |
गामा ग्लोबुलिनची लस घेणे |
मेनिनजायटीस |
मेंदूस प्रभावित करतो. |
|
इंद्रिय बिघाडामुळे होणारे रोग
-
परिहृदयरोग (Coronory Diseases ) – यात कोलेस्टेरॉलचा थर धमन्यांत जमल्यामुळे हृदयास कमी रक्त पुरवठा होतो. यास धमन्या काठिण्य म्हणतात.
-
युरेमिया – मूत्रपिंडरोपण हे त्यावरील उपचार आहेत.
-
कर्करोग – पेशींची अनियमित व अपसामान्य वाढ होते. धूम्रपान, डांबर साधिते ,रंजके, आण्विक स्फोट तसेच अल्ट्राव्हायलेट किरण, क्ष किरण उत्सर्जन यामुळे हा रोग होतो. केमोथेरपी, रेडिओथेरपी या उपचार पध्दती वापरतात. कर्करोगाची चाचणी बायांप्सी (Biopsy) द्वारे केले जाते.
चयापचयातील बिघाडामुळे होणारे रोग;-
१. मधुमेह
हा रोग अनुवंशिक असू शकतो. स्वादूपिंडातील आयलेट्स ऑफ लँगर हॅन्स मधील बीटा पेशी मधून इन्शुलिन स्त्रवते. त्या पेशींच्या कार्यात बिघाड झाल्यास यकृतातील उती ग्लुकोजचा वापर करु शकत नाही. परिणामी ग्लुकोज मूत्रातून बाहेर टाकले जाते.
उपाय – इन्शुलिनचे इंजेक्शन गुरांच्या स्वादूपिंडापासून काढतात.
२. संप्रेरकांचे असंतुलन – अवटू(Thyroid), पीयुषीका(Pituitory), अधिवृक्क (Adrenal), अंडाशय(Ovary), आणि वृषण या अंतःस्त्रावी ग्रंथी विशिष्ट संप्रेरके स्त्रवतात. त्यात बिघाड झाल्यास रोग होतात.
अनुवांशिक दोष – एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित होणा-या दोषांना अनुवांशिक दोष म्हणतात. जनुकात झालेल्या उत्परिवर्तनामुळे किंवा गुणसुत्रात असाधारण बदल झाल्यास असे दोष निर्माण होतात.
१. वर्णकहीनता – ही माणसे मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य संश्लेषित करु शकत नाही. प्रखर सुर्यप्रकाशात त्यांच्या शरीरावर पुरळ येतात. डोळ्यांना तेज प्रकाश सहन होत नाही.
२. हिमोफिलीया- या व्यक्तीस जखमा झाल्यास रक्त न गोठल्यामुळे ती व्यक्ती अतिरक्त स्त्रावाने मृत्यू पावते. सामान्यतः पुरुषांमध्ये आढळतो. रक्ताच्या नात्यात विवाह करणा-यांना हा आजार होतो. ३.
रंगाधळेपणा – विशेषतः लाल व हिरव्या रंगातील फरक ओळखता येत नाही. रंगांधळेपणा तपासणीसाठी इसिहरा टेस्ट करतात.
४. मतिमंदता – मानवी गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी २१ व्या जोडीत एक गुणसूत्राची वाढ झाल्यास जन्माला येणारे मूल मतिमंद असते.
५. टर्नर सिंड्रोम – नपुंसक स्त्री
६. डाउन्स सिंड्रोम ( मंगोलिजम) – मंदबुध्दीत्व
७. क्लीनेफेल्टर सिंड्रोम – नंपुसक पुरुष, यात ४७ गुणसूत्रे आढळतात.
-
वरील रोगांशिवाय sickle cell Anaemic (Red Cell) हा रोग आफ्रिका खंडात आढळतो.
इतर रोग
रोग |
कारण |
उपाय व वैशिष्ट्ये |
खरुज |
सारकॉप्टिस स्केबी या बाह्य परजीवीमुळे होतो. हा संधीपाद प्राणी आहे. |
बेंझिल बेंझोएट आणि गंधकाचे मलम |
क्षयरोग (TB) |
Mycobactrium Tuberculosis जीवाणूमुळे होतो. |
लस – बॅसिलस ग्लायमेट गुएरीन (BCG) जन्माला आल्याबरोबर देतात |
टायफाईड |
बॅसिलस टायफस सॅल्मोनेला टायफी जीवाणू |
TAB लसी करण, क्लोरोमायसिटिन |
ऍन्थ्रॅक्स |
बॅसिलस ऍन्थ्रॅसिस जीवाणू |
जनावरे, शेळ्या, मेंढ्यापासून माणसाला होतो. |
डिप्थेरिया (घटसर्प ) |
Corinebaclerium dipatheria (डिप्थेरिया ऍटीटॉक्सिन) |
D.P.T.लस देणे. |
न्यूमोनिया |
डिप्लोकोकस न्यूमोनी |
जेटामायसिन |
प्लेग |
पाश्चुरेला पेस्टीज जीवाणू |
पिसू,उंदीर वाहक असतात. प्रकार १. ब्युबोनिक २. न्यूमोनिक ३. सेप्टीसेमिक |
धनुर्वात (Tetanus ) |
क्लोस्टिडिअम टिटनी जीवाणू |
मांसपेशी, खास करुन गळा व जबड्यात जोरदार आकस |
डांग्या खोकला |
हिमोफीलस पर्टूसिस |
D.P.T.लस |
बॅक्टेरिया |
शीगेला डिसेंट्री जीवाणू |
777 |
डिसेंट्री |
|
|
सुजाक |
निसेरिया गोनोराहा |
77- |
अमांश |
ऍन्टामिबा आदिजीव |
77- |
गरमी |
निसेरिया गोनोरोहा जीवाणू |
पेनिसिलीन, टेटासायक्लिन, स्पोक्टिनोमायसिन |
सिफलिस |
ट्रैपोनेमा पेलिडिअम |
77- |
स्लिपिंका |
ट्रिपेनेसोमा आदिजीव |
|
सिकनेस |
सी सी माशीमुळे प्रसार |
|
पायरिया |
आदिजीव, हिरड्यातून येणे |
सी जीवनसत्व |
काला आजार |
लिशमेनिया आदिजीव |
|
दमा ( अस्थमा) |
कवक |
|
रोगाचे नाव |
प्रभावित अवयव |
रोगाचे नाव |
प्रभावित अवयव |
एक्झिमा |
त्वचा |
कावीळ, पित्त |
यकृत |
गलगंड |
थायरॉईड ग्रंथी |
क्षयरोग |
फुफुसे |
न्युमोनिया |
फुफुस |
ल्युकेमिया |
रक्त |
प्ल्युरिसी |
छाती |
डिप्थेरिया |
गळा |
मलेरिया |
प्लिहा (तांबड्या रक्त पेशी) |
टायफाईड |
मोठे आतडे |
मोतीबिंदू |
डोळे |
पायरेलिया |
दात हिरड्या |
मधुमेह |
स्वादूपिंड (पाणथरी) |
सुखा |
हाडे |
मेनिंजायटिस |
मेंदू (मज्जारज्जू) |
रुमेरिज्म |
हाडांचा सांधा |
कंजायटीव्हायटीस |
डोळे |
अमांश |
आतडे |
घटसर्प |
घसा |
विषमज्वर |
मोठे आतडे |
अर्धांगवायू |
चेतासंस्था |
सायनसायटिस |
हाडे |
इसब |
|
त्वचा |
रेबीज चेतासंस्था |
धनुर्वात |
चेतासंस्था |
कुष्ठरोग |
मज्जासंस्था |
टॉन्सिलायटिस |
घशातील गाठ |
नेफ्रायटिस |
मुत्रपिंड |
ग्लुकेमिया |
डोळा |
टिनियासिसे |
छोटे आतडे |
सायनोसायटिस |
नाक |
अमिबीयासिस |
मोठे आतडे |
संकीर्ण
-
इन्फ्लुएंझा हा सर्वात तीव्र संसर्गजन्य साथीचा रोग आहे.
-
शरीराचा भाग कायमचा सडून निकामी होतो –गँगरीन रोग
-
म. प्रदेश, राजस्थान राज्यात केसरी डाळीच्या सेवनाने होणारा रोग – लॅथिरिझम
-
इन्शुलिन हे रासायनिक दृष्ट्या पेप्टाईन ( प्रोटिन) आहे
-
धनुर्वात, डांग्या खोकला व घटसर्प लस – ट्रिपल व्हॅक्सिन (त्रिगुणी लस)
-
सर्वाधिक प्रमाणावर पसरलेला रोग – क्षयरोग
-
ऍनिमिया (रक्तक्षय) या रोगात शरीरातील हिमोग्लोबीन कमी होते, तर ल्युकेमिया या आजारात तांबड्या रक्त पेशींचा नाश होतो.
-
मानवी शरीरातील विषाणू प्रतिकारक प्रथिन – इंटरफेरॉन
-
कॅन्सर संबंधी रोगांचा आभ्यास करणारे शास्त्र – ऑकोलॉजी
-
चिकित्साशास्त्राचा जनक – हिप्पोक्रिटस
-
गोवर सोडून सर्व रोगांत शरीरजन्य प्रतिकार क्षमता निर्माण करता येते.
-
धनुर्वात व घटसर्प यांच्याविरुध्द शरीरजन्य व परोक्ष प्रतिकारक्षमता निर्माण करता येते.
शोध |
संशोधक |
कुष्ठरोगावरील लस |
ऍरमन हॅन्सन |
देवीची लस |
एडवर्ड जेन्नर |
प्लास्मोडिअसम परजीवी |
लॅव्हेर्न |
मलेरियाचे कारण |
रोनाल्ड रॉस |
रेबीज लस संशोधन |
लुईस पाश्चर |
रोग जंतूपासून होतात. पाश्चरायझेशन |
लुईस पाश्चर |
सल्फा औषधे |
एग्मन |
सुक्ष्म जीवाणू |
लिवेनहॉक |
क्षयरोगाचे जंतू पटकीचे जंतू |
रॉबर्टहॉक |
पटकी व प्लेग लस |
वाल्देमार मोर्डेकाय हाफ कीन |
पोलिओ लस |
साल्क |
कुष्ठरोगाचे जीवाणू |
डॉ. ए. हॅन्सन |
पेनिसिलीन |
अलेक्झांडर फ्लेमिंग |
बी.सी.जी लस |
कालमेट व गुएरिन |
कांजण्या लस |
एडवर्ड जेन्नर |
पीत ज्वर विषाणू |
डॉ. रीड |
इन्फ्लुएंझा |
स्मिथ |
विषाणूतील डीएनए |
बावडेन |
गोवरचा विषाणू |
स्मिथ |
घटसर्प जंतू |
फ्रेडीक लोहर |
लसिकरणाचा जनक |
एडवर्ड जेन्नर |
पोलिओ व्हायरस |
पापर |
क्लोरोफार्म |
जेम्स सिम्पसन घटसर्प लस |
धनुर्वात लस |
एमिल बेहरिंग |
शुध्द पेनिसिलिन |
डॉ. फ्लोरो व डॉ. चेन |
मेंढ्यांचा ऍन्थ्रॅक्स |
लुई पाश्चर |
क्विनाईन |
रेबी इन्शुलिन एफ बेटिंग |
होमिओपॅथी |
हाएनमन |
रोग |
औषध |
रोग |
औषध |
हिवताप |
क्विनाईन |
हत्तीरोग |
हेट्रेसन DEC गोळी |
दमा |
सालब्यूटॉमॉल |
मधुमेह |
इन्शुलिन |
न्यूमोनिया |
जेटामायसिन |
पोलिओ |
डीपीटी |
कुष्ठरोग |
सल्फोन |
क्षयरोग |
स्ट्रेप्टोमायसिन, बीसीजी |
विषमज्वर |
क्लोरोमायसिटीन |
कर्करोग |
केमोथेरपी, रेडिओथेरिपी |
गेंगारिन |
पेनिसिलीन व सल्फाड्रग्ज |
क्षयरोग |
अय एन एच, रिफाम्सिन स्ट्रेप्टोमायसिन |
कुष्ठरोग |
डॅप्सॉन, क्लोफोझॅमिन, रिफाम्सिन |
मलेरिया |
प्रोग्वाविल, क्लोरोक्विन, क्विनाईन, प्रोक्केन |
विषमज्वर |
क्लोरोमायसेटीन, सेप्ट्रॉन, सिक्रॉम |
कॉलरा |
डुकारील |
संकीर्ण
-
ताप उतरण्यासाठी उपयुक्त वनस्पती – गुळवेल
-
रक्तदाबावर उपयुक्त वनस्पती – सर्पगंधा ( सर्पसिल औषध)
-
मलेरियावरील क्विनीन (कोयनेल ) हे औषध सिंकोना झाडाच्या सालीपासून काढतात.
-
अफूच्या बोंडापासून काढलेले मार्फीन हे औषध वेदनाशामक आणि गुंगी आणणारे म्हणून प्रसिध्द आहे.त्याचा उपयोग झोपेच्या तक्रारीवरही होतो.
-
सदाफुलीपासून तयार केलेले रक्ताच्या कर्करोगावरील औषध – विलाकिस्टिन, तर नरक्या (अमृता ) वनस्पतीच्या खोडापासुन कॅन्सरवर उपयुक्त कॅफोथेसिन औषध काढतात.
-
कार्बोलिक ऍसिडद्वारे शस्त्रक्रिया करुन जंतू विरहित शस्त्रक्रियेचा शोध लावला –जोसेफ लिस्टर १८६५
-
खुप-या ( Cunjuctivitis) हा रोग विषाणूमुळे होतो ( डोळे येणे)
-
सापाच्या विषापासून मुंबईच्या हाफ किन इन्स्टिट्यूट मध्ये प्रतिविष तयार करतात.
-
मानवी शरीरातील Blood Bank म्हणून ओळखतात-
-
जीवाणूच्या शरीरातील विषाणूस बॅक्टेरियल फॅग म्हणतात.
-
कावीळ व टी.बी सारखे रोग दुधामार्फत पसरतात.
-
सायनाईडचा परिणाम तंतूकणिकेवर होऊन मृत्यु येतो.
मूलभूत संकल्पना - रसायनशास्त्र
रसायनशास्त्र
-
रॉबर्ट बॉईल ( १६२७ – १६९१ ) याला रसायन शास्त्राचा जनक म्हणतात. कारण रसायनशास्त्राचा पध्दतशीरपणे अभ्यास करणारा तो पहिला शास्त्रज्ञ होय.
आधुनिक रसायनशास्त्राचा जनक - ए. लावासिए. ( त्याने ऑक्सिजनला नाव दिले.) द्रव्य व द्रव्याचे गुणधर्म (Matter & Properties of Matter) द्रव्यांच्या अवस्था – ४
१. स्थायुरूप अवस्था ( घन ) ( Solid State )
२. द्रवरूप अवस्था (द्रव ) (Liquid State )
३. वायुरूप अवस्था ( वायु ) (Gaseous state )
४. प्लाझ्मा ( Plasma)
-
यापैकी प्लाझ्मा ही अवस्था सूर्याच्या पृष्ठभागावर घडते, कारण त्या ठिकाणी अणुचे प्रचंड प्रमाणात आयनीभवन होते.
द्रव्याचे वर्गीकरण – १) मूलद्रव्ये (Elements ) २) संयुगे (Compounds) ३) मिश्रणे (Mixtures )
-
मूलद्रव्ये – ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही, अशा पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. आत्तापर्यंत रसायनशास्त्रज्ञांना १०९ ( इ. स. १९८४ ) मूलद्रव्यांचा शोध लावण्यात यश आले आहे. त्यापैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात व इतर मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत.
मूलद्रव्याचे वर्गीकरण -१) धातू २) अधातू या प्रकारात करतात.
१.धातू (Metals ) –
-
धातूंना चकाकी असते.
-
धातू तंतूक्षम / तन्य (Ductile) असतात.
-
हे वर्धनीय (Malleable) असतात.
-
हे उष्णता व विद्युत यांचे सुवाहक असतात. सर्व धातू स्थायूरूप असतात.
-
पारा हा धातू मात्र अपवाद असून तो कक्ष तापमानाला द्रवरूपात असतो.
-
धातूची उदा – तांबे(Cu) , लोखंड(Fe) , ऍल्युमिनिअम(Al) , सोने (Au)y , चांदी(Ag) , पारा(Hg) इ.
२. अधातू (Non – Metals) –
-
अधातू पदार्थ स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेत आढळतात.
-
सर्वसामान्यपणे अधातूंना चकाकी नसते. हे उष्णता व विद्युत यांचे दुर्वाहक आहेत.
-
अपवाद – आयोडिन स्फटिक चमकदार असतात, ग्रॅफाइट स्वरूपात ( अपरूपात) असलेला कार्बन विद्युत सुवाहक असतो.
-
अधातू वर्धनीय नाहीत. तसेच ते तन्यही नाहीत.
-
अधातू – फॉस्फरस, कार्बन, गंधक, आयोडिन हे स्थायुरूप आहेत तर ब्रोमीन द्रवरूप अवस्थेत असतो.
-
ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, निऑन हे सर्व कक्ष तापमानाला वायुरूप अवस्थेत असतात.
-
संयुगे ( Compounds )
– दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणा-या पदार्थांना संयुगे असे म्हणतात उदा – पाणी, साखर, मीठ.
गुणधर्म
-
संयुगाचे गुणधर्म त्याच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात.
-
कोणत्याही भौतिक पध्दतीने संयुगाचे विघटन, त्यांच्या मूलभूत घटकामध्ये करता येत नाही.
-
संयूगातील घटक मूलद्रव्ये विशिष्ट प्रमाणात असतात.
-
संयुग तयार होतांना किंवा त्यांचे अपघटन होताना उष्णता बाहेर पडते किंवा ग्रहण केली जाते
-
मिश्रणे (Mixture ) –
जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ (मूलद्रव्ये आणि संयुगे) रासायनिक अभिक्रिया न होता एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. उदा – हवा, समुद्राचे पाणी इ.
गुणधर्म - १) मिश्रणात घटकांचे गुणधर्म कायम राहतात. २) रासायनिक क्रिया न होता दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळल्यास मिश्रण तयार होते, ३) साध्या सोप्या प्रक्रियांना मिश्रणाचे घटक वेगवेगळे करता येतात, ४) मिश्रणाच्या घटकांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडत नसल्याने कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही.
आम्ल – आम्लारी अनुमापन –
-
आम्ले व आम्लारी यांच्या उदासिनीकरणाच्या अभिक्रियेत त्यांची आकारमाने ही त्यांच्या प्रसामान्यतेच्या व्यस्त प्रमाणात असतात
दर्शक आम्लातील रंग आम्लारीतील रंग
लिटमस लाल पिवळा हळद
निळा फेनॉप्थॅलिन रंगहीन पिवळा
गुलाबी मेथिल ऑरेंज गुलाबी लाल
अणू – संरचना
-
थोर हिंदू तत्वज्ञ महर्षी कणाद यांनी द्रव्य हे अतिशय सूक्ष्म कणांनी बनले असावे असे विचार मांडले १)त्यांनी अणूला “ परमाणू” असे म्हटले. ग्रीक तत्वज्ञ डिमोक्रिट्स हाही याच मताचा होता. त्याने या सूक्ष्म कणांना “अणू( Atom)” म्हणून संबोधले
-
अणू ( Atom)– रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा व मूलद्रव्यांचे सर्व गुणधर्म असणारा लहानात लहान कण म्हणजे अणू होय.
-
रेणू (Molecule ) – मूलद्रव्यांचे किंवा संयुगाचे सर्व गुणधर्म असणा-या तसेच स्वतंत्र अस्तित्व असणा-या लहानात लहान ( सूक्ष्मतम ) कणास रेणू म्हणतात.
अणू व रेणू यांचे गुणधर्म-
अणू
१)अणू व रेणू एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असतात २) अणूंना स्वतंत्र अस्तित्व नसते. परंतु निष्क्रीय वायू उदा – हेलिअम, न्यूऑन, ऑरगॉन, क्रिप्टॉन व झेनॉन या मूलद्रव्यांचे अणू स्वतंत्र अवस्थेत असतात. ३) एकाच मूलद्रव्यांचे सर्व अणू एकसारखे असतात. ४) टाचणीच्या डोक्यावर अब्जावधी अणू मावतात.
रेणू-
१) रेणूला त्या मूलद्रव्याचे अथवा संयुगाचे सर्व गुणधर्म असतात. २) वेगवेगळ्या पदार्थाचे रेणू वेगवेगळ्या गुणधर्माचे असतात. ३) मूलद्रव्यांचा रेणू दोन अथवा अधिक एकसारख्या अणूंचा बनलेला असतो. ४) संयुगाचा रेणू वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचा बनलेला असतो.
डॉल्टनचा अणू सिध्दांत –
-
जॉन डॉल्टन या शिक्षकी पेशात असलेल्या इंग्लीश व्यक्तीने १८०८ मध्ये अणू सिध्दांताची कल्पना मांडली. त्याच्या मते –
१) प्रत्येक पदार्थ अणूने बनलेला आहे. २) अणू अविभाज्य (विभाजन करता येत नाही ) आहे. ३) अणू अविनाशी असतात. अणूची निर्मिती अथवा नाश करता येत नाही. ४) एकाच मूलद्रव्याचे अणू एकरूप असतात व त्यांचे वस्तूमान व गुणधर्म समान असतात. ५) निरनिराळ्या मूलद्रव्याचे अणू एकत्र येऊन संयुगे बनतात.
-
डॉल्टनच्या अणू सिध्दांतातील अणू हा अविभाज्य हे गृहीत चुकीचे ठरले आहे. तरी त्यांचा हा सिध्दांत रसायनशास्त्राचा पुढील प्रगतीचा पाया ठरला आहे.
अणू – संरचनेसंबंधी सध्याची कल्पना –
-
युरेनिअम क्षारांपासून निघणा-या अदृश्य किरणांचा शोध १८९६ मधे हेन्री बेक्वेरेल यांनी लावला. नंतर हे अदृश्य किरणे – १) अल्फा(α) (धन प्रभारीत कण ) , २) बीटा(β) (ऋण प्रभारीत कण), ३) गॅमा(γ) असतात याचा शोध लागला.
-
विद्युत चुंबकीय प्रारणे या शोधामुळे अणूमधे काही सूक्ष्म कण असले पाहिजे याची शास्त्रज्ञांना कल्पना आली.
अ) कॅथोड किरणांचा शोध (Discovery of chathode rays ) – इ. स. १८७९ मधे सर विल्यम क्रुक यांनी कॅथोड किरणांचा शोध लावला. १. कॅथोड किरण हे ॠणप्रभारीत असतात. २. विप्रभार नळीत कोणत्याही मूलद्रव्याची वाफ किंवा वायूरूप मूलद्र्व्य असले तरी कॅथोड किरणाचे गुणधर्म कायम राहतात. ३. या कणांनाच आता इलेक्ट्रॉन असे म्हणतात.
आ) प्रोटॉनचा शोध – इ. स. १८८६ मधे ई. गोल्ड्स्टाइनने अणूमधे धन प्रभारीत किरण मिळविले. जे. जे. थॉमसनने सखोल संशोधन करुन धन प्रभारित कणांचा शोध लावला. या धन प्रभारित कणांनाच प्रोटॉन म्हणतात.
अणूकेंद्रक आणि केंद्रक बाह्य भाग – १. सर जे. जे. थॉमसन यांनी १८९८ मधे अणूच्या स्वरूपासंबंधी पहिली प्रतिकृती सुचविली. १९९१ मध्ये ही प्रतिकृती चुकीची असल्याचे लॉर्ड रूदरफोर्डने सिद्ध केले. २. सन १९९१ मधे रुदरफोर्ड याने अणूकेंद्रकाचा शोध लावला. अ. अणू केंद्रकात – अणूचा सर्व धन प्रभार आणि अणूचे जवळ जवळ सर्व वस्तुमान केंद्रकापाशीच एकवटलेले असते. आ. केंद्रकाभोवती पोकळी असते. इ. अणू केंद्रकाभोवती वर्तुळाकार कक्षामधे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करीत असतात. अणू संरचना सूर्यमालेप्रमाणे आहे .अणूचे केंद्रक म्हणजे सूर्य आणि केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन म्हणजे ग्रह अशी कल्पना मांडण्यात आली .म्हणूनच या प्रतिकृतीला ग्रह गोलीय प्रतिकृती असे संबोधण्यात येते.
३) न्यूट्रॉनचा शोध –
-
इ. स. १९२० मध्ये अणू केंद्रकातील प्रोटॉन बरोबरच उदासिन कणांचे अस्तित्व असले पाहिजे असे रुदरफोर्डने भाकित केले.
-
१९३२ मध्ये चॅडविकने उदासिन कणांचा शोध लावला. या उदासिन कणांनाच त्याने न्यूट्रॉन असे नाव दिले.
-
प्रोट्रॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे अणूचे मूलभूत घटक असल्याचे सिध्द होते.
-
केंद्र्कात न्यूट्रॉन व प्रोट्रॉन असतात. अणूकेंद्र्काच्या सभोवतालच्या पोकळीत फिरत असतात. त्यांना ग्रहांप्रमाणे फिरणारे (प्लॅनेटरी ) इलेक्ट्रॉन म्हणतात.
-
कोणत्याही अणूमध्ये प्रोट्रॉनची संख्या ही त्यामधील इलेक्ट्रॉनच्या संख्येइतकीच असते. विद्युतदृष्ट्या अणू उदासिन असतो.
अणूक्रमांक (Atomic Number – z )
अणूक्रमांक
१) अणू केंद्रकामधील प्रोट्रॉनची संख्या त्या अणूमधील इलेक्ट्रॉनच्या संख्येएवढीच असते. प्रोट्रॉनच्या संख्येलाच त्या अणूचा अणूक्रमांक असे म्हणतात २) तो पूर्णांकात असतो. ३) अणूक्रमांक मूलद्रव्याचे लक्षण होय. ४) तो “Z” अक्षराने दर्शवितात.
१) इलेक्ट्रॉन – १)हा एकक ॠण प्रभार असलेला कण असतो. २) अशा सुमारे १८५० इलेक्ट्रॉनचे वस्तुमान एक प्रोटॉन इतके असते. ३) म्हणून इलेक्ट्रॉनचे वस्तुमान इतर कणांच्या तुलनेत नगण्य मानतात. ४) अणूंची रासायनिक क्रियाशीलता इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते.
२) प्रोटॉन – १) हा एकक धन विद्युतप्रभार असलेला कण असतो. २) त्याचे वस्तुमान जवळ जवळ हायड्रोजनच्या एका अणू इतके असते. ३) प्रोटॉनमुळे अणूकेंद्रकाला धनप्रभार प्राप्त होतो.
३) न्यूट्रॉन – १) हा बिद्युत प्रभाररहित कण असतो. २) त्याचे वस्तुमान जवळ जवळ प्रोटॉन इतके असते. इलेक्ट्रॉन संरुपण (Electronic Configuration ) – अणूच्या निरनिराळ्या कक्षांमध्ये असलेली इलेक्ट्रॉनची विभागणी म्हणजेच संरुपण होय. इलेक्ट्रॉनची वाटणी विविध कक्षांमध्ये 2N2 या सुत्राने होते. N=कक्षेचा क्रमांक
कक्षा |
कक्षेचे नाव |
कक्षेत असणारे |
जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन |
1 |
K |
2x12=2 |
2 |
2 |
L |
2x22=8 |
8 |
3 |
M |
2x32=18 |
18 |
4 |
N |
2x42=32 |
32 |
-
परंतू कोणत्याही अणूच्या अंतिम (बाह्यतम) कक्षेत मात्र ८ इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त इलेकट्रॉन नसतात.
-
इ. स. १९१३ मध्ये नील्स बोहर यांनी अणूतील निरनिराळ्या कक्षांमधील इलेक्ट्रॉनच्या विभागणीचे निश्चितीकरण केले.
संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन (Valency & Valency Electrons) –
संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन
-
एखाद्या अणूच्या अंतिम कक्षेत ८ इलेक्ट्रॉन असल्यास तो अणू संयुगक्षम नसतो.
-
ज्या अणूच्या अंतिम कक्षेत ८ इलेक्ट्रॉन नसल्यास तो अणू संयुगक्षम असतो.
-
संयुग निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याच्या अणूच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात.
-
अणूच्या बाह्यतम कक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनांना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात.
-
अणूच्या बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त होण्याच्या दृष्टीने दिल्या किंवा घेतल्या जाणा-या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मुलद्रव्यांची संयुजा होय.
-
अष्टक स्थिती येण्यासाठी मुलद्र्व्याच्या अणूला जितके कमी इलेक्ट्रॉन द्यावे लागतील किंवा घ्यावे लागतील किंवा भागीदारी करावी लागेल तितके ते मुलद्रव्य जास्त क्रियाशील असते.
-
ज्यावेळी एखादा अणू आपली बाह्यतम कक्षा होण्यासाठी इलेक्ट्रॉन मिळवितो, तेव्हा त्यावरील ऋणप्रभार वाढतो. परिणामी, तो अणू ॠणप्रभारित होतो. यालाच ॠण आयन म्हणतात.
अणुवस्तुमानांक (Atomic Mass Number )
१) अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. २) अणुवस्तुमानांक “A” या अक्षराने दाखविला जातो. ३) त्याची किंमत नेहमी पूर्णांकात असते. अणुवस्तुमानांक = अणुअंक+न्युट्रॉनची संख्या (A= z + n ) समस्थानिके ( Isotopes )
-
अलिकडे संशोधनाने असे सिध्द झाले आहे की, एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकरूप असतातच असे नाही. त्यांच्या अणुवस्तुमानांमध्ये फरक आढळतो. अशा अणूंना त्या मुलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात.
-
एकाच मुलद्रव्यांच्या भिन्न अणूंचा अणुक्रमांक एकच असून त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतील तर अशा अणूंना त्या मुलद्रव्याची समस्थानिके असे म्हणतात.
-
समभारी (Isobar) – ज्या मूलद्रव्याच्या अणुचा अणुवस्तुमानांक समान परंतु अणुक्रमांक वेगळा असतो त्यांना आयसोबार म्हणतात.
-
आयसोटोन्स ( Isotones ) – वेगवेगळ्या मुलद्रव्यांच्या अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते त्यांना आयसोटोन्स म्हणतात.
-
-
अणूभारांक ( Atomic wight ) – अणूमधील प्रोटॉन आणि न्योट्रॉन यांच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजेच त्याचा अणूभारांक होय.
-
रेणूभारांक (Molecular weight ) – रेणूच्या वजनाला रेणूभारांक असे म्हणतात किरणोत्सारिता (Radioactivity)
-
हेन्री बेक्वेरेल यांना १८९६ मध्ये अचानकपणे किरणोत्साराचा शोध लागला.
-
युरेनिअम, थोरिअम, रेडिअम इ. सारखी जड मूलद्रव्ये आणि त्यांची संयुगे सातत्याने व उत्स्फुर्तपणे प्रारणे (Radiations) उत्सर्जित करीत असतात. या प्रमाणे प्रारणे उत्सर्जित करणा-या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात.
-
मादाम क्युरी आणि जी. सी. श्मिड (१८९८) यांनी स्वतंत्रपणे थोरिअम क्षार ही किरणोत्सार करतात. हे सिध्द केले.
-
मादाम क्युरी आणि पिअरी क्युरी यांनी युरेनिअम आणि त्याचे खनिज पिच ब्लेंड यांच्या किरणोत्साराचा अभ्यास केला. त्यांनी पिच ब्लेंड पासून पोलोनिअम आणि रेडिअम ही दोन नवीन किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी केली. या शोधाबद्द्ल १९०३ मध्ये एम. क्युरी, पी. क्युरी आणि बेक्वेरेल यांना संयुक्तपणे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
प्रारणांचे स्वरूप –
-
अल्फा (α) व बीटा (β) प्रारणाचा शोध १८९८ मध्ये रूदरफोर्डने लावला.
-
गॅमा (ϒ) प्रारणाचा शोध विलार्डने लावला.
किरणोत्सारी मुलद्रव्याचे विच्छेदन किंवा –हास प्रक्रिया –
-
रूदरफोर्ड आणि सॉडी यांच्या मते किरणोत्सारिता ही केंद्रकीय प्रक्रिया आहे. जड मुलद्रव्यांची (८२ अणुक्रमांकानंतरची) केंद्रके अस्थिर असतात. स्थिरता प्राप्त करण्यासाठी केंद्रकातील अल्फा आणि बीटा किरणाच्या रूपात बाहेर टाकले जातात. या घटनेचा दुय्यम परिणाम म्हणजे गॅमा किरणांचेही उसर्जन होते. अकिरणोत्सारी स्थिर केंद्रकाचे मुलद्रव्य तयार होईपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते. या प्रक्रियेलाच किरणोत्सारी मूलद्रव्याचे विच्छेदन किंवा –हास असे म्हणतात.
१. अल्फा कणाचे उत्सर्जन – जेव्हा मूलद्रव्यातून अल्फा कण उत्सर्जित होतो तेव्हा अणूचा अणू अंक २ ने कमी तर अणूवस्तुमानांक ४ ने कमी होतो.
२. बीटा कणाचे उत्सर्जन – जेव्हा मूलद्रव्यातून बीटा (β) कण उत्सर्जित होतो तेव्हा मूलद्रव्याचा अणूक्रमांक १ ने वाढतो. परंतु अणुवस्तुमानात बदल होत नाही. परिणामी अपत्य मूलद्रव्याचे आवर्तसारणीमधील स्थान एक स्तंभ उजवीकडे गेल्याचे आढळ्ते. ३. अल्फा आणि बीटा प्रारणे उत्सर्जित झाल्यावर अपत्य मुलद्रव्याचे केंद्रक उत्तेजित अवस्थेत असते. ही अवस्था अधिक उर्जायुक्त असल्यामुळे जास्त असलेली ऊर्जा गॅमा प्रारणाच्या स्वरूपात उत्सर्जित केली जाते.
अर्ध आयुष्य काळ (Half life Perod)
-
किरणोत्सारी मूलद्रव्याचे विच्छेदन होताना सुरूवातीला असलेल्या अणुसंख्येच्या निम्म्या अणूंचे विच्छेदन होण्यासाठी लागणा-या कालावधीला अर्ध आयुष्य काळ म्हणतात.
-
कृत्रिम किरणोत्सारीता(Artificial radioactivity) –
-
आयरिन क्युरी (मादाम क्युरीची मुलगी ) आणि तिचा पती फ्रेडरिक जोलिओट (१९३४) यांनी हलक्या मूलद्रव्यांवर अल्फा कणांचा मारा केला असता मुलतः किरणोत्सारी नसलेल्या मूलद्रव्याची किरणोत्सारी मूलद्रव्यात रुपांतर झाल्याचे आढळले.
-
स्थिर मूलद्रव्याची किरणोत्सारी समस्थानिके कृत्रिम त-हेने तयार करता येतात. याप्रमाणे किरणोत्सारी समस्थनिके दर्शवित असलेल्या किरणोत्सारीला कृत्रिम किरणोत्सारीता असे म्हणतात.
किरणोत्सारी समस्थानिकांचे उअपयोजन :-
१) कृषीक्षेत्रः- a) बियाणेउद्दीपनासाठी – अंकुरण क्षमतेत वाढ, रोपांची जलद वाढ व अधिक उत्पन्न मिळविण्यासाठीb) वनस्पती वाढीसाठी आवश्यक असलेल्या किरणोत्सारी समस्थानिकाच्या साह्याने करता येते. c) कांदे, बटाटे इ. च्या साठवणीत त्यांना मोड येऊ नये म्हणून त्यांचे उद्दीपन करता येते. d) हवाबंद डब्यात साठविलेले खाद्यपदार्थ व धान्य उद्दीपनाने टिकविता येते
२)वैद्यकशास्त्र :- रोगांचे निदान करण्यासाठी आणि उपचारासाठी किरणोत्सारी समस्थानिकांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. उदा. a) फॉस्फरस ३२ –ल्युकेमियावरील ( ब्लड कॅन्सर) उपचारासाठी. b) आयोडिन व आर्सेनिकचा – मेंदूतील ट्यूमर ओळखण्यासाठी (Brain Tumour ) c) आयोडिन १३१ – कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखणे व उपचार करणे d) कोबाल्ट ६० – कॅन्सरवरील उपचारासाठी e) सोडिअम २४ – रक्तभिसरणातील बिघाड तपासण्यासाठी
३)औद्योगिक क्षेत्र- a) इंजिनमधील झीज आभ्यासणे. b) धातूच्या ओतकामातील भेगांचा शोध घेणे.
केंद्रकीय विखंडन आणि संमीलन (Nuclear fission & fusion ):-
-
एखाद्या जड अणुकेंद्रकाचे विभाजन होऊन त्याचे कमी वस्तुमान असलेल्या दोन अणू केंद्रकात रुपांतर होणे या क्रियेला केंद्रीय / केंद्रकीय विखंडन असे म्हणतात.
-
केंद्रकीय विखंडनाचा शोध १९३९ मध्ये ऑटो हॉन आणि स्ट्रॉसमन यांनी लावला.
-
युरेनिअम २३५ वर मंदगती न्युट्रॉनचा मारा केला असता युरेनिअमच्या केंद्रकाचे बोरिअम व क्रिप्टॉन यांसारख्या कमी वस्तुमानाच्या किमान दोन मूलद्रयात विखंडन होते. आणि ३ न्युट्रॉन मुक्त होतात असे आढळले. तसेच ऊर्जा मुक्त होत असल्याचे आढळले.
-
केंद्रीय / केंद्रकीय संमीलन – दोन हलक्या मूलद्रव्यांच्या ( वस्तुमानांक २० पेक्षा कमी) केंद्रकांच्या संमीलन प्रक्रियेमुळे तुलनात्मक दृष्ट्या वजनदार मूलद्रयांचे केंद्रक तयार होणे या प्रक्रियेला संमीलन असे म्हणतात.
१) संमीलन प्रक्रिया अतिशय उच्च तापमानाला ( लक्षावधी अंश सेल्सिअस तापमानाला) घडून येते. २) अशा प्रक्रियेला औष्णिक केंद्रकीय प्रक्रिया (Thermonuclear reaction) असे म्हणतात. ३) दोन हलक्या मूलद्रव्यांच्या केंद्रकाचे संमीलन होऊन जड मूलद्रव्याचे केंद्रक तयर होत असतांना काही वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर होते. केंद्रकीय ऊर्जा ( Nuclear energy) – विखंडन आणि संमीलन प्रक्रियांमध्ये मुक्त होणा-या ऊर्जेला केंद्रकीय ऊर्जा असे म्हणतात.
-
वस्तुमानात येणारी घट आईनस्टाईनच्या E=mc2 या समीकरणाप्रमाणे ऊर्जेच्या रुपात मुक्त होते.मुक्त होणारी
ऊर्जा = E, घटलेले वस्तुमान =m , प्रकाशाचा वेग =c
-
युरेनिअम २३५ च्या विखंडनात ०.१ % वस्तुमान कमी होते. या वस्तुमानाचे सुमारे २०० MeV (२०० मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ) म्हणजेच १०० टन शुध्द कार्बन जाळून मिळनारी ऊर्जा होय.
-
अणू केंद्रक विखंडनाच्या प्रक्रियेला शृखंला अभिक्रिया असे म्हणतात.
-
अनियंत्रित शृंखला अभिक्रिया (uncontrolled cain reaction ) – शॄखंला अभिक्रिया ही एक अनियंत्रित शृखंला अभिक्रिया असून अणूबाँबची निर्मिती अनियंत्रित शृखंला अभिक्रियेच्या तत्वावर केलेली असते.
नियंत्रित शृंखला अभिक्रिया –
-
बोरॉनयुक्त पोलाद किंवा कॅडमिअम कांड्यांचा उपयोग शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी होतो. त्या कांड्या बरेचसे न्यूट्रॉन शोषून घेतात. त्यामुळे फारच थोडे न्यूट्रॉन अभिक्रिया पुढे चालू ठेवू शकतात. यालाच नियंत्रित शृंखला अभिक्रिया असे म्हणतात.
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण-
-
मूलद्रव्यांचे अणुचे वस्तुमान त्या मूलद्रव्याच्या गुणविशेष आहे असे डाल्टनने आपल्या अणुसिध्दांतामध्ये सुचविले होते. त्या अधारावर मूलद्रव्याचे असे वर्गीकरण करणारा डोबेरायर (१८२९) हा पहिला शास्त्रज्ञ होय. त्याने रासायनिक गुणधर्मात साम्य असलेल्या तीन मूलद्रव्यांचा एक गट, याप्रमाणे काही विशिष्ट
मू लद्रव्यांचे वर्गीकरण केले. त्या गटांना त्याने त्रिके (Triads) असे नाव दिले.
न्यूलॅन्डसने अष्टके ( Newlands octet )
-
न्यूलॅन्डसने (१८६४) अणुभारांकांच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली. संगीतातील अष्टकांप्रमाणे प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्या प्रमाणे असल्याचे त्याला आढळले.
-
मेंड्लिफचा आवर्ती नियम (Mendeleef’s periodic low );-
-
मेंडलिफने (१८६९) अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली. तेव्हा मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुभारांकांचे आवृत्तीफल आहेत असे त्याला दिसून आले. मेंडलिफने तयार केलेल्या सारणीलाच मेंडलिफची आवर्तसारणी म्हणतात.
-
मेंडलिफची सुधारीत आवर्तसारणी वैशिष्ट्ये
-
उभे आठ स्तंभ – गण
-
सात आडव्या ओळी – आवर्तने ( Periods)
-
मेंडलिफने आपल्या आवर्तसारणीमध्ये अज्ञान मूलद्रव्यांच्या तीन जागा रिक्त सोडल्या होत्या आणि त्यांच्या गुणधर्मासंबंधी भाकित केले होते. त्या तीन मूलद्रव्यांना शोध लावल्यानंतर दिलेली नावे.इका बोरॉन ला – स्कॅडिअम, इका ऍल्युमिनिअमला गॅलिअम, इका सिलिकॉनला जर्मेनिअम
-
मेंडलिफच्या आवर्तसारणीतील त्रुटी;- १) समान रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्ये ही भिन्न गणात. तर काही भिन्न गुणधर्म असलेली मूलद्रव्ये एकाच गणात आल्याचे आढळले. उदा. – अणुभारांक- ऑरगॉन ४० व पोटॅशिअम ३९ २) नंतर शोध लागलेल्या समस्थानिकांना मेंडलिफच्या मूळ आवर्तसारणीमध्ये स्वतंत्र स्थान देता येत नाही.
आधुनिक आवर्तसारणी
-
अणूअंक - केंद्रकातील प्रोटॉन/ केंद्रकाभोवती फिरणा-या इलेक्ट्रॉनच्या संख्येइतका असतो असे मोस्ले याने दाखवले. त्यांनी असेही सुचविले की मूलद्रव्यांच्या अणूभारांकापेक्षा अणूअंक हाच मूलद्र्व्याचा पायाभुत गुणविशेष आहे.
-
मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे आवृत्तीफल आहेत.
-
आधुनिक आवर्तसारणीलाच दीर्घश्रेणी आवर्तसारणी असे म्हणतात.
-
आधुनिक आवर्तसारणीलाच मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे की ज्यामुळे समान गुणधर्म असलेली मूलद्रव्य एकाच स्तंभात येतात. यात उभे अठरा स्तंभ असून त्यांना गण म्हणतात. सात आडव्या ओळी असून त्यांना आवर्तने असे म्हणतात.
१) पहिल्या आवर्तनात दोनच मुलद्रव्ये आहेत. २) दुस-या व तिस-या आवर्तनांना लघु आवर्तने असे म्हणतात. यात प्रत्येकी आठ मूलद्रव्य आहेत. ३) चौथे व पाचवे ही दोनही आवर्तने असून त्या प्रत्येकात अठरा मूलद्रव्ये आहेत. ४) सहावे आवर्तन हे सर्वात प्रदीर्घ आवर्तन असून त्यात एकूण ३२ मूलद्रव्य आहेत. ५) सातवे आवर्तन अपूर्ण असून त्यात ८७ ते १०९ अणुअंक असलेली २३ मुलद्रव्य आहेत.
दीर्घ श्रेणीच्या आवर्तसारणीची प्रमुख वैशिष्ट्ये ;- १) आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या इलेक्ट्रॉन संरुपणाशी निगडीत आहे. २) प्रत्येक आवर्तनाची सुरुवात मूलद्रव्याच्या अणूतील नवीन कक्षेने होते. तर शून्य गणातील मूलद्रव्याचा पूर्ण भरलेल्या आवर्तनाचा शेवट होतो.
आवर्तसारणीच्या आधारे मूलद्रव्याचे वर्गीकरण ;- अणुंच्या बाह्य कक्षा पूर्ण भरलेल्या असतील किंवा अपूर्ण असतील त्याचप्रमाणे त्यांचे चार प्रकारात वर्गीकरण करतात.
-
निष्क्रिय वायू मूलद्रव्ये – राजवायू
-
सामान्य मूलद्रव्ये
-
संक्रमक मूलद्रव्ये
-
आंतरसंक्रामक मूलद्रव्ये.
-
निष्क्रिय वायू मूलद्रव्य(राजवायू) :- बाह्यतम कक्षेसह सर्व कक्षा पूर्णतः भरलेल्या असतात. रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत.
-
सामान्य मूलद्रव्ये;- ज्या मूलद्रव्यांच्या अणूमधील बाह्यतम कक्षेशिवाय अन्य सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असतात. अशी मूलद्रव्ये सामान्य मूलद्रव्य या प्रकारात मोडतात.
-
संक्रमक मूलद्रव्ये- ज्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या शेवटच्या दोन कक्षा अपूर्ण असतात. त्यांना संक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. ही मूलद्रव्ये परिवर्ती संयुजा दर्शवितात. त्यांच्यातील बहुसंख्य मूलद्रव्ये उत्प्रेरकाचे कार्य करतात.
-
आंतरसंक्रामक मूलद्र्व्ये;- ज्या मूलद्रव्यात अणुंच्या शेवटच्या तीन कक्षा अपूर्ण असतात. त्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. लॅथॅनाइड व ऑक्सिनाईड मालिकेतील मूलद्रव्यांचा या गटात सामावेश होतो. आवर्तसारणीच्या तळाशी त्यांना स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे.
तिस-या आवर्तनातील मूलद्रव्ये – Na, Mg, Al, Si, P, S,Ar 1) इलेक्ट्रॉन संरुपण – तिस-या कक्षेत सोडिअम पासून इलेक्ट्रॉन भरण्यास सुरुवात होऊन ऑरगॉनमध्ये ती कक्षा पूर्ण भरते. 2) Na पासून Si पर्यंत संयुजा वाढते. Si पासून Ar पर्यंत संयुजा कमी होत जाते. 3) धातूगण – एकाच आवर्तनात डावीकडून उजवीकडे धातू गण कमी कमी होत जातो आणि अधातू गण वाढत जातो. 4) डावीकडून उजवीकडे मुलद्र्व्याचा क्षपणक गुणधर्म कमी कमी होत जातो. तर ऑक्सिडीकारक गुणधर्म वाढत जातो.
धातू आणि त्यांची संयुगे
-
तांबे (cupper);- संज्ञा Cu – (लॅटिन – cuprum)
-
अणूअंक-२९, अणुभारांक -६३.५, इलेक्ट्रॉन संरुपण (२,८, १८,१) किंवा (२,८,१७,२)
-
संयुजा – १ किंवा २, तांब्याची धातूके -१) कॉपर पायराईट किंवा कॅल्पोपायराइट (CufeS2 ) २) क्युप्राइट (CuZO) ३)कॉपर ग्लास किंवा कॅल्फोसाइट( Cu2S )
उपयोग – १. भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी , २) नाणी तयार करण्यासाठी ३) विद्युत विलेपणासाठी ४) उत्प्रेरक म्हणून
तांब्याची संयुगे – १. कॉपर सल्फेट ( मोरचूद – Blue Vitriol – CuSo45H2O)
उपयोग – १. बुरशीनाशक म्हणून बोर्डो मिश्रणात वापर, २. औषधात व प्रयोगशाळेत उपयोग.
तांब्याची संमिश्रे
नाव |
घटक |
वैशिष्ट्ये |
उपयोग |
१) पितळ |
६० ते ९०% तांबे ४० ते १०% जस्त |
गंजरोधक, कठीण |
धातूची भांडी, पाईप, काड्तुसाचे ओतकाम सहजगत्या करता येते. साचे व संघननी नलिका तयार करण्यासाठी |
२) ब्राँझ |
८० ते ९०% तांबे १९ ते १०% कथिल |
गंजरोधक व कठीण, गोठताना प्रसरण पावते. |
पुतळे, पदके, भांडी आणि नाणी तयार करण्यासाठी तसेच बेअरिंग व जहाजांच्या बांधणीत उपयोगी पडते. |
३) जर्मन |
५०% तांबे सिल्वर २५% जस्त २५% निकेल |
उच्च प्रतीचे विद्युतरोधक |
विद्युत शेगड्या व विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी |
४) बेल मेटल |
७८% तांबे २२% कथिल |
नाद जनकता |
घंटा व तासाच्या थाळ्या बनविण्यासाठी |
५) गन मेटल |
८८% तांबे १०% कथिल २% जस्त |
गंजरोधक असते. |
बंदुकीच्या नळ्या व बॉयरलचे सुटे भाग बनविण्यासाठी |
६) ऍल्युमिनिअम ब्राँझ |
तांबे व ऍल्युमिनिअम |
|
|
-
चांदी (Silver) – संज्ञा – Ag
-
अणूअंक – ४७, अणुभारांक १०७.३७ इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,१,१८,१८,१)
-
संयुजा – १
धातुके – १. सिव्हर ग्लान्स किंवा अर्जेंटाइट (Ag2S) २. हॉर्न सिल्व्हर ( Agcl )
-
चांदी संयुक्त स्थितीत आणि मुक्त स्थितीतही आढ्ळ्ते.
उपयोग १. दागिने, २. उच्च दर्जाचा विद्युत वाहक सिल्व्हर नायट्रेट – साठविण्यासाठी अंबर रंगाच्या बाटल्या वापरतात. याचा उपयोग १. नाक, कान आणि डोळे यांच्यासाठी रोगाणुरोधक म्हणून, २. विद्युत विलेपणासाठी, ३. छायाचित्रणात ४. पुसली न जाणारी शाई तयार करण्यासाठी ५. प्रयोग शाळेत अभिकारक म्हणून वापरता.
C. शिसे –
-
संज्ञा – pb, अणुअंक ८२, अणुभारांक – २०७ , इलेक्ट्रॉन संरुपण ( २,८,१८,३२,१८,४)
-
संयुजा २ आणि ४ धातूके – प्रमुख गॅलेना (Pbs)
-
अन्य – १) ऍग्लिसाइट (Pbso4) २) सीरूसाइट (Pbco3)
उपयोग – १. मुद्रण – धातू तयार करण्यासाठी, २. दारूगोळा तयार करण्यासाठी, ३. तारायंत्र आणि टेलिफोन यांच्या केबल तयार करण्यासाठी ४. किरणोत्सारी द्रव्यांतून निघणा-या प्रारणांपासून संरक्षक ढाल करण्यासाठी ५. डाग देण्याचा धातू ( Solder) आणि सहज वितळणारी संमिश्रे तयार करण्यासाठी शिशाची संयुगे. – अ) लेड मोनॉक्साईड (लिथार्ज Litharge) PbO – उपयोग १. चिनी मातीच्या भांड्यांना झिलई देण्यासाठी २. फ्लिंट ग्लास तयार करण्यासाठी ३. रंग आणि रोगण (Vrnish) तयार करण्यासाठी, ४. शिशाचे क्षार तयार करण्यासाठी ब) लेड नायट्रेट pb(No3)2उपयोग - १. कापड रंगवितांना व छपाई करताना ( कॅ लिको प्रिटिंग ) रंगबंधक म्हणून २. लेड क्रोमेट व शिशाचे इतर क्षार करण्यासाठी ३. स्फोटक द्रव्य तयार करण्यासाठी
D. लोखंड
-
संज्ञा – Fe, लॅटिन Ferrum, अणुभारांक – ५५.८४, अणूक्रमांक – २६
-
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,१४,२) ,संयुजा- २ किंवा ४
-
उल्कांमध्ये हा धातू सापडल्यामुळे प्राचीन लोक या धातूला स्वर्गातील धातू म्हणून मानत असत.
-
धातूके – मॅग्नेटाईट (Fe3O4 फेरोसोफेरिक ऑक्साइड) ,हेमेटाइट ( Fe2O3) ,लिमोनाईट ( 2Fe2O3, 3H2O) ,आयर्न पायराइट ( FeS2) आणि कॉपर पायरायटस ( CuFeS2)
-
झोतभट्टीमध्ये (Blast Furnace) क्षपण पध्दतीने धातुकापासून लोखंड निष्कर्षण करतात.
-
इ. स. १३५० मध्ये जर्मनीमधे झोतभट्टीचा प्रथमच उपयोग करण्यात आला.
लोखंडाचा प्रकार |
कार्बनचे प्रमाण |
विलय बिंदू |
शुध्दता |
उपयोग |
ओतीव |
०.५ ते ४.२ |
१२०००C |
अशुध्द |
नळ, कठडे, वजने, यंत्राचे अवजड भाग |
घडीव ( नरम ) |
जास्तीत जास्त ०.०३५ |
१५०००C |
सर्वात शुध्द |
साखळ्या, नट,बोल्ट,तार, खिळे इ. |
पोलाद |
०.०२५ ते १.५ |
१२०० ते १५०००C |
एक संमिश्र |
|
-
· बेसिमर भट्टीचा उपयोग करून ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करतात.
-
· ओतीव लोखंडापासून पोलाद मिळविण्यासाठी विवृत्त भट्टी पध्दतीचाही उपयोग करतात.
संमिश्र पोलाद
पोलाद प्रकार |
घटक |
वैशिष्ट्ये |
उपयोग |
१. स्टेनलेस स्टील |
७३% लोह १८% क्रोमिअम १% कार्बन ८% निकेल |
गंजत नाही |
तीक्ष्ण हत्यारे, भांडी, अवजारे, वाहनांचे सुटे भाग, दुध डेअरीतील यंत्रे यासाठी |
२. टंगस्टन |
९४% लोह ५% टंगस्टन |
अति कठिण असते, धारदार बनविता येते. |
कठिण वस्तू जलद कापण्याच्या हत्यारांसाठी |
३. मँगनीज स्टील |
लोह व लक्षणीय प्रमाणात मँगनिज |
अत्यंत टणक |
खडकांना छिद्रे पाडण्याच्या हत्यारांसाठी |
४. क्रोम स्टील |
लोह व लक्षणीय प्रमाणात क्रोमिअम |
कठीण व टणक |
बॉल बेअरिंग, रोलर्स, बोअरिंग यंत्रे, स्वयंचलित वाहनांचे सुटे भाग यांसाठी उपयुक्त |
E) जस्त ( Zinc);-
-
संज्ञा - Zn, अणुभारांक – ६५.४, अणुक्रमांक -३०
-
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,१८,२ ), संयुजा – २
-
प्राचीन काळी जस्ताला यशदा म्हणत असत.
-
धातुके – कॅलॅमिन (ZnCo3 ), झिंक ब्लेंड (Zns), झिंकाइट (Zno) इ.
जस्ताचे निष्कर्षण – १) क्षपण पध्दती २) विद्युत अपघटन पध्दती
गुणधर्म; - १) जस्त हा निळसर पांढरा धातू आहे. २) नेहमीच्या तापमानाला जस्त ठिसूळ असतो. ३) १०००C ते १५००C वर्धनीय तंतूक्षम. ४) २०००C पेक्षा अधिक ठिसूळ ५) द्रावणांक (M.P.)-४२९.४०C ६) उत्कलनबिंदू (B.P.) ९३००C आहे.
उपयोग १) लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्याच्यावर लेप देण्यासाठी (Galavanizing) प्रामुख्याने जस्ताचा उपयोग केला जातो. २) डॅनिअलचा विद्युत घट, लेक्लांशेचा विद्युत घट आणि कोरडा विद्युत घट. या घटांमध्ये जस्ताचा इलेक्ट्रॉड म्हणून उपयोग करतात. प्रयोग शाळेत हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी दाणेदार जस्ताचा उपयोग करतात. ३) जस्ताचा क्षपण म्हणून उपयोग होतो. ४) पितळ (जस्त आणि तांबे), जर्मन सिल्व्हर (जस्त, तांबे आणि निकेल)इ. संमिश्रे तयार करण्यासाठी. ५) चांदी आणि सोने यांच्या निष्कर्षण प्रक्रियेत जस्त वापरतात.
F) पारा ; -
-
लॅटिन नाव - Hydrargyrm,संज्ञा Hg, अणुभारांक -२००.६, अणुक्रमांक -८०
-
इलेक्ट्रॉन संरुपण –(२,८,१८,३२,८,२) संयुजा – १किंवा २
-
या धातुला ऍरिस्टॉटलने क्विक सिल्व्हर असे म्हटले.
-
धातुके - सिन्नाबार (Hgs) मरक्युरीक सल्फाईड.
गुणधर्म -१) द्रवरुप धातु २) रुपेरी पांढरा ३) घनता १३.६ g/Cm३ ४) विद्युत व उष्णता यांचा सुसंवाहक आहे.
-
उत्कलन बिंदू (B.P.) -३५७०C, गोठणबिंदू (F.P.) -३९०C
-
पा-याची वाफ विषारी असते.
उपयोग – १) हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पा-याचा उपयोग करतात. २) पा-याच्या बाष्पदीपात त्याचा उपयोग करतात. ३) पा-याच्या काही संयुगांचा उपयोग औषधांमध्ये करतात.(मकरध्वज औषध)
G) सोडिअम ;-
-
संज्ञा –Na, अणुभारांक -२३, अणुक्रमांक -११, संयुजा-१, इलेक्ट्रॉन संरुपण- ( २,८,१)
-
सोडिअमची दैनंदिन वापरातील संयुगे मीठ, वॉशिंग सोडा, खाण्याचा सोडा इ.
-
१८०७ मध्ये सर हॅप्रे डेव्हीने प्रथमच सोडिअम धातू मुक्त स्थितीत मिळविला.
-
निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही, कारण अतिक्रियाशील असतो.
-
संयुगे – साधे मीठ Nacl, चिली सॉल्टपीटर - NaNo3, सोडिअम कार्बोनेट – Na2Co3, , बोरॅक्स – टाकणखार – Na2B4O7,सोडिअम सल्फेट – Na2 So4
-
द्रवणांक 804०C आहे. त्याचा द्रवणांक सुमारे ६०० अंश सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी त्यामध्ये कॅल्शिअम क्लोराइड मिसळतात. या द्रावणाचे विद्युत अपघटनाने हा धातू मिळवितात. या पध्दतीला डाऊन्स सेक पध्दती म्हणतात.
-
वितळलेल्या कॉस्टिक सोड्याचे विद्युत अपघटन करुनही सोडिअम धातुचे निष्कर्षण करता येते. याला कासनेरची पध्दती म्हणतात.
उपयोग ;- १) सोडिअम बाष्प दीपांमध्ये सोडिअमचा उपयोग करतात. २) सोडिअम पारद संमिश्राचा क्षपणक म्हणून उपयोग करतात. ३) उच्च तापमानदर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो. ४) सोडिअम पेरॉक्साइड, सोडिअम सायनाइड आदी संयुगे तयार करण्यासाठी ५) सुती कापडाच्या रेशमीकरणासाठी सोडिअम हायड्रोक्साईड वापरतात.
H) मॅग्नेशिअम ;-
-
संज्ञा- Mg अणुभारांक –२४.३, अणुक्रमांक -१२
-
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,२ ), संयुजा – २ दिवाळीत शुभ्रोष्ण ज्योतीने जळणारी मॅजिक वायर म्हणजेच मॅग्नेशिअम धातूच होय.
-
मुक्त स्थितीत आढळत नाही.
-
संयुगे – मॅग्नेसाइट MgCo3 -, डोमालाईट- CaCo3 MgCo3 , कार्नेलाईट Kck3 MgCl2 6H2O, इप्सम सॉल्ट MgSo47H2O
-
द्रवणांक ( M.P.)-650०C, उत्कलनबिंदू(B.P.)1107 ०C
उपयोग ;- १) क्षणदीप्ती छायाचित्रणात (Flash Photography) मॅग्नेशिअमचा उपयोग करतात. २) शोभेच्या दारुत त्याचा उपयोग करतात. ३) मॅग्नेलिअमसारखी ( मॅग्नेशिअम आणि ऍल्युमिनिअम यांचे संमिश्र) संमिश्रे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. विमाने, मोटारी यांचे सुटे भाग करण्यासाठी. ४) थाईमाइट मिश्रण ( फेरिक ऑक्साइड आणि ऍल्युमिनिअमची पूड) जोड कामासाठी वापरतात. ५) धातूंच्या निष्कर्षणात मॅग्नेशिअमचा क्षपणक म्हणून उपयोग होतो.
I) ऍल्युमिनिअम ;-
-
संज्ञा- Al, अणुभारांक –26.98, अणुक्रमांक -13
-
इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,३ ), संयुजा – 3
-
वोलहरने १८२७मध्ये प्रथमच ऍल्युमिनिअमचे निष्कर्षण केले.
-
भूकवचात ७.३% आढळतो.
क. ऑक्साइड – बॉक्साइट (Al2O3, 2H2O ), कोरंडम, माणिक, रत्ने इ.
ख. सिलिकेट - फेल्सपार(Kalsi 3 O8), अभ्रक, केओलिन, चिकणमाती इ.
ग. फ्लोराइड - क्रायोलाइट (Alf3, 3Naf) इ.
-
बॉक्साइटच्या शुध्दीकरणाच्या पध्दतीलाच बेयरची पध्दती (Bayer’s Process)
उपयोग ;- १) घरातील भांडी, विमानांचे भाग, फोटोफ्रेम इ. साठी २) चॉकलेट, सिगारेट आदी वस्तुंच्या आवरणासाठी ऍल्युमिनिअमचा वर्खाचा उपयोग होतो. ३) ऍल्युमिनिअमच्या तारा विद्युत वाहक म्हणून उपयोगी पडतात. ४) क्षणदीप्ती छायाचित्रणात त्याचा उपयोग होतो. ५) ऍल्युमिनिअमची पूड जवसात तेलात मिसळून रुपेरी रंग म्हणून वापरतात. ६) मॅग्नेलिअम (Al आणि Mg ) ऍल्युमिनिअम ब्राँझ (Al आणि Cu )आणि ड्युरॅल्युमिन (Al, Cu आणि Mg) यासारखी संमिश्रे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात.
ऍल्युमिनिअमची संमिश्रे |
घटक |
वैशिष्ट्ये |
वैशिष्ट्ये उपयोग |
१) ड्युरेल्युमिन |
75 % Al 4% Cu 1% Mg & Mn |
वजनाला हलके व मजबूत आघात रोधक, वर्धनीय |
हवाई वाहने, मोटारी, स्वयंपाकाची भांडी, साचे, वजन पेण्याचे सामर्थ्य, भुयारी आगगाडी इ. साठी |
२) ऍल्यूमिनिअम ब्रॉंझ |
९०% ते ९६ %Cu २.३% ते १०.५% Al अल्प प्रमाणात लोखंड व कथिल |
उच्च प्रतीची तन्यता, कठीणपणा, आघात रोधकता असून रसायने व समुद्राचे पाणी यांचा परिणाम नाही. |
रंग व शाईमध्ये तसेच वर्णकामध्ये |
३) मॅग्नेलिअम |
९०% Al १०%Mg |
वजनाला हलके, मजबूत व गंज रोधक |
शास्त्रिय तराजूच्या दांड्यात, घरगुती उपकरणे, हवाई वाहने |
४) अल्निको संमिश्र |
मुख्य घटक Al व कार्बन मोनॉक्साईड निकेल |
चुंबकीय गुणधर्म असतो. |
उत्तम टिकाऊ, चुंबक तयार करण्यासाठी |
अधातू १) फॉस्फरस (phosphorus) –
-
संज्ञा - P,रेणुसूत्र- P4 अणुभार -३१, अणुअंक – १५, इलेक्ट्रॉन संरुपण – (२,८,५), संयुजा – ३ आणि ५
-
फॉस्फरसचा शोध १६७४ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ ब्रॅंड ने लावला
फॉस्फरसची खनिजे- १. फोस्फोराईट Ca3 (Po4)2 २. फ्ल्यूर ऍपेटाईट 3Ca3(Po4)2 CaF2 ३. क्लोर ऍपेटाईट 3Ca3(Po4)3 Cacl2 ४. वेव्हेलाइट 4 AlPo4, 2Al (OH)3, 9H2O
गुणधर्म – १. पिवळा फॉस्फरस अंधारात चकाकतो २. हवेत उघडा रारिल्यास पेट घेतो, (ज्वलनांक ३००C) त्यामुळे तो पाण्याखाली ठेवतात ३. उष्णतेने पिवळ्या फॉस्फरची वाफ होऊन तिचे सावकाश ऑक्सिडीकरण होते. आणि शीत ज्योत दिसते या ज्योतीत आगकाडी धरल्यास पेट घेत नाही. ४. शुध्द फॉस्फरसचा रंग पांढरा असतो,तर अशुध्द फॉस्फरसचा रंग पिवळा असतो. ५. पिवळा फॉस्फरसचा पाण्यातील विलय बिंदू ४४०C इतका असतो.
उपयोग – १. आगकाडी उद्योगात २. फॉस्फरस ब्राँझ हे संमिश्र तयार करण्यासाठी, ३. स्मोक बाँम्ब, शोभेचे दारूकाम इ. च्या उत्पादनात, ४. उंदरांसाठी विष म्हणून उपयोगी पडणारे झिंक फॉस्फाइड तयार करण्यासाठी, ५. फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणी फॉस्फरस पेंटा क्लोराईड तयार करण्यासाठी फॉस्फरस पेंटाऑक्साईड (P2O5) -
उपयोग – १. निर्जलक पदार्थ म्हणून उपयोग करतात, २) वायू कोरडे करण्यासाठी, ३. फॉस्फोरिक ऍसिड तयार करण्यासाठी.
२) गंधक
-
संज्ञा – S रेणुसुत्र – S8 , अणुभारांक – ३२, अणुअंक – १६, इलेक्ट्रॉन संरुपण (२,८,६)
-
संयुजा – २,४ आणि ६
-
गंधकमुक्त तसेच संयुक्त स्थितीत आढळते
-
संयुक्त स्थितीत – आयर्न पायराइट (FeS2 ) , झिंक ब्लेंड ( Zns) , गॅलेना ( Pbs ) , कॉपर पायराइट ( CuFeS2) , कीझेराइट (MgSo4, H2o)
-
प्राणी आणि वनस्पतीतून मिळणा-या काही पदार्थातही गंधक आढळते. उदा – अंडी, केस, कांदा, लसूण, पेट्रोलिअम वगैरे.
-
गंधक निष्कर्षणासाठी फ्राश पध्दती (Frasch process ) वापरतात.
उपयोग – १. गंधकाम्ल ( सल्फ्युरिक ऍसिड ) हे गंधकापासून मिळणारे महत्वाचे उत्पादन आहे. २. सल्फर डायऑक्साइड व कार्बन डायऑक्साइड यांच्या निर्मितीसाठी. ३. औषधी उपयोगाची कार्बनी संयुगे तयार करण्यासाठी ४. किटकनाशके तयार करण्यासाठी ५. बंदुकीची दारू, स्फोटकद्रव्ये यामध्ये वापरतात ६. रबराचे व्हल्सनायझेशन ( Vulcanisation ) करण्यासाठी हायड्रोजन सल्फाइड (H2S)
-
हायड्रोजन सल्फाइड वायू तयार करण्यासाठी किपच्या उपकरणाचा किपच्या उपकरणाचा उपयोग करतात.
-
H2S हा रंगहीन असून त्याला नकोसा वाटणारा, सडक्या अंड्यासारखा वास असतो. तो हवेपेक्षा जड असून पाण्यात अल्प प्रमाणात द्रावणीय आहे.
उपयोग – १. धातूची धन मूलके ओळखण्यासाठी, २. क्षपणक म्हणून उपयोग होतो. सल्फरडाय ऑक्साइड So2 , सल्फर ट्राय ऑक्साइड So3 यांचा उपयोग सल्फ्युरिक ऍसिडच्या उत्पादनासाठी होतो. सल्फ्युरिक ऍसिडला ( H2So4) रसायनांचा राजा म्हणतात.
उपयोग- १. साखर, कृत्रिम धागे इ. विरंजनासाठी २. कागद उद्योगात उपयोगी पडणा-या कॅल्शिअम बाय सल्फाइट सारखी संयुगे तयार करण्यासाठी ३. द्रवरूप सल्फर डायऑक्साइड पेट्रोलिअम शुध्दीकरणासाठी.
सल्फ्यूरिक ऍसिडचे उपयोग (H2So4)
-
अमोनिअम सल्फेट, सुपर फोस्फेट यासारख्या खतांच्या उत्पादनात
-
रंग, प्लॅस्टिक, रेयॉन इ. उत्पादनात
-
कागद आणि कापड उद्योगात.
-
विद्युत संचायकात (Lead Accumulator)
-
प्रयोगशाळेत अभिकारक म्हणून
-
सल्फेट क्षार, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड इ. निर्मितीमध्ये
-
पेट्रोलिअमच्या शुध्दीकरणात असंतृप्त संयुगे वेगळी करण्यासाठी
३) कार्बन (C)
-
संज्ञा – C, अणुअंक – ६ , इलेक्ट्रॉन संरुपण – (२,४), संयुजा – ४
-
निसर्गात विस्तृत प्रमाणावर कार्बन विखुरलेला आहे. मुक्त स्थितीत तो हिरा आणि ग्रॅफाईट या रूपात आढळतो
-
संयुक्त - Co2, वातावरणात – ०.०३%
-
चुनखडी ( लाइमस्टोन CaCo3), डोलोमाईट ( CaCo3, Mgco3) , मॅग्नेसाईट ( MgCo3)
-
कार्बन हा वनस्पती आणि प्राणी यांचा महत्वाचा घटक असून तो कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन या संयुगाच्या स्वरूपात असतो.
कार्बन स्फटिक रूपे अस्फ्टिक रूपे १.हिरा लोणारी कोळसा २.ग्रॅफाइट काजळी, कोक (टीप – आता ही सूक्ष्म अशा ग्रॅफाइटचीच बनलेली आहेत असे मानतात. )
१.हिरा – हिरा हे कार्बनचे सर्वात शुध्द रूप होय. तो पारदर्शक असून सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. त्याचा अपवर्तनांक (२.४२) सर्वात जास्त आहे. त्याची घनता ३.१५ g/cm3 आहे. द्रवणांक ३९३० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे.
उपयोग- १. हि-याचा रत्न म्हणून उपयोग होतो. २. ओढून तारा तयार करण्यासाठी ३. काळ्या अशुध्द हि-याचा उपयोग कापण्याची हत्यारे आणि पदार्थ घासण्यासाठी होतो.
२. ग्रॅफाइट – ग्रॅफाइट हा धातूसारखी चकाकी असलेला गडद करड्या रंगाचा स्थायू पदार्थ आहे. तो अपारदर्शक आहे. तो मउ असून थरांनी बनलेला असतो. घनता २.२५ g/cm3 आहे. कागदावर ओढल्यास त्याच्या काळ्या खुणा उमटतात. ग्रॅफाइट अधातू असूनही विद्युत सुसंवाहक आहे.
उपयोग – १. शिसपेन्सिल तयार करण्यासाठी २. उच्च तापमानाला वंगण म्हणून ३. रंगामध्ये रंगद्रव्य म्हणून४. अणुभट्टीमध्ये युरेनिअमचे रूळ साठविण्यासाठी
१. कार्बन मोनॉक्साईड ( Co) – उपयोग – १. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांचे मिश्रण म्हणजेच वॉटर गॅस होय. त्याचा उपयोग इंधन म्हणून तसेच धातूशास्त्रात क्षपणक म्हणून होतो. २. कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन यांचे मिश्रण (Co+N2) म्हणजे प्रोड्यूसर गॅस होय. याचाही इंधन म्हणून उपयोग होतो. ३. कार्बोनिल क्लोराइडला फॉस्जिन असे म्हणतात. त्याचा उपयोग रंगाच्या कारखान्यात तसेच युध्दामध्ये विषारी वायू ( Chemical war ) म्हणून उपयोग करतात
२. कार्बनडायऑक्साईड (Co2)- वातावरणामध्ये आढळतो. ज्वलन, श्वसन आणि किण्वन (Fermentation) या क्रियांमध्ये तयार होते.
उपयोग १. धुण्याचा सोडा (NaCO3 ) आणि सोडिअम बायकार्बोनेट (NaHCO3) यांच्या उत्पादनात २. वायुमिश्रित जल (Aerated water ) तयार करण्यासाठी ३. अग्निशामक म्हणून ४. स्थायूरूप कार्बन डायऑक्साईड ( शुष्क बर्फ ) अन्नपदार्थाचा साठा व त्यांची वाहतूक यामध्ये शीतक म्हणून उपयोगी पडतो
-
मिथेनला मार्श गॅस ( Marsh Gas ) असेही म्हणतात. कारण दलदलीच्या भूभागात (Marshy Land) वनस्पतीच्या अपघटनाने नैसर्गिकरित्या तो तयार होतो. तो कोलगॅसमध्ये (५० ते ९७% ) आढळतो. पेट्रोलिअमच्या भंजन प्रक्रियेतही ( Cracking Process) त्याचे उपउत्पादन होते. गोबर गॅस आणि स्यूएज गॅस (Sewage Gas ) यांच्यामध्येही तो प्रमुख घटक म्हणून आढळतो.
उपयोग- १. गोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या रूपात मिथेनचा दीप्तीदायी (Illuminant) घरगुती इंधन म्हणून. २. ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून, ३. हायड्रोजनच्या उत्पादनासाठी, ४. काजळी,कार्बन ब्लॅक तयार करण्यासाठी.
इथिलीनचे उपयोग
१. ऑक्सि – इथिलिन ज्योत, २. कृत्रिम रीतीने फळे पिकविण्यासाठी, ३. पॉलिथिन पिशव्या, प्लॅस्टिकचे कापड, नळ, तारा वगैरे तयार करण्यासाठी लागणा-या पॉलिथिन प्लॅस्टिकच्या उत्पादनासाठी उपयोग करतात. बेंझिनचे उपयोग (C6H6) – १. ड्रायक्लिनिंगसाठी, २. पेट्रोल तुटवड्यांच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून उपयोग.
-
लोणारी कोळसा – मर्यादित हवेत लाकडाचे ज्वलन करून लोणारी कोळसा तयार करतात. त्याचा उपयोग पाणी शुध्दी करणासाठी होतो.
-
प्राणिज कोळसा – मर्यादित हवेत हाडांचे ज्वलन करून तयार करतात, याचा उपयोग जलशुध्दीकरण व उद्योगात होतो.
कोळसा प्रकार |
कार्बनचे प्रमाण |
पीट |
३०- ५०% |
लिग्नाईट |
६५-७५% |
बिटूमिनस |
७५-९०% |
अँथ्रासाईट |
९०-९५% |
रंग |
धातूच्या ऑक्साइड्स |
१) हिरवा |
क्रोमिअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड |
२) लाल |
क्युप्रस ऑक्साइड |
३) निळा |
कोबाल्ट ऑक्साइड |
४) पिवळा |
अँटिमनी सल्फाइड |
५) जांभळा |
मँगनीज डायऑक्साइड |
६) अपारदर्शक / दुधी |
टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम फॉस्फेट |
विशेष प्रकारच्या काचा ः-
१) सुरक्षा काच- अ. चिवट काच – चिवट काच मोटारीच्या काचा बनविण्यासाठी वापरतात आ. स्तरीत काच – काचेच्या स्तरांमध्ये व्हायनिल प्लॅस्टिकचे पातळ पापुद्रे घालून ते उच्च दाबाखाली तापवून स्तरीत काच तयार करतात. ही काच आघात झाला असता तडकते पण तुकडे उडत नाहीत. उपयोग- १. मोटारीच्या काचा बनविण्यासाठी २. स्तरीत काचेच्या स्तरांची संख्या वाढविली म्हणजे तयार होणारी काच पिस्तुलाच्या गोळीला सुध्दा अभेद होते.
२) तंतूकाच –
-
या काचेत उष्णता आणि विद्युतरोध्क गुणधर्म आहेत.
उपयोग – बोटीचे सुकाणू, मोटारीचे ढाचे आणि शिरस्त्राणे (Helmets) बनविण्यासाठी वापरतात कारण या प्रकारच्या काचेत पोलादासारखी ताकद असते. ३) काच विटा (Glass Bricks)-
-
काचेपासून पोकळ विटा बनवितात. वातानुकूलित घरांच्या बांधकामासाठी अशा विटा योग्य असतात.
४) संकोचित काच-
-
ही विशेष प्रकारची बोरोसिलिकेट काच असून १००० अंश सेल्सिअस तापमानावर काच वापरावयाची असली म्हणजे तिचा उपयोग करतात.
हवा
हवा हे ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बनडाय ऑक्साइड, पाण्याची वाफ व काही दुर्मिळ वायूंचे मिश्रण आहे.
हवेचे घटक टक्केवारी (%)
नायट्रोजन ७८.३
ऑक्सिज २०.९९
कार्बनडाय ऑक्साइड ०.०३
ऑरगॉन ०.९४
हायड्रोजन, मिथेन, निऑन, हिलिअम ०.०१
पाणी
-
पाणी (H2O) हे एक संयुग आहे. पृथ्वीचा सुमारे ३/४ भाग (७१%) हा पाण्याने व्यापलेला आहे.
-
हेन्री कॅव्हेडिंश (१७८१) या रसायन शास्त्रज्ञाने १ भाग ऑक्सिजन व २ भाग हायड्रोजन एकत्र करून प्रयोग शाळेत पाणी तयार केले आणि पाणी हे संयुग आहे हे सिध्द केले.
ऑक्सिजन
-
संज्ञा – O, अणुक्रमांक – ८
-
ऑक्सिजन हा हवेतील क्रियाशील भाग आहे. ऑक्सिजन श्वसनासाठी तसेच ज्वलनासाठी आवश्यक आहे.
-
ऑक्सिजन वायू प्रथम तयार केला – कार्ल शिल (१७७७)
-
ह्या वायूला ऑक्सिजन हे नाव दिले – ए. लाव्हासिए – (१७७७)
-
याने ऑक्सिजन पाण्यापासून वेगळा केला – जोसेफ प्रिस्टले – (१७७४)
-
पाण्यात ऑक्सिजन व हायड्रोजनचे वजनी प्रमाण – ८ः१
-
पृथ्वीच्या कवचात ऑक्सिजनचे प्रमाण – ५०% तर हवेत तेच प्रमाण – २१%
उपयोग १. शुध्द ऑक्सिजन आणि ऍसिटीलीन वायू एकत्र करून जी ज्योत मिळते ती ज्योत – ऑक्सिऍसिटीलीन ज्योत (३०००० C) २. ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणातून तयार केलेले ज्योतीचे तापमान २८०००C असते. या ज्योती धातूंचे तुकडे जोडण्यासाठी व पत्रे कापण्यासाठी वापरतात. ३. अग्निबाणाच्या इंधनाच्या जलद ज्वलनासाठी द्रवरूप ऑक्सिजन वापरतात. ४. H2So4 ऍसिड बनविण्यासाठी ऑक्सिजन वापरतात. ५. ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साइड यांचे मिश्रण भूल देण्यासाठी वापरतात.
हायड्रोजन
-
संज्ञा – H, अणुक्रमांक -१
-
या वायूचा शोध लावला – हेन्री कॅव्हेंडीश (१७६६)
-
हा वायू सर्व मूलद्रव्यात हलका आहे. म्हणून हा वायू फुग्यांमध्ये शास्त्रीय उपकरणाद्वारे भरून अभ्यासासाठी हे फुगे अवकाशात तरंगत ठेवले जातात.
-
सूर्यावरील वातावरणात प्रामुख्याने हा वायू आढळतो
-
ज्वालामुखीतून जे वायू बाहेर पडतात. त्यात हायड्रोजन मुक्तावस्थेत आढळतो.
-
पाण्यामधे हायड्रोजचे वजनी प्रमाण – ११% असते.
-
कार्बन व हायड्रोजन यांची संयुगे या नावाने ओळखली जातात. – हायड्रोकार्बन्स
उपयोग – १. कोलगॅस, वॉटरगॅस व प्रोड्यूसर गॅस यांसारख्या वायूरूप इंधनाचा घटक असतो. २. खाद्यतेल, तुपासारखे पदार्थ घट्ट करण्यासाठी या वायूचा वापर करतात. ३. धातूंच्या ऑक्साइडपासून धातू मिळविण्यासाठी हायड्रोजन क्षपणक म्हणून वापरतात ४. ऑक्सिहायड्रोजन ज्योतीचा उपयोग धातूंचे पत्रे कापण्यासाठी होतो.
नायट्रोजन
-
संज्ञा – N, अणुक्रमांक -७
-
डॅनिअल रूदरफोर्ड (१७७२) याने सर्वप्रथम हवेतून नायट्रोजन वायू वेगळा केला.
-
हवेतील प्रमुख घटक म्हणजे नायट्रोजन. याचे हवेतील आकारमान सुमारे ७८% आहे.
-
प्राणी व वनस्पती यांच्या वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते.
-
निसर्गात जो नायट्रोजन आढळतो तो प्रामुख्याने सोडिअम नायट्रेट (NaNo3-चिली सॉल्ट पिटर) आणि पोटॅशिअम नायट्रेट (KNo3 – नायटर) या रूपांमध्ये आढळतो.
उपयोग- १. विद्युत दिव्यांमध्ये तंतूचे ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून त्यामध्ये नायट्रोजन व ऑरगॉन यांचे मिश्र्ण वापरतात. २. अमोनिया, नायट्रीक ऍसिड आणि खते तयार करण्यासाठी ३. उच्च तापमानाच्या तापमापीमध्ये याचा उपयोग करतात. ४. पोलाद कठीण करण्याच्या प्रक्रियेत नायट्रोजन वापरतात.
-
वातावरणातील नायट्रोजनचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर होण्याच्या क्रियेला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात.
-
नायट्रोजनच्या परिभ्रमणाला नायट्रोजनचे चक्र म्हणतात.
अमोनिया (NH3)
जोसेफ प्रिस्टले (१७७४) यांनी हा वायू तयार केला
-
नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्यापासून कृत्रिमरित्या मोठ्या प्रमाणावर अमोनिया वायू तयार करण्याची पध्दत – हेबर पध्दत
-
हेबर यांना नोबेल पारितोषिक मिळाले – १९१८
उपयोग- १. धुण्याचा सोडा, सोडिअम बायकार्बोनेट, नायट्रीक ऍसिड इ. च्या उत्पादनात. २. अमोनिया सल्फेट डायामोनियम फॉस्फेट, यूरिया इ. खतांच्या उत्पादनात. ३. बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात प्रशीतक (Refrigerent) म्हणून. ४. औषधात वापर. ५. बेशुध्द माणसाला शुध्दीवर आणण्याकरीता.
-
अमोनियम क्लोराइड (NH4Cl - नवसागर ) हे संयुग – तांबे आणि पितळांच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी , लेक्लाशेंच्या विद्युतघटात आणि निर्द्रव विद्युतघटात आणि औषधांमध्ये यांचा वापर करण्यात येतो.
-
अमोनियम नायट्रेट (NH4No3) गोठण मिश्रणातील एक घटक म्हणून वापरतात
-
अमोनियम कार्बोनेट (NH4Co3), स्मेलिंग सॉल्ट तयार करण्यासाठी, बेकिंग पावडरमध्ये, कापडउद्योगांमध्ये रंगबंधक म्हणून वापरतात.
इंधने (Fules)
निरनिराळ्या उद्देश्यांसाठी वापरली जाणारी उष्णता ऊर्जा ज्या पदार्थांचे दहन केले असता निर्माण होते, अशा पदार्थांना इंधने म्हणतात.
इंधनाचे प्रकार-
१. नैसर्गिक वायू इंधने- नॅचरल गॅस – कोळसा किंवा पेट्रोलियम खाणीच्या प्रदेशात नॅचरल गॅस आढळतो. त्यात मुख्यतः सुमारे ९५% हायड्रोकार्बन असतात. हायड्रोकार्बनची घटना विविध प्रकारची असते. त्यात सुमारे ८० ते ९०% मिथेन, ६ ते १०% इथेन, ३ ते ५% प्रोपेन, १ ते २% ब्युटेन हे वायू असतात. तसेच त्यात थोड्या प्रमाणावर नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि हेलिअम हेही वायू असतात. नॅचरल गॅस थंड करून व खनिज तेलाच्या भागशः उर्ध्वपतनाने ब्युटेन व इतर वायू वेगळे करता येतात. नंतर तो पोलादी नळकांड्यात भरतात. हल्ली नॅचरल गॅस अन्न शिजविणे, प्रकाश मिळविणे इ. साठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
२. कृत्रिम वायू इंधने
अ) कोल गॅस – दगडी कोळशाच्या भंजक उर्ध्वपातनाने कोल गॅस मिळविता येतो. तो मुख्यतः इंधन म्हणून वापरतात. तसेच प्रकाशासाठीही त्याचा उपयोग करतात.
आ) ऑइल गॅस – केरोसीनचे भंजन करून ऑइल गॅस मिळवितात. केरोसीनचे मिथेन, इथेन, एथिलिन आणि हायड्रोजन यासारख्या वायूरूप हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर होते. ऑइल गॅसचा प्रयोगशाळा आणि लघुउद्योगधंद्यांमध्ये उपयोग होतो.
इ) पेट्रोल गॅस – पेट्रोलचे भंजन करून पेट्रोल गॅस मिळवितात. त्यात प्रोपेन, ब्युटेन, एथिलिन आणि ब्युटिलिन यासारखे हायड्रोकार्बन असतात. तो वायू प्रयोगशाळेत आणि घरगुती उपयोगासाठी इंधन म्हणून वापरतात.
ई) वॉटर गॅस – वॉटर गॅस हे कार्बन मोनॉक्साइड वायू आणि हायड्रोजन वायू यांचे मिश्रण होय. त्यात ४५% कार्बन मोनॉक्साइड, ४५% हायड्रोजन आणि १०% अन्य वायू असे वैशिष्ट्यपूर्ण घटक असतात. सुमारे १४०० अंश सेल्सिअसला शुभ्रोष्ण कोक वरून पाण्याची वाफ जाऊ दिल्यास वॉटर गॅस तयार होतो. त्याचा इंधन म्हणून उपयोग होतो. शिवाय हायड्रोजन मिळविण्यासाठीही तो उपयोगी पडतो. वॉटर गॅस निळसर ज्योतीने जळत असल्यामुळे त्याला नील वायू (Blue gas) असेही म्हणतात
उ) प्रोड्यूसर गॅस – हा वायू कार्बन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण होय. त्यात ३०% कार्बन मोनॉक्साइड, ६०% नायट्रोजन आणि १०% अन्य वायू असे विशेष घटक असतात. रक्तोष्ण कोळशाच्या थरावरून अपु-या हवेचा झोत जाऊ दिल्यास प्रोड्यूसर गॅस तयार होतो. काच तयार करण्याच्या भट्टयांमधे आणि धातू मिळविण्याच्या भट्टयांमध्ये प्रोड्यूसर गॅसचा उपयोग करतात. अमोनिआ तयार करताना लागणारा नायट्रोजन मिळविण्यासाठीही त्याचा उपयोग करतात. ट्रॅक्टर, मोटारी, माल वाहतुकीच्या गाड्या चालविण्यासाठी वापण्यात येणा-या गॅस इंजिनांमधे त्याचा इंधन म्हणून उपयोग करतात.
महत्वाची संयुगे
नाव व रेणुसुत्रे |
गुणधर्म |
उपयोग |
१. खाण्याचा सोडा सोडीयम बाय कार्बोनेट |
१. पांढरी भुकटी २. पाण्यात द्रावणीय ३. मिरमिरी चव ४. उष्णतेने अपघटन व कार्बनडाय ऑक्साइड मुक्त ५. आम्लाची तीव्रक्रिया होऊन कार्बनडाय ऑक्साइड मुक्त |
१. बेकिंग पावडरमध्ये टार्टारिक ऍसिड बरोबर वापरतात त्यामुळे पाव, बिस्किटे, केक सच्छिद्रे व खुसखुशीत बनतात. |
२. धुण्याचा सोडा सोडीयम कार्बोनेट |
१. पांढरा स्फटीक पदार्थ २. थोड्याशा उष्णतेने बरेसचे स्फटिक जल बाष्परुपात वेगळे होते व पांढरी भुकटी शिल्लक उरते. ( या क्रियेला जलत्सर्जन म्हणतात. ३. विरल आम्लांशी सहज अभिक्रिया होवून कार्बनडाय ऑक्साइड वायू मुक्त होतो. ४. सोडीयम कार्बोनेट ओला तांबडा लिटमस निळा बनवतो. म्हणजेच तो पदार्थ आम्लारीधर्मी आहे. ५. कठीण पाणी सोडीयम बायकार्बोनेटमुळे सिफेन बनते. |
१. कपडे, भांडी इत्यादींच्या स्वच्छतेसाठी २. पाणी सुफेन बनविण्यासाठी ३. टाकणखार (बोरॅक्स) कॉस्टीक सोडा, काच ४. धुण्याचा साबण व इतर उपमार्जकांमधे ५. अग्निशामकांमधे |
३. चुनखडी कॅल्शिअम कार्बोनेट |
१. पांढरा चूर्ण रुप पदार्थ २. पाण्यात अद्रावणीय मात्र कार्बनडाय ऑक्साइडयुक्त पाण्यात द्रावणीय ३. सुमारे १००० सेल्सी. तापमानाला याचे रुपांतर चुनकळीत होते व CO2 मुक्त होतो. |
१. चुना, सिमेंट, काच, धुण्याचा सोडा यांच्या उत्पादनात वापरतात. २. खनिजांपासून धातू मिळवितांना ३. संगमरवराच्या स्वरुपात शिल्पकला, इमारती इ. ४. प्रयोगशाळेत कार्बनडायऑक्साइड तयार करण्यासाठी ५. रंग, दंतमंजन, खडू तयार करण्यासाठी |
४. फेरस सल्फेट (ग्रिन व्हिट्रीऑल) (हिराकस) |
१. फिकट हिरव्या रंगाचा स्फटिक पदार्थ २. ब-यापैकी जलोत्सर्जक असल्याने लगेच चूर्णरुप पांढ-या रंगाचे फेरस सल्फेट तयार होते. ३. अमोनियम सल्फेटशी क्रिया होऊन फेरस अमोनियम सल्फेट म्हणजेच मोहर्स सॉल्ट म्हणतात. FeSO4(NH4)2SO46H2O फेरस सल्फेट क्षेपणक असल्याने पोटॅशिअम परमँगनेटचे जांभळ्या रंगाचे आम्लीकृत द्रावण त्यामुळे रंगहीन बनते. |
१. कपडे रंगविण्याच्या उद्योगात रंगबंधक म्हणून २. कृषी क्षेत्रात किटकनाशक म्हणून ३. प्रयोगशाळेत क्षपणक म्हणून ४. पेनाची शाई तयार करणे ५. कातडी कमविण्याच्या उद्योगात |
५) कॉपर सल्फेट (ब्ल्यूव्हिट्रिऑल/मोरचूद) |
१. निळ्या रंगाचे स्फटिक २. पाण्यात द्रावणीय ३. स्वरूप विषारी ४. २५० सेल्सी. पर्यंत तापविल्यास स्फटिकजल स्फटिकातील स्फटिकजल बाष्परूपात निघून जाते व कॉपर सल्फेटचे पांढरे चूर्ण शिल्लक राहते. ५. कॉपर सल्फेटच्या द्रावणाचे अमोनियाबरोबर अभिक्रिया होवून प्रतम द्रावणीय निळसर पांढ-या रंगाच्या कॉपर हायड्रॉक्साईडचा अवक्षेप तार होतो पण जादा अमोनिया पाठवल्यास अवक्षेप विरघळून गडद निळे द्रावण तयार होते. ६. पोटॅशिअम आयोडाईड बरोबर कॉपर सल्फेटची अभिक्रिया होऊन आयोडिन मुक्त होते. |
१. किडनाशक म्हणून बोर्डो मिश्रणात. २. किडनाशक म्हणून तांब्याच्या विद्युत विलेपना साठी व तांब्याच्या शुध्दीकरणासाठी. ३. रंगबंधक म्हणून कापड उद्योगात ४. डॅनिअलच्या विद्युतघटात ५. तांब्याची अनेक संयुगे तयार करण्यासाठी ६. मधुमेहाच्या निदानासाठी वापरल्या जाणा-या फेलिंगच्या द्रावणात किंवा बेनिडीटच्या द्रावणात कॉपर सल्फेटच्या हा एक घटक असतो. |
६) तुरटी |
१. पोटॅशिअम सल्फेट व ऍल्युमिनिअम सल्फेट मिळून तयार होणारा हा दुहेरी क्षार आहे २. चव तुरट ३. स्वरुप पांढरे स्फटिकमय ४. पाण्यात द्रावणिय ५. आम्लधर्मी ६. विकनयांक ९२ त्याहून जास्त तापविल्यास स्फटिकजल बाष्परुपात उत्सर्जित होवून तुरटी फुलारते. अशा तुरटीला लाही म्हणतात. |
१.कातडी कमविणा-या उद्योगात रंगबंधक म्हणून २.विशिष्ट औषधांध्ये तुरटी व तिची लाही वापरतात. ३. कागदाला चमक येण्यासाठी ४. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी ५. निवळण्याच्या क्रियेने पाणी शुध्द करण्यासाठी |
रासायनिक पदार्थ व त्यांची व्यावहारिक शास्त्रीय नावे
अ.क्र. व्यावहारीक नाव |
शास्त्रीय नाव |
१) ब्ल्यू व्हिट्रीऑल २) व्हाईट व्हिट्रीऑल ३) ग्रीन व्हिट्रीऑल ४) धुण्याचा सोडा ५) खाण्याचा सोडा ६) कॉस्टिक पोटॅश ७) बेंगॉल सॉल्ट पिटर ८) साधे मीठ ९) लिथार्ज १०) फॉस्जिन ११) मार्श गॅस १२) जलकाच १३) जिप्सम १४) इप्सम सॉल्ट १५) ग्लोबर्स सॉल्ट १६) साल ऍमॉनिऍक १७) आयर्न पायराइट |
कॉपर सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट सोडिअम कार्बोनेट सोडिअम बाय कार्बोनेट पोटॅशिअम हायड्रॉक्साइड पोटेशिअम नायट्रेट सोडिअम क्लोराइड लेड(लिड) मोनोक्साइड कार्बोनिल क्लोराइड मिथेन सोडिअम सिलिकेट कॅल्शिअम सल्फेट मॅग्नेशिअम सल्फेट सोडिअम सल्फेट अमोनिअम क्लोराइड आयर्न सल्फाइड |
काही महत्वाची रासायनिक संयुगे व रेणूसूत्रे
क्र. रासायनिक संयुगे |
रेणूसूत्रे |
१. नायट्रोजन डाय ऑक्साइड २. नायट्रेस ऍसिड ३. नायट्रीक ऍसिड ४. अमोनियम क्लोराइड ५. अमोनियम सल्फेट ६. अमोनियम नायट्रेट ७. अमोनियम कार्बोनेट ८. कॅल्शिअम हायड्रॉक्साइड (विरलेला चुना) ९. पोटॅशिअम परमॅगनेट १०.मॅगनीज डायऑक्साइड ११.हायड्रोजन सल्फाइड १२.ऍटिमनी ट्रायआयोडाइड १३.पोटॅशिअम सल्फेट १४.मँग्नेशिअम हायड्रॉक्साइड १५.ऍल्युमिनिअम ऑक्साइड १६.क्युप्रस क्लोराइड १७.क्युप्रिक क्लोराइड १८.फेरस सल्फेट ( हेराकस) १९.कॉपर सल्फेट २०.झिंक सल्फेट २१.मँग्नेशिअम सल्फेट २२.झिंक ऑक्साइड ( झिंक सफेदा) २३.मँग्नेशिअम कार्बोनेट २४.सिल्व्हर नायट्रेट २५.मर्क्युरस क्लोराइड २६.सोडिअम हायड्रॉक्साइड (कॉस्टिक सोडा) २७.पोटॅशिअम ऍल्युमिनिअम सल्फेट (तुरटी) २८.लेड मोनॉक्साइड ( लिथार्ज) २९.लेड नायट्रेट ३०.फॉस्फरस पेंटॉक्साइड ३१.क्रोमिअम ट्रायऑक्साइड ३२.स्टॅनिक ऑक्साइड ३३.शेंदूर ३४.चिली सॉल्ट पीटर ( सोडिअम नायट्रेट) ३५.बोरॅक्स (टाकणखार) ३६.कॉपर सल्फेट ३७.ऍल्युमिनिअम सल्फेट ३८.सोडिअम ऍल्युमिनेट ३९.ऍसिटीक ऍसिड ४०.सोडिअम कार्बोनेट ४१.सोडिअम बायकार्बोनेट ४२.मिथेन ४३.ऍसिटीलीन ४४.यूरिया ४५.पोटॅशिअम नायट्रेट ४६.सोडिअम सल्फेट ४७.ग्लुकोज ४८.साखर ४९.क्लोरोफार्म ५०.B. H. C. ५१.जिप्सम ५२.प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) ५३.पॉलिथीन प्लॅस्टिक |
NO2 HNO2 HNO3 NH4Cl (NH4)2 SO4 NH4NO3 (NH4)2 CO3Ca(OH)2 KMNO4 MNo2 H2S Sbl3 K2So4Mg(OH)2 Al2O3 CuCl or Cu2Cl2 Cucl2FeSO4 (Green Vitriol) CuSO4, 5H2O (Blue Vitriol) ZnSO4,7H2O (White Vitriol) MgCO4, 7H2O (Epsom Salt) ZnO MgCO3 (French Chalk) AgNO3 (Lunar Caustic) Hg2Cl2 (Calomel) NaOH K2So4Al2 (So4) 24H2O PbO Pb (NO3)2 P2O5CrO3 SnO2 Pb3O4 NaNO3 Na2B4O7CuSO4 (मोरचूद) Al2 (SO4)3 NaAlO2CH3COOH Na2CO3 (धुण्याचा सोडा) NaHCO3 (खाण्याचा सोडा) CH4 (मार्श गॅस) C2H2 NH2 CONH2 KNO3 (बेंगाल सॉल्ट पिटर) NaSO4 (ग्लोबर्स सॉल्ट) C6H12O6C12H22O11 CHCl3 C6H6Cl6 CaSO4 (CaSO4) 2H2O (C2H4)n |
धन प्रभार ॠण प्रभार न्यूट्रल
ऍनोड कॅथोड - कॅटायन
ऍनायन - अल्फा बिटा
गॅमा हायड्रोजन ऑक्सिजन -
मुलद्रव्य |
संज्ञा |
अणू |
मूलद्रव्य |
संज्ञा |
अणू |
हायड्रोजन |
H |
1 |
हेलियम |
He |
4 |
कार्बन |
C |
12 |
नायट्रोजन |
|
N 14 |
ऑक्सिजन |
O |
16 |
सोडियम |
|
NA 23 |
मॅग्नेशिअम |
MG |
24 |
ऍल्युमिनीयम |
AL |
27 |
सिलिकॉन |
SI |
28 |
फॉस्फरस |
P |
31 |
गंधक |
S |
32 |
क्लोरीन |
CL |
35 |
क्रोमीअम |
CR |
52 |
कोबाल्ट |
CO |
59 |
तांबे |
CU |
64 |
कॅडमियम |
CD |
112 |
संकीर्ण माहिती –
-
६४% लोखंड व ३६% निकेल वापरून तयार केलेल्या मिश्रधातुला इनव्हार म्हणतात.
-
ज्युव्हेनाइल हॉर्मोन किंवा निओटेनिन हे किटकांमध्ये सापडणारे संप्रेरक आहे.
-
केरोसिनला पॅराफिन तेल असेही दुसरे नाव आहे.
-
मधामध्ये लेव्हलोज ही साखर असते.
-
सोन्याचा खरेपणा ओळखण्यासाठी सोन्याचा तुकडा आम्लराज द्रावात बुडवून कसोटी दगडावर घासतात. हे द्रव हायड्रोक्लोरिक आम्ल व नायट्रीक आम्लापासून तयार करतात.
-
पी. व्ही. सी. म्हणजे पॉली व्हिनाइल क्लोराइड होय.
-
कृत्रिम रितीने तयार केलेल्या चामड्याला रेक्झिन म्हणतात. ते सेल्युलोजपासून बनवितात
-
पहिल्या महायुध्दात विषारी गॅस म्हणून ज्या तेलासारख्या वायूचा उपयोग केला गेला. त्याचे नाव मस्टर्ड गॅस असे आहे.
-
बॉक्साइट शुध्द करण्यासाठी कॉस्टिक सोडा वापरतात.
-
बर्फ व मीठ यांच्या योग्य मिश्रणाच्या साह्याने तापमान – २३0 से पर्यंत कमी करता येते.
-
द्राक्षाच्या रसापासून शॅम्पेन हा मद्याचा प्रकार बनवितात.
-
पॉलिजल ही पृथ्वीवरील सर्वात हानीकारक वस्तू मानली जाते. साधे पाणी केसासारख्या सूक्ष्म आकाराच्या नलिकेतून पाठवून ते तयार करतात. ते – ४०0 से. ला गोठते तर ५०० 0 से. ला उकळते.
-
चिंचेमध्ये टारटारिक आम्ल असते. तर लिंबामध्ये सायट्रीक आम्ल असते.
-
वाईन (दारु) मध्ये १२ % इथिल अल्कोहोल असते.
-
जाहिरातीमध्ये वेगवेगळे रंग आणण्यासाठी निऑन वायू वापरतात.
-
गंधकाबरोबर रबर तापविण्याच्या क्रियेला वल्कनायझेशन म्हणतात.
-
कार्नोबा मेण हे पेट्रोलिअम मेण असते.
-
फॉस्फरसच्या रेणूतील अणू -४
-
हायड्रोजन सल्फाइड वायू आम्लधर्मी आहे.
-
परागकण हे नैसर्गिक प्रदूषक आहे.
-
पिवळा फॉस्फरस पाण्याखाली ठेवतात.
-
सोडीअम धातू रॉकेल खाली ठेवतात.
-
ऊसाच्या चिपडाला बगास म्हणतात.
-
वाफाळ सल्फ्युरिक ऍसिडला म्हणतात. –ओलीयम
-
पिवळा फॉस्फरस बेझिंनमध्ये द्रावणीय आहे.
-
निश्चित आकार नसणारा स्थायू- स्टार्च
-
स्फोटक – TNT- ट्रायनायट्रो टॅल्वीन
-
विमानाच्या टायरमध्ये असणारा वायू – हेलीयम
-
१८ कॅरेट सोने – ७५ % शुध्द
-
वायूच्या विसरणाचा नियम –ग्राहम
-
प्रकाश विद्युत घटातील लवण – लिथीयम
-
एअर कंडीशनर मधील प्रशितक – फ्रिऑन
-
टाल्कम पावडर तयार करतात – मॅग्नेशियम सिलीकेट
-
कापड गिरण्यांमध्ये विरंजक – सोडीयम परबोरेट
-
सर्वात हलका धातू- लिथियम, जड –प्लुटेनियम
-
नायट्रीक आम्ल साठविण्यासाठी टाक्या – ऍल्युमिनीयम
-
तीव्र आम्ल साठविण्यासाठी टाक्या – शिशाच्या
-
अतिशय सप्लवनशिल द्रव – नॅप्थॅलिन
-
चांदीच्या भांड्यात अंडे उकडल्यास – अंडे काळे होते.
भैतिकशास्त्र
द्रव्याचे भौतिक गुणधर्म -
१) द्रव्य जागा व्यापतातत त्याबरोबर सर्व पदार्थ जागा व्यापतात.
२) वस्तुमान – पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्यामधील द्रव्यसंचयन होय. वस्तुमान हा सर्व पदार्थाचा सर्वसामान्य गुणधर्म होय. वस्तुमान हे द्रव्याच्या आकारमानाच्या प्रमाणात असते. भिन्न प्रकारचे द्रव्य असलेल्या परंतु सारखेच आकारमान असलेल्या पदार्थाचे वस्तुमान भिन्न असु शकतात. उदा – लाकडी ठोकळा व लोखंडी ठोकळा
३) प्रत्यस्थता ( Elasticity) - पदार्थावरील लावलेले बल काढून घेताच ते त्यांच्या मुळचा आकार व मुळ्चे आकारमान प्राप्त करुन घेतात या गुणधर्माला प्रत्यास्थता असे म्हणतात. उदा. – रबर,पोलाद, हवा, फुटबॉलच्या चेंडूचे उसळी मारणे इ.
४) जडत्व (Inertia)- सद्यस्थिती स्वतःहू न बदलण्याची प्रवृत्ती असते. पदार्थाच्या या प्रवृत्तीस जडत्व असे म्हणतात. उदा – ग्लास, पोस्ट कार्ड व नाण्याचा प्रयोग, चालत्या बस/ रेल्वेतून उतरतांना पळावे लागणे.
५) कठिणपणा (Hardness)- काच तांब्यापेक्षा कठीण आहे कारण काचेच्या तुकड्याने तांब्यावर आराखडा पाडता येतो. हिरा अत्यंत कठीण पदार्थ असल्यामुळे त्याचा काच कापण्यासाठी हि-याचा उपयोग करतात.
६) ठिसूळपणा (Brittlness)- आघाताने तुकडे होण्याचा गुणधर्मास ठिसूळपणा म्हणतात. पदार्थ जितका कठीण तेवढाच तो ठिसूळ असतो. पोलादाचा तुकडा व काचेचा तुकडा फरशीवर टाकल्यावर काचेचे तुकडे पडतात यावरुन काच पोलादापेक्षा अधिक ठिसूळ आहे.
७) सच्छिद्रता ( Porosity)- रंध्रे असणा-या गुणधर्मास सरंध्रता ( सच्छिद्रता) असे म्हणतात. उदा. –खडूचा तुकडा पाण्यात टाकल्यास हवेचे बुडबुडे येणे , माठातून पाणी पाझरणे, स्पंज.
८) वर्धनीयता (Malleability ) – पदार्थाच्या ज्या विशिष्ट गुणांमूळे त्याचे पातळ पत्र्यात रुपांतर करता येते, त्या गुणधर्मास वर्धनीयता असे म्हणतात. उदा. – तांब्याची भांडी. सर्वाधिक वर्धनीयता चांदीत असते.
९) तन्यता (Ductility) – पदार्थाच्या या गुणधर्मामुळे त्याची बारीक तार काढता येते. जवळजवळ सर्वच धातूत तन्यता हा गुणधर्म असतो. उदा- सोने व चांदीच्या बारीक तारा दागिने बनविण्यासाठी वापरतात. सर्वाधिक तन्यता सोन्यात असते.
-
भौतिक राशीचे मापन – लांबी, क्षेत्रफळ, वस्तुमान, आकारमान, घनता, चाल (speed) इत्यादी भौतिक राशी आहेत. भौतिकशास्त्राचा अभ्यास करतांना भौतिक राशींच्या अचूक मापनाची गरज भासत असते.
-
मापन – विशिष्ट परिमाणाशी एखाद्या राशीची तुलना करणे म्हणजे त्या राशीचे मापन करणे होय. त्यास एकक असे संबोधतात
-
प्रमाणित एकके (Standard Unit ) – एखाद्या विशिष्ट राशीचे मापन सर्वच स्थळी व सर्व काळी एकसारखे येण्याकरिता काही प्रमाणित एकके मापनाकरिता वापरली जातात.
प्रमाणित एककाचे गुणधर्म –
१. ते एकक सहजपणे उपलब्ध होणारे असावे.
२. ते नाशवंत नसावे.
३. ते स्थल कालपरत्वे बदलणारे नसावे
मुलभूत राशी (Fundamental Quantities)
सोयीसाठी लांबी, वस्तुमान आणि काल या तीन भौतिक राशी मूलभुत आहे कारण ही एकके एकमेकांवर अवलंबून नाही. आणि जवळजवळ इतर सर्वच राशींची एकके लांबी, वस्तुमान आणि काल यांच्या एककात दर्शविता येतात.
-
मापन पध्दती
१. MKS – पध्दत – मीटर, किलोग्रॅम, सेकंद यास मेट्रिक पध्दत म्हणतात.
२. CGS – पध्दत – सेंटिमीटर, ग्रॅम, सेकंद.
३. FPS – फुट, पौंड, सेकंद या पध्दतीलाच ब्रिटिश पध्दत असेही म्हणतात.
४. SI – पध्दत (System Internationl) – ही MKS पध्दतीचे आंतराराष्ट्रीय मान्यता मिळून स्विकारलेली पध्दत आहे.
-
ही SI पध्दत १९६० च्या GGPM परिषदेत मान्यता पावली. यात मुलभूत एकके, दोन पुरक एकके व १९ साधित एकके त्यांच्या विशिष्ट नावासह स्विकारली गेली.
-
आंतरराष्ट्रीय वजन माप कार्यालय पॅरिस जवळ सेव्हरस येथे आहे.
सात मुलभूत SI एकके (The Seven Basic SI Unit)
Quantity |
Unit |
symbol |
१. लांबी (Length) |
Meter |
M |
१. वस्तुमान (Mass) |
kilogram |
Kg |
२. वेळ (Time) |
second |
S |
३. तापमान (Temperature) |
kelvin |
K |
४. (Amount of Substance) |
Mole |
Mol |
५. विद्युत प्रवाह (Electric Current) |
Ampere |
A |
६. अनुदिप्त तीव्रता (Luminous intensity) |
Candela |
Cal |
Abbreviation in powers of 10
Powers of 10 |
Prefix |
Symbol |
1012 |
Tera |
T |
109 |
Giga |
G |
106 |
Mega |
M |
103 |
Kilo |
K |
102 |
Hecto |
h |
101 |
Deca |
da |
10-1 |
Deci |
d |
10-2 |
Centi |
c |
10-3 |
Milli |
m |
10-6 |
Micro |
u |
10-9 |
Nano |
n |
10-12 |
Pico |
p |
10-15 |
Femto |
f |
10-18 |
Atto |
a |
SI Unite-
-
लांबी (Length) – लांबीचे SI पध्दतीत एकक मीटर ( m ) आहे. मीटर म्हणजे इ. स. १८८९ मध्ये फ्रान्स मधील पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय वजन आणि मापन संघटनेच्या संग्रहामध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम – इरिडियम या मिश्र धातूच्या पट्टीची लांबी होय. जी २७३. १६ K तापमान व बार दाब अशा वातावरणात जतन करून ठेवलेली आहे.
-
१९८३ मध्ये मीटरची व्याख्या प्रकाशाने अंतराळात १/२९९, ७९२, ४५८ सेकंदात पार केलेले अंतर म्हणजेच एक मीटर होय.
-
तसेच मीटर म्हणजे क्रिप्टॉन नारंगी रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी प्रमाण मानतात
-
लांबीचे मोठ्या प्रमाणावरील एकक प्रकाशवर्ष – 9.46X1015 m/9.46X 1012 km
-
लांबीचे मोठ्या प्रमाणावरील एकक – मायक्रोमीटर्स किंवा मायक्रॉन (um), ऍगस्ट्रॉम (A), नॅनोमीटर (mn), फेम्टोमीटर (fm)
मीटरवरून इतर एकके
1Km = 1000m =103 m
1mm = 1/1000 m = 10-3
1 (nm) = 1/1000000000 = 10-9 m
1 cm = 1/100 m =10-2 m
1 (um) = 1/1000000 = 10-6 m
-
लांबी – कोणत्याही दोन बिंदुमधील अंतराला लांबी असे म्हणतात. मीटर हे लांबीचे MKS पध्दतीतील एकक होय.
विविध शास्त्रात अंतर मोजण्यासाठी वापरण्यात येणारी एकके –
१. दैनंदिन व्यवहार – सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर
२. खगोलशास्त्र – प्रकाशवर्ष
३. सूक्ष्मजीवशास्त्र – मायक्रॉन, ऍंगस्ट्रॉम
४. जीवशास्त्र – मायक्रॉन, मिलीमीटर
५. सागरशास्त्र – फॅदम, नॉटीकल मैल
६. अणुशास्त्र – ऍंगस्ट्रॉम, फेम्टोमीटर
-
वस्तुमान (Mass) – पदार्थातील द्रव्य समुच्च्यास वस्तुमान असे म्हणतात. SI पध्दतीत वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम हे आहे.
-
वस्तुमानाचे किलोग्रॅमवर आधारित एकके-
1 tone ( t ) = 1000 kg = 103 kg
1 gram ( g ) = 1/1000 kg = 10-3 kg
1 miligram ( mg ) = 1/1000000 = 10-6 kg
1kwintal = 100 kg.
-
वेळ ( Time ) – एकक सेकंद (S) आहे. वेळेचे मापन किंवा (Standard Measurement) हे पृथ्वीच्या परिवलनापासून घेण्यात आले आहे. सेकंद म्हणजे १ सौरदिनाच्या १/८६४०० वा भाग होय.
-
नवीन संशोधनानुसार सेकंद हे सिसियम अणुमधील (Cesium atom) कंपनावरून (Periodic Vibration) घेतले आहे. यामध्ये एक सेकंद म्हणजे सिसियम – १३३ अणुतील ९, १९२, ७७० एवढी कंपने निर्माण होण्यास लागणारा वेळ होय.
-
साधित राशी आणि त्यांची एकके (Derived quantities and their units ) क्षेत्रफळ, आकारमान, चाल, घनता इ. भौतिक राशीना साधित राशी असे म्हणतात. या राशी मुलभूत राशींच्या स्वरुपात व्यक्त करता येतात. त्यामुळे त्यांची एकके मुलभूत, भौतिक राशींच्या एककांच्या स्वरूपात मिळतात. म्हणून साधित राशींच्या एककांना साधित एकके म्हणतात. उदा- लांबीचे मुलभूत एकक घेऊन क्षेत्रफळाच्या मापनाकरीता cm किंवा चौरस सेमी एकक CGS पध्दती वापरतात. CGS मध्ये cm/s व MKS मध्ये m/s असे लिहितात.
-
अदिश राशी व सदिश राशी (Scalars & Vectors) – ब-याच भौतिक राशींच्या बेरीज वजाबाकी वगैरेसाठी अंकगणिताचे नियम वापरता येतात तथापी काही भौतिक राशींच्या बाबतीत अंकगणिताचे नियम लागू पडत नाही. हा फरक विचारात घेऊन भौतिक राशींचे (१) आदिश राशी (२) सदिश राशी असे दोन गट करता येतात.
-
आदिश (Scalars) – जी भौतिक राशी केवळ परिमाण दिल्याने पूर्णपणे व्यक्त होते, तिला आदिश राशी म्हणतात. अंकगणिताचे नियम वापरून आदिश राशींची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. परंतु बेरीज किंवा वजाबाकी करतांना या राशी समान एककामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत. लांबी, वस्तुमान, आकारमान, काल, तापमान, चाल, घनता इ. राशींना आदिश राशी म्हणतात,
-
सदिश राशी – जी भौतिक राशी पूर्णपणे व्यक्त करण्याकरिता तिचे परिमाण व दिशा या दोन गोष्टीची आवश्यकता असते तिला सदिश राशी किंवा सदिश म्हणतात.
-
विस्थापन, वेग, त्वरण, बल, संवेग, चुंबकीय प्रवर्तन, वजन, प्रेरणा इ. सदिश राशी आहेत.
-
सर्वसाधारणपणे सदिश राशी दर्शविण्यासाठी माथ्यावर बाण काढलेल्या चिन्हांचा वापर केला जातो. उदा – विस्थापन OA व OB
-
बाणरहित चिन्हे (OA,OB) केवळ परिमाण दर्शवितात. म्हणून 1(OA)=1(OB) परंतु OA≠OB
-
समान परिमाण परंतु ते भिन्न दिशा असलेले सदिश समान नसतात.
-
सदिश राशींच्या परिमाणाबरोबर दिशा ही असल्यामुळे त्यांच्या बेरीज किंवा वजाबाकीसाठी अंकगणिताचे नियम लागू पडत नाहीत.
-
सदिश राशींना दिशा असल्यामुळे ती दर्शविण्यासाठी आलेख चित्रणाचा उपयोग केला जातो.
-
सदिशा राशीची बेरीज AB + BC = AC
राशी |
व्याख्या |
SI एकक |
क्षेत्रफळ (Area) |
लांबी वेग |
m2 |
घनफळ (Volume |
लांबीचा घन |
m3 |
घनता (Density) |
वस्तुमान / आकारमान |
kg / m3 |
वेग (Velocity) |
एकक कालावधीत कापलेले अंतर |
m /s |
त्वरण (Acceleration) |
एकक कालावधीत वेगातील बदल |
m / s2 |
जोर (Force) |
mass times acceleration of object kg m /s2 |
m /s2 (= newtons N) |
दाब (Pressure) |
एकक क्षेत्रफळावर प्रयुक्त केलेले बल |
(Pascal, Pa) |
ऊर्जा (Engery |
एकक कालावधीत बलाचे विस्थापन |
kg m2 / s2 (Joule, J ) |
गती (Motion )
गतीची कल्पना निरीक्षक सापेक्ष असते. एखाद्या पदार्थाच्या स्थानात दुस-या पदार्थाच्या संदर्भाने सतत होत राहणा-या बदलाना चलन असे म्हणतात. तसेच गती म्हणजे वस्तुचा निरीक्षक सापेक्ष स्थान बदल होय. चलनाचे किंवा गतीचे तीन प्रकार पडतात. ते पुढिलप्रमाणे
१. स्थानांतरणीय गती (Transiation Motion) – या गती मध्ये वस्तूमधीलप्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होत असते. त्यामध्ये वस्तुचे चलन सरळ रेषेत होत असले तर रेखीय विस्थापन किंवा एकरेषीय विस्थापन म्हणतात. आणि जर वक्र होत असे ल तर वक्ररेषी विस्थापन म्हणतात. उदा - एकाच दिशेने जाणारी आगगाडी, रस्त्यावरून न वळता चालणारा मनुष्य इ.
२. परिवलन गती ( Rotational Motion ) – यामध्ये वस्तुमधील सर्व कण एकाच आसाभोवती परिवलन मार्गाने फिरत असतात. उदा- पृथ्वीचे परिवलन, कप्पी भोवरा, पंखा, पवनचक्की इ.
३. कंपन गती(Vibrational Motion ) – ठराविक कालामध्ये पदार्थामध्येपुनःपुन्हा होणारी एकाच प्रकारची हालचाल यालाच कंपनगती म्हणतात. उदा – लंबकाच्या घड्याळातील लंबकाची गती, शिवणयंत्रातील सुईची गती, तंतुवाद्यातील तार छेडली असता तारेत कंपनगती निर्माण होते. स्थायू किंवा द्रव पदार्थातील अणुरेणूंची गती
विस्थापन, चाल आणि वेग –
१. विस्थापन (Dispacement ) - एखाद्या वस्तुच्या स्थान बदलास विस्थापन असे म्हणतात. विस्थापन व अंतर यामध्ये वेगवेगळे फरक आहे. अंतर म्हणजे प्रवासात आक्रमिलेल्या मार्गाची प्रत्यक्ष लांबी आणि विस्थापन म्हणजे मूळ स्थानापासून अंतिम ठिकाणापर्यंतच्या मार्गाची एकरेषीय लांबी होय. मूळ स्थान व अंतिम स्थान यांना जोडणा-या किरणाची दिशा निश्चित होते. म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. परंतु अंतर ही अदिश राशी आहे. जर अंतराला दिशेचा उल्लेख केला तर मात्र ते सदिश म्हणावे लागेल. उदा – २०० मी अंतर पूर्व दिशेने. विस्थापन हे लांबीच्या एककामध्ये cm, m, km मध्ये मोजतात
२. चाल ( speed) - एकक कालावधीमध्ये वस्तूने आक्रमिलेल्या अंतरास त्या वस्तुची चाल असे म्हणतात
अंतर
चाल =
काल
-
MKS पध्दतीत अंतराचे एकक मीटर आणि कालाचे एकक सेकंद आहे. म्हणून MKS पध्दतीत चालीचे एकक मीटर / सेकंद (m /s) तर CGS पध्दतीत चालीचे एकक सेमी /सेकंद (cm /s) हे आहे
-
चाल मोजतांना आपण विस्थापनाची दिशा विचारात घेत नाही म्हणून चाल ही अदिश राशी आहे. सृष्टीत आढळणा-या काही चालींची अदमासे मूल्ये खालील सारणीत दिली आहे.
किटक व इतर सूक्ष्मजीव 152
बैलगाडी किंवा चालणारा माणूस 1 m /s
ध्वनी ( हवेतून जाताना ) 340 m / s
स्वनातीत जेट विमान 1000 m / s
पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण 104 m / s
इलेक्ट्रॉनचे अणुकेंद्रकाभोवती भ्रमण 106 m /s
०० C तापमानास हायड्रोजन वायूचे रेणू 1314 m /s
०० C तापमानास ऑक्सिजनचे रेणू 460 m / s
प्रकाश (हवेतून जाताना ) 3 X 108 m / s
चित्ता (सर्वात जलद धावणारे जनावर ) 29 m / s
ससाणा ( सर्वात जलद उडणारा पक्षी ) 78 m / s
बंदुकीची गोळी 860 m / s
प्रकाश लहरी व रेडिओ लहरी 3 X 105 m / s
-
सरासरी चाल – एखाद्या वस्तुने आक्रमिलेले एकूण अंतर, ते कापण्यासाठी लागलेला एकूण कालावधी यांच्या भागाकारास त्या वस्तुची चाल असे म्हणतात. आक्रमिलेले एकूण अंतर लागलेला एकूण काल
३. वेग – एखाद्या वस्तुच्या विस्थापनाचा दर म्हणजे वस्तुचा वेग होय.
विस्थापन काल
वेगाची एकके MKS पध्दतीत मीटर / सेकंद आणि CGS मध्ये सेमी / सेकंद ही आहेत.
-
त्वरण( Acceleraction ) – जेव्हा एखाद्या वस्तुचा वेग बदलत जातो, तेव्हा त्या वस्तुच्या गतीला त्वरणीत गती म्हणतात
१. स्टेशनजवळ आल्यानंतर आगगाडीचा वेग कमी होत जातो व गाडी सुटते तेव्हा वेग वाढत जातो.
२. वेगात जाणारी बस वळणे घेत असते.
व्याख्या – एकक कालात होणारा वेगातील बदल म्हणजे त्वरण होय. किंवा वेगाच्यपरिवर्तनाचा दर म्हणजे त्वरण होय.
-
त्वरण हे वेगातील बदलाशी संबधीत असते. वेग ही सदिश राशी असल्याने त्वरण ही सुध्दा सदिश राशी आहे.
न्यूटनचे गतिविषयक नियम-
१. अवकाशातील ग्रह व तारे यांची गती
२. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तुची गती
३. अणू, रेणू, इलेक्ट्रॉन या सारख्या सूक्ष्म कणांची गती यासारख्या विभिन्न गतीच्या स्पष्टीकरणासाठी गतिविषयक नियम सर्वप्रथम आयझॅक न्युटन (१६४२ – १७२७ AD ) याने आपल्या “Mathematical Principles of Natural Philosophy” (The Principle) या विख्यात ग्रंथात प्रसिध्द केले. न्यूटनच्या गतिविषयक नियमांची गणना भौतिक शास्त्रातील मुलभूत नियमांमध्ये केली जाते.
-
न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम – एखाद्या वस्तुवर कोणतेही असंतुलीत बल क्रिया करीत नसेल तर ती वस्तु अचल अवस्थेत असल्यास अचल अवस्थेत राहील अथवा सरळ रेषेत एक समान गतीत असल्यास एका समान गतीतच राहील.
जडत्व –
स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती प्रत्येक वस्तूत असते, त्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. उदा – पेला, कार्ड व नाणे यांचा प्रयोग
-
जडत्वाच्या व्याख्येवरून न्यूटनच्या पहिल्या नियमास जडत्वाचा नियम असेही म्हटले जाते.
-
न्यूटनच्या पहिल्या नियमास लागू होणारी उदाहरणे –
१. गुळगुळीत कॅरम बोर्डवरील कॅरम बोर्डची सोंगटी टिचकी मारल्यानंतर बोर्डवर सरकत राहते.
२. काचेच्या पृष्ठभागावर फिरणारी घर्षणहीन चकती
३. बस वेगात असताना अचानक ब्रेक दिल्यानंतर प्रवासी पुढे ढकलले जातात.
४. खेळाचे मैदान सपाट करण्यासाठी वापरला जाणारा रोलर प्रथम जोर लावून ओढावा लागतो.
-
न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम –
संयोग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. उदा – संवेगांसंबंधीची उदाहरणे ही दुस-या नियमाची उदाहरणे होत.
न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम –
क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात, कारण त्यांच्या दिशा परस्परविरूध्द असतात किंवा कोणत्याही एका वस्तुवर बलाची क्रिया होत असताना बल निर्माण करणा-या (दुस-या) वस्तुवर विरूध्द दिशेने तेवढ्याच परिमाणाचे बल प्रतिक्रिया करीत असते. (Every action has equal & opposite reaction)
-
न्यूटनच्या तिस-या नियमाची काही उदाहरणे –
१. जेव्हा चेंडूवर बॅटचा तडाखा बसतो त्यावेळी चेंडूवर क्रिया केलेल्या बलामुळे तो अत्यंत वेगाने फेकला जातो. त्याचवेळी बॅटवर तेवढ्याच परिमाणाचे बल विरूध्द दिशेने क्रिया करीत असल्याने बॅटची पुढे जाण्याची गती कमी होत असते.
२. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदुक जोराने मागे ढकलली जाते.
३. गोलंदाज बॉउंस बॉल टाकताना खेळपट्टीवर जोराने आपटून बॉल टाकतो त्यामुळे बॉलला इच्छित उसळी भेटते.
-
न्यूटनच्या तिस-या नियमाची व्यावहारिक उपयोगाची उदाहरणे –
१. अग्निबाणाचे प्रक्षेपण – अग्निबाणातील इंधनाचे जेव्हा ज्वलन होते, त्यावेळी रासायनिक क्रियेमुळे फार मोठे बल निर्माण होते. अग्निबाणातील द्रवरूप ऑक्सिजन अथवा ऑक्सिजन निर्माण करणा-या रसायनांचा साठा करावा लागतो. हे जळणारे वायू बारीक नळकांड्यांतून बाहेर फेकले जातात. परिणामी अग्निबाण उर्ध्व दिशेने ढकलला जातो.
२. जेट इंजिन – जेट इंजिनास सतत हवेचा पुरवठा आवश्यक असतो नाही तर पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी उपयोगी पडत नाही. त्याचप्रमाणे अति उंचीवरील विरळ हवेतही जेट विमान जाऊ शकत नाही.
-
गॅलिलिओ – या इटालियन शास्त्रज्ञाने प्रयोगाद्वारे सिध्द केले की, एखादी वस्तू एक समान वेगाने जात असेल तर त्या वस्तुवर क्रिया करणारे परिणामी बल शून्य असते. म्हणजेच एक समान वेग चालू असातो तेव्हा बलाची आवश्यकता नसते.
बल (Force )
-
न्यूटनच्या पहिल्या नियमावरून बलाची व्याख्या, अचल वस्तु गतिमान करण्यासाठी किंवा वस्तुची सरळ रेषेतील एक समान गती बदलण्यासाठी आवश्यक असणा-या भौतिक राशीस बल असे म्हणतात. बलाद्वारे आपण
१. गतिमान वस्तुत वेगाच्या परिमानात बदल घडवून आणू शकतो. किंवा
२. वेगाचे परिमाण तसेच राखून केवळ गतीची दिशा बदलू शकता किंवा
३. वेगाचे परिणाम व दिशा या दोहोंमध्ये बदल करू शकतो.
-
बल या राशीस परिणाम व दिशा असल्यामुळे बल ही सदिश राशी आहे.
-
बलाचे प्रकार –
निसर्गात आढळणारे बलाचे तीन गटांत वर्गीकरण केले आहे.
१. गुरूत्व बल – (Gravitational Force ) - पृथ्वी आपल्या पृष्ठभागावरील व सभोवतालच्या प्रत्येक वस्तुवर आकर्षण बल प्रयुक्त करते, या बलास पृथ्वीचे गुरुत्व बल असे म्हणतात. पृथ्वीवरील सर्व वस्तुच्या गती गुरुत्व बलाने प्रभावीत होतात. ग्रह, तारे, उपग्रह, कृत्रिम उपग्रह इत्यादी. सर्वांच्या गती गुरुत्वबलामुळे घडुन येतात.
२. विद्युत चुंबकीय बल (Electromanatic Force ) :- वस्तुमधील अणुंना व रेणुना एकत्रीत ठेवणार-या बलास विद्युत चुबंकीय बल असे म्हणतात. हे बल गुरुत्वबलापेक्षा कितीतरी पट मोठे असते. उदा. चुंबकाकडे लोखंडी टाचणी खेचली जाणे.
३. केंद्रीय बल ( Nuclear Force ) :- अणुच्या केंद्रकात असणा-या वेगवेगळ्या कणांना एकत्र ठेवणा-या बलास केंद्रकीय बल म्हणतात. गुरुत्व बल व विद्युत चुंबकीय बलहे दोन्ही केंद्रकीय बल खुप मोठे असते. या बलांच्या सापेक्ष तीव्रता पुढील प्रमाणे
बल सापेक्ष तीव्रता
गुरुत्व बल १
विद्युत चुंबकीय बल १०३८
केंद्रकीय बल १०४०
यावरुन असे सिध्द होते की, गुरुत्व बल हे सर्वात क्षीण असून न्यूक्लिय बल हे सर्वात प्रबल असते. गुरुत्व बल व विद्युत बल ही दीर्घ आहे.
-
संवेग (Momentum)- संवेग म्हणजे वस्तुमान व वेग यांचा गुणाकार होय. उदा. –
१) वेगाने जाणारा क्रिकेटच्या चेंडूपेक्षा टेनीसचा चेंडु सहज अडविता येतो.
२) एखाद्या लाकडी ठोकळ्यावर बंदूकीची गोळी झाडल्यास ती ठोकळ्यात घुसते. थोडक्यात वस्तुचे वस्तुमान व वेग या दोन्हीशी संबधित असलेल्या कोणत्यातरी भौतिक राशीवर आघाताची तीव्रता अवलंबून असते.
-
संवेग अक्षयतेचा नियम (Law of conservation of momentum);- कोणत्याही बाह्य बलाची क्रिया होत नसतांना, जेव्हा दोन किंवा अधिक वस्तु मध्ये टक्कर होत असते, तेव्हा त्या वस्तुंचा आघातापुर्वी एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतका असतो. उदा. - बंदुकीतुन गोळी उडविल्यानंतर गोळी प्रचंड वेगाने पुढे जाते याच वेळेला बंदुक कमी वेगाने मागे सरकते. CGS पध्दतीत बलाच्या एककास डाईन(Dyne) असे म्हणतात. १ Cm/s2वस्तुमानात १ त्वरण निर्माण करणा-या बलास १ डाईन बल असे म्हणतात. १न्युटन = १० ५ डाईन
-
बले |
बलाचा परिणाम |
१) यांत्रिक बल २) रेणू बल ३) चुंबकीय बल ४) विद्युत बल ५) गुरुत्वाकर्षण बल ६) घर्षण बल ७) न्युक्लीय बल ८) विद्युत चुंबकीय बल ९) गुरुत्व बल |
विहिरीतून रहाटाने पाणी काढणे पाण्याच्या थेंबात बल लोहकणांचे चुंबकाला चिकटणे कागदाच्या कपट्यांचे, केसांवर फिरवलेल्या कंगव्याने आकर्षण झाडावरुन खाली पडणारे फळ क्रिडांगणावर घरंगळत जाऊन चेंडूचे थांबणे अणुकेंद्रातील कणांना एकत्र ठेवणे अणु रेणू यांना एकत्र ठेवणे उपग्रहांची गती |
-
न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम (Newtons Laws of gravitiation);- एका पदार्थाने दुस-या पदार्थावर प्रयुक्त केलेले गुरुत्व बल हे त्या पदार्थाच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती व त्या पदार्था मधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती होत असतो.
-
दोन पदार्थाचे वस्तुमान m1 व m2 पदार्थातील अंतर D आकर्षण बल F या ठिकाणी G हा स्थिरांक असून त्यास गुरुत्व स्थिरांक (Gravitinal constant) म्हणतात. या स्थिरांकाचे मुल्य 6.67 X 10 -11 Nm2/kg2 (न्यूटन मीटर वर्ग प्रती किलोग्रॅम वर्ग)
-
गुरुत्वाकर्षणामुळे ध्रुव पृथ्वीभोवती फिरतो किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
घनता (Density)
पदार्थ |
घनता (Kg/m3) |
ग्रॅम/ सेंटि पदार्थ |
घनता(Kg/m3) |
ग्रॅम/सेंटि |
इरिडीयम प्लॅटिनम सोने शिसे चांदी तांबे पितळ लोखंड /पोलाद कथिल जस्त ओतीव लोखंड शुध्द पाणी मलई न काढलेले दुध अल्कहोल पेट्रोल |
२२४०० २२.४ २१५०० २१.५ १९३०० १९.३ ११३०० ११.३ १०५०० १०.५ ८९०० ८.९ ८५०० ८.५ ७८०० ७.८ ७३०० ७.३ ७१०० ७.१ ७००० ७.० १००० १.०० १०२८ १.०२८ ८०० ०.८ ७१० ०.७१ |
ऍल्युमिनिअम संगमरवर ग्रॅनाइट काच चिनीमाती मेण बर्फ सागाचे वाळलेल लाकूड पारा सल्फ्युरीक ऍसिड समुद्राचे पाणी मलई काढलेले दुध मशिनचे तेल इतर |
२७०० २७००० २६०० २५०० २३०० ९०० ९०० ४८० १३६०० १८०० १०३० १०३० ९०० ७३० |
२.७ २.७ २.६ २.५ २.३ ०.९ ०.९ ०.४८ १३.६ १.८ १.०३ १.०३२ ०.९ ०.७३ |
उर्जा (Energy)
-
एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.
-
MKS पध्दतीत ऊर्जा ज्युल या एककात मोजतात तर CGS पध्दतीत अर्ग हे ऊर्जेचे एकक होय. कार्या प्रमाणे ऊर्जा ही सुध्दा अदिश राशी आहे.
-
निसर्गामध्ये ऊर्जेची यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ऊष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, आण्विक ऊर्जा इ. विविध रुपे आढळतात.
-
यांत्रिक ऊर्जा दोन प्रकारात आढळून येते. १) गतिज ऊर्जा २) स्थितिज ऊर्जा
१) गतिज ऊर्जा (kinetic Enregy);-
गतिमान अवस्थेमुळे पदार्थात असणा-या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. उदा.- १) गतिमान मोटारीचे ब्रेक दाबले असता मोटार थोडी पुढे जाते. २) हातोड्याच्या साह्याने खिळा ठोकणे. ३) बंदुकीची गोळी गतिज ऊर्जे मुळे दुस-या वस्तुमध्ये घुसत असते. ४) वाहते पाणी इ. वस्तुमान (m) असणारा पदार्थ, (V)एक समान वेगाने गतिमान असल्यास त्याची गतिज ऊर्जा पुढील सूत्राने मिळते.
२) स्थितिज ऊर्जा (Potential Energy);-
एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे व त्या घटकांमधील अन्योन्य क्रियेमुळे त्या संस्थेत जी ऊर्जा सामावलेली असते, तिला त्या संस्थेची स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. स्थितिज ऊर्जेची काही उदाहरणे आहे ती पुढीलप्रमाणे-
१) घड्याळाची गुंडाळलेली स्प्रींगमध्ये स्थितिज ऊर्जा असते.
२) दोरी ताणलेले धनुष्यामध्ये स्थितिज ऊर्जा असते
३) बॉम्बमध्ये भरण्यात येणारे स्फोटके मिश्रणात रासायनिक स्थितिज ऊर्जा सामावलेली असते.
४) धरणातील पाण्याच्या प्रचंड साठ्यात स्थितिज ऊर्जा असते
स्थितिज ऊर्जा (P.E.) = mgh
कार्य आणि ऊर्जा यांचा संबंधः-
एक वस्तु जेव्हा दुस-या वस्तुवर कार्य करते त्यावेळी कार्य करणा-या वस्तुची ऊर्जाकमी होते ५ते आणि ज्या वस्तुवर कार्य होते त्या वस्तुला तेवढीच ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा कोणत्याही स्वरुपात असते. उदा.- धरणातील पाण्याच्या गतिज ऊर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. (कोयनानगर)
-
या विद्युत ऊर्जेचे रुपांतर गतिज ऊर्जेत होते. उदा.- विजेवर चालणारी आगगाडी, विजेवर चालणारे पंखे, कारखाण्यातील यांत्रे
-
विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत उदा.- विजेचा बल्ब, ट्युबलाईट इ.
-
विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत उदा.-विजेचा हिटर, इस्त्री, गिझर इ.
-
विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत उदा.- विद्युत घंटा, रेडिओ इ.
-
विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत उदा.- विद्युत विघटन, विद्युत विलेपन
-
औष्णिक विद्युत केंद्रात ऊष्णतेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
-
तारापुर येथे आण्विक विद्युत केंद्रात आण्विक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर केले जाते.
-
बॉम्बचा स्फोट होतो तेव्हा त्यामधील रासायनिक ऊर्जेचे उष्णता, प्रकाश, ध्वनी, यामध्ये रुपांतर होते.
ऊर्जा अक्षय्यतेचा नियम ( Law of conservation of energy );-
-
उर्जेची निर्मिती किंवा नाश होवू शकत नाही. एका प्रकारच्या उर्जेचे दुस-या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करता येते. तथापि, विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते.
शक्ती (Power )
शक्ती – कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात.
-
व्यवहारामध्ये शक्ती मोजण्यासाठी १ किलोवॅट (kw) या मोठ्या एककाचा उपयोग केला जातो. १ किलोवॅट = १००० वॅट = १००० ज्युल / सेकंद
-
CGS पध्दतीत शक्तीचे एकक अर्ग / सेकंद आहे. स्थापत्यशास्त्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती ( Horse Power ) या एककाचा वापर प्रचलित आहे. १ अश्वशक्ती = ७४६ वॅट
-
कार्य व ऊर्जा याप्रमाणे शक्ती सुध्दा अदिश राशी आहे. म्हणून शक्ती = बल X वेग (p = f v)
दाब (Pressure)
-
भौतिक शास्त्रात दाब ही संकल्पना द्रव व वायू या प्रवाही पदार्थाबाबत वापरण्यात आली आहे.
-
एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लंब दिशेने क्रिया करणा-या बलाच्या परिणामाला त्या पृष्ठ भागावरील दाब असे म्हणतात.
-
दाबामधील बदल दर्शविण्यासाठी दाबमापी (बॅरोमीटर ) हे एक साधे व सोपे उपकरण वापरले जाते.
-
द्रवातील कोणत्याही बिंदुवरील दाब त्या बिंदुच्या द्रवातील खोलीवर अवलंबून असतो.
दाबाच्या पारषणाचा पास्कलचा नियम –
-
बंदिस्त द्रवाला लावलेला दाब हा कमी न होता द्रवाच्या प्रत्येक भागावर सारखाच पारेषित होतो. यालाच पास्कलचा दाब पारेषणाचा नियम म्हणतात.
-
व्यवहारात या नियमांवरून द्रविक दाबयंत्र (Hydraulic press) व द्रविक ब्रेक्स (Hydraulic Breaks ) यांचे कार्य चालते.
वातावरण व त्याचा दाब
-
पृथ्वीच्या सभोवतालच्या हवेच्या आवरणाला पृथ्वीचे वातावरण असे म्हणतात. हवेला वजन असल्याने हवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब निर्माण करते. हा दाब म्हणजेच वातावरणाचा दाब होय.
वातावरणाचा दाब दर्शविणारी काही उदाहरणे –
१. शितपेये पिताना वापरल्या जाणा-या स्ट्रॉमध्ये द्रव खेचला जातो.
२. दौतीतून ड्रॉपरने शाई खेचली जाते.
३. पाण्याने काठोकाठ भरलेला पेला पुठ्ठा लावून उपडा केला तरी पाणी खाली पडत नाही.
पा-याचा हवा दाब मापी (Mercury Barometer ) –
-
वातावरणाचा दाब हा पा-याच्या स्तंभाच्या उंचीने दर्शविला जातो. समुद्रसपाटीवर वातावरणाचा दाब ७६ सेमी उंचीच्या पा-याच्या स्तंभाने दिलेल्या दाबाएवढा असतो. ०० C तापमानाला ७६ सेमी उंची असलेल्या पा-याच्या स्तंभाने दिलेला दाब म्हणजेच एक वातावरण दाब होय (g = 9.8 cm / s 2) . पा-याच्या स्तंभाची उंची h= 0.76 m
-
o० C तापमानास पा-याची घनता p=13595 kg / m3 म्हणून १ वातावरण दाद = hpg = 1.013X105 n/m2
-
पारा हा पाण्यापेक्षा १३.५९५ पट जड असल्याने पा-याच्या एवजी पाणी वापरल्यास एक वातावराण दाब मोजण्यासाठी ६.७६X १३.५९५ =१०.३३ मी एवढ्या उंचीचा जलस्तंभ लागेल
आर्किमिडीजचे तत्व
-
कोणताही पदार्थ कोणत्याही द्रवात अंशतः अथवा पुर्णतः बुडविला असता त्याचे वजन कमी होते. त्याच्या वजनात येणारी तुट ही त्याच्या द्रवव्याप्त भागाने उत्सारलेल्या द्रवाच्या वजनाएवढी असते.
-
पदार्थ द्रवात बुडविला असता द्रवाच्या दाबामुळे पदार्थावर क्रिया करणारे बल उर्ध्वगामी असते. या उर्ध्वगामी बलाला द्रवामुळे क्रिया करणारे प्लावकबल अथवा उत्प्रणोद म्हणतात. द्रवाच्या या गुणधर्माला प्लावकता म्हणतात. यावरून आर्किमिडीजचे तत्व खालीलप्रमाणे मांडतात.
-
कोणताही पदार्थ द्रवात अंशतः अथवा पुर्णतः बुडालेला असता तो, द्रव्यव्याप्त भागाने उत्सारलेल्या द्रवाच्या वजनाएवढ्या बलाने, वरच्या बाजूस प्लावित केला जातो.
-
आर्किमिडीजच्या तत्वानुसार अद्रावणीय व पाण्यापेक्षा हलक्या पदार्थाची घनता काढता येते.
-
पाण्यात द्रावणीय अशा स्थायू पदार्थाची घनता काढतांना पदार्थ ज्या द्रवात विरघळत नाही असा द्रव वापरावा लागतो.
तरणाचा नियम –
-
तरंगणा-या वस्तुचे वजन तिच्या द्रवव्याप्त भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते. यालाच तरणाचा नियम म्हणतात.
-
लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने लोखंडी तुकडा पाण्यात बुडतो. परंतु तोच लोखंडी तुकडा पा-यावर तरंगतो कारण पा-याची घनता लोखंडापेक्षा जास्त असते.
चुंबक
चुंबकाचे गुणधर्म –
१. लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते.
२. चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो.
३. दक्षिणेकडे स्थिर असणा-या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणा-या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात.
४. चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणा-या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात.
५. केवळ एकच ध्रुव असलेला चुंबक मिळविणे अशक्य आहे.
६. चुंबक तुटल्यास तुटल्याजागी विरूध्द ध्रुव निर्माण होतात.
७. चुंबकाच्या विजातयीय ध्रुवामध्ये आकर्षण असते तर सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. प्रतिकर्षण हीच चुंबकाची खरी कसोटी मनतात. चुंबकीय क्षेत्र- जेव्हा एखादी सुची चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने विचलित होत असेल तर चुंबकसुई उत्तर ध्रुव हा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते.
८. विद्युत वाहकातून प्रवाह जातांना चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ही गोष्ट प्रथम ओरस्टेड या शास्त्रज्ञाने दाखवून दिली. चुंबकीय क्षेत्राची दिशा विद्युत धारेच्या दिशेवर अवलंबून असते.
चुंबकाचे दोन प्रकार करता येतात.
१. स्थायी चुंबक – ज्या प्रवर्तित चुंबकात चुंबकीय गुणधर्म दिर्घकाळ टिकतात अशा चुंबकांना स्थायी चुंबक म्हणतात. हे चुंबक पोलादासारख्या पदार्थापासून तयार केलेले असतात. अलिकडे स्थायी चुंबक तयार करण्यासाठी अल्निको (Alnico) हा ऍल्युमिनिअम, निकेल, कोबाल्ट व लोखंड यांच्या मिश्रणापासून बनविलेला मिश्र धातू वापरला जातो.
२. स्थायी चुंबक – ज्यांचे चुंबकीय गुणधर्म अल्पकाळ टिकतात ज्यांना अस्थायी चुंबक म्हणतात. अस्थायी चुंबक मृदू लोखंडापासून तयार केले जाते.
३. विद्युत चुंबक – मऊ लोखंडी तुकड्यांभोवती तारेचे वेटोळे घालून त्यातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास लोखंडी तुकड्यात चुंबक तयार होते. अशा चुंबकास विद्युत चुंबक असे म्हणतात. याचा उपयोग विद्युतधारा निर्मित चुंबकीय क्षेत्रात वाढ करण्यास होतो.
-
चुंबकाचे उपयोग – विशिष्ट साधनात चुंबकाचा उपयोग केला जातो. उदा – विद्युत घंटा, खलाशाचे होकायंत्र, चुंबकीय सुरूंग, तारायंत्र दूरध्वनी आणि ध्वनीवर्धक आहे.
पृथ्वी एक चुंबक (Earth as megnet)-
पृथ्वी स्वःताच एका मोठ्या चुंबकाप्रमाणे वागते व या पृथ्वी चुंबकाचा दक्षिण ध्रुव भौगलिक उत्तर दिशेने आणि पृथ्वी चुंबकाला उत्तर ध्रुव भौगोलिक दक्षिण दिशेकडे असतो.
या परिणामामुळे चुंबकसूची केव्हाही दक्षिणोत्तर स्थिर होते.
आधन |
उपयोग |
विद्युत घंटा खलाश्याचे होकायंत्र चुंबकीय सुरुंग दूरध्वनीतील माउथपीस तारायंत्र विद्युत मोटार चुंबकीय क्रेन लाउडस्पीकर गॅल्व्होनोमीटर व्होल्टमीटर मल्टीमीटर |
विद्युतमंडळ जुळणे व भग्न होणी ही योजना दिशादर्शक म्हणून रणगाड्यांचा विध्वंस करण्याकरिता ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणे मोर्सच्या सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्यासाठी यंत्रना गती देणे लोखंडी यंत्रे व इतर अवजड वस्तुंची चढउतार करणे तीव्रता वाढवोलेल्या प्रवाहाचे ध्वनीमध्ये रुपांतर करुन मोठा आवाज प्रक्षेपीत करणे. विद्युत धारेचे अस्तित्व ओळखणे विद्युत विभवांतर मोजणे विद्युतधारा, विभवांतर, रोध आदि विजेच्या परिमाणांचे मापन करणे. |
-
चुंबकीय पदार्थ – जे पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता त्यांच्यात प्रवर्तनाने चुंबकीय गुणधर्म उतरवतात अशा सर्व पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा.- लोखंड, कोबाल्ट, पोलाद, निकेल यांसारखे पदार्थचुंबकीय पदार्थ होत.
-
क्युरी तापमान – ज्या तापमानाला चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होते त्या तापमानाला क्युरी तापमान असे म्हणतात.
धारा विद्युत (Current Electricity)
विद्युत धारा निर्मान होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१) त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा मुक्तप्रवाह चालू असला पाहीजे.
२) त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनांना विशिष्ट दिशेने प्रवाहीत होण्यासाठी विद्युत क्षेत्र असणे आवश्यक आहे.(PSI पुर्व परिक्षा २००९)
-
धारा विद्युत निर्मिती – रासयनिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, अणुकेंद्रकीय ऊर्जा, प्रकाश व ध्वनी ऊर्जा अह्सी अनेक रुपे आहेत. एका ऊर्जेचे दुस-या ऊर्जेत रुपांतर करता येते. ऊर्जेचे भिन्न रुपाचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करण्याच्या योजनांना विद्युतधारा निर्मितीची साधाने म्हणतात.
-
विद्युत घट
१) व्होल्टाचा साधा विद्युत घट, डॅनिअलचा विद्युत घट, लेक्लाशेचा विद्युत घट, निद्रव विद्युत घट आणि दुय्यम विद्युत घट या विद्युत घटांमध्ये रासायनिक ऊर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत होते.
२) विद्युत जनित्र (Electric Dynamo)- या साधनात यांत्रिक उर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत होते.
३) प्रकाश विद्युत घट (Photo Electric)- या घटात प्रकाश ऊर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत होते. उदा.- सौरघट
-
विद्युत जनित्र – यांत्रिक ऊर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत करणा-या साधनाला विद्युत जनित्र(Electric Dynamo) म्हणतात. विद्युत जनित्रात नरम लोखंडावर गुंडाळलेल्या तांब्याच्या तारेचे वेटोळे प्रबल चुंबकाच्या दोन ध्रुवांमध्ये फिरते ठेवण्यासाठी योजना असते. वेटोळे फिरतांना त्या्च्या तारेत विद्युत मंडळ पूर्ण होऊन प्रवर्तित धारा उत्पन्न होते.
-
विद्युत जनित्राचे वेटोळे फिरवण्यासाठी लागणारी यांत्रिक ऊर्जा भिन्न प्रकारे उपलब्ध करता येते.
१) उंचावर साठवलेल्या पाण्यातील गुरुत्वीय ऊर्जा वापरुन विद्युत निर्मिती केली जाते. अशा केंद्राला जलविद्युत केंद्र म्हणतात.(Hydro electric power)
२) औष्णिक विद्युत (Thermal plower) दगडी कोळसा व खनिज तेल यांच्या ज्वलनाने रासायनिक ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रुपांतर करतात. या प्रचंड औष्णीक ऊर्जेने पाण्याची वाफ करुन त्याद्वारे बाष्प चक्र(Steam turbines) गतिमान करतात. त्यापासुन विद्युत जनित्र गतिमान करुन विद्युतनिर्मिती होते. दगडी कोळशाच्या ज्वलनापासून निर्माण केलेल्या औष्णिक ऊर्जेचा वापर करुन विद्युत ऊर्जा निर्मान करणा-या विद्युत केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र (Thermal Power Station) म्हणतात.
३) अणु इंधनाचा उपयोग करुन विद्युत निर्मिती – अणूभट्टीत (Nuclear reactor) युरेनिअम या किरणोत्सारी मूलद्रव्याने विखंडनकरुन या अणुकेंद्रीय ऊर्जेपासुन प्रचंड उष्णता ऊर्जा मिळते. या उष्णतेने पाण्याची वाफ करुन तिच्या साह्याने विद्युत जनित्र गतिमान करुन विद्युत निर्मिती करतात. अणुकेंद्रकाची ऊर्जेचा वापर करुन विद्युत ऊर्जा निर्माण करणा-या केंद्राला न्युक्लीय विद्युत केंद्र (Nuclear Power Station) म्हणतात.
४) प्रकाश ऊर्जेच विद्युत ऊर्जेत रुपांतर–
सौर्घटाद्वारे ((Solar Cell))प्रकाश ऊर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. सौर विजेरीचा उपयोग कृत्रिम उपग्रहात व अवकाश याणांमध्ये विद्युतयंत्रना विद्युत पुरवठा करण्यासाठी करतात.
-
रासायनिक उर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतरन होतांना दिष्ठ विद्युत धारा ( डायरेक्ट करंट किंवा डी.सी निर्माण होते ही विद्युत धारा एकाच दिशेने वाहते.
-
यांत्रिक ऊर्जेचे विद्युत धारेत रुपांतरण होतांणा प्रत्यावर्ती विद्युत धारा(अल्टरनेटींग करंट किंवा ए.सी.) निर्माण होते. ही विद्युत धारा ठराविक कालावधीनंतर वहनाची दिशा बदलते. उदा – भारतात ए. सी. मुख्य तारांची वारंवारिता ५० हर्टझ प्रति सेकंद इतकी असते.
-
प्रत्यावर्ती होल्टेज मिळविण्यासाठी ट्रान्सफार्मरचा उपयोग करतात.
-
ए. सी. चे डी. सी. मध्ये रूपांतर करण्यासाठी रेक्टीफायर हे उपकरण वापरतात.
-
डी. सी. चे ए. सी. मध्ये रूपांतर करण्यासाठी ऑस्सीलेटर हे उपकरण वापरतात.
-
घरगुती वापराच्या विजेचे परिणामकार्क व्होल्टेज नेहमी २२० असते.
-
पृथ्वीवरील एकूण विभव नेहमी शून्य असतो.
उपकरकण - चुंबकीय परिणामाचा प्रकार उपकरण
दूरध्वनी - चुंबकीय परिणाम
विद्युत दिवा - प्रकाशिय परिणाम
पंखा - यांत्रिक परिणाम
गिझर - उष्णता जनक परिणाम
विद्युत संचायक - रासायनिक परिणाम
तापमापी –
-
पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. पा-याच्या तापमापीचा जास्त प्रमाणात उपयोग करतात.
-
पा-याचा गोठणांक = -३९ अंश सेल्सिअस आणि पा-याचा उत्कलनांक -३५७ अंश सेल्सिअस
-
पा-याचे प्रसरण एकसमान आहे. पारा उष्णतेचा सुवाहक आहे. पारा काचेस चिकटत नाही.
-
पारा अपारदर्शक असून चकाकणारा असल्याने काचेतून सहज दिसतो.
-
तापमानात थोडीशी जरी वाढ झाली तरी त्याचे प्रसरण लक्षात येण्यासारखे असते.
-
-३९ अंश सेल्सिअस पेक्षा तापमान मोजण्यासाठी अल्कोहोल तापमापीचा उपयोग करतात. अल्कोहोलचा गोठणांक -१७ अंश सेल्सिअस असतो.
-
-४० अंश सेल्सिअसला फॅरनहाईट व सेंटिग्रेड सारखेच असते.
-
३६७ अंश सेल्सिअसच्या वरचे तापमान मोजण्यासाठी (उच्च तापमान) विद्युत तापमापीचा उपयोग करतात.
-
सर्वसाधारण निरोगी माणसाचे तापमान सामान्यपणे ३६.९ अंश सेल्सिअस असते.
-
सेल्सिअसचे फॅरनहिट तापमानात रूपांतर 0C = 5 /9 (F – 32) या सुत्राने करतात.
प्रकाश (Light )
-
पूर्ण आंतरिक परावर्तन –
जेव्हा आपाती कोनाची किंमत क्रांतिक कोनापेक्षा जास्त असते तेव्हा अपवर्तन कोन त्या प्रमाणात वाढायला पाहिजे परंतु अपवर्तन कोनाचे माप ९० पेक्षा जास्त असणे शक्य नाही म्हणून या दिशेने येणा-या प्रकाशाचे त्याच माध्यमात परावर्तनाच्या नियमानुसार संपूर्णतः परावर्तन होते यास पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात. उदा- काजळीचा थर दिलेला धातूचा गोळा पाण्यात टाकला असतांना तो पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे चांदीसारखा चकचकीत दिसतो, हिरा चकाकणे व ऑप्टीकल फायबर.
-
आकाश निळे का दिसते ? – सूर्यकिरण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात त्यावेळी वातावरणातील अतिसूक्ष्म कणावर ते पडतात. आणि त्यांचे सर्व दिशांना विकिरण होते. सूर्यप्रकाशात सात रंग मिसळलेले आहेत. त्यातील निळ्या आणि जांभळ्या या रंगाचे इतर रंगापेक्षा मोठ्या प्रमाणावर विकिरण होते. पृथ्वी पृष्ठभागापर्यंत पोहचत असताना अधिक विकीरणामुळे जांभळा रंग नष्ट होतो व आपल्या डोक्यापर्यंत फक्त निळा रंग येऊन पोहोचतो त्यामुळे आकाश निळे दिसते.
-
सूर्योदय, सूर्यास्तावेळी आकाश तांबडे दिसते – सूर्योदय, सूर्यास्तावेळी सूर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यासाठी जास्त अंतर कापावे लागते म्हणजे ते जास्त वेळ वातावरणात राहतात. अशावेळी जांभळ्या व निळ्या रंगाचे अति विकिरण होते व ते नष्ट होतात. तांबडा रंग आपल्या डोक्यापर्यंत पोहोचतो.
-
मृगजळ – वाळवंटामध्ये मृगजळ दिसते. कडक उन्हाने जमिनीलगतच्या हवेचा थर तापतो. त्यामानाने हवेचा वरचा थर थंड व जाड असतो. प्रकाश किरण कमी अधिक विरल थरातून जातांना त्यांचे अपवर्तन होत राहते. एका विशिष्ट ठिकाणी हा कोन हवेच्या दोन थरांतील क्रांतिक कोनापेक्षा जास्त असल्यास किरणांचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन होते. त्यामुळे झाडाची उलटी प्रतिमा दिसते. उलट्या प्रतिमा फक्त पाण्यातच दिसतात. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी असल्याचा भास होतो. याला मृगजळ म्हणतात.
ध्वनी (Sound)
-
ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हे माध्यम स्थायू, द्रव किंवा वायूरुप असू शकेल
-
ध्वनीचे प्रसरण तरंगत्या रुपात होते. तरंगाचे दोन प्रकार पडतात.
१. अवतरंग (Transverse Waves )
२. अनुतरंग (Longitudinal Wawes )
अवतरंग – या प्रकारच्या तरंगातील माध्यमातील कणांची हालचाल तरंगाच्या प्रसारण दिशेशी काटकोन करते. अशा तरंगांना अवतरंग म्हणतात. यांचे वहन स्थायू पदार्थातून होते. उदा – तंतूवाद्य, सतार, गिटार, तंबोर
अनुतरंग – अनुतरंगात माध्यमातील कंप पावणा-या कणांची हालचाल तरंगाच्या प्रसरणाच्या दिशेशी समांतर दिशेने होते. यांचे वहन स्थायू, द्रव व वायू या तिघांतूनही होते. उदा – घंटा नाद .
-
अनुतरंगातील माध्यमातील स्तरांचे संपिडन आणि विरलन होऊन तरंगाचे प्रसारण होते.
-
ध्वनी उर्जेचे प्रसारण दोन्ही (अवतरंग व अनुतरंग) तरंगांनी होवू शकते.
-
हवेमध्ये ध्वनी उर्जेचे एका ठिकाणापासून दुस-या ठिकाणापर्यंत होणारे प्रसारण अनुतरंगात होते.
-
क्रमाने येणा-या कोणत्याही दोन शिखरांमधील किंवा क्रमाने येणा-या दोन दरीमधील अंतराला त्या तरंगाची तरंगलांबी (Wave length) म्हणतात
-
तरंगलांबी ג ( लॅमडा) या ग्रीक अक्षराने दर्शवितात
-
तरंगाचा आवर्ती काल T अक्षराने दाखवितात.
-
वस्तु एका सेकंदात जितकी कंपने किंवा दोलने करते त्या संख्येला त्या तरंगाची वारंवारता म्हणतात. तरंगाची वारंवारता (न्यु) या ग्रीक अक्षराने दर्शवितात. किलो हर्टझ मेगा हर्टझ
-
हर्टझ (Hz) हे वारंवारतेचे एकक आहे. 1k Hz = 1000Hz, 1MHz = 106
१. श्राव्य ध्वनी (Sonic Sound) – २० Hz ते २०००० Hz दरम्यान वारंवारता असलेले ध्वनीतरंग आपण एकू शकातो. अशा आवाजांना श्राव्य ध्वनी असे म्हणतात.
२. श्राव्यातील ध्वनी – (Ultra Sonic Sound) – २०००० Hz पेक्षा जास्त वारंवारता असणा-या आवाजांना श्राव्यातील ध्वनी म्हणतात. मानव श्राव्यातील ध्वनी एकू शकत नाही परंतु कुत्रा, मांजर, चिमणी वटवाघुळ, डॉल्फिन मासा श्राव्यातील ध्वनी ऐकू शकतात. वटवाघुळ एक लाख हर्टझ पर्यंतचा आवाज ऐकू शकतात. वटवाघुळ एक लाख हर्टझ पर्यंतचा आवाज ऐकू शकते.
३. अश्राव्य ध्वनी - (Infra Sonic Sound) – २५ हर्टझ पेक्षा कमी वारंवारता असणा-या ध्वनीला अश्राव्य ध्वनी म्हणतात.
-
भूकंपाच्या वेळी पृथ्वीच्या आतल्या गाभ्यात होणा-या लहरी या प्रकारच्या असतात.
-
ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात. (PSI पूर्व परीक्षा २००९)
-
मानवी श्रवण यंत्रणा साधारणपणे ८० डेसिबल पर्यंत एवढीच आहे. व त्यापुढील आवाज गोगांट ठरतो.
संभाषणासाठी - ६० डेसिबल
मोटारगाड्या - ७५ डेसिबल
मोटारसायकल - ८० ते ८५ डेसिबल
रेल्वे इंजिन - ९० ते ९५ डेसिबल
जेट विमान - १४० ते १५० डेसिबल
-
अग्निबाणाचा (रॉकेट) आवाज २० मैलापर्यंत ऐकू जातो. सामान्य माणूस १०५ डेसिबल तिव्रतेचा आवाज एक तासापेक्षा जास्त काळ सहन करू शकत नाही.
-
ध्वनी प्रदूषण – ध्वनी प्रदूषणामुळे आम्लपित्त, ऍसिडिटी, चिडचिडेपणा व भय हे आजार उदभवतात. ध्वनीच्या संपर्काने एकाग्रता कमी होते. डोके जड होते. ह्रदयाची स्पंदने वाढतात.
-
१९८५ मध्ये मुंबईत ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.
ध्वनीचा वेग –
-
ध्वनीचा हवेतील वेग ० अंश सेल्सिअस तापमानास ३३१m /s आहे.
ध्वनीचे परावर्तन (Reflection of sound)
-
प्रतिध्वनी (Echo) हे ध्वनीच्या परावर्तनाचे सर्वज्ञात उदाहरण आहे.
-
जेव्हा मुळ ध्वनी व परावर्तित ध्वनी स्वतंत्रपणे ऐकू येतात तेव्हा त्या ऐकू येणा-य परावर्तित ध्वनीला प्रतिध्वनी म्हणतात.
-
एखाद्या ध्वनीचा मनुष्याचा कानावर झालेला परिणाम फक्त १/१० सेकंद टिकून राहू शकतो.
-
त्यामुळे मूळ ध्वनी व त्याचा प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी त्यांच्यातील कमीत कमी काल १/१० सेकंद असला पाहिजे.
-
ध्वनीचा हवेतील सर्वसाधारणपणे वेग ३४० m/s आहे. यावरून ध्वनी १/१० सेकंदात १/१० X ३४० = ३४ मी जातो.
-
मूळ धनी व प्रतिध्वनी ऐकण्यासाठी कमीत कमी अंतर १७ मी. असावे.
-
प्रतिध्वनीच्या उपयोगाद्वारे वटवाघळे, डॉल्फिन अंधारात मार्गक्रमण करू शकतात.
-
प्रतिध्वनी या घटनेचा वापर SONAR (Sound Navigation and Ranging) पध्दतीत करतात. या तंत्राने पाण्याची खोली मोजता येते.
डॉप्लर परिणाम (Doppler Effect)
-
डॉप्लर परिणाम हे निरीक्षक व ध्वनी निर्माण करणारे स्त्रोत यांच्या सापेक्ष गतीमुळे ध्वनी लहरीमधील होणारा बदलाचा परिणाम असतो. डॉप्लर परिणामाचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण फ्लॅटफॉर्मवर उभे असतांना स्टेशनकडे वेगात येणा-या गाडीने शिट्टी वाजवली तर शिट्टीच्या ध्वनीचा स्तर वाढतो आणि ती स्टेशनपासून दूर जातांना ध्दनीचा स्तर कमी होऊ लागतो.
-
डॉप्लर परिणामांचा खगोलशास्त्रामध्ये उपयोग होतो. एखादा तारा पृथ्वीच्या जवळ येत आहे किंवा दूर जात आहे याचा शोध घेण्यासाठी हा सिध्दांत उपयोगी पडतो.
-
रडारमध्येही या डॉप्लर परिणामांचा उपयोग केला जातो.
प्रदुषण
प्रदुषण (Pollution)
-
प्रदुषण – वातावरणात होणारा नैसर्गिक आणी कृत्रिम बदलांचा खुद्द निसर्गावर होणारा परिणाम म्हणजे प्रदुषण होय. थोडक्यात ज्या घटकांनी निसर्ग व वातावरण दूषित केले जाते, त्यास प्रदुषण असे म्हणतात. पर्यावरणात निर्माण होणा-या किंवा केल्या जाणा-या अपायकारक पदार्थांना दुषितके असे म्हणतात.
-
काही वेळा प्रदुषण (Point Source Pollution) असे म्हटले जाते.
-
मोठ्या क्षेत्रातील प्रदुषणाला विस्तारीत प्रदुषण (Area Wide Pollution) असे म्हणतात.
-
प्रदुषन ही एक जागतिक समस्या आहे.
प्रदुषणाचे प्रकार
१. हवा प्रदूषण – (Air Pollution)
२. जल प्रदूषण – (Water Pollution)
३. ध्वनी प्रदूषण – (Sound Pollution )
१. हवा प्रदूषण ( Air pollution) –
सामान्यपणे हवा प्रदूषणास कारणीभूत असणारे घटक – कार्बन मोनॉक्साइड, मर्क्युरी, पाण्याची वाफ इ.
-
विटा भाजण्यासाठी भट्टी, मोटारीचा धूर, खत कारखाने, रासायनिक तेल शुध्दिकरण प्रकल्प इत्यादी कारखान्यांतून हवेत प्रदूषके मिसळली जातात. हायड्रोजन, क्लोरीन, प्लुओराईड हे सुध्दा हवा दुषित करतात.
-
भारतातील सर्वाधिक प्रदुषित शहर – कानपुर, तर सर्वात कमी प्रदुषित शहर – चेन्नई
१. कार्बन मोनॉक्साइड – या वायूची कार्बनी पदार्थाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्मिती होते. उदा – स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणारा धूर, रंगहीन आणि गंधहीन असतो. रक्तातेल हिमोग्लोबीनशी तात्काल संयोग पावून रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे चक्कर येणे, तिव्र डोकेदुखी, बुध्दी भ्रम व मृत्यू होतो.
२. सूक्ष्म कण – जीवाक्ष्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बनचे अतिसूक्ष्म (०.००२ हून कमी व्यासाचे) कण हवेत तरंगतात. डिझेलवर चालणारी वाहने व ट्रक्स इतर वाहनापेक्षा ३० ते १०० पट कार्बन कण सोडतात. त्यामुळे श्वसनाचे रोग, फुप्फुसाचा कर्करोग होतो.
३. ऍस्बेस्टॉस – ऍस्बेस्टॉसच्या खाणीतील कामगारांना यामुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो, सिंगभूम येथे या रोगाने अनेक लोक पिडित आहेत.
४. सिलीकॉसीस – सिलीकाचे सूक्ष्म कण फुप्फुसात साठल्याने सिलीकॉसीस हा कर्करोग होतो. खाण कामगार व काच कारखन्यातील मजूरांना या रोगाची बाधा होते.
५. सल्फरडायओक्साइड – हे गंधक व ऑक्सिजनचे संयुग आहे. हा वायू हुंगल्यावर श्वसन इंद्रियांचा दाह होतो. या वायूची पाणी, ऑक्सिजन आणि हवेतील इतर खनिज पदार्थांबरोबर प्रक्रिया होऊन गंधकयुक्त आम्ल तयार होते. गंधकयुक्त हवेत वनस्पतींची वाढ खुंटते, पोलादाची २ ते ४ पट झीज होते, इमारती व दगड झिजतात. यामुळे श्वसनाचे व फुप्फुसाचे रोग होतात.
६. नायट्रोजनची ऑक्साइड्स – स्वयंचलित वाहनांच्या इंजिनातून धूर, धूरके इत्यादी आढळते. नायट्रोजनची इतर संयुगाबरोबर प्रक्रिया होवून प्रकाशिय रासायनिक धूर, धूके(फोटो केमिकल स्मॉग) तयार होते. जेव्हा स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणा-या धुरातील दोन दुषितके नायट्रोजन ऑक्साइड व हायड्रोकार्बन सूर्यप्रकाशात एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा नायट्रोजन ऑक्साइड No2 व ओझोन O3 व पॅन PAN पॅराक्झिलॅसिटीक नायट्रेट हे संयुग तयार होते व पिवळसर तपकिरी रंगाचे विरळ धुक्यासारखे आवरण तयार होते यालाच प्रकाशिय रासायनिक धूर, धूके असे म्हणतात.
-
PAN – याचा वनस्पतीवर परिणाम होतो. झाडांची पाने पांढरट होतात वनस्पतींची वाढ खुंटते.
-
आम्ल पर्जन्य – सल्फर डायऑक्साइड (So2 ) व नायट्रोजनचे ऑक्साइड्स यांची वातावरणातील पाण्याशी अभिक्रिया होवून गंधक आम्ले (H2So4 ) व नायट्रिक आम्ल ( HNO3) तयार होते. (आम्लयुक्त पर्जन्याची आम्लता PH 3.0 to 5.6 ) त्याचप्रमाणे कार्बनडाय ऑक्साइड पाणयात मिसळून सौम्य कार्बनिक आम्ल तयार होते. अशा पावसाची PH 5.6 असते. आम्ल पर्जन्यामुळे जंगले उजाड होतात. Mg, ca क्षारांसारखे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषणद्रव्ये वाहून जातात. सरोवरातील जीवन नष्ट होते. ऍल्युमिनिअमची द्रवता वाढते. ऍल्युमिनिअमचा माशांच्या कल्ल्यांवर विपरित परिणाम होवून ते गुदमरून मरतात.
-
मथुरेच्या तेल शुध्दीकरण प्रकल्पामुळे ताजमहलचे संगमरवर पिवळे पडत चालले आहे.
-
हरितगृह परिणाम (ग्रीन हाऊस इफेक्ट) – जमिन व पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात ज्यामुळे वाढ होते त्याला हरितगृह परिणाम असे म्हणतात. कार्बनडायऑक्साइडमुळे उष्णता शोष्ली जाऊन पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १९५८ पासून आजपर्यंत उष्णतेत ६८% वाढ झाली आहे.
-
हरितगृह वायूंचा गट – कार्बन डायऑक्साइड, क्लोरो फ्ल्युरोकार्बन ( CFC ) नायट्रोजन ऑक्साइड, मिथेन, हायड्रोक्लोरोफ्लोरो कार्बन, ओझोन. इ.
-
स्मॉग- शहरातील हवा प्रदुषण ( Smog) प्रकारचे असते. हे घातक रासायनिक धुलीकणांनी बनलेले असते.
१९५२ मध्ये लंडनमध्ये धूर व धूरके यांचा संयोग होऊन (स्मॉग) निर्माण झाले. त्यात कार्बनचे कण व सल्फर डायऑक्साइड यांचा धुक्यातील पाण्याच्या कणांशी संयोग होऊन गंधकाम्लाचे थेंब तयार झाले. कार्बनच्या कणांबरोबर ते श्वासाबरोबर फुप्फुसात जाऊन अनेक लोक मृत्यूमुखी पडले.
-
D.D. D. फवा-याने त्याचे मातीत विघटन न होता १५ वर्षे ते तसेच राहते त्यामुळे उपयुक्त जीवाणूचा नाश होतो. पक्षांच्या पुररूत्पादनावर परिणाम होतो. अंडी ठिसूळ होतात.
-
भोपाळ दुर्घटना – युनियन कार्बाईड या कंपनीत ३ डिसे. १९८४ ला मिथिल आयसोसायनेट ( MIC ) ची गळती होऊन ३२०० लोकांचा मृत्यू झाला . अनेक लोक विकलांग झाले
-
ऍस्बेस्टॉस व सिमेंट कारखान्यात काम करणा-यांना अस्थमा होण्याचे प्रमाण जास्त असते.
-
हवा प्रदूषणाने मानसिक दौर्बल्य, निरूत्साह, मरगळणे, रक्तपेशीवर विपरीत परिणाम या समस्या उदभवतात.
-
अणु स्फोटामुळे हवेत किरणोत्सारी धूळींचे प्रदूषण होते.
-
चर्नोबिल दुर्घटना – (युक्रेन) २६ एप्रिल १९८६ यातील किरणोत्सर्जन युरोपपर्यंत झाले होते. त्यात ३१ जणांचा मृत्यू झाला.
-
आगपेट्यांच्या कारखान्यात काम करणा-या कामगारांना फॉसिजा (हनुवटी वकडी होणे ) हा रोग होतो.
-
प्लूटोनियम २३९ – २ लाख वर्ष्यापर्यंत किरणोत्सर्जन करतो.
-
ओझोन- आढळ – वातावरणाच्या स्थितांबर थरात समुद्रसपाटीपासून १६ ते २३ कि. मी. दरम्यान आढळतो.
-
सूर्यापासून निघालेले अल्ट्राव्हायलेट किरणे शोषली जाऊन पृथ्वीला वाचविण्याच्या कार्यामुळे ओझोन वायूच्या थरास पृथ्वीचे संरक्षण कवच असे म्हणतात.
-
ओझोनच्या श्वसनाने छाती दुखी, खोकला, घशाचा दाह, श्वास कोंडणे, डोळे जळजळ , सर्दी, न्युमोनिया, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इ. परिणाम होतात.
ओझोनचा क्षय –
१. क्लोरो फ्युरो कार्बन (CFC)
२. हॅलोजन
३. नायट्रोजन ऑक्साइड
-
१९३० मध्ये शास्त्रज्ञांनी नायट्रोजन ऑक्साइडप्रमाणे क्लोरीन अणुमुळे ओझोनचा क्षय होतो हे सिध्द केले.
क्लोरो-फ्युरो कार्बन संयुगे वातानुकुलीत यंत्रणेत द्रव्य स्वरूपात, उत्साहवर्धक फवा-यात, कॉस्मेटिक मध्ये औद्योगिक द्रावण म्हणून वापरतात. CFC चा एक अणू १ लाख ओझोन कण नष्ट करतो. ओझोनचा थर नष्ट झाल्याने पृथ्वीवर येणा-या अतिनिल किरणांचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास त्वचेचे कर्करोग, पिकांचे नुकसान, ऑक्सिजन चक्रात व्यत्यय, हवामानात विकृत बदल इ. दुष्परिणाम होतात.
-
ओझोन विवर – १०८२ साली अंटार्टिका खंडावर ओझोन थरास मोठे भगदाड पडल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. १९८७ च्या मॅट्रिअल कराराने व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोनचा –हास थांबविण्याचे कार्य सुरू झाले आहे.
-
हवा प्रदूषण ओळखण्यासाठी वापरतात – लायकेन (दगडफुल)
-
जल प्रदूषन ओळखण्यासाठी वापरतात – जलकुंभी
-
अतिजास्त प्रदूषण क्षमता असणारे वायू – NO2, CO2, SO2
२)जल प्रदूषण (Water Pollution) –
जल प्रदूषण हे हवेतील प्रदूषणाइतकीच गंभीर समस्या आहे.
-
जल प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक – नायट्रोजन, फॉस्फरस, पारा, आर्सेनिक, शिसे, झिंस, ऍल्युमिनिअम इ. रासायनिक पदार्थ कारखान्याच्या सांडपाण्यातून नैसर्गिक जलाशयात सोडले जातात.
-
जहाजांमुळे नद्यात व समुद्रात डिझेल, वंगण सांडते किंवा जहाजांना अपघात होऊन पाण्यावर कित्येक मैल तेलाचा तवंग पसरतो. त्यामुळे त्या पाण्यातील जलचरांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो व परिणामी ते मरतात.
-
काही कारखान्यातून उष्ण पाणी जलाशयात सोडले जाते त्यामुळेही प्रदूषण होते.
-
शहरातील जलाशयांत मोठ्या प्रमाणावर मलमूत्रांचे सांडपाणी सोडले जाते.
-
खतांचा अतिप्रमाणात वापर केल्याने भूगर्भातील पाणी दुषीत होते.
-
डिटर्जंट मधील अनेक घटक पाण्यात मिसळत नाही त्यामुळे जल जलप्रदुषण होत.
-
जमिनीत खड्डे खोदुन त्यात दूषित पाणी सोडल्याने हळह्ळू आजुबाजुची सर्व जमिन नापिक होते.
-
जहांजांना असलेल्या रंगामुळेही पाणी प्रदुषण होते.
-
पाण्यात प्रति लिटर ०.१ मिलीग्राम एवढ्या प्रमाणात जरी तांब्याचे प्रमाण वाढले असले तरी पाणी विषारी होते.
-
फोटोग्राफी, चिनी मातीची भांडी, चिनी मातीच्या अन्य उपयोगी वस्तु बनवणा-या कारखाण्यात कॅडिमियमचा वापर केला असतो. कॅडिमियम मिश्रीत पाणी अत्यंत विषारी असते.
-
शिसे मिसळलेले पाणी प्यायल्याने मळमळणे, भुक मीदावणे, डोके जड होणे इत्यादी प्रकार उदभवतात.
-
पारा पाण्याद्वारे पोटात गेल्याने कर्करोग होतो.
-
दुषित पाण्यामुळे पटकी व काविळ यांसारखे रोग होतात.
-
पाण्यात ३mg पेक्षा टाकावू पदार्थ असल्यास पाणी प्रदूषित मानले जाते. -WHO -नायट्रेट 45 gngपेक्षा कमी असावे.
-
दर लिटर पाण्यासाठी आवश्यक ऑक्सीजनचे प्रमाण -4 mg.
-
फॉस्फोरस व नायट्रेत पाण्यात सतत सोडल्याने सरोवरातील प्राणी जीवन नष्ट होते. उदा –अमेरीकेतील एरि सरोवर
-
१९५० मधील मिनिमाटा उपसागरात मिथाईल कर्क्युरीचे प्रदूषण झाल्याने जीभ, ओठ बधिर होंणे, स्नायुंवर ताबा सुटणे इ. दूष्परीणाम दिसुन येतात.
-
शैवालाची बहूपोषणाची समस्या वाहत्या पाण्याशी संबधीत नसून फक्त तलाव सरोवर अशा स्थिर जलाशी संबधीत आहे. जल प्रदूषणात आघाडीवर असणारे शहर – कोल्हापूर, कानपूर
-
ग्रीन पोल्युशन – पाण्यातील शेवाळाची वाढ होते.
-
बॉयोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD);- मध्ये पाण्यात जैव –हास योग्य सेंद्रीय द्रव किती आहे त्यावरुन पाण्याची शुध्दता कळते यानुसार १) उत्तम पाणी – १ ते २ मिलिग्राम / लिटर २) मध्यम पाणी – ३ ते५ मिली लिटर ३) साधारण प्रदुषित पाणी – ६ते ९ मिलीग्राम /लिटर ४) खुप प्रदूषित पाणी – १० पेक्षा जास्त मिलीग्राम लिटर् पेक्षा जास्त.
ध्वनी प्रदूषण :-
-
आवाजाची तीव्रता ठराविक मर्यादे पलिकडे गेली म्हणजे तो आवाज नकोसा होतो त्यालाच ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. ध्वनी प्रदूषण ही पूर्णपणे मानव निर्मीतीस समस्या आहे.
-
ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी अलेक्झांडर बेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ डेसिबल हे युनिट प्रचलित आहे.
-
केवळ एकू येण्याजोग्या कमीत कमी आवाज म्हणजे( नाडीचे ठोके) १० डेसिबल असे गृहीत धरुन त्या नुसार आवाजाची तीव्रता ठरविली जाते.
-
साधारणपणे ५० ते ६० डेसिबल पर्यंतचा आवाज हा सुसह्य असतो. ८० डेसिबल नंतरचा आवाज मानवास असह्य होत जातो तर १२० डेसिबल नंतरचा आवाज शरीरास हानीकारक ठरतो.
शहरी भागात लोकांचा गोंगाट वाहनाचा आवाज, कारखान्यांचा आवाज ह्यामुळे ध्वनीची तीव्रता ८० ते ८५ डेसिबल इतकी नेहमीच असते.
-
साधारण माणूस १०५ डेसीबल ध्वनी १ तासापेक्षा जास्त एकू शकत नाही.
सामान्य संभाषण कारखाना जेट विमान ग्रंथालय निरव शांतता |
६० डेसिबल ८५ डेसिबल १४० ते १४५ ४० डेसिबल २० डेसिबल |
रेडिओ मोटार गाड्या डेसि. मोटार सायकल ट्र्क, ट्रॅक्टर |
६० डेसिबल ७५ डेसिबल ८० ते ८५ डेसि. ८० डेसिबल |
-
दुष्परिणाम – रक्तदाब वाढ, ऍसिडीटी (आम्लपित्त), भय, चिडचिडेपणा, डोके जड होणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, गर्भावर परिणाम, रक्तपेशीवर आघात होणे इ.
-
मुंबईत ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी १९८५ साली एक समिती नेमली गेली.
-
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वात स्वस्त आणि जास्त योग्य उपाय – लोकांमध्ये प्रदुषणाविरोधी जागृती निर्माण करणे.
-
प्रदूषण होणार नाही किंवा पर्यावरणाबरोबर अनुकूल उत्पादनांवर लावले जाणारे लेबल – इको मार्क (१९९१ पासून )
पर्यावरण प्रदूषण नियंत्रण
-
संपूर्ण भारतात शिसे विरहीत पेट्रोल विकण्यास सुरूवात – १ फेब्रु, २०००
-
०.२५% सल्फरयुक्त पेट्रोल मिळण्यास सुरूवात – जाने २०००
-
पेट्रोल व डिझेलवर चालणा-या सर्व चारचाकी वाहनांना १ जून १९९९ च्या युरो – १ उत्सर्जन मानक च्या समक्षक / समायुक्त लागू केलेले नियम, इंडिया स्ट्रेज – १ सर्व भारतात लागू – १ एप्रिल २०००
-
युरो – २ चे समतुल्य मानक भारत स्ट्रेज -२ भारतात लागू – १ एप्रिल २००५
-
युरो -३ ची सुसंगत निकष चार चाकी गाड्यांबाबत भारत स्ट्रेज -३ ११ शहरात लागू -१ एप्रिल २००५
-
चार महानगरात शिसे विरहित पेट्रोल मिळते – १ एप्रिल १९९५
-
दिल्लीत २ T ऑइल बंदी – ३१ डिसे. १९९८
-
दिल्लीत शिसेरहित पेट्रोल सुरू – १ सप्टेंबर १९९८, संपूर्ण भारतभर सुरू – १ फेब्रु २०००
-
मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे उद्योगांची यादी – १७
-
केंद्रीय प्रदूषण बोर्ड व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार महाराष्ट्रातील गंभीर प्रदूषणाचे ठिकाण – चेंबूर
-
धोकादायक टाकाऊ पदार्थ (रसायने इ. ) संबंधी संयुक्त राष्ट्राची पर्यावरण संरक्षण करार – बासेल (स्वित्झरलँड) सन १९८९, सदस्य देश – भारतासह १२६ देश
-
धोकादायक टाकाऊ पदार्थ उत्पादन किंवा साठवण किंवा आयात संबंधी नियम (१९८९) त्यामध्ये सुधारणा – १९९४ तसेच त्याच्या अधिसुचना – २० जाने २००० पासून अंमलबजावणी सुरू.
-
राष्ट्रीय पडिक जमिन महामंडळ – १९८५
-
PVC चा शोध लावणारी जगातील सर्वात मोठी किटकनाशक उत्पादक कंपनी – मोन्सेटो
-
केंद्रीय गंगा शुध्दीकरण प्रकल्प – पहिला टप्पा – १९८५ ते ३१ मार्च २०००
-
राष्ट्रीय तलाव संरक्षण योजनेअंतर्गत तीन तलावांचे प्रस्ताव स्विकारले आहेत.
१. पवई (महाराष्ट्र)
२. उटी
३. कोडाईकॅनॉल
४. ग्रीन हाऊस गॅस कमीत कमी करून १९९० च्या पातळीत आणण्याचे उदिष्ट २००८ ते २०१२ पर्यंत गाठणे
क्योटो प्रोटोकॉल करार – १९९७, जपान
-
क्योटो प्रोटोकॉल कराराची अंमलबजावणी सुरू झाली – १६ फेब्रु २००५.
-
डिसेंबर २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाने क्योटो करारावर सही केल्याने हा करार मान्य करणा-या देशाची संख्या झाली – १७६
-
जी. बी. पंत हिमालय पर्यावरण व विकास संस्था – अल्मोडा १९८८ (उत्तरांचल)
-
राष्ट्रीय वनरोपन आणि परिस्थिती विकास बोर्डाची स्थापना – १९९२
-
इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार – १९८६
-
१ लाखाचा इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार – १९८७
-
ओझोन नष्ट करणा-या पदार्थावर नियंत्रण करण्यासाठी हिवेन्ना विएन्ना करार – १९८५
-
केंद्रीय मृदा संरक्षण बोर्ड – १९६२
-
D.D.T च्या वापरावर निर्बंध घालण्यात आले. – २६ मे १९८९
-
संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरणविषयक पहिली परिषद – स्टॉकहोम (स्विडन) (१९७२)
-
नॅशनल इको. डेव्हलपमेंट बोर्ड – १९८१
-
प्रदूषणविषयक बाबींची दखल घेते- केंद्रीय जल प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण बोर्ड
-
महाराष्ट्र पर्यावरण विकास संचनालय – १९६६
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ – ऑक्टोबर (१९६६)
-
भारतीय पर्यावरण खाते – १ नोव्हे. १९८०
-
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना – १९७४
-
पर्यावरण व वन मंत्रालय – ४ जाने. १९८५ हे मंत्रालय पुढील कायदे राबविते
-
वन्यजीव संरक्षण कायदा – १९७२
-
केंद्रीय जलप्रदूषण नियंत्रण कायदा – १९७४ (The Water Prevention & Control Of Pollution )
-
द वॉटर सेस ऍक्ट – १९७७
-
जंगले संवर्धन कायदा – १९८१
-
वायू प्रदूषण नियंत्रण कायदा – १९८१ सुधारीत – १९८७ – The air pollution & control of pollution act.
-
पर्यावरण संरक्षण कायदा – १९ ऑक्टो. १९८६ नोव्हे.
-
धोकादायक टाकाऊ पदार्थ विल्हेवाट कायदा – १९८९
-
The public Liability Act – १९९१
-
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – NEERI नागपूर
-
राष्ट्रीय पर्यावरण धोरण – २००६
-
महाराष्ट्र – महाराष्ट्राचे प्रदूषण नियंत्रण आणि संरक्षण यासाठी नियंत्रण मंडळ – १९७०
-
१९९२ ला पहिली वसुंधरा परिषद भरविण्यात आली. – रिओ दी जानिरो ( ब्राझिल) (विषय अजेंडा २१)
-
२००२ मध्ये वसुंधरा परिषद – जोहान्सबर्ग ( द. आफ्रिका )
-
परिषदेचे बोधवाक्य – वर्ल्ड समेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (WSSD)
विज्ञान व तंत्रज्ञान प्रगती
विज्ञान तंत्रज्ञान
-
आजचे युग आधुनिक युग म्हणून ओळखले जाते.
-
विश्वाचे रहस्य जाणण्याचे साधन म्हणून एके काळी विज्ञानाला मोल होते. तंत्रविद्येच्या अदभूत पराक्रमामुळे विश्व बदलण्याची युक्ती सांगणारे म्हणून आज विज्ञानाची किंमत केली जाते. – बर्ट्राड रसेल
१. |
१९ वे शतक |
विद्युत युग |
२. |
२० वे शतक |
अणुयुग |
३. |
६ ते ७ वे दशक |
अवकाश युग |
४. |
१९७० ते ८० |
इलेक्ट्रॉनिक्स |
५. |
१९८० ते ९० |
संगणक |
६. |
१९९० ते २००० |
जैविक अभियांत्रिकी |
जैविक अभियांत्रिकी (Genetic Engineering )
-
जैविक तंत्रज्ञानाच्या वापराने एखाद्या वस्तूच्या मुळ स्वरूपाहून भिन्न स्वरूपाचे असलेली नवीन वस्तू तयार करता येते. उदा – दुधापासून दही, पनिर, चीज इ.
-
व्याख्या- सूक्ष्म जीवाणूंचा औद्योगिक, कृषी व तत्सम क्षेत्रातील संशोधनात वापर करता येणा-या तंत्रज्ञानाचा शोध म्हणजे जैविक अभियांत्रिकी (Genetic Engineering ) होय.
-
जैविक अभियांत्रिकेचे मुलभूत गृहीत तत्व
डी.एन.ए.
-
DNA रेणूतून नियंत्रण ठेवणे, त्यांना योग्य प्रकारे हाताळणे आणि उपयुक्त कामाकरिता वापर करणे.
-
DNA च्या रासायनिक रचनेत प्रोटीन संयोगीकरणास (Protin Synthesisc) अतिशय महत्व असते.
जैविक अभियांत्रिकेची उपयुक्तता –
१. मानवी शरीराच्या कोणत्याही त्रुटीची कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या प्रोटीन्स, विटीमिन्स इत्यादीद्वारे भरपाई जैव अभियांत्रिकी मदतीने करता येते.
२. तसेच जेनेटिकली मॉडीफाईड पिके बी. टी. कॉटन तयार करता येतात.
३. वनस्पती किंवा प्राण्याच्या दोन जातीमध्ये संकर घडवून आणून रोग प्रतिकारक व कमी दिवसात तयार होणा-या जाती निर्माण करता येतात.
४. जैविक खते तयार करणे उदा - -हायझोबियम, अझोला इ.
५. इन्शुलिन सारखी दुर्मिळ परंतु जीवशास्त्रीयदृष्ट्या महत्वाची प्रोटीन्स जी नैसर्गिकरित्या सहज उपलब्ध नाहीत. ती जैविक अभियांत्रिकी तत्वाने उत्पादीत करता येतात.
६. ऊती संवर्धनाने चांगली रूपे मिळविता येतात.
-
DNA च्या ध्याग्यातील वलयांना प्राकल रेणू म्हणतात. हे प्राकल रेणू पेशीतून बाहेर काढण्याचे आणि त्यावर विजातीय DNA चे आरोपण करण्याचे तंत्र १९७९ साली पाऊल बर्ग या शास्त्रज्ञाने विकसित केले. या महत्वपूर्ण शोधाबद्दल बर्ग यांना १९८० चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
-
मानवी शरीरात ओळख पटलेले अमिनो ऍसिड – २४. हे ऍसिड शरिरात १०,००० वेगवेगळ्या प्रोटीन्सची निर्मिती करतात. या प्रोटीन्सची कृत्रिमरित्या पूर्तता करता येते. उदा – इन्शुलिन
-
या तंत्राने प्लास्टिक खाणा-या जंतूचा शोध लावला आहे. त्यांना बग (Bug) असे म्हणतात.
-
कृषी जैविक तंत्रज्ञान मंडळ – १९८२
-
जैविक तंत्रज्ञान स्वतंत्र खाते – फेब्रु १९८६
-
अतिप्राचीन जैविक तंत्रज्ञाज म्हणजेच आंबविण्याची प्रक्रिया होय.
-
महाराष्ट्रातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
-
जैव तंत्रज्ञान विभागातर्फे जैवतंत्र शहर म्हणून विकसित केले जात आहे. – लखनौ.
क्लोनिंग (Cloning)
-
अनैसर्गिक पध्दतीने जीवनिर्मिती या तंत्राने केली जाते.
-
कोणत्याही जीवाचे प्रतीएरुप बनविने म्हणजे क्लोनिंग होय. नविन उत्पादीत क्लोन हे मुळ जीवाशी शारिरीक आणि वांशिक बाबतीत साधर्म्य दाखवते.
-
१९९७ मध्ये डॉ. इयान विल्मुट आणि त्यांच्या सहका-यांनी रॉसलीन इन्स्टीट्युट, एडिनबर्ग ( स्कॉटलँड ) येथे प्रौढ (Adult Colning) क्लोनिंगचा उपयोग करुन डॉली नावाची मेंढी जन्मास घातली.
-
डॉलीचे निर्माण ६ वर्षीय मेंढीच्या स्तनातील पेशींपासुन केले होते. तर पॉली आणि मॉली या २६ दिवसांच्या मेंढीच्या पेशीपासुन तयार केल्या आहेत.
-
भारतात म्हशींचे क्लोन - नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्युट, कर्नाल यांनी १९९८ मध्ये केंद्रकीय स्थानांतरण तंत्राच्या प्रयोगाद्वारे म्हशींचे क्लोन तयार केले आहे.
-
म्हशीचे क्लोनिग
-
भारताची क्लोनिंग तंत्रज्ञान ब्रिटान पेक्षा भिन्न आहे. जगात प्रथमच रिग प्रतिकारक उत्तम प्रजातीच्या म्हशींचे प्रजनन करणार आहेत. भारतात मु-हा जातीच्या म्हशींचे क्लोनिंग केले जात आहेत.
-
नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्युट, कर्नाल येथील शास्त्रज्ञांनी वृक्षांचे क्लोन तयार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
-
बीबस्टन ( अमेरिका) येथील ऑरगन रीजनल प्रायव्हेट सेंटरच्या शास्त्रज्ञांनी मेंढीपेक्षा वेगळ्या तंत्राने माकडाचे क्लोन तयार केले आहे. ह्या नविन तंत्राने निर्माण केलेल्या माकडाचे नाव टेड्रा असे ठेवले.
-
डॉलीचे क्लोन तयार करणारी ब्रिटन मधील सहयोगी कंपनी पी.पी.एल. थेराप्युटीक्सने डुकराचे पाच क्लोन ५ मार्च २००० ला जन्मास आणले, ते क्रमशः मिल, क्रिस्ट्रा, एसेक्सिस, कम्टेल, व डॉटमम ही आहेत.
-
डॉली क्लोनिंग
-
मुल जन्माला येण्यापुर्वी गर्भधारणेनंतर १४व्या दिवसापूर्वी भ्रूण पेशीपासुन मानवी अवयवाच्या उदा. ह्रदय, यकृत, चेतापेशी असे विविध अवयव विकसित करण्याचे तंत्रज्ञान – स्टेम सेल तंत्रज्ञान
लेसर तंत्रज्ञान (Laser Technalogy)
-
LASER:Light amplification by stimulated Emmission of Radiation )
(उत्तेजीत प्रारण उत्सर्जनाने प्रकाशाचे विवर्धन)
-
लेसरचा शोध लावण्याचे श्रेय १९६० मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ चार्ल्स टोन व शॉल, थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांना आहे.
-
ऊर्जेच्या केंद्र्कीयकरणामुळे आलेली प्रखरता, नियंत्रीत तरंग लांबी व सेकंदाच्या एक लक्ष कोट्यांश इतक्या सुक्ष्म कालापर्यंत लेसर शलाका नियंत्रीत करता येते.
-
प्रारंभीच्या काळातील लेसरसाठी वापर – रुबी क्रिस्टल
-
लेसरचे आधुनिक प्रकार – रुबी लेसर, लॉस लेसर, द्रवरुप लेसर, समी कंडक्टर लेसर
-
गुणधर्म –
१) किरण शलाका एकत्रित किंवा सुसंगत स्वरुपी असते. त्यामुळे एकाच दिशेने लांबवर जातात.
२) लेसर प्रकाशकिरणातील तरंग एकाच लांबीचे असतात.
३) लेसर किरण निर्धारीत मार्गक्रमण करतात.
४) उर्जेचा –हार होत नाही, ज्या पदार्थावर सुसंगतपणे ते पडतात तेथे थोड्या क्षेत्रावर उर्जेचा प्रचंड मारा करतात.
५) एकच दरी व माथा असतो.
उपयुक्तता -
अ) उद्योग क्षेत्र- लेसरची धातू शास्त्रात अचूकता १०० % असते. दोन पृष्ठभाग एकमेकांना जोडण्यासाठी, कोणत्याही कठिण पदार्थ काच, दगड, लाकूड, प्लास्टीक , हिरा यांसारख्या पदार्थांना सहजपणे छिद्र पाडता येतात. धातू वितळवणे, धातूच्या मिश्रणासाठी, त्याच प्रकारे मोठे पुल, बहूमजली इमारती, बोगदे इ. च्या बांधकामात सरळ रेषेत आहेत का हे बघण्यासाठी लेसरचा उपयोग होतो. धातूमधील अशुध्दता ओळखणे.
ब) वैद्यकीय क्षेत्र- मानवी केसांच्या १/५० आकारच्या भागावर अचुकपणे लेसर शलाका नियंत्रित करता येतात. त्यामुळे शेजारच्या पेशींना धक्का न लागता रोगग्रस्त भाग जाळुन टाकता येतो. रक्तस्त्रावाशिवाय शस्त्र क्रिया करता येते. त्याच प्रमाणे या शस्त्र क्रिया जंतू विरहीत असतात.
-
कान, नाक, डोळा, मेंदू यावर शस्त्र क्रिया, मधुमेहीच्या दुषित रक्त वाहिन्यांचा नाश करणे
-
सध्या तंतू प्रकाशिकांच्या शोधामुळे लेसर्त किरणांचा उपयोग वाढला आहे. शरीराच्या कोठल्याही नाजूक भागाची शस्त्र्क्रिया करणे सुलभ झाले आहे.
-
मेंदूतील गाठ, डोळ्यातील रक्त वाहिन्या जाळणे, चष्माचा नंबर कमी करणे, अल्सरचा रक्तस्त्राव थांबविणे.
क) संदेशवहन – केसासारख्या बारिक ऑपटीकल फायबरमधून लेसर साहिय्याने हजारो संदेश हजारो कि. मी. अंतरावर पाठविता येतात.
ख) माहिती साठवण – लेसरच्या साहाय्याने सी. डी. मध्ये फार थोड्या जागेत उच्च दर्जाचे ध्वनी किंवा चित्रमुद्रण करता येते.
-
मुद्रण व्यवसाय – लेसर प्रिटर्सची गुणवत्ता व वेग उच्च असतो. लेसरच्या साहाय्याने होलोग्राफी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. (होलोग्रफी – त्रिमीती चित्र)
ग) संरक्षण – शत्रुची विमाने, रणगाडे, तोफा यांचा अचुक वेध लेसरच्या साहाय्याने घेता येतो. एक्स – रे लेसरचा शोध हा त्याच्या प्रचंड ऊर्जा वाहक तंत्रामुळे मानव जातीला घातक ठरणार आहे.
घ) इतर उपयोग – अणु शक्ती, चंद्र किंवा ग्रहाची अंतरे मोजणे. वस्तूची त्रिमीती प्रतिमा (होलोग्राम ) तयार करणे, ध्वनी व चित्र मुद्रण, वातावरण दुषित करणा-या रासायनिक कणांचा शोध घेणे.
वस्तुवरील किंमतीचे बारकोड वाचण्यासाठी लेसर स्कॅनरचा उपयोग होतो.
मेसर तंत्रज्ञान / MASER –
(Microwave Amplication by Sumlulated Emission of Radiation)
-
मेसरचा शोध १९५२ मध्ये चार्ल्स टोन्स याने लावला.
उपयोग – संदेशवहन, रडार यंत्रणा, अवघड शस्त्रक्रिया
प्रारण किंवा किरणोत्सार तंत्रज्ञान ( Radition technology)
-
उर्जेच्या स्थांनातरण माध्यमाशिवाय होणा-या प्रक्रियेस प्रारण असे म्हणतात.
-
ही विद्युत चूंबकीय तरंगाच्या स्वरुपात व द्रव्य माध्यमाच्या शिवाय होणा-या उर्जा स्थानांतरणास प्रारण असे म्हणतात. उदा- सूर्यप्रकाश अवकाशातून प्रारणाच्या स्वरुपात उर्जा वहन करतो.
प्रारणांचे प्रकार -
१) यात्रिंक प्रारणे – पाण्याच्या पृष्टभागावरिल तरंग किंवा धातूच्या माध्यमातून वहन करणारे चुंबकीय तरंग ही यांत्रिक प्रारणे आहेत.
२) विद्युत चुंबकीय प्रारणे- अवकाशातून माध्यमाशिवाय वहन करु शकणारी तरंगे,विशिष्ट प्रकार धातूची तार तापवली असता त्यातील इलेक्ट्रॉन उत्तेजीत होतात. हे उत्तेजीत इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुर-या कक्षेत उडी मारु शकतात. इलेक्ट्रॉनने आपली कक्षा बदलल्यास त्या दोन कक्षाच्या फरका एवढी उर्जा मुक्त होते. ही उर्जा म्हणजेच दृश्य किंवा अदृश्य चुंबकीय लहरी किवा तरंगे होय.
-
मुक्त उर्जा ही दर वेळी वेगळी असते म्हणुन चुंबकीय लहरींचे स्वरुपही वेगळे असते.
अ) बाहेरच्या काक्षातील इलेक्ट्रॉनने आतल्या पहिल्या कक्षेत उडी घेतल्यास –अतिनील किरण
आ) दुस-या कक्षेत उडी घेतल्यास - दृश्य प्रकाश
इ) तिस-या कक्षेत इलेक्ट्रॉनने उडी घेतल्यास - अवरक्त तरंग बाहेर पडतात.
-
उत्तेजित अणूतील इलेक्ट्रॉनचे एका कक्षेतुन दुस-या कक्षेत उडी मारल्यामुळे जी उर्जा मुक्त होते त्याला प्रारण असे म्हणतात. हे प्रारण विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरुपातील असते.
-
ही प्रारणे सेकंदात ३ लाख कि.मी. वेगाने प्रवास करतात. रेडीओ लहरी व सुक्ष्म लहरींची तरंग लांवी प्रचंड असते.
उपयोग – टेलेक्स, दूरध्वनी, ध्वनी लहरी, संगणक, नभोवाणी, चित्रावाणी इ. मध्ये केला जातो.
अवरक्त तरंग/ उष्णता तरंग (Infrared radition)
उष्णता तरंग
-
कोणताही पदार्थ साधारणपणे १५०० से. तापविला की अवरक्त तरंग उत्सर्जीत होतात.
-
माणिक या स्फटिकापासुन उत्सर्जीत झालेले लेसर किरण हे अवरक्त स्वरुपाचे आहेत. प्रयोग शाळेत सूर्य प्रकाश रॉक सॉल्टच्या विषारी लोलकातून पाठवून अवरक्त स्वरुपाचे तरंग मिळवतात.
उपयोग –
१) धुक्यातील फोटोग्राफी, विमानातून भूपृष्ठाची पाहनी, नकाशे तयार करणे यांच्या छाया चित्रीकरणासाठी अवरक्त तरंग वापरतात.
२) महत्वाच्या कागदपत्रावर शाईने खाडाखोडा अवरक्त प्रारणांच्या साहाय्याने शोधता येते.
३) पुराण वस्तु संशोधनात सापडलेल्या अवशेषावरील लिपी, खूणा या अवरक्त प्रारण छायाचित्रणांत स्पष्ट दिसतात.
४) वनस्पतींना झालेले रोग हूडकून काढता येतात.
५) वैद्यक शास्त्रात शारिरीक सांधे दुखीवरिल उपचार, सांध्याना शेक देणे, अंतर्गत स्नायूंना उब देणे यासाठी इन्फ्रारेड लंप उपकरण वापरतात.
६) शुक्र ग्रहावरिल CO2 चे अस्तित्व प्रथम अवरक्त प्रारणांमुळे शोधता आले.
अतिनील किरण (Ultraviolet rays)
-
ह्या प्रारणांची तरंग लांबी जास्त किंवा कंप्रता कमी असते. सुर्य प्रकाशात उष्णतेच्या प्रारणाबरोबर अतिनील किरणे असतात. तथापि ती ओझोन थरात शोषली जातात. विषुववृत्तावर या प्रारणांची तीव्रता ध्रुवीय प्रदेशापेक्षा जास्त आढळते. अतिनील प्रारणे प्रतिदीप्तीशील पदार्थावर पडल्यावर विशिष्ट रंगाने चमकतात.
उपयोग –खरे खोटे दात ओळखणे, हिरे – मोती ओळखणे, शुध्द व अशुध्द तुपातील फरक ओळखणे, ऑपरेशन थिएटर म्ध्ये हवा निर्जंतूक करणे, धातूच्या ओतकामातील छिद्रे व भेगा शोधणे इ. कामासाठी अतिनिल किरणांचा उपयोग होतो.
-
सुर्य प्रकाशात त्वचेतील इर्गोस्टेरॉल या द्रव्याचे डी जीवनसत्वात रुपांतर अतिनिल किरणांमुळे होते.
क्ष –किरण (X- Ray)
-
शोधाचे श्रेय – विल्यम के. राँटजेन (१८९५)
-
हे हेलिअमचे केंद्रक असतात. त्यांची कंप्रता अतिनील किरणांपेक्षा जास्त असल्याने त्याची भेदकता जास्त असते.
-
हे किरण पुस्तक ऍल्युमिनीयमचा पत्रा इ. तून आरपार जातात.
-
रोग निदान, रोग उपचार, सोनोग्राफी व केत स्केन यासाठी क्ष-किरण वापरतात.
-
छायाचित्रे, मेटल डिटेक्टर, अपघात बाहेरचे पदार्थ शरीरात घुसणे, अस्थिभंग इत्यादीसाठी क्ष-किरण उपयुक्त आहेत
-
पचनेंद्रिये, मुत्राशय इ. मांसल भागांचे क्ष- छायाचित्रकणांद्वारे रोग्यास बेरिअम सल्फेटचे द्रावण देवून क्ष-किरण फोटोग्राफी करतात.
-
हे किरण डोळ्यांना दिसत नाही पण झिंग आयोसिलिकेट या फ्लुरोसेंट मुलद्रव्यातून गेल्यास ते दिसतात.
-
हे किरण म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी असतात. यांची तरंग लांबी 1A0 100A पर्यंत असते.
-
स्फटिकामधील अणुच्या संरचनेत अभ्यास करण्यासाठी क्ष- किरणांचा उपयोग होतो. सोने, चांदी वगैरे मौल्यवान धातूंची तस्करी तसेच स्फोटके, मादक पदार्थ शोधून काढण्यासाठी क्ष-किरणांचा उपयोग होतो.
-
दिशा बदल सेकंदास १००० झाल्यास लांब तरंग लांबीचे रेडिओ तरंग तयार होतात. १लाख वेळा –
अतिनील लघू तरंग
रेडिओ तरंग
-
अवरक्त तरंगांच्या पलिकडे पसरलेल्या तरंगांना रेडिओ तरंग असे म्हणतात.
-
जेव्हा वीजा कडाडतात त्यावेळी धन प्रभारीत व ऋण प्रभारीत ढगांमध्ये विजेचा स्फुलींग निर्माण होवून रेडिओ तरंग प्रसारित होतात.
-
फॅरेडे व मॅक्सवेल यांनी रेडिओ तरंगावर संशोधन केले.
-
हॅर्टझने रेडिओ तरंग निर्माण केले व ते पाठविण्याची प्रेषणी ( Transmiter ) व मिळवायची ग्रहणी ( Reciver ) ही साधने निर्माण केली. ही साधने अशी आहेत त्यांना तारेने जोडण्याची आवश्यकता नाही. म्हणून रेडिओतरंगे हे बिनतारी संदेशवहन ( Wireless ) म्हणून ओळखले जातात.
-
आवाजरहित शीळ तयार केली – फ्रान्सिस गाल्टन
-
उपयोग – दूरदर्शन व आकाशवाणीमध्ये, पोलिस दलाच्या फिरत्या गाडीतून, अग्निशामक दल, संशोधन शाळा, धुक्यातून जाणा-या विमानांना मार्गदर्शन, समुद्रातील धोक्याच्या ठिकाणांचा शोध, वातावरणातील विविध थरांचा शोध, अवकाश संशोधन इ. ठिकाणी रेडिओ तरंग वापरतात.
-
रेडिओ तरंग हे वातावरणातील आयनांबरमधून परावर्तित होतात.
-
सध्याच्या युगात रेडिओ तरंग उपग्रहाच्या मदतीने संदेशवहनाकडे पाठविले जातात.
-
कमी तरंग लांबीचे रेडिओ तरंग रडार यंत्रणेत वापरतात. वटवाघुळ हे नैसर्गिक रडारच होय.
-
रडारचे प्रात्यक्षिक रॉबर्ट अलेक्झांडर वॅटसन वॅट याने २६ फेब्रुवारी १९३५ मध्ये केले.
-
अल्ट्रसॉनिक तरंगाचे उपयोग – गर्भाचे वय ठरवणे, मांस बारीक करणे, रडारला मार्गदर्शन करणे, अंधांना डोळे तयार करणे, समुद्राची खोली, कॉफीच्या बिया धूवून बारीक करणे, या लहरी ऐकू शकतात. – कुत्रे, वटवाघुळ, डॉल्फिन
किरणोत्सार (Nuclear Radiation)
-
युरेनिअम, थेरियम यासारखी जड मुलद्रव्ये सातत्याने व उत्सफूर्तपणे विविध प्रारणे उत्सर्जित करतात. त्याला किरणोत्सार असे म्हणतात. ही प्रारणे स्थायू पदार्थांना भेदून जातात. वायूचे आयनीभवन करतात. छायाचित्रण काचेवर परिणाम करतात व झिंक सल्फाईड रंग लेपावर चमक दाखवतात. या सर्व वैशिष्ट्यांना किरणोत्सारिता हे नाव आहे.
-
किरणोत्सारितेचा शोध – हेन्री बेक्वेरेल (१०९६)
-
पोलोनियम व रेडियम या दोन किरणोत्सारी मुलद्रव्यांचा शोध – मादाम क्युरी व पी. क्युरी.
-
रूदरफोर्ड व बिलार्ड यांनी १८९९ मधे संशोधन करून अल्फा, बीटा, गॅमा अशी तीन किरणोत्सारी प्रारणांना नावे दिली.
-
अल्फा, बिटा,गॅमा किरण
तपशील |
अल्फा प्रारण
|
बीटा |
गॅमा प्रारण |
विद्युत प्रभार |
+ २ e 1 e |
प्रभारहित |
(०) |
वस्तुमान वेग(प्रकाशाच्या पटीत) प्रकाशाच्या वेगाइतका अल्फा कणांपेक्षा जास्त आयनीभवन क्षमता वस्तुमान व अणु वस्तुमानांक व अणु क्रमांक अणु अंकात कोणताही परंतू अणु अंक1 ने वाढतो. स्वरूप विद्युत |
5 a.m.u. 1/100 ते 1/10 भेदन क्षमता सर्वात जास्त सर्वात जास्त कणांच्या निर्गमनाने बीटा अणु वस्तुमानांक 4 ने व अणु अंक 2 ने कमी होतो बदल होत नाही. हेलिअम अणुकेंद्रक |
वस्तुमान नगण्य प्रकाशाच्या वेगाच्या सर्वात कमी अल्फा कणांपेक्षा कण बाहेर पडल्यानंतर अणु वस्तुमानांक बदलत इलेक्ट्रॉन अतिसुक्ष्म चुंबकीय तरंग |
- 99% सर्वात कमी नाही तरंलांबीचे |
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
किरणोत्सार ही केंद्रकीय प्रक्रिया आहे. अस्थिर असलेली जड मुलद्रव्ये त्यांच्या केंद्रकातील कण व उर्जा अल्फा, बीटा, गॅमा या किरणांच्या स्वरूपात बाहेर टाकून नव्या हलक्या मुलद्रव्यांची (अपत्य मुलद्रव्य) केंद्रक तयार करतात. स्थिर मूलद्रव्याचे केंद्रक तयार होईपर्यंत ही –हास प्रक्रिया चालूच राहते.
-
किरणोत्सारीता दोन प्रकारे होते. १) नैसर्गिक २) कृत्रिम
-
नैसर्गिक किरणोत्सारीता - युरेनियम, थेरिअम, रेडिअम, पोलोनियम सारखी जड मुलद्रव्ये सतत व उत्स्फुर्तपणे विशिष्ट प्रकारची प्रारणे बाहेर उत्सर्जित करत असतात.
-
कृत्रिम किरणोत्सारीता – मूलतः किरणोत्सारी नसलेल्या मुलद्रव्यांची कृत्रिमरीत्या तयार केलेल्या समस्थानिकांकडून उत्स्फुर्तपणे प्रारणे उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेस कृत्रिम किरणोत्सारीता असे म्हणतात.
उदा – ऍल्युमिनिअमवर अल्फा कणांचा मारा केल्यावर एक न्युट्रॉन बाहेर पडतो व फॉस्फोरस – ३० तयार होतो. फॉस्फोरस -३० हा किरणोत्सारी नसलेल्या फॉस्फोरस ३१ चा समस्थानिक असून तो पॉझिट्रॉन उत्सर्जित करतो व सिलीकॉन -३० तयार होते. इतर किरणोत्सारी मुलद्रव्याची उदाहरणे C-14, Na-24
किरणोत्सारी अमस्थानिके व त्यांचे वैधक शास्त्रात उपयोग –
-
फॉस्फोरस ३२ – ल्युकेमियावरील (ब्लड कॅन्सर) उपचारासाठी उपयोग
-
आयोडिन व आर्सेनिक – मेंदूतील ट्युमर ओळखण्यासाठी
-
आयोडिन १३१ – कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखणे व उपचार करणे
-
कोबाल्ट ६० – कॅन्सरवरील उपचार
-
सोडिअम २४ – रक्तभिसरणातील बिघाड ओळखण्यासाठी
-
आयोडिन १२५ – डोळ्यांच्या कॅन्सरचा उपचार
-
इरिडियम १९२ – कॅन्सरच्या उपचारासाठी
-
केसीयम १३७ – कॅन्सरच्या उपचारासाठी
-
आर्सेनिक ७४ – शरीरातील गाठींचा शोध घेणे.
-
थॉलिअम २०१ – ह्रदयातून रक्तप्रभावाचा मार्ग शोधणे
-
हेलिअम १६१ व सॅमेरियम १५३, संधीवात उपचार
-
ल्युथिअम १७७ – अंतर्गत रेडिओ थेरेपी
-
सीजीएम १३७ – ब्रेकीथेरेपी कॅन्सरवरील उपचारासाठी.
-
युरेनियम डेटिंग – पुरातन निर्जीव वस्तुंचे (उदा- खडक) काळ ठरविणे, पृथ्वीचे वय ठरविणे.
-
नैसर्गिक किरणोत्सारी पदार्थाची समस्थानिकांची संख्या मर्यादित आहे.
-
कुठल्याही मुलद्रव्यापासून कृत्रिम किरणोत्सारी समस्थानिके तयार येत असल्याने अशा समस्थानिकांची संख्या अगणित आहे. उदा – फॉस्फोरस -३०, कार्बन -१४, सोडिअम
-
२४ २०००० वर्षापुर्वीच्या वनस्पती व प्राणी यांचे अवशेषावरून वय ठरविणे- अर्धआयुष्यवान ५६०० वर्षे
प्रारण तंत्राचा उपयोग – कृषी क्षेत्र
कृषी क्षेत्रामध्ये प्रारणाचा उपयोग
१. किरणोत्सारी प्रारण वापरून उदिपीत केलेल्या बियाण्यापासून रोपांची वाढ जलद होते. पीक उत्पादनात वाढ होते. बी-बीयाणे दिर्घकाळ टिकतात.
२. कांदे, बटाटे इत्यादी साठवणींच्या पदार्थांना उदिपीत केल्यास मोड येत नाही.
३. फळ व फुलावर गॅमा किरणांचा सौम्य मारा करून त्यांचा फुलोरा वाढविता येतो. फळ पिकवता येतात.
४. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी हवाबंद डब्यात साठवण्यात येणारे पदार्थ गॅमा किरणांनी उदिपीत करतात.
५. कार्बन १४ या किरणोत्सारी समस्थानिकांपासून बनविलेला कार्बन – डायॉक्साइड वायू वापरून वनस्पतींमध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया अभ्यासता येते. मसाल्यांवरील किरणोत्सारी प्रक्रिया करणारा रेडिएशन प्रोसोसिंग प्लँट –नवी मुंबई.
कांदा, कडधान्य, रवा, हळद यांच्यावर किरणोत्सारी प्रक्रिया करण्याचा प्रकल्प – लासलगाव (नाशिक)
-
उद्योग – धातुच्या ओतकामातील भेगांचा शोध समस्थानिके वापरून घेता येतो.
इलेक्ट्रॉनिक
-
इलेक्ट्रॉनिक्स तंत्रात सर्वाधिक प्रगती करणारे राष्ट्र – जपान
-
ज्या मुलद्रव्यांच्या अणूतील बाह्यकक्षेतील इलेक्ट्रॉन मुक्तपणे भ्रमंती करू शकतात. अशा इलेक्ट्रॉनांना मुक्त इलेक्ट्रॉन असे म्हणतात. अशा प्रकारची मुलद्रव्ये वीज वाहक असतात.
-
मुक्त इलेक्ट्रॉनांना नियंत्रित करण्याचा त्यांची दिशा व कार्य निर्धारीत करण्याच्या तंत्राला इलेक्ट्रॉनिक्स असे म्हणतात.
इलेक्ट्रॉन वाहके किंवा अर्ध वाहके इलेक्ट्रॉनची धारा निर्माण करतात. अशी धारा ज्या विभवांतराच्या क्षेत्रात असतील तर तेथे होणा-या आकर्षणाने इलेक्ट्रॉन धारकाचे नियंत्रण आणि त्या द्वारा इच्छित कार्यभाग साधने हे इलेक्ट्रॉनचे मर्म आहे.
-
उपयोग – गृहपयोगी वस्तु व मनोरंजनाची साधने तसेच युध्दउपयोगी अवजारे इ.
-
इलेक्ट्रॉनचा शोध व इलेक्ट्रॉनिकचा पाया घातला- जे.जे. थॉमस
इलेक्ट्रॉनच्या विकासाचे टप्पे -
फ्लेमिंगचा डायोड -
-
पहिली इलेक्ट्रॉन नलिका फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने तयार केली. या नलिकेस दोन विजाग्रे असल्याने त्यास डायोड असे नाव देण्यात आले. इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत पट्टीकडून धन प्रभारीत पट्टीकडे एकाच दिशेने वाहतात. ही नलिका झडपेप्रमाणे कार्य करते त्यामुळे डायोडला फ्लेमिंगची झडप असे म्हणतात.
-
डायोडचे कार्य – प्रत्यावर्ती वीजधारा एकाच दिशेने वाहत ठेवणे
-
ट्रायोड – डायोडमध्ये सुधारणा घडवून आणून सुधारीत ट्रायोड निर्माण करण्यात आले.
-
ही नलिका तयार करण्याचे श्रेय फॉरिस्ट या शास्त्रज्ञाला दिले जाते. यामध्ये वीजाग्रे असतात म्हणून त्यास ट्रायोड असे म्हटले जाते. ट्रायोडमध्ये त्याने टाकलेल्या जाळीत (कंट्रोल ग्रीड ) ऋण प्रभार असतांना इलेक्ट्रॉनचे नियंत्रण करता येते.
-
ट्रायोडचे कार्य –
१. इलेक्ट्रॉन प्रवाह वाढविणे किंवा त्याचे विवर्धन करणे.
२. प्रत्यावर्ती विजेची अंदोलने सतत चालू ठेवणे.
३. ट्रायोड हा विवर्धकाचे (ऍम्प्लीफायर) कार्य करतो.
-
इलेक्ट्रॉन दिष्टकरण (रेक्टीफायर), विवर्धन आणि आंदोलन यामुळे इलेक्ट्रॉनची व्यावहारिक उपयुक्तता वाढली. चार विजाग्रे असल्यास त्यास ट्रेट्रोड, पाच विजागरे असल्यास पेट्रोड म्हणतात. यांचाही उपयोग औद्योगिक उत्पादन क्षेत्रात केला जातो.
दूरदर्शनची कॅथोड किरण नलिका
-
दूरदर्शन मध्ये प्रभावी इलेक्ट्रॉनच्या झोताचे नियमन करून त्यांना दृष्य स्वरूप देणारी नलिका असते. तिला कॅथोड किरण नलिका (कॅथोड रे ट्युब) असे म्हणतात.
-
दूरदर्शनमधील दुस-या महत्वाच्या नलिका – प्रकाश स्फुरित विजेरी. (Photo Electric Cell)
-
रंगीत दूरदर्शन – लाल, हिरवा, निळा हे प्राथमिक रंग असतात. अर्ध वाहक (Semi Conductor )
-
ज्या मुलद्रव्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या अतिशय मर्यादित असते अशा मुलद्रव्यातून विज धारा पूर्णपणे वाहत नाही अथवा पूर्णपणे बंद ही होत नाही अशा मुलद्रव्यांना अर्ध वाहके असे म्हणतात. उदा- सिलीकॉन, जर्मेनियम, गॅलियम, अर्सेनाईड, इडिअम, ऍटीमोनाईड इ.
-
सर्व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनचा पाया – अर्ध वाहक
-
या मुलद्रव्यात अगदी सुक्ष्म प्रमाणात दुस-या योग्य त्या मुलद्रव्याचे अणू घुसडतात. व त्यांना वीजभारीत करतात. या तंत्रातूनच अर्धवाहके तंत्रज्ञान तयार झाले.
-
N – अर्ध वाहक – अगदी थोडे आर्सेनिक, ऍटिमनी, जर्मेनियम किंवा सिलीकॉनच्या स्फटिकात घातल्यास तो स्फटिक अर्धवाहक बनतो व त्याचा ऋणप्रभार वाढतो.
-
P - अर्ध वाहक - जर बोरॉन, गॅलिअम इंडिअम हे जर्मेनियम किंवा सिलीकॉनमधे अशुध्दी म्हणून घातले तर स्फटिकातील इलेक्ट्रॉन कमी पडून गॅप (पोकळी) तयार होतो. तो अर्धवाहक बनतो.
-
अशा प्रकारे अशुध्द पदार्थ घालण्याच्या क्रियेस शास्त्रज्ञांनी दिलेले नाव – डोपिंग
-
उपयुक्त अर्ध वाहक बनविण्यासाठी १ टन सिलिकॉनमधे 1 mg आर्सेनिक टाकतात
-
P प्रकार +N प्रकार जोड - PN जोड डायोड म्हणतात.
-
खूप मोठ्या प्रमाणावर अर्धवाहक एकावर एक बसवून संकलीत सारणी (इंटग्रेटेड सर्किट) तयार करतात.
-
IC चा आकार 25mm लांब व 13mm रूंद, 4mm जाड असतो.
-
अर्ध वाहक सूर्यप्रकाश किंवा विजेरीतील वीजधारनेही तापतो व जोडल्यावर तात्काळ सुरू होतो.
-
अर्थ वाहकापासून तयार केलेल्या ट्रान्झिस्टरमुळे इलेक्ट्रॉन नलिकेतील सर्व दोष दूर झाले व उपकरणांचा आकार लहान होण्यास मदत झाली.
-
घरगुती किंवा नेहमीच्या वापरातील वीज – AC (Alternate Current )
-
बॅटरीपासून मिळणारी वीज किंवा जनरेटरपासून मिळणारी वीज – DC (Direct Current )
-
डायोडमध्ये प्रवाह एकाच दिशेने वाहतो म्हणून प्रत्यावर्ती AC चे (DC) धारे रूपांतर करण्यास उपयोग होतो.
-
P-N-P किंवा N-P-N जोड – ट्रान्झीस्टर
-
अर्धवाहक ००C वर जवळ जवळ रोधकच असतात.
-
AC चे रूपांतर DC मध्ये करणारे साधन – रेक्टीफायर
-
IC खूप मोठ्या प्रमाणावर अर्धवाहके चीपवर बसवून त्यापासून तयार करतात. - Integrated Circuit
-
इन्टेग्रेटेड सर्किट चिपवर सिलीकॉनचा थर असतो.
-
ट्रान्झीस्टरचा शोध – १९४८ बर्डिन व ब्रॅटेन
-
इन्टेग्रेटेड चीप विकसीत करणारा – जे. एम. किल्बी
अतिवाहकता (Super Conductivity)
-
काही पदार्थात अतिवाहक व अतिचालकता हा गुणधर्म असतो. म्हणजे त्यातूनच विद्युतचे सहजपणे विरोध न होता वहन होते. अशा पदार्थांना अतिवाहक म्हणतात.
-
अतिवाहकतेचा शोध – जॉर्ज बॅडनॉस अलेक्स म्युलर.
-
उच्च तापमानास मिश्र धातू बिस्मथ धातू, ट्रिटियम, पारा २६८.८०C तापमानास अतिवाहक बनतात. तर इतर धातू २७३० C तापमानास अतिवाहक बनतात.
-
अतिवाहकतेमुळे विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होते.
-
सिरॅमिस १७०० C ला अतिवाहक बनतात. सिरॅमिकचा शोध – हिक कॅमेरिलींग ओन्स (१९९१)
-
ट्रिटीयम – बेरिअम – तांबे यांच्या १;२;३ प्रमाणातील मिश्र धातू १८०० C ला अतिवाहक बनतो. (शोध-भारतात)
नॅनो तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी ) –
-
नॅनो तंत्रज्ञान म्हणजे रेणू स्तरावर घडवून आणलेली निर्मिती किंवा रेणू स्तरावर केलेले निर्माण होय. या नॅनो आकारापासून वस्तूंची बांधणी केली जाते.
-
एक नॅनो मीटर म्हणजे १०-९ मीटर किंवा १ मीटरचा अब्जावा भाग होय. म्हणून या तंत्रज्ञाला अब्जाशी तंत्रज्ञान असे म्हणतात.
-
नॅनो तंत्रज्ञाचे फायदे –
१. या तंत्रज्ञानाने निर्मित उपकरणांना अतिशय कमी विद्युत ऊर्जा लागते.
२. या तंत्रज्ञानामुळे पर्यावरणास घातक अनुत्पादक कचरा निर्माण होत नाही.
३. मूळ पदार्थाच्या गुणधर्मापेक्षा वेगळा गुणधर्माचे उपयुक्त उपकरणे तयार करता येतात.
४. नॅनोची उत्पादन प्रक्रिया अतिशय स्वस्त व कार्यक्षम असते.
५. नॅनो तंत्रज्ञामुळे अणुच्या लांबी एवढ्या नॅनो ट्युब किंवा नॅनो वायर पासून संगणकाचे एन्टीग्रेडेड सर्किट बनवता येईल.
६. नॅनो तंत्रज्ञानाने औषधे बनवणे, प्रदूषक नष्ट करणे. नॅनो शस्त्रास्त्र तयार करणे. अशा विविध क्षेत्रात उपयोग होइल.
प्रकाश तंतू (Fiber Optics)
-
हे काच, नायलॉन, प्लॅस्टिक, गारगोटी यांपासून तयार केलेल्या बारिक नळ्या किंवा तार असतात. यांचे कार्य प्रकाशाचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्वावर कार्य चालते. यातील प्रकाशाची तीव्रता कमी होत नाही.
-
उपयोग – संदेशवहनाकरिता एका वेळी १३१०१ संदेश वाहुन नेऊ शकतो. यामुळे संदेशवहन अतिशय वेगाने होण्यास मदत होते. यांच्या प्रसरणासाठी अतिशय कमी ऊर्जा खर्च होते. यातील संदेशवहन खात्रीशीर व कमीत कमी त्रुटी असतात. उदा- ०.०००५ मी. मी. व्यासाच्या नलिकेतून एका वेळी ४०,००० टेलिफोन लाईन व २० टेलिव्हिजन कार्यक्रम चालवले जाऊ शकतात. सामान्य तांब्याची तार वापरली तर ८००० टेलिफोन संदेश पाठवता येतात. वीज कमी लागते, विद्युत चुंबकीय व्यत्यय कमी होतात.
-
भारतात प्रकाश तंतूचा प्रथम वापर – पुणे येथील शिवाजीनगर आणि कँटोमेंट केंद्र जोडण्याकरिता १९७९ करण्यात आला.
-
टेलिफोन (दूरसंचार साठी) प्रकाश तंतूचा वापर करणारे पहिले राज्य – मध्यप्रदेश
-
सध्या भारतात हिंदुस्थान केबल लि. नैनी (उ.प्र), ऑप्टेल टेलिकम्युनिकेशन लि. भोपाळ या कंपन्याद्वारे उत्पादन केले जाते.
-
आधुनिक वैद्यकशास्त्रात तंतु प्रकाशाच्या साहाय्याने उपकरणाद्वारे ह्रदय व मेंदूच्या रोगाचे परिक्षण करण्यासाठी तसेच श्वसन नलिका, गर्भाशय, पोट यांच्या आतील भाग पाहण्यासाठी केला जातो.
-
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बेगंलोर (१९५४) – इतर शाखा – तळोदा (महाराष्ट्र) पंचकुला ( हरियाणा)
-
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-१९६७ हैद्राबाद
-
इलेक्ट्रॉनिक्स आयोगाची स्थापना – १९७१ ( इंदिरा गांधीच्या काळात )
-
मेल्ट्रॉन (महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन) – मुंबई – १९७८
-
इलेक्ट्रॉनिक्स वस्तुच्या निर्यातीसाठी महाराष्ट्रात विभाग – SEEPZ, मुंबई (Santacurz Electronic Export Public Zone)
-
इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणासाठी भारताचे केंद्र – CDET, औरंगाबाद
-
किरणोत्साराचे मापन करण्यासाठी भारताचे केंद्र – CDET, औरंगाबाद
-
किरणोत्साराचे मापन करण्यासाठी उपकरण – गिगर म्युलर काऊंटर
-
किरणोत्सार मोजण्याचे एकक – रँड
-
संगणक
संगणक (Computer)
-
संगणकाची १८२१ मध्ये सर्वप्रथम संकल्पना मांडली – चार्ल्स बॅवेज
-
पहिला आधुनिक कॉम्प्युटर बनविला – १९२५ (बॅने बुश)
-
पहिला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर – १९४५ ( जॉन एखर्ट व जॉन मॉचली)
संगणकाचे विभाग-
१. इनपुट युनिट – माहिती ग्रहण करण्यासाठी माऊस, कि-बोर्ड, जॉय स्टिक, वेब कॅम, टच स्क्रिन, डिजीटल पेन, बॉयोमेट्रिक्स स्कॅनर, डिजीटल कॅमेरा
२. मेमरी- माहिती साठवून ठेवण्यासाठी
३. A. L. U. – ऍरीथमॅटिक लॉजिक युनिट (प्रत्यक्ष काम करण्यासाठी)
४. कंट्रोल युनिट - संगणकाच्या सर्व भागाचे कंट्रोल युनिट
५. आऊटपुट - माहिती मिळविण्यासाठी साधने- प्रिंटर, मॉनिटर, स्पिकर्स, प्लॉटर्स, हेडफोन, प्रोजेक्टर
६. स्ट्रोरेज डिव्हाईस – १. फ्लॉपी ड्राइव्ह २. हार्ड डिस्क ड्राइव्ह ३. कॉम्बो ड्राइव्ह ४. डिजीटल पेन ५. ऑप्टिकल झिप ड्राइव्ह, मेमरी, A. L. U. कंट्रोल युनिट यांनाच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सी. पी. यु.) असे म्हणतात. यालाच संगणकाचा आत्माही म्हणतात.
प्रकार –
१. पर्सनल ( P. C )- यांनाच मायक्रो कॉम्प्युटर असेही म्हणतात, याचा उपयोग घरगुती वापर, स्वतःसाठी, कार्यालयातील कामकाजांसाठी केला जातो.
२. मिनी – कार्यालयात वापरला जातो. वैयक्तिक संगणाकापेक्षा हे महाग व जास्त कार्यक्षम असतात.
३. सुपर कॉम्प्युटर – सर्वात जलद व अतिमहाग, हवामानाची अंदाज वर्तनिणे, जमिनिवरील निरीक्षण केंद्रासाठी वापर करतात.
४. मेनफ्रेम – अनेकजण एकाचेवेळी काम करू शकतात. विद्यापीठ व संशोधन संस्था, गुंतागुंतीची आकडेवारी, तसेच बँका,ONGC, मोठे कारखाने उद्योगात वापरला जातो.
-
हार्डवेअर – गुंतागुंतीची इलेक्ट्रॉनिक जोडणी, चुंबकीय यांत्रिक उपकरणे इत्यादी सर्वांचा समावेश यामध्ये होतो.
-
सॉफ्टवेअर – हार्डवेअरचा उपयोग करून माहिती मिळविण्याकरिता दिल्या जाणा-या सुचनांचा संच म्हणजे सॉफ्टवेअर होय.
भाषा- कॉम्प्युटर प्रोग्रामसाठी विकसित पहिली भाषा -फोट्रॉन
-
BSIC - बीगीनर्स ऑल परपज इन्स्ट्रक्शन कोड साठी साधी सरळ भाषा अतिशय लोकप्रिय आहे.
-
COBEL – कॉमन बिझनेस ओरिएन्टल लॅंग्वेज – व्यापार उद्योगक्षेत्रात वापरली जाते.
-
FORTRAN- फॉर्म्युला ट्रान्सलेशन – वैज्ञानिक संशोधन, तंत्रविज्ञान व अभियांत्रिकी संस्था यासाठी वापर
-
ALGOR – अलगोरिदम लॅग्वेज – वैज्ञानिक संशोधन व तंत्रविज्ञान इ. यासाठी वापर
-
PL- प्रोग्राम लॅग्वेज – बहुउद्देशीय वापरासाठी.
-
PASKAL – गणित व इंजिनियरींग यासाठी वापर केला जातो.
-
इतर प्रचलीत भाषा – डेल्फी -१ ही भाषा बोरलॅडने १९९५ मध्ये तयार केली. त्याचप्रमाणे डेल्फी 3, C, C++, Visual C, (JAVA) जावा, व्हिज्युल बेसिक, एच. टी. एम. एल. इ.
-
संगणकाच्या पिढ्या- संगणकाचा आकार, आराखडा, वेग व क्षमता यांयुसार वर्गीकरण
१. संगणकाच्या पहिल्या पिढीत – १९४६ – ५९ वापर केला गेला. – व्हॅक्यूम ट्यूब्स
२. संगणकाच्या दुस-या पिढीत -१९५९ -६५ मध्ये वापर केला गेला- ट्रॉन्जिस्टर
३. संगणकाच्या तिस-या पिढीत – १९६५ -७९ मिनी कॉम्प्युटर, मायक्रो कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटर यात वापर केला गेला- एन्टीग्रेटेड सर्किट- (आय. सी.)
४. चौथ्या पिढीत – १९८९ पासून आद्यपपर्यंत वापर केला जात आहे. – एल. एस. आय व व्ही. एस. एल. आय.
५. संगणकाच्या पाचव्या पिढीतील भविष्यात निर्माण होणारे वैशिष्ट्य – कृत्रिम बुध्दिमत्ता
-
जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक्स डिजीटल कॉम्प्युटरचे नाव – एनियाक (ENIAC)
-
भारतात पहिला कॉम्प्युटर बनविला – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. (१९७१) – सिध्दार्थ
-
जगातील सर्वाधिक वेगवान कॉम्प्युटर IBM कंपनीने बनविला. International Business Machine
-
भारतात प्रथम हिंदीत पर्सनल कॉम्प्युटर IBM कंपनीकडून १५ डिसें. १९९७ मध्ये तयार केला गेला.
-
जागतिक बुध्दीबळपट्टू गॅरी कॅस्पोरोव्हरला पराजित करणारा कॉम्प्युटर – डीप ब्ल्यू कॉम्प्युटर
-
जगातील पहिला पर्सनल कॉम्प्युटर तयार करून बाजारात आणला. – आय. बी. एम. ने (१९८१)
-
सुपर कॉम्प्युटर्सची कार्य करण्याची क्षमता – ५०० मेगा फ्लॉप्स, मेमरी-५२ मेगा बाईट
-
पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव – ENIAC – IV
-
भारत सरकारने महासंगणक भारतात तयार करण्यासाठी स्थापन केलेली संस्था – सी- डॅक (C-DAC), सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटरिंग – पुणे – (१९८८)
-
भारताने प्रथम स्वदेशी बहुउद्देशीय सुपर कॉम्प्युटर परम C-DAC पुणे येथे १९९० मध्ये विकसित केला. त्याची क्षमता एक गिगा फ्लॉप्स, परम – १००००, परमअनंत, परमपद्मम
-
भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरने तयार केलेला सुपर कॉम्प्युटर – अनुपम
-
परम १०००० – पुणे येथे C-DAC मध्ये २८ मार्च १९९८ मधे विकसित केला.
क्षमता-१०० गेगा फ्लॉप्स या महासंगणक शोधाचे श्रेय विजय भटकर यांना दिले जाते.
-
परम १०००० चा उपयोग – हवामानाचे अंदाज वर्तविणे, भूकंपाविषयी अंदाज वर्तविणे, तेल व गॅस साठे संबंधी मॉडेल तयार करणे, वैद्यकीय, संरक्षण, अणु अस्त्रे, उपग्रह प्रक्षेपण इ. कामासाठी केला जातो.
-
परम अनंत - C-DAC निर्मित आणि व्यापारी क्षेत्र लोकाभिमुख बनवण्याच्या उद्देशाने पर्सनल कॉम्प्युटर परम अनंत ५ एप्रिल २००० मध्ये तयार केला गेला.
-
परम पद्म- देशातील सर्वात वेगवान संगणक, क्षमता १ टेराफ्लॉप (सी- डॅक निर्मित)
-
भारतात सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था – नॅसकॉम (NASSCOM)
-
भारतीय माहिती केंद्र- नीकनेट (NIC) National Information Center
-
शास्त्रीय शोध व त्याचा सर्वात कमी गर्भकाळ – कॉम्प्युटर क्षेत्रात
-
संगणक कार्यात विकास व संशोधन कार्यासाठी वापरले जाणारे एकूण मनुष्यबळ – ३० ते ५०%
-
डिजीटल व ऍनालॉगच्या आवश्यक बाबींचा उपयोग करून बनवलेला संगणक – हायब्रीड संगणक
-
C-DAC चे संचालक विजय भटकर यांना मिळालेला पुरस्कार – महाराष्ट्र भूषण
-
मॉनिटर स्क्रिनच्या आतिल भागास दिला जाणारा लेप – फॉस्फरस
-
संगणकाची मेमरी मोजली जाते. – किलोबाईटमध्ये
-
संगणकाची स्मरण शक्ती जेवढी जास्त तेवढा संगणकाचा वेग व शक्ती जास्त असते.
संगणकाची स्मरण शक्ती म्हणतात – RAM – Random access memory
-
संगणकाची स्मरणशक्ती मोजण्याचे एकक – बाईट
-
कॉम्प्युटरची भाषा २ अंकाची असते. (बायनरी डिजट) – ० व १.
-
० किंवा १ अंकांनी बनलेले संगणकाचे मूळ एकक – बीट
१) ० किंवा १ -१ बीट २) ८ बीटस् – १ बाईट ३)१किलो बाईट – १०२४ बाईट ४) १ मेगा ब बाईट – १०२४ के.बी. ५) १ गिगा बाईट (जीबी) – १०२४ एम बी. ६) १ टेरा बाईट- १०२४ जेबी
संगणकाचे पूर्व कामकाज ० ते १ बायनरीमध्ये चालते.
आपण दिलेल्या आज्ञा खालील प्रमाणे दिसतात. उदा.-
अ.क्र |
संज्ञा |
बायनरी अंक |
१. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. |
० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ |
००० ००१ ०१० ०११ १०० १०१ ११० १११ १००० १००१ |
-
हार्डवेअर व सॉफ्टवेअर व्यवस्थित कम करण्यासाठी वापरल्या जाणा-या सॉफ्टवेअर प्रोग्रामचे नाव – ऑपरेटिंग सिस्टिम
-
जगातील सर्वाधिक वापरल्या जाणा-या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिम विंडोजच्या विविध आवृत्या – विंडोज -१.०, २.० , २.३, ३.० विंडोज ९५ ,९८ ,२०००. विंडोज एक्स. पी. विंडोज व्हिस्टा, व विंडोज – ७
-
जगात सर्वाधिक वापरली जाणारी मोफत असणारी ऑपरेटिंग सिस्टीम – ग्नू – लिनक्स
सायबर क्राईमः
१) संगणाकाच्या प्रोग्राममध्ये किरकोळ बदल करुन सॉफ्टवेअर मालकाची परवानी न घेता कॉपीचा भंग करुन ते वापरणे. यास म्हणतात – क्रॅकींग
२) फोटोच्या मागे गोपनीय माहीती लपविण्यास म्हणतात – स्टेग्नोग्राफी
३) इतर व्यक्तीच्या संगणकातील माहीती चोरण्यास म्हणतात – स्निफिंगी
-
कॉम्प्युटर व्हायरस – म्हणजे मानव निर्मित डीजीटल परजीवी असतात. ते फाईल संक्रमण म्हणूनही ओळखले जातात. हे सजीव नसून एका विशिष्ट प्रकारे केलेले प्रोग्राम असतात. ज्यामुळे संगणकातील डाटा फाईल नष्ट होतात.
-
व्हायरस व प्रोग्राम मध्ये फरक नसतो त्यामुळे ते कोणत्याही सुचने शिवाय स्वतःच कार्यरत होतात.
-
पहिल्या कॉम्प्युटर व्हायरसचा विकास १९८५ मध्ये पाकिस्तानमधील दोन बधूंनी केला. त्याचे नाव होते- ब्रेन व्हायरस किंवा पाकिस्तानी व्हायरस
-
हॅकर- एखाद्या अनाधिकृत व्यक्ती द्वारा संगणक प्रणालीत प्रवेश करुन डाटा ( माहीती) पळविणे. अनाधिकृत पध्दतीने संगणक जाळ्यात प्रवेश करणा-यांना हॅकर ( Haiker ) असे म्हणतात, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना सायबर क्राईम असेही म्हणतात.
-
कॉम्प्युटरला व्हायरस पासून वाचविण्यासाठी ऍन्टीव्हायरस प्रोग्राम बनवतात.
-
सी. डी. – कॉम्पक्ट डिस्क, डी. व्ही. डी. –डिजिटल व्हॅर्से टाईल डिस्क, व्हि. सी. डी – व्हिडीओ कॉम्पॅक्ट डिस्क.
-
सी. डी. किंवा डि. व्ही. डी. वरचा कशाच्या साहाय्याने वाचला जातो.- लेझर.
-
रेल्वे रिझर्वेशन, बॅंकेतील कामे येथिल डाटा एन्ट्री ऑन लाईन असते.
-
लहान ब्रिफ केसच्या आकारा एवढा संगणकाचा प्रकार – लॅपटॉप संगणक
-
माणसाच्या तळहाताएवढा संगणकाचा प्रकार – पामटॉप संगणक (सर्वात लहान)
-
टेलिफोनच्या वायरीतून मजकूर एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पाठविण्यासाठी वापरले जाणारे साधन – मोडेम
-
इ. स. १९८१ मध्ये पहिले पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आणणा-या कंपनीचे नव – आय. बी. एम. (I.B.M.)
-
एका सुपर कॉम्प्युटरची क्षमता ४० हजार पर्सनल कॉम्प्युटर इतकी असते.
-
भारतात स्वतःची वेबसाइट सुरू करणारा पहिला राजकीय पक्ष – भारतीय जनता पार्टी
इंटरनेट (Internet)
-
१९६५ मध्ये अमेरिकन संरक्षण विभागाने अर्पानेटचा ( ARPANET ) विकास केला. १९८० मध्ये अर्पानेटचे विभाजन करून सैनिकी उपयोगासाठी एक विभाग व समान्यासाठी इंटरनेट हा विभाग केला. शोध – डॉ. विंट सर्फ
-
१९८९ मध्ये World Wide Web (WWW) मुळे इंटरनेट लोकप्रिय बनले.
-
भारतात इंटरनेटचा प्रवेश १९८७ -८८ मध्ये झाला तथापि विदेश संचार निगम. लि. द्वारा इंटरनेट सुविधा जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली. –
-
VSNL नंतर भारतात इंटरनेट सुविधा सत्यम इन्फोटेकने २१ नोव्हे. १९९८ मध्ये सुरू केली.
-
भारतात प्रथम व्यापारी ई. मेल सेवा ( I.C.N.E.T. या खाजगी कंपनीद्वारा ) नवी दिल्ली येथे ११ फेब्रु १९९४ पासून सुरू करण्या आली.
-
भारतात ई- कॉमर्सला संसदेची मान्यता – १७ मे २०००
मर्यादित क्षेत्रातील संगणक जोडण्यासाठी उदा- शासकीय कार्यालय, खाजगी उद्योग, कॉलेज इत्यादीत वापरले जाणारे नेटवर्क – लोकल एरिया नेटवर्क (LAN)
-
विस्तृत प्रदेशातील संगणक जोडण्यासाठी वापरले जाणारे नेटवर्क- WIDE AREA NETWORK-WAN टेलिफोन लाईन मध्ये लँड लाईनमध्ये फोन व इंटरनेट डेटा व व्हाईस एकाच वेळी वापरता येतात- ISDN CONNECTIONM
-
कॉपर वायर व ऑप्टीकल फायबरचा वापर करून मिळणारे इंटरनेट कनेक्शन VSDL (VERY HIGH SPEED)इंटरनेटच्या Ip (Internaert protocol) Address चे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्थापन बघणारी संस्थाअ- ICANN (Internationl corporation for assign names & address ) असे सॉफ्टवेअर ज्याच्या मदतीने इंटरनेटवर प्रवेश करता येतो. – ब्राऊजर
-
ज्या सॉफ्टवेअरच्या मदतीने इंटरनेट उपलब्ध असणारा माहितीचा शोध घेता येतो त्याचे नाव – सर्चइंजिन
-
अरनेट – (ERNET) – शिक्षण संस्था व संशोधक संस्थांना जोडणारे जाळे यास अरनेट ही संज्ञा आहे.
-
विद्या वाहिनी योजना – पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ जून २००३ ला विद्यालयाचे संगणकीकरण करण्यासाठी विद्यावाहिनी ही योजना सुरू केली. यामध्ये सर्वप्रथम १९९१ मध्ये भारतात इंटरनेटचा पहिला अनुभव आला.
-
पहिले संगणक साक्षर गाव – केरळमधील मालापुरम जिल्ह्यातील अमरावतम गाव या ८५० कुटूंब असलेल्या गावातील प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक सदस्य संगणक साक्षर आहे.
-
रोबो – T – औद्योगिक रोबो हा ०.०००५ अचूक भोके पाडतो. F-16 लढाऊ विमानांची जुळणी करतो.
भारत - विज्ञान व तंत्रज्ञान विकास
भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विकास
-
विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास करणे व विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातून राष्ट्रीय विकास साधने भूमिकेतून भारताने पहिले वैज्ञानिक धोरण जाहिर केले. – ४ मार्च १९५८ (पं. नेहरू)
-
राष्ट्राच्या प्रगतीतील तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने तंत्रज्ञानाविषक निवेदन (Technology Policy Statement) जाहिर केले-१९८३
-
विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी पंचवार्षिक योजनांतून दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते.
विज्ञान व तंत्रज्ञान नियोजनाचे तीन विभाग ( डी. एस. टी. स्थापना, मे १९७१ )
१) विज्ञान आणि तंत्रज्ञान, औद्यागीक संशोधन, सागरी विकास , अवकाश संशोधन, अणुऊर्जा
२) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR), दळणवळण विभाग, इलेक्ट्रॉनिक्स विभाग, अपारंपारिक ऊर्जा विभाग, जलसिंचन विभाग, उद्योग विभाग इ. ३० विभाग
३) राज्ये व संघराज्य प्रदेशांसाठी शास्त्र व तंत्रज्ञानाचा स्वतंत्र विभाग
केंद्रशासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञानविषयक संशोधन संस्था -
१. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ( CSIR ) १९४२
२. भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR )
३. भारतीय वैद्यकीय परिषद – ICMR
४. इलेक्ट्रॉनिक्स विभाग -DOE
५. संरक्षण व विकास संघटना – PRDO
६. पर्यावरण विभाग – DOEN
७. अणुऊर्जा विभाग - DAE
८. अवकाश विभाग - DOS
९. सागरी विकास विभाग-DOD
-
विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय –
१. विज्ञान तंत्रज्ञान
२. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन
३. विक तंत्रज्ञान
ह्याच प्रकारे केंद्र सरकारच्या व अन्य मंत्रालयाच्या संशोधन संस्था, सार्वजनिक उद्योगांची संशोधन व विकास कामांसाठी स्थापन केलेल्या संस्था, राज्य सरकारांनी शासकीय स्तरावर स्थापन केलेल्या संस्था त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठे व त्या अंतर्गत कार्य करणा-या संशोधन संस्था. देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार करता शिक्षण, संशोधन व विकास यातील कार्य करणा-या संस्थांची संख्या जवळपास तीन हजारापर्यंत आहे.
-
महाराष्ट्र राज्यात २००५ मध्ये डॉ. वसंत गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी विज्ञान, तंत्रज्ञान आयोगाची स्थापना करण्यात आली.
१८ स्वायत्त वैज्ञानिक संस्था
१. बोस इन्स्टिट्युटः कोलकाता
२. आगरकर रिसर्च इन्स्टिट्युटःपुणे
३. श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नोलॉजीः तिरूअनंतपूरम (केरळ)
४. इंडियन असोसिएशन फॉर दि. कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसः कोलकाता
५. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऍस्ट्राफिजिक्सःबंगळूर
६. इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ ट्रापिकल मटेरिलॉजीः पुणे
७. जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्चः बंगळूर
८. रामन रिसर्च सेंटरः बंगळूर
९. बिरबल सहानी इन्स्टिट्युट ऑफ पॅलिओ बॉटनीः लखनौ
१०. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिओमॅग्नेटिझमः मुंबई
११. वाडिया इन्स्टिट्युट ऑफ हिमालयीन जिऑलॉजीः डेहराडून
१२. इंटरनॅशनल ऍडव्हान्स सेंटर फॉर पॉवडर मेटॉलॉजी ऍन्ड न्यु मटेरिअल्सः हैद्राबाद
१३. एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसः कोलकाता
१४. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फॉर कास्टींग ऍण्ड असेसमेंट कौन्सिल – नवी दिल्ली.
१५. विज्ञान प्रसार संस्था- नवी दिल्ली
१६. राष्ट्रीय परिक्षण आणि अंशाकन बोर्ड – नवी दिल्ली.
१७. द्रव क्रिस्टल शोध केंद्र- बंगलोर.
१८. आर्यभट्ट संशोधन वेधशाळा – नैनिताल.
-
देशात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना – १९७१.
-
कार्य – विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील बाबींचा विकास करणे. धोरणात्मक निवेदने प्रसारण करणे, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना आवश्यक ते तंत्रज्ञान पुरविणे, वैज्ञानिक संशोधन संस्थांना अनुदान देणे. इ.
-
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाची (NSTEDB) ची स्थापना – जाने. १०८२
-
ग्रामिण जनतेमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या विषयी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय जन विज्ञान जथ्थाचे आयोजन केले होते. – १९९२
-
द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेस,- बंगलोर (१९०१)
-
इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशन - (ICSA) – (१९१४) कोलकाता
-
दि जिऑजिकल सर्व्हे ऑफ इंडिया – (१८५१) डेहरादून
-
भारतीय हवामान खाते – १८७५ , कार्यालय – दिल्ली, कुलाबा, मद्रास, कलकत्ता, नागपूर, रांची, तिरूचिरापल्ली.
-
भारतीय सर्वेक्षण संस्था, डेहराडून या संस्थेचे ब्रिद वाक्य – आ सेतु हिमाचल
-
भारतीय सर्वेक्षण विभागाने UNO च्या NDP चे सहाय्य घेऊन सर्वेक्षण आणि मानचित्र निर्मिती याचे प्रशिक्षण देणारे आशियातील पहिले केंद्र व संशोधन विभाग सुरू केला – (१९७०) हैद्राबाद
-
मानचित्र मुद्रण कार्य – कोलकाता, हैद्राबाद, डेहराडून
-
भारतीय विज्ञान अकॅडमी – बंगलोर
-
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी – दिल्ली
-
राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी – अलाहाबाद
थेट पंतप्रधानांची जबाबदारी असणारी मंत्रालये – अणुऊर्जा, सागर विकास, विज्ञान व तंत्रज्ञान
-
बोर्ड ऑफ हाईट मॅथमेटिक्स – मुंबई
-
भारतीय वन सर्व्हेक्षण – डेहराडून, प्रादेशिक कार्यालय – नागपूर, कोलकाता, बंगळूर, सिमला
-
भारतीय राष्ट्रीय इंजिनिअरिंग अकॅडमी – दिल्ली
-
राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुअवारी
-
इन्स्टिट्युट ऑफ नॅनो सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीची स्थापना केली जाणार आहे. – मोहाली
-
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ( सीएमआयाआर) – ही देशातील सर्वोच्च सर्वोत्तम व विकास संस्था आहे. हिच्या अंतर्गत ३८ प्रयोगशाळा व ३९ क्षेत्रीय केंद्र आहे. याचा उद्देश विज्ञान व तंत्रज्ञान यात उच्च यश प्राप्त करून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धाक्षम बनविणे हे आहे.
-
कलिंगा पारितोषिक – विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना युनेस्कोतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
भारतातील अणुऊर्जा संशोधन
-
भारतीय अणुशक्तीचे जनक – डॉ. होमी भाभा.
-
टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई (१९४५)
-
अणु शक्ती किंवा अणु ऊर्जा आयोगाची स्थापना ऑगस्ट १९४८, डॉ. होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. उद्देश- शांततेच्या कार्यासाठी अणु ऊर्जेचा भारतात वापर करणे.
-
अणु ऊर्जा या स्वतंत्र खात्याची स्थापना – १९५४
-
तुर्भे (ट्रॉम्बे) येथे अणुसंशोधन केंद्रकाची स्थापना – १९५७
त्याचेच नामकरण- भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (BARC)- असे करण्यात आले – १९६७
-
ऍटोमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड – १९८३
-
अणु ऊर्जा समिती मंडळ – ऑगस्ट १९८४
-
अणु ऊर्जा विकास महामंडळ – १७ डिसे. १९९७.`
देशातील अणुभट्ट्या (शोध रियॉक्टर)
क्र. |
नाव |
पासून कार्यरत |
मदत |
क्षमता |
स्थळ |
१. |
अप्सरा |
४ ऑगस्ट १९५६ |
ब्रिटन |
१ मे. वॅट |
ट्रॉम्बे |
२. |
सीरस |
१० जुलै १९६० |
कॅनडा |
४० वॅट |
ट्रॉम्बे |
३. |
झर्लिना |
१४ जुलै १९६१ |
स्वदेशी |
१०० मेगा वॅट |
ट्रॉम्बे |
४. |
पूर्णिमा |
२२ मे १९७२ |
----------- |
१ मेगा वॅट |
ट्रॉम्बे |
५. |
ध्रुव |
८ ऑगस्ट १९८५ |
स्वदेशी |
१०० मे. वॅट |
ट्रॉम्बे |
६. |
कामिनी |
१९८८ |
स्वदेशी |
४० मेगा वॅट |
कल्पकम |
|
(कोड - अ स. झ. प. ध. का.) ५६ ६० ६१ ७५ ८५ ८८ |
|
अणुविद्युत प्रकल्प
केंद्र राज्य |
स्थापना |
सहकार्य |
क्षमता |
तारापूर |
महाराष्ट्र १९६९ |
अमेरिका |
१४०० मे. वॅ. |
रावतभाट्टा |
राजस्थान १)१९७२ २)१९८० |
कॅनडा |
७४० मे. वॅ. |
नरोरा |
उत्तरप्रदेश १)१२ मार्च १९८९ २) २४ ऑक्टो १९९१ |
|
४४० मे. वॅ. |
कल्पकम |
तामिळनाडू १)जाने. १९८४ २)२१ मार्च १९८६ |
स्वदेशी |
४४० मे. वॅ. ६६० मे. वॅ. |
कैगा |
कर्नाटक-१९९३ |
|
|
काक्रापारा |
गुजरात – १९९५ (जगातील अत्युच्च दर्जाचे) |
|
४४० मे. वॅ. |
उमरेड |
महाराष्ट्र निर्माण कार्य स्वरूप |
|
|
कुंडाकुलम |
तामिळनाडू |
रशिया |
|
-
अणुभट्ट्यामध्ये झालेले अपघात – अमेरिकेतील लॉग आयलँड व रशियातील चर्नोअबल येथे घडला आहे.
-
भारतातील सर्वाधिक क्षमतेचा (५४०मेगावॅट) अणूऊर्जा प्रकल्प ६ मार्च २००५ रोजी तारापूर (मुबंई) येथे कार्यान्वीत झाला.
-
जैतापूर ( रत्नागिरी) – प्रस्तावित अणू विद्युत प्रकल्प.
-
देशातील पहिला फार्स्ट ब्रिडर न्युक्लिअर रिऍक्टर – कल्पकम तामिळनाडू.
-
दि. ११ ऑक्टोबर २००८ रोजी भारत व अमेरिका यांच्या दरम्यान आण्विक करार झाला. यामुळे जगातील ४५ अणु इंधन पुरवठा करणा-या देशांनी या करारास मान्यता दिली. त्यामुळे भारतास अणु इंधन मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
-
या करारास हेन्री हॉईड करार (कलम १२३) असेही म्हणतात.
-
यामुळे भारातातील २२ अणुभट्ट्यांतील १४ अणु भट्ट्या आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाच्या निरक्षणाखाली येणार आहे.
-
अमेरिकेत पूर्वी ३० सप्टे. २००८ रोजी भारताने फ्रान्स सोबत अणुकरार केला. फ्रान्सनंतर असा करार करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरला.
-
भारताच्या अणुबॉम्ब चाचण्या -
१) शास्त्रज्ञ राजा रामोण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ मे१९७४ रोजी ‘आणि बुध्द हसला” या सांकेतिक नावाने २ यशस्वी अणु चाचण्या घेण्यात आल्या.
२) दि. ११ व १३ मे १९९८ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरण येथे पाच अणु बॉम्ब चाचण्या घेण्यात आल्या. यात एक हायड्रोजन बॉम्ब होता.
अणु विकास
-
जडपाणी प्रकल्प – जडपाण्याचा संचलन व शीतकरण घटक म्हणून अणुभट्टीत वापर केला जातो.
-
देशातील पहिले जडपाणी प्रकल्प पंजाबमध्ये – नानगल या ठिकाणी १९६१ मध्ये सुरू झाला.
-
अमोनिआ – हायड्रोजन प्रक्रियेद्वारा जडपाणी निर्मिती करणारे प्रकल्प – नानगल (पंजाब), बडोदरा (गुजरात), तालचेर (ओरिसा), तूतीकोरीन (तामीळनाडू), थळ (महाराष्ट्र), हाजिरा (गुजरात)
-
हायड्रोजन सल्फाईडद्वारा जडपाणी निर्मिती करणारे प्रकल्प – रावतभाटा (राजस्थान) व मणगुरू (आंध्रप्रदेश)
-
अणुऊर्जा खात्याच्या अखत्यारीत काम करणा-या संस्था
१. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (BARC) – मुंबई – १९५७
२. इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च ( IGCAR ) - कल्पकम ( तामिळनाडू)
३. सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी - (CAT) इंदोर (म. प्रदेश)– १९८४
४. व्हेरिएबल एनर्जी सायक्लोन सेंटर (VECC) – कोलकाता (प. बंगाल)
५. ऍटोमिक मिनरल्स डिव्हीजन ( AMD) – हैद्राबाद (आंध्रप्रदेश)
-
मंदायक (मॉडरेटर) म्हणून वापर करतात. – ग्राफाइट
-
शोषक (ऑब्जर्वर) म्हणून वापर करतात. – कॅडमियम, बोरॉनयुक्त पोलाद. बेरेलियम.
-
औद्योगिक संस्था
१. हेवी वॉटर बोर्ड (WHB) , मुंबई
२. न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स (NFC) , हैद्राबाद (A.P.)
३. बोर्ड ऑफ रेडिएशन ऍन्ड आयसोटोप टेक्नॉलॉजी ( BRIT) , मुंबई
-
-
सार्वजनिक निगम-
१. न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCL) , मुंबई
२. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL), जादूगोडा (झारखंड)
३. इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IRE), केरळ
४. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैद्राबाद (आंध्रप्रदेश)
-
अणु ऊर्जा खाते पुढील ७ स्वायत्त संस्थाना अर्थसाहाय्य करते.
१. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई
२. टाटा मेमोरिअल सेंटर (TMC) , मुंबई
३. सहा इन्स्टिट्युट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स ( SINP) , कोलकाता
४. इन्स्टिट्युट ऑफ फिजिक्स ( IOP ) , भुवनेश्वर (ओरिसा)
५. मेहता रिसर्च इन्स्टिट्युट ( MRI) , अलाहाबाद, (U.P)
६. इन्स्टिट्युट ऑफ मॅथेमेटिकल सायन्सेस (IMSC), चेन्नई.
७. इन्स्टिट्युट फॉर प्लाझमा रिसर्च (IPR) , गांधीनगर (GJ)
अवकाश संशोधन
-
पृथ्वी ही मानवी मनाचा पाळणा आहे. पण पाळण्यात कोणी कायम राहू शकत नाही. – जिओलोव्हस्की (रशिया)
-
मानवाने सोडलेला पहिला उपग्रह ज्याद्वारे अवकाश युगाची सुरूवात झाली- स्फुटनिव -१
हा उपग्रह रशियाने ४ ऑक्टो, १९५७ ला सोडला, (स्फुटनिकचा अर्थ – सहप्रवासी किंवा उपग्रह)
-
अमेरिकेने सोडलेला पहिला उपग्रह – ( ३१ जाने. १९५८), एक्सप्लोरर -१
-
अंतराळात जाणारा पहिला मानव – युरी गागारीन (रशिया) (१२ एप्रिल १९६१- व्होस्टोक – १द्वारे)
-
अंतराळात जाणारा पहिला प्राणी – कुत्रा, लायका नावाची कुत्री, स्फुटनिक -२ द्वारे
-
अंतराळात चालणारा पहिला मानव – ऍलेक्सी लिआनोव्ह (व्होस्टोक -२)
-
अंतराळात जाणारी पहिली महिला – व्हॅलेंटिना तेरेस्कोव्हा (रशिया ),१६ जून १९६३ व्होस्टोक – ६द्वारा)
-
पहिली अमेरिकन पृथ्वी प्रदक्षिणा – ऍलन शेफर्ड (५ मे १९६१, फ्रिडम -७)
-
चंद्रावर गेलेले पहिले मानवरहित यान – (३ फेब्रु. १९६६००) ल्युना -१
-
रशियाचे १९६९ मध्ये पहिले अवकाश स्थानक – स्कायलॅब
-
रशियाची १९७० मध्ये पहिली मानवरहित अवकाश प्रयोगशाळा - सॅल्यूत
-
चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल टाकले गेले – २० जुलै १९६९
नील आर्मस्ट्राँग आणि एडविन आल्ड्रिन, अपोलो – ११द्वारे
-
मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी अमेरिका व रशियाने सुरू केलेली मालिका -१९७५ पासून अपोलो सोयूज, दुसरी मालिका – १९९५ पासून अटलांटिक मीर
-
अमेरिकेने मंगळावर पाठविलेले यान – पाथ फाइंडर ( ४ जलै, १९९७
-
अमेरिकेने पाठविलेले पहिले स्पेस शटल – कोलंबिया (१२ एप्रिल १९८१) – नष्ठ – १ फेब्रु २००३
-
त्यानंतर पाठविलेले स्पेस शटल – चॅलेंजर, डिस्कव्हरी आणि अटलांटिस
-
रशियाने स्थापन केलेल्या अवकाश केंद्र किंवा स्थानक – मीर ( २० फेब्रु, १९८६ वजन १३० टन)
-
लोकांना दूरदर्शनद्वारा पहिले रॉकेटचे प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायला मिळाले. – ३ मार्च १९८६ मध्ये पाठवलेले रशियाचे सोयुज – १५ या उपग्रहाचे
-
१९९ देशांच्या सहकार्याने बनलेली युरोपियन अंतरिक्ष एजन्सिने (E.S.A.) सोडलेले रॉकेट- एरियन रॉकेट
-
जगात अंतराळ पर्यटन करणारे मानव
१. डेनिस टिटो, अमेरिका
२. मार्क शटल बर्थ- आफ्रिका
३. ग्रेगरी ओल सेन – अमेरिका
४. अनुशेह अन्सारी (इराण – अमेरिकी)
भारत आणि अवकाश संशोधन
-
१९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमीटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
-
अग्णिबाण प्रक्षेपण केंद्र – थूंबा १९६३ (केरळ)
-
थूंबा हे चुंबकीय विषुववृत्तावर आहे.
-
थूंबा येथून अमेरिकेने बनावटीचे नायके अपाचे हे पहिले रॉकेट भारताने सोडले – २१ नोव्हे. १९६३
-
अंतराळ संशोधन विषयक सर्व संस्थांना जोडणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO)-१९६९ (बंगळूर)
-
केंद्र सरकारने अंतरिक्ष आयोग (स्पेस्स कमिशन) अवकाश विभागाची स्थापना केली- १९७२, मुख्यालय -बंगळूर
-
१९ एप्रिल १९७५ या दिवशी रशियाच्या सहकार्याने भारताचा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला – आर्यभट्ट (वजन ३६० कि. ग्रॅ.)
-
सॅटेलाइट ट्रेकिंग ऍन्ड स्टेशनची (उपग्रह स्थानक ) ची स्थापना – कावलूर ( तामिळनाडू) – १९७७
-
देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र १९७१ पासून कार्यरत आहे – आर्वी ( पुणे-महाराष्ट्र)
-
वैश्विक किरणांचे संशोधन करण्याच्या उद्देशाने अवकाश संशोधन केंद्र व भाभा अणुशक्ती केंद्र यांनी ४ वर्ष केलेल्या संशोधनानंतर ४५ किलो वजनाचा, ४८ से.मी. व्यासाचे,५३ से.मी. उंचीचे अनुराधा हे उपकरण अमेरिकेच्या चॅलेंजर अवकाश यानातून पाठविण्यात आले. या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक शास्त्रज्ञ डॉ. सुकुमार विश्वास हे होते.
-
अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून यांना मान दिला जातो. – स्कॉड्रन लिडर – राकेश शर्मा (सोयुझ टी- ११)
-
मानवास अंतराळात पाठविणारा भारत हा १४ वा देश, तर राकेश शर्मा १३८ वा अंतरिक्ष ठरला.
-
अंतराळात जाणा-या पहिल्या भारतीय महिला – कल्पना चावला (जन्म कर्नुल-हरियाणा) २० नोव्हे. १९९७ रोजी अवकाशात जाणा-या कोलंबिया या अवकाशात या यानाद्वारे प्रवास केला.
-
कोलंबिया दुर्घटनेनंतर अमेरिकेने डिस्कव्हरी हे स्पेस शटल अंतराळात पाठविले.
-
कल्पना चावला नंतर नासामध्ये संशोधन करणारी दुसरी भारतीय महिला – सुनिता विल्यम्स.
-
दोन वेळा अवकाशात भ्रमण करणा-या पहिल्या भारतीय महिला - कल्पना चावला
-
कोलंबिया यान पृथ्वीवर उतरतांना अपघातग्रस्त होवून सात अंतराळविरासह मृत्युमुखी – १ फेब्रु, २००३
-
केवळ हवामानविषयक अभ्यास संशोधन व निष्कर्ष यांच्याशी निगडीत असा भारताचा पहिल्या उपग्रहाचे नाव – मॅट सॅट (मॅट सॅट चे नामकरण – कल्पना – १ ) १२ सप्टेंबर,२००२
-
१५ ऑगस्ट २००३ ला भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून चंद्रायान (सोमयान) ची घोषणा केली.
-
११ सप्टेंबर २००३ ला मिशन चंद्रयानाला मंजूरी दिली. चांद्रयान – १ ही भारताची पहिली चांद्रमोहीम आहे. दि. २२ ऑक्टो. २००८ रोजी आंध्र प्रदेशामधील श्रीहरीकोटा येथिल सतीश धवन आंतरिक्ष केंद्रावरून सायंकाळी ६.२० वा. धृवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन ( PSLV-C-11 ) द्वारे चांद्रायानचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
-
चांद्रयाण चंद्राच्या कक्षेत पोहोचले. – ८ नोव्हेंबर -२००८
-
भारताची मोहीम ही जगातील ६८ व्या चांद्र मोहीम होती. तर चंद्रयान पाठवणारा भारत हा देश ठरला – ६वा
अंतरिक्ष आयोगाचे प्रमुख केंद्रे-
१. विक्रम साराभाई स्पेस सेंटर – तिरूअनंतपूरम, केरळ (१९६२)
२. इंडिअन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट (ISRO) – बंगळूर (१९७१)
३. स्पेश ऍप्लिकेशन सेंटर (SAC) – अहमदाबाद – (१९६८)
४. श्री हरिकोटा रेंज, श्रीहरीकोटा (SHAR) (आंध्रप्रदेश) (नामकरण – सतिश धवन)
५. मास्टर कंट्रोल फॅसिलिट (मुख्य नियंत्रण सुविधा) – हसन (कर्नाटक)
६. इस्त्रो टेलिमेट्री ट्रेकिंग अँड कमांड कम्युनिकेशन नेटवर्क – बंगळूर
७. लिक्वीड प्रोप्युलुझन सिस्टिम युनिट – तिरूअनंतपूरम
८. डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन कम्युनिकेशन युनिट – अहमदाबाद
९. नॅशनल रिमोट सेसिंग एजन्सी – हैद्राबाद
१०. भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षमतेचे व्यापारीकरण करण्यासाठी अंतरिक्ष कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ची स्थापना करण्यात आली. – बंगळूर – १९९२
-
थुंबा रॉकेट केंद्र, थुंबा- तिरूअनंतपूरम
-
फिजीकल रिसर्च लॅब्रोटरी- अहमदाबाद (गुजरात) फिजिकल लॅब्रोटरी- दिल्ली
-
सॅटेलाईट लाँच व्हेईकल प्रोजेक्ट- तिरूअनंतपूरम –(केरळ)
-
आकाश विज्ञान विद्यापीठ – मुंबई.
भारतीय अंतराळ कार्यक्रम
भारतीय अंतराळ कार्यक्रम हा बव्हंशी नागरी आणि शांततापूर्ण कारणांसाठी आहे. यामध्ये ३ बाबींचा समावेश होतो.
१. उपग्रहांची बांधणी (दूरसंवेदन व दूरसंचार उपग्रह)
२. वाहकांची (लाँच व्हेईकल्स) निर्मिती आणि विकास
३. उपग्रहांना कक्षेत स्थिर करणे
-
भारतीय सुदूरसंवेदन उपग्रह (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट)- यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० कि. मी. (लोअर्थ आर्बीट) अंतरावरून निरिक्षण करण्याची व्यवस्था असते. यात पृष्ठभागांवरील वस्तूंची विकीरणाद्वारे(Radiation) माहिती मिळवितात. पृथ्वीच्या पृष्ठभागाला प्रत्यक्ष स्पर्श न करताही माहिती मिळविता येते असल्याने त्यास सुदूर संवेदन असे म्हटले जाते. सुदूर संवेदनाद्वारे विस्तृत भुभागाची सुव्यवस्थित व अचूक माहिती अल्पावधीत मिळविता येते.
-
भारताने IRS उपग्रहाद्वारे १९८८ पासून माहिती मिळण्यास सुरूवात केली. हे उपग्रह ध्रुवीय कक्षेत सोडतात. ते दक्षिण-उत्तर असे भ्रमण करतात व पृथ्वीभोवती ४ ते ५ दिवसांत एक फेरी पूर्ण करतात.
-
मे १९९७ IRS-P 4 मध्ये किंवा ओशियन सॅट PSLV – C 2 या वाहकाद्वारे श्रीहरीकोटा येथून सोडला. ओशियन सॅटच्या प्रक्षेपणाने भारताने आपले लक्ष भूपृष्ठावरून समुद्रविषयक भागावर केंद्रीत केले.
-
PSLV – C2 हे पहिले वाहक होते. ज्याद्वारे इतर देशांचे उपग्रह सोडण्यात आले उदा. –जर्मनी, द. कोरिया
दूरसंवेदनाचे महत्व व उपयोग-
१. उपग्रहाद्वारे एकाचवेळी अनेक गोष्टींचे निरीक्षण करता येते उदा. – खनिजे व नैसर्गिक तेल व वायु इ.
२. पिकाखालील क्षेत्र, पुराची पूर्वसुचना, नैसर्गिक खनिजे, हिमालयातील नद्या, हिमरेषांची हालचाल इ.
३. कृषी क्षेत्र – भूमी उपयोग, भाकित रोगांचे प्रमाण, टोळ धाडींची हालचाल, सिंचनासाठी धरणातील पाण्याची उपलब्धता इ. बाबींची माहिती मिळते.
४. प्लॅक्टनच्या उपलब्धतेनुसार समुद्रात मासेमारीची अधिक क्षमता कोठे आहे हे निश्चित करण्यासाठी.
५. वनक्षेत्र-वनक्षेत्र निश्चित करणे, झाडांच्या प्रजातिचे वितरण, प्राण्यांचे स्थलांतर, वणव्यांवर लक्ष ठेवणे इ.
६. २४ तास अगोदर हवामानाचा अंदाज वर्तविता येतो.
७. दूरसंवेदनाचे व्यापारी उपयोग- IRS द्वारे पुरविलेल्या डाटाच्या मार्केटिंगसाठी अंतरिक्ष कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले. अंतारिक्ष कॉर्पोरेशच्या करारामुळे भारतास १ बिलियन डॉलर इतकी प्राप्ती होईल.
८. कर्नाटक पोलिसांच्या टास्क फोर्सने चंदनचोर विरप्पनचा मागोवा घेण्यास दूरसंवेदनाचा डाटा वापरला होता. त्याप्रमाणे लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा थरच्या वाळवंटात शोध लावण्याकरिता दूरसंवेदन उपग्रहांच्या प्रतिमा वापरल्या.
भारतीय दूरसंचार उपग्रह व्यवस्था / Indidan National Satellite System ( INSAT)
-
दूरसंचार उपग्रह भूस्थिर - (Geo-Stationary) हा उपग्रह असून पृथ्वीपासून ३६ हजार कि. मी. इतक्या उंचीवर स्थिर केलेले असतात. पृथ्वीवरील निश्चित बिंदूवर (देशावर) हे उपग्रह स्थिर असून पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाइतकाच त्याचा वेग असतो. म्हणजेच भूस्थिर उपग्रह २४ तासात पृथ्वीभोवती १ फेरी पूर्ण करतात. हे उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात.
-
या उपग्रहाची निर्मीती – प्रसार भारती कॉर्पोरेशन, भारतीय हवामान खाते, दूरसंचार विभाग यांच्या संयुक्तपणे इन्सॅट प्रणालीची निर्मिती केली जात असली तरी अवकाश विज्ञान मंत्रालयाकडे इन्सॅटची कार्यात्मक जबाबदारी सोपविली आहे.
-
इन्सॅट उपग्रह प्रणालीची सुरूवात १९८२ मध्ये झाली. सध्या इन्सॅटची चौथी पिढी अवकाशात स्थिर करण्याचे कार्य चालू आहे.
१. इन्सॅटची पहिली पिढी – इन्सॅट- १ - अ, १- ब, १- क, १- ड,
२. इन्सॅटची दुसरी पिढी – इन्सॅट -२-अ,२-ब, २-क, २-ड, २-इ,
३. इन्सॅटची तिसरी पिढी- इन्सॅट – ३-ब, ३-क, ३-अ, ३-इ,
४. इन्सॅटची चौथी पिढी –
१) इन्सॅट – ४- अ दि. २५ डिसेंबर २००५ रोजी प्रक्षेपण
२)इन्सॅट – ४-ब, दि. १० मार्च २०१० रोजी प्रक्षेपण
३) इन्सॅट- ४ – क,दि. १० जुलै २००६ रोजी GSLV-F-02 , द्वारे श्रीहरी कोटा येथून GSLV- F- 04 द्वारे येथून यशस्वी प्रक्षेपण केले. याचा उपयोग डी. टी. एच सेवांचा विकास करण्यासाठी होणार आहे.
उपग्रह प्रणालीचे व्यावहारिक उपयोग-
१. दूरदर्शन देशातील ९०% लोकांपर्यंत पोहचू शकते. याचे श्रेय इन्सॅट उपग्रहाकडे जाते. इन्सॅट २ मुळे दूरदर्शन सेवा अग्नेय व मध्य आशियापर्यंत पोहचू शकते.
२. इन्सॅटमुळे देशातील लहानमोठी ठिकाणे दूरसंपर्क योजनेमुळे जोडली गेली आहेत.
३. हवामानाचा अंदाज वर्तविणे, आकाशवाणीचे प्रसारण, माहितीचे वहन, टेलिप्रिंटर, संगणक जाल, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यास इंटरनेट जाल यांसाठी उपयोगी आहे.
४. शोध आणि मदत कार्यांसाठी – जहाजांद्वारे संकटकालीन संदेश पाठवून मदत कार्य मिळविता येते.
भारतीय प्रेक्षपक वाहकांचा विकास ( लॉंच व्हेईकल)
-
उपग्रहांचे प्रक्षेपण व संरक्षण क्षेत्रासाठी प्रक्षेपक वाहकांचे अत्यंत महत्व आहे.
-
भारताने १९८० पासून प्रक्षेपक वाहनांच्या निर्मितीला सुरूवात केली.
SLV- सॅटेलाईट लाँच व्हेइकल – ३०० कि. मी.
ASLV- ऍग्युमेटेड सॅटेलाईट लाँच व्हेइकल – ७०० कि. मी.
PSLV- पोलार सॅटेलाईट लाँच व्हेइकल – १००० कि. मी.
GSLV - जियोसॅक्रोनाईस सॅटेलाईट लाँच व्हेइकल- ३६००० कि. मी
-
या चारही पिढ्यांतील प्रक्षेपक वाहनांची भारताने यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. प्रक्षेपक वाहनातील इंधन तंत्रज्ञानावरही भारताने प्रभुत्व मिळवले आहे.
प्रक्षेपक वाहनांचे उपयोग व महत्व
१. भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण कमी खर्चात होऊ शकते.
२. इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडून परकीय चलनाची प्राप्ती होते.
३. भारताला हेरगिरीसाठी स्वतःचे उपग्रह सोडता येतील.
४. PSLV च्या यशस्वी प्रेक्षपणानंतर भारताची आंतरखंडिय क्षेपणास्त्राची क्षमता दिसून येते.
-
अग्निबाणाच्या ज्वलन कोटीचे तापमान २०००० C असते, त्यामुळे ज्वलन कोटीसाठी ग्रॅफाइट वापरतात.
-
भारतातील सर्वात मोठे कॉम्प्युटर नेटवर्क, अग्नीबाण व उपग्रह जुळणी केंद्र, ते उड्डाणास योग्य आहे की नाही याचा निर्णय, आवश्यक इंधन निर्मिती प्रकल्प श्रीहरीकोटा येथे आहे.
-
रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी सेंटर – उटकमंड
-
भूस्थिर उपग्रह पृथ्वीभोवती एक फेरी २४ तासात पूर्ण करतात तर इतर उपग्रह १ फेरी पूर्ण करतात – ९० मिनिटांत
-
भारतीय बनावटीचे पहिले अंतरिक्ष प्रक्षेपन वाहन- SLV-3
-
इन्सॅट प्रक्षेपणानंतर नियंत्रणाची जबाबदारी- हसन (कर्नाटक)
-
धोक्याची सुचना देणारी यंत्रणा असणारा जगातील अवकाशात फिरणारा एकमेव उपग्रह – इन्सॅट 2A
-
अग्निबाणाच्या कार्यपध्दतीचे मुलत्वांचे वर्णन करणारा शास्त्रज्ञ – जिओलोव्हस्की (USSR)
-
अग्नी बाण शास्त्राचा जनक, पहिला द्रवरुप इंधनावर चालणारा अग्निबाण तयार करणारा शास्त्रज्ञ ; गोगार्ड
-
USA ची मंगळावरील मालिका - व्हायकींग
-
राज्यात रिमोट सेन्सीग ऍप्लीकेशन - नागपूर (१९८८)
-
कौरु (कोअरु) प्रक्षेपण स्थळ फ्रेंच गियाना (द. अमेरिका ) मध्ये आहे.
-
चीनने १५ आक्टो. २००३ मध्ये पाठवलेले यान -शेनझाऊ -V
-
याअंतराळ्याद्वारे अंतराळ्यात पाठविलेला पहिला अंतरिक्ष यात्री- यांग लीवी.
भारताचा उपग्रह कार्यक्रम - एक दृष्टीक्षेप
क्र. उपग्रह |
प्रक्षेपण वाहन |
प्रक्षेपण दिनांक |
कार्य |
|
१. आर्यभट्ट २. भास्कर-१ ३. रोहिणी ४. रोहिणी RS 1 ५. रोहिणी RSD 1 ६. ऍपल ७. भास्कर -२ ८. इन्सॅट १ ए ९. रोहिणी RSD२ १०.इन्सॅट १ बी ११.श्रोस-१ १२.इन्सॅट १ बी १३.श्रोस -२ १४.इन्सॅट १सी १५.इन्सॅट १ डी १६.IRS -१ए १७.श्रोस ३ १८.इन्सॅट २ ए १९.इन्सॅट २ बी २०.IRS -१ २१.श्रोस सी. २२.I.R.S.P-2 २३.इन्सॅट २सी २४.I.R.S-1c २५.I.R.S-P3 २६.एन्सॅट २ डी २७.I.R.S. D -१ २८.इन्सॅट २ ई. २९.I.R.S. P-4 ३०.इन्सॅट ३ बी ३१.सी-सॅट ३२.टी. ई.एस. ३२ ३३.इन्सॅट ३ सी ३४.मॅट –सॅट(कल्पना) ३५.इन्सॅट ३ ए. ३६.जी –सॅट २ ३७.इन्सॅट ३ ई ३८.रिसॉट सॅट ३९.एज्युसॅट ४०.हॅमसॅट व कार्टोसॅट ४१.इन्सॅट ४ सी ४२.कार्टोसॅट – २ ४३.इटलीचा एजाईल ४४.इन्सॅट-४ ४५.पोलरीज(इस्त्राईल) ४६.कार्टोसॅट -२ए ४७.चंद्रयाण -१ |
इंटर कॉसमॉस U.S.S.R. इंटर कॉसमॉस U.S.S.R. एस. एल.वी-३ (भारत) एस. एल.वी-३ (भारत) एस. एल.वी-३ (भारत) एरियन ( युरोपिय अंतरिक्ष एजंसी) इंटर कॉसमॉस U.S.S.R. डेल्टा एस. एल.वी-३ (भारत) चॅलेजर शटल एस. एल.वी- (भारत) वास्तोक एस. एल.वी- (भारत) एरियन डेल्टा सेव्हियत रॉकेट एस. एल.वी-४ (भारत) डेल्टा ( सं. रा. अमेरिका) एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी) पी. एस. एल. व्ही.(भारत) एस. एल.वी- ४(भारत) एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी) मोलनिया पी. एस. एल. व्ही.डी.३ एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी पी. एस. एल. व्ही.डी१ एरियन पी. एस. एल. व्ही.सी २ एरियन ५ पी. एस. एल. व्ही.डी. १ पी. एस. एल. व्ही.सी. ३ एरियन -४ पी. एस. एल. व्ही.सी.(भारत) एरियन ५ (युरोपिय अंतरिक्ष एजंसी) जी. एस. एल.व्ही. एरियन ५ (युरोपिय अंतरिक्ष एजंसी) पी. एस. एल. व्ही.सी.-५ (राज्यसेवा २००६) पी. एस. एल. व्ही.सी.६ जी. एस. एल.व्ही.-०२ पी. एल. व्ही.सी-७ पी.एस. एल. व्ही.एफ -४ सी.आर. जीएल. व्ही.एफ – ४ पी.एस. एल. व्ही.एफ –४ पी.एस. एल.व्ही.एफ-१० पी.एस. एल.व्ही.एफ-११ |
१९/४/७५ ७/६/७९ १०/८/७९ १८/७/८० ३१/५/८१ १९/६/८१ २०/११/८१ १०/४/८२ १७/४/८३ ३०/८/८३ २४/३/८७ १९/३/८८ १३/७/८८ २२/७/८८ १२/६/९० २९/८/९१ १९/५/९२ १०/७/९२ २३/७/९३ २०/८/९३ ४/५/९४ १५/१०/९४ ७/१२/९५ २८/१२/९५ २१/३/९७ ४/६/९७ २९/९/९७ ३/४/९९ २६/५/९९ २७/३/२००० १८/४/२००१ २२/१०/२००१ २४/१/२००२ १२/९/२००२ १०/४/२००३ ८/५/२००३ २८/९/२००३ १७/१०/२००३ २९/९/२००४ ५/५/२००५ १०/७/२००६ १०/१/२००७ २३/४/२००७ २/९/२००७ २१/१/२००७ २८/४/२००८ २२/१०/२००८ |
वैज्ञानिक पृथ्वी सर्वेक्षण पृथ्वी सर्वेक्षण (अयशस्वी) पृथ्वी सर्वेक्षण वैज्ञानिक (अयशस्वी) संचार पृथ्वी सर्वेक्षण बहूउद्देशिय वैज्ञानिक बहूउद्देशिय तंत्रज्ञानिक दूरसंवेदी तंत्रज्ञान (अयशस्वी) बहूउद्देशिय (अयशस्वी) बहूउद्देशिय दूरसंवेदी तंत्रज्ञान बहूउद्देशिय बहूउद्देशिय दूरसंवेदी(अयशस्वी) तंत्रज्ञान दूरसंवेदी बहूउद्देशिय दूरसंवेदी दूरसंवेदी बहूउद्देशिय दूरसंवेदी व्यावसायिक समुद्र पर्यवेक्षण बहूउद्देशिय पृथ्वी सर्वेक्षण औद्योग्यिक पर्यवेक्षण बहूउद्देशिय हवामान सर्वेक्षण बहूउद्देशिय बहूउद्देशिय बहूउद्देशिय दूरसंवेदी शिक्षण बहूउद्देशिय अयशस्वी यशस्वी सफल डी.टी.एच. लष्करी वापर यशस्वी |
|
टिप ; पी.एस.एल.व्ही.-सी ने एकाच वेळी १० उपग्रह आकाशात सोडण्याचा भारताने पराक्रम केला. त्यात त्याने दोन भारतीय व आठ देशांचे आठ इतर उपग्रह होते.
भारत - संरक्षण सिध्दता
भारताची संरक्षण सिध्दता
-
भारतीय सेनेचा सर्वोच्च कमांडर – राष्ट्रीय
-
भारतीय सेना व समक्षक अधिकारी-
भूदल |
नौदल |
वायूदल |
जनरल ले. जनरल मे. जनरल ब्रिगेडिअर कर्नल ले. कर्नल मेजर कॅप्टन लेफ्टनंट |
ऍडमिरल व्हॉ ऍडमिरल रियर ऍडमिरल कमोडोर कॅप्टन कमांडर ले. कमांडर लेफ्टनंट सब लेफ्टनंट |
एअर चीफ मार्शल एअर मार्शल एअर व्हॉ मार्शल एअर कमोडर ग्रुप कॅप्टन विंग कमांडर स्क्वॉड्रन लिडर फ्लाईट लेफ्टनंट फ्लाईंग ऑफिसर |
भारतीय नौसेना ;
-
भारतीय नौसेनेच्या तीन कामांड असुन त्याचे मुख्यालय –
१) दक्षिण कमांड – कोच्ची
२) पूर्व कामांड – विशाखापटणम
३) पश्चिम कमांड – मुंबई
४ जानेवारी २००७ रोजी नेव्हलबेस कारवार येथे नियुक्ती केलेली लँडींग शिप टँक –आय. एन. एस. शार्दुल
भारतीय नवसेना जगातील दुसरी सर्वात मोठी – पाचव्या क्रमांकाची नौसेना आहे.
भारतीय नौसेनेच्या मारिन कंमांडना म्हणतात – मारकोस
२२ जुन २००७ रोजी भारतीय नौसेनेत दाखल पहिला लँडिग प्लॅटफॉर्म – डॉक आय.एन.एस जलावश
-
भारतीय नौदलातील पहिली विमानवाट युध्द नौका – विक्रांत
अति वेगवान ( ४८ नॉटीकल मैल ,/ तास) युध्द नौकेचे १ मार्च ९७ मध्ये जलावरण झाले. – आय. एस.प्रहार
नौसेनेच्या युध्दनौकांना शत्रुच्या क्षेपणास्त्र हल्यापासुन वाचविण्यासाठी स्वदेशी संगणकीकृत स्वयंचलीत मॅल्टि लाँचर प्रणाली – कवच
-
भारतीय नौदलातील दुसरी विमानवाट युध्दनौका – विराट ( विक्रांत ही नौका नौदलातून बाहेर काढण्यात आली असून तीच्यावर तरंगते म्युझीयम सुरु करण्यात आले आहे.)
-
भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्र वाहू बोट – विभूती
-
भारतीय बनावटीची दुसरी क्षेपणास्त्र वाहू बोट- विपूल
-
भारतीय बनावटीची तिसरी क्षेपणास्त्र वाहू बोट – नाशक
-
संपूर्ण भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र बोट निर्मिती होत आहे- ब्रम्हपुत्रा
-
भारतीय बनावटीची पहीली पाणबुडी – शाल्की
-
भारतीय बनावटीची दुसरी पाणबुडी - शंकुल
-
भारताची पहीली आण्विक पाणबुडी – आय. एन. एस. चक्र
-
भारताचा सर्वात मोठा आत्याधूनिक नाविक तळ - आय. एन. एस. राजाजी
-
भारतातील सर्वात मोठा व आत्याधूनिक लष्करी तळ कर्नाटक येथील कारवार येथे विकसीत होत असुन त्याचे सांकेतीक नाव – सी बर्ड आली.३१ मे २००५ रोजी औपचारीक रित्या नौसेनेत सामील करण्यात आले.
-
भारतातील सर्वात मोठी युध्द नौका – आय एन एस दिल्ली. ती तयार करण्यात आली – माझगांव डॉक (मुंबई)
-
एप्रिल २००३ मध्ये नौदलात सामील करण्यात आलेली रडार व सोनार (SONAR) यांच्या कक्षेत न येणारी भारतीय बनावटीची क्षेपणात्र सज्ज पहिली स्टेल्थ युध्द नौका – शिवालिक
-
भारतीय नौदलातील युध्द नौका – ब्रम्ह पुत्रा, गंगा, दिल्ली, राजपुत, तलवार इ.
नौका |
नौदलात सामिल सहकार्य |
आय.एन.एस. दिल्ली आय.एन.एस.प्रहार घडियाल युध्द नौका आय.एन.एस.म्हैसुर एडमिरल गोर्श्कोव्ह आय.एन.स. तलवार |
१५ नोव्हे. १९९७ माझगांव डॉक मार्च १९९७ गोवा शिपयार्ड, रशियाच्या सहकार्याने १४ फेब्रु. १९९७ गार्डनरिच जहाज, कलकत्ता येथे बांधण्यात आले २ जुन १९९९ माझगांव डॉक जाने २००४ ला खरेदी करार रशियन बनावटीची विमान वाहू युध्द नौका १२ ऑगस्ट २००३ रशियाच्या सहकार्याने |
-
सह्याद्री – शत्रुच्या रडारला चकविणरी युध्द नौका मे २००५ मध्ये माझगांव डॉक (मुंबई) येथुन भारतीय नौदलात सामील कराण्यात आली.
-
झामोरीन एप्रिल २००५ मध्ये नौदलात सामील झाली.
-
अत्याधुनिक रडार – राजेंद्र
-
भारताने विकसित केलेले एकाच वेळी अनेक दिशांना स्फोटके सोडू शकणारे प्रक्षेपक यंत्र – अग्नि वर्षा
-
भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक – डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
-
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना – १ फेब्रु १९७८
भारतातील लढाऊ विमाने ; -
-
भारताचे पहिले लढाऊ विमान – नॅट
-
फ्रान्सकडून घेतलेल्या मिराज – २००० या लढऊ विमानास देण्यात आलेल्या भारतीय नाव – वज्र
-
रशियाकडून घेतलेल्या मिग – २१ या विमानाचे भारतीय नाव – बाझ
-
हिंदुस्तान एअरोनॉटिक्सने तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची कमी वजनाचे आत्याधूनिक हेलिकॉप्टर्स – ALH
भारतीय विमान दलातील महत्वाची विमाने – कॅनबेरा, हंटर, अजित, किरण, चेतक, मिग -२३, मिग-२७, मिग -२९, मिराज -२०००, सुखोई-३० के, सुखोई -३० एम.के. आय.
-
पुर्णतः स्वदेशी बनावटीचे हलक्या वजनाचे विकसित केलेले सुपरसॉनिक लढाऊ विमान –तेजस, स्वदेशी इंजिन – कावेरी ( चाचणी – १ऑगस्ट २००३)
-
सध्या भारतीय विमानदलाकडे असलेले अमेरिकन बनावटीचे वैमानिक विरहीत लक्ष्य केंद्रीत विमाने – चकोर
-
भारताने विकसीत केलेले लक्ष्य केंद्रीत करणारे विमान – निशांत
-
भारताने विकसीत केलेले वैमानिक विरहीत विमान (PTA – Poiletles Target Aircraft) लक्ष्य
सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील लष्करी सामग्री निर्मीती केंद्रे ;-
-
हिंदुस्थान एअरोनॅटिक्स लि. (HAL) – स्थापनाः १९६४, मुख्यालय; बंगलोर १० जुलै १९५० पासुन कंपनी प्रायव्हेट लि. पासून पब्लीक लि. करण्यात आली, तिच्या ६ राज्यात १२ विभाग आहेत. त्यापैकी बंगलोर येथे ५, नाशिक (ओझर), कोरापूत, कारवा, कानपूर, लखनौ, बराकपूर व हैद्राबाद इ.
-
उत्पादने – डोनियार -२२८, मिग २१ एम किंवा जग्वार इ.
-
हेलिकॉप्टर – चीता, चेतक इ.
-
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. (१९५४) – हैद्राबाद,चैन्नई, बंगलोर ( कर्नाटक ), गाजियाबाद (उ.प्र.), पुणे, तळोजा (महाराष्ट्र ) पंचकूला (आंध्र प्र), कोटवारा (उ.प्र).
-
भारत अर्थस् मुव्हर्स लि. (१९६४) – बंगलोर, म्हैसुर (तिन्ही कर्नाटक)- उत्पादने – बुलडोजर, डम्पर, लोडर, स्केपर, मोटार ग्रेडर इ.
-
माझंगाव डॉक लि. मुंबई,१९६०-युध्दनौका तयार करणे, व्यापारी जहाजे बनविणे.
-
गोवा शिपयार्ड लि.,स्थापना ; १९५७ (वास्को- दि- गामा) –जहाजांची दुरुस्ती व मध्यम दर्जाचे जहाज बनविणे.
-
गार्डन रिच शिप बिल्डर्स ऍन्ड इंजिनियर्स लि. – मुख्यालय - कलकत्ता, रांची येथे डिसेल संयत्र आहे. स्थापना १८८४, संरक्षण विभागाकडे १९६० मध्ये हस्तांतरण करण्यात आले.
-
भारत डायनामिक्स लि. १९७०, हैद्राबाद शाखा-कांचनबाग (हैद्राबाद), भानूर (मेडक)
कार्यः मिसाईल उत्पादने व तंत्रज्ञान विकसित करणे.
-
मिश्र धातू निगम लि. २० नोव्हे १९७३ हैद्राबाद - विमाने, अवकाश संशोधन, ऊर्जा, रसायने इ. कार्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे धातूम मिश्र धातू निर्माण करणे.
-
प्रागा टूल्स – हैद्राबाद (आंध्रप्रदेश)
-
हेवी व्हेईकल्स फॅक्टरी – आवडी (तामिळनाडू)
-
भारताने भक्कम सुरक्षा व्यवस्था बनवण्याच्या हेतूने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची स्थापना केली. – (DRDO) १९५८
-
संरक्षन, संशोधन आणि विकास कार्यक्रम – १९८०
या विभागाअंतर्गत, वैमानिकी, रॉकेट, मिसाईल, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे, इंजिनिअरिंग, युध्दनौका इ. चा विकास अंतर्भुत आहे.
-
भारताचा एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम जाहिर करण्यात आला – २७ जुलै १९८३
-
पृथ्वी – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची मारक क्षमता-१५० ते २५० कि. मी., वजन १४ टन. हे क्षेपणास्त्र SLV-3 चे रूपांतरण आहे.
पृथ्वीची पहिली यशस्वी चाचणी-२५ फेब्रु. १९८८
-
पृथ्वी १ – मारक क्षमताअ १५० कि. मी वजन – १००० कि. ग्रॅ. १९८९ मध्ये अंतिम चाचणी, १९९२ पासून उत्पादनास सुरूवात, १९९६ पासून भू-सेनेत सामील करण्यात आले.
-
पृथ्वी -२ मारक क्षमता-२५० कि. मी., वजन ५०० कि. ग्रॅ. याची तुलना रशियाच्या स्कॅड क्षेपणास्त्राबरोबर केली जाते.
-
त्रिशुल- जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र मारक क्षमता- ५०० मी. ते ९ कि. मी. आहे. हे तिन्ही- नौ सेना, भू-सेना व वायु सेना यांसाठी विकसित करण्यात आले आहे. विमानभेदी क्षेपणास्त्राचा पल्ला ३ कि. मी असतो.
-
आकाश- जमिनीवरून आकाशात मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र. मारक क्षमता – २५ कि. मी. अमेरिकेचे पॅट्रियट, रशियाचे स्कॅड, पाकिस्तानचे हत्फ – १, हत्फ- २, चीनचे एम-११ या क्षेपणास्त्रांना नष्ट करण्याचे सामर्थ्य आकाश मध्ये आहे.
-
अग्नी -१-हैद्राबादने केलेले मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.
मारक क्षमता – १२०० ते २५०० कि. मी. वजन – १६ टन. अग्नीची पहिली चाचणी २२ मे १९८९ रोजी घेण्यात आली. अंतिम चाचणी ९ जाने. २००३ ला घेण्यात आली.
-
अग्नी – २ इंटरमिडिएट – रेंज बैलिस्टिक मिसाईल (IRBM) मारक क्षमता ३००० ते ३५०० कि. मी. पर्यंत, वजन – १००० कि. ग्रॅ. २५०० कि. मी. हे अंतर ते केवळ ११ मि. पार करते. पहिली चाचणी- १७ जाने २००१
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असणारे देश – अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, इस्त्राईल इ.
-
नाग – भारताने विकसित केलेला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र. मारक क्षमता – ४ कि. मी. हे एकदा सोडल्यावर नियंत्रणाची गरज भासत नाही. म्हणून यास फायर अँड फरगेट (Fire & Forget) असे म्हटले जाते.
-
सूर्य – लांब पल्ल्याचे अंतरखंडिय क्षेपणास्त्र (Inter Continentel Ballastic Missile –ICBM) मारक क्षमता – ५००० कि. मी., हे PSLV च्या आधारावर विकसित केले जात आहे.
-
धनुष्य – हे समुद्री जहाजावरून सोडले जाणारे जमिनीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र (Ship Launched Surfce Missile – SSM) आहे.
-
सागरिका – हे नौसेनेकरिता विकसित केलेले जहाजावरून सोडले जाणारे जहाज विरोधी मिसाईल आहे. (Anti Ship Missile – ASM) मारक क्षमता – ३५० कि. मी.
-
अरब – लढाऊ विमानातून सोडले जाणारे हवेतून हवेतच लक्ष्य भेद करणारे (Air Missile – AAM) हे क्षेपणास्र आहे. मारक क्षमता – ६० ते १०० कि. मी. आहे.
-
पिनाका – भारतीय भूसेनेसाठी विकसीत केलेले जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी यंत्रणा आहे.
मारक क्षमता ३९ कि. मी., एकावेळा सेकंदात बारा रॉकेट सोडता येतात.
-
अर्जुन – या अत्याधुनिक रणगाड्याचा विकास DRDO आणि हेवी व्हेईकल फॅक्टरी, आवडी यांनी संयुक्तपणे केला आहे. १९९६ मध्ये सेनेत सामील करण्यात आले. १५० अश्वशक्ती, वजन ५८.५ टन सपाट रस्त्यावर ८० कि.मी प्रती तास तर खाचखळग्याच्या रस्त्यावर ४० कि.मी. प्रति तास वेगाने चालू शकतो.
-
जगातील आधुनिक रणगाडे – एम्ब्रास, लियोपर्ड, लेसलर्स इ. चॅलेजर्स आणि मार्कावा यांच्यापेक्षा शक्तीशाली समजला जातो.
-
हंस ३ – एकावेळी दोन माणसे बसू शकणारी हलकी विमाने
उपयोग – वैमानिक प्रशिक्षणासाठी, जन – ७५० कि. ग्रॅ., वेग २१५ कि.मी./ प्रती तास
-
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. गाजियाबादने विकसीत केलेले अत्याधुनिक रडार – इन्द्र -२
-
ब्रम्होस – भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यामानाने तयार केलेले क्षेपणास्त्र होय. यशस्वी चाचणी – १२ फेब्रु – २००३, मारक क्षमता – २९० कि.मी. ध्वनीपेक्षा सुपर सॉनिक जास्त वेगवान आहे. भारताची ब्रम्हपूत्रा नदी व रशियाची मॉस्को नदी यावरून ब्राम्होस हे नाव देण्यात आले, उत्पादन – हैद्राबाद.
-
श्येन- विशाखापट्टनम येथील नेव्हल ऍन्ड सायंटिफिक लॅबोरेटरीने श्येन हा अत्याधुनिक पाणतीर (टोरपॅडो) विकसित केला आहे. हे हेलिकॉप्टर व युध्दनौकावर तैनात करण्यात येतो. अशाच प्रकारची स्वदेशी पाणतीर असणारे देश – अमेरिका, चीन, जर्मनी, इटली आणि रशिया इ.
-
पिछोरा – जमिनीवरून जमिनीवर, मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र, हे शत्रुच्या विमानाला २० कि.मी. अंतरावरून मारण्याची क्षमता आहे.
-
इन्फॉकटी. ८०- वेगवान युध्दनौका -२४ जुन १९९८ पासून नौदलात सामील, इस्त्राईलच्या सहकार्याने विकसित इन्फॉकटी- ८० ही नौदलातील आति वेगवान नौका आहे.
* संकीर्ण *
-
डिफेन्स मेटॅरॉलॉजिकल लॅबोरेटरीने तयार केलेले अत्याधुनिक चिलखत – कवच
-
भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा – विजयंता
-
इतर रणगाडे – अर्जुन (अत्याधुनिक स्वदेशी) टी – ५५, टी- ७२ (रशियन बनावटीचे) इ.
-
भिष्म ( टी – ९० एक्स) रशियाच्या सहकार्याने बनविलेल्या रणगाडा जानेवारी २००४ मधील भारतीय सेनेत सामील झाला.
भारतातील सैनिकी प्रशिक्षण संस्था-
१. नॅशनल डिफेन्स कॉलेज – नवी दिल्ली, २७ एप्रिल १९६०
२. राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज – डेहराडून (उत्तरांचल)
३. आर्मी कॅडेट कॉलेज – डेहराडून (उत्तरांचल)
४. नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी – खडकवासला ( पूणे )
५. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग – दापोली (पूणे)
६. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज – पुणे
७. ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी – चेन्नई (तामिळनाडू)
८. एअर डिफेन्स ऍन्ड गाइडेड मिसाईल स्कूल – गोपाळपूर (ओरिसा)
९. स्कुल ऑफ आर्टिलरी – देवळाली (नाशिक-महाराष्ट्र)
१०.इंडियन मिलीटरी ऍकॅडमी – डेहराडून (उत्तरांचल)
११.आर्मी आर्डनन्स कोअर स्कुल – जबलपूर (मध्यप्रदेश)
१२.कॉलेज ऑफ मटेरिअल मॅनेजमेंट – पुणे
-
नेव्हल सायंटिफिक ऍण्ड टेक्निकल लॅब्रोटरी – विशाखापट्टणम
-
हॉवित्झर तोफा बोफर्स कंपनीकडून आयात करण्यात आल्या. बोफर्स कंपनी ही कोणत्या देशाची – स्वीडन
-
अग्नीबाणात इंधन म्हणून वापरतात – द्रवरूप ऑक्सिजन
-
बुलेट प्रुफ जॅकेट भेदून जाणा-या गोळ्यांना आवरण असते. – टेफ्लॉन
-
युध्दात वापरला जाणारा विषारू वायु – फॉस्जिन